दारु
मित्राहो...!
दारु बद्दल कमी लिहणं म्हणजे दारुचा तसेच पिणार्याचा अपमान केल्यासारख आहे. आतच एका मित्राने दारु या विषयावर mp3 file पाठवली. त्यातील चारोळ्या खाली देत आहे त्या तुम्हाला नक्कीच भावतील
पुन्हा त्या धूंद बार मधुन
मंद सुगंध दरवळेल
आणि पुन्हा एकदा हा
तळीराम वेड्यासारखा बडबडेल....!
प्रत्येकाला एक घर असावं
पिऊन रात्री परतण्यासाठी
प्रत्येक घराला ओसरी असवी
बायकोने हाकलं की बाहेर झोपण्यासाठी..!
दारुच्या गुत्त्यावर गावर्यांचा गराडा हाय
पण चौथीच्या पुस्तकात मात्र दारू बंदीवर धडा हाय...!
अशी वेळ येते जेव्हा कुणीच आपलं नसतं
म्हणुन जेव्हा आपण जेव्हा प्यायला बसतो तेव्हा ड्राय डे असतो....!
ज्याची जागा त्याला द्यावी भलती चूक करु नये
पीताना फक्त पीत रहावं चकण्याने पोट भरू नये...!
आपला आवाज दणक्याच हवा उगा लाऊडस्पीकर कशाला
आरं प्यायची तर देशी प्या इंग्लीश दारु कशाला...!
इंग्लीश दारु कितीही प्यावी
काही केल्या चढत नाही
देशी आपली जरशीच प्यावी पण
दोन दोन दिवस उतरत नाही...!
पाजणारा कोण असेल
तर दारु प्यायला अर्थे हाय...
आर्र्र जर स्वतःच्या पैशान प्यायला
मी काय मुर्खय...!
पीऊन पीऊन कधी कधी बेवडापण थकतो
मग काय..
ब्र्यांड बदलुन पुन्हा प्यायला बसतो....!
तसा मी श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावण मात्र दारु पितो
नॉन-व्हेज मात्र टाळतो....!
दारु पीणं असतो एक उत्सव
त्याचा ऊरुस होऊ नये..
आणि प्यायल्या नंतर आपला कुणी
वकार युनुस होऊ नये....!
दारु हेच जर जीवन नसेल
तर मेलेलं बर
पणं भीती वाटतेनं मरायची
मगं प्यायलेलं बरं....!
पीऊन पीऊन माझा देह झाला खराब
माझ्या पै प्याला अन. प्याला पै शराब..!
अत्तर गुलाब पुष्पांनी तिरडी माझी सजवा
पण उधळायची फुल मात्र दारुतच भिजवा...!
अंतयात्रेस माझ्या सारेजण प्यायलेले असावेत
चार खांदेकरी मात्र अजिबात शुध्दीत नसावेत...!
तो यम जरी आला मला स्वर्गात मला न्हायला
त्याला सांगा ना र्र् बाबा...
पिऊ देना मला शेवटचा मला एकच प्याला अन..एकच प्याला.........!
Cheers.. 
-- श्रीवर्धन ---
.jpg)
आलोच जरा पावशेर मारुन आणी
आलोच जरा पावशेर मारुन
आणी लिहितो भरभरुन
दारु मला सोडत नाही
मी दारुला सोडत नाही
नाते जपेल आयुष्यभर
संपेल फक्त सरणावर
मित्रहो पोचवाल मला
चार खांद्यावरुन प्रवासाला
दोन बाटल्या भरलेल्या
असु द्या माझ्या सोबतीला
(विषय दिलेला नाही)
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
पुनमवासीयांना खूप आवडेल हे लिखाण
संदीप खरे
मी बुद्धाला मारुन डोळा
भरतो माझा प्याला रे
जो प्याला तो गेला
जो ना प्याला तो ही गेला रे
अर्थ म्हणतो ' दारू दारू ! ! '
शब्द म्हणतो ' शॅम्पेन शॅम्पेन !! '
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
सरकार, वैज्ञानिक सगळेच
सरकार, वैज्ञानिक सगळेच म्हणतात "पाण्याचा अपव्यय टाळा. शक्य तितके कमी पाणी वापरा!" म्हणून त्यांच्या या सल्ल्याचा मान राखून सध्या आम्ही तीन त्रिकाळ बीअरच पीतो!
चीयर्स माडी!!
आयला
श्रावण मात्र दारु पितो
नॉन-व्हेज मात्र टाळतो....!
