मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle
अ वुमन्स करेज
मी भक्ष किंवा बळी ठरण्याचं नाकारते - जॅकलिन गोल्ड जॅकलिन गोल्ड ही `अॅन समर्स', या एका प्रचंड यशस्वी किरकोळ विक्री दुकानांच्या साखळीची धडाडीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. `कॉस्मोपॉलिटन' मासिक आणि `डेली मेल' वृत्तपत्रानं ब्रिटनमधली सवा|त प्रभावशाली स्त्रियांपौकी एक म्हणून तिची निवड केली आहे, आणि ब्रिटनमधल्या सवा|त यशस्वी महिलांमध्ये तिची गणना होते. पण तिला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. `अ वुमन्स करेज'मध्ये पहिल्यांदाच तिनं आपली संपूर्ण आणि अद्भुत कहाणी लोकांसमोर मांडली आहे. सावत्र वडिलांनी लहानपणी केलेल्या छळाचं- तेव्हापासून तिच्या मानगुटीवर बसलेलं भूत तिनं कसं उतरवलं, खरं प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात तिच्या आयुष्यामध्ये घडलेली आणि तिचं हृदय भग्न करणारी अनेक वादळी प्रेमप्रकरणं आणि मूल होण्यासाठी, आपलं स्वत:चं कुटुंब निर्माण करण्यासाठी तिनं जे अयशस्वी प्रयत्न केले, त्यातून पदरी आलेली निराशा आणि दु:ख, हे सगळं तिनं मोकळेपणानं सांगितलं आहे. ही एक ज्वलंत आणि प्रभावी कथा आहे. आपलं खरं मूल्य आणि क्षमता खूप उच्च आहेत, हे जाणून असणार्या आणि ती पातळी गाठण्यासाठी प्रेरणा शोधत असलेल्या स्त्रियांसाठी हे पुस्तक म्हणजे एक मंगल स्तोत्र ठरेल.
.jpg)