श्रामो, काय हो हे. तुमचे शिक्रेट ओपन झाले की हो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
च्यायला
च्यायला... नाही हो. यांनी आम्हाला ओळखलंच नाही. रागाचं प्रोफाईल रंगवतात, तसं झालं यांचं. काये, रागात अमूक सूर असतो आणि तमूक नसतो हे ठाऊक असणाऱ्याला राग कळतो, पण त्याची ओळख लागत नाही. तसं झालं हे.
श्रीवर्धनराव (हे राव हे नक्की. धागा दारूवरचा आहे), मी नॉनव्हेज टाळतो? कैच्याकैच राव. नीट वळख झालेली नाही अजून. बसा एकदा आमच्यासोबत निवांत. मग कळेल.
आमच्या जिव्हाळ्याचा विषय !!
आमच्या जिव्हाळ्याचा विषय !!
कधी काळी ढकलपत्रातुन एक चारोळी आली होती. आमच्या दु:खाचे वर्णन त्यात होते.
दारुडे खाली पडतात तेव्हा,
आवाज होत नाही|
ह्याचा अर्थ असा नाही कि,
त्याची हाडे मोडत नाहीत||
(पडल्यामुळे हात मोडलेला) सुक्या
चालता चालता जीवनात खूप प्रश्न
चालता चालता जीवनात खूप प्रश्न छळतात
पिताच मात्र दोन पेग प्रश्न दूर पळतात
चिकनचिली घेता चकणा,सारं मळभ दूर होतं
धुंदतेचं ते सुख निरभ्रतेतून झरू लागतं
म्हणती मित्र घे अजून एकाने काय होते
जीभ जड झाली तरी थोडी ग्लासात उरते
म्हणतो त्याला शेवटचीच पुन्हा हात नाही लावणार
आग्रहाने कोणी पाजेपर्यंत निर्धार नक्की टीकवणार
अशी आमची कहाणी कायम आम्ही प्यालेले
आणि वादळे आमची जिरवून उरले फक्त रिते पेले
-पुण्याचे पेशवे
" घेऊन ग्लास हाती " " टेबलावर
" घेऊन ग्लास हाती "
" टेबलावर तोंड वाजविशी "
" गुर्हाळ चर्चेची तासी "
" होय !! आम्ही पुनमवासी !!"
" तु घे रॉयल स्टॅग "
" मला हवी फ्रेश बियर "
" सोबतीला प्लेन चीजची बशी "
" होय !! आम्ही पुनमवासी !!"
" त्याला कोणी म्हणे प्रसन्न "
" त्याला कोणी म्हणे प्रसाद "
" नावे देण्याची सरसासरशी "
" होय !! आम्ही पुनमवासी !! "
" दुपारच प्लानिंग "
" आठवडाभराचा ताण "
" होई हलका पहिल्या घोटाशी "
" होय !! आम्ही पुनमवासी !! "
" दोस्त येतील .दोस्त जातील "
" कट्टे होतील, तंटे होतील "
" झगडा करू आणी मिटवु टेबलापाशी "
" होय !! आम्ही पुनमवासी !! "
रमतारमांना समर्पित ..............
आवशेचा घोव
तुज्या. क लिवलंय कं लिवलय. बाला फुडल्या पूनमकट्ट्याक तुजो घसा वल्ला करन्याची जिम्मेदारी आपली.
बाकी आम्हाला काय समर्पित केले आहे, कविता की पेग. साला कविता काय करायची आहे, तो पेग आण इकडे आणि हो प्लेन चीज एकटाच संपवू नको लेका, ते ही दे इकडे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मलाही थोडं प्लेन चीज ठेवा रे.
मलाही थोडं प्लेन चीज ठेवा रे.
-पुण्याचे पेशवे
मलासुद्धा! नंबर लावून ठेवायला
मलासुद्धा!
नंबर लावून ठेवायला काय जातंय!
मस्त आहे कविता...
मस्त आहे कविता...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
व्वा !
पीत नसलो तरी कविता वाचून प्याविशी वाटते.
शेक्-हर
बघता काय
सामील व्हा. (ह. घ्या हो.)
अवांतर: राजे, जोगांच्या फक्त सहीला चुकीचे असे टाचण देता येईल का? अंमळ चावट अर्थ निघतोय.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ख्ररं तर बहुआयामी वाक्य आहे
ख्ररं तर बहुआयामी वाक्य आहे हे.
-पुण्याचे पेशवे