एक झुंज वार्याशी हे पुलंच एक तुलनेन कमी लोकप्रिय नाटक, मी हे माझ्या महाविद्यालयीन आयुष्यातच वाचले, खरं सांगायचे तर तेव्हा झेपले नाही पण आपण काहीतरी अलौकीक वाचतोय याचा पुसटसा अंदाज नक्कीच आला. त्यानंतर अनेकवेळा हे नाटक वाचत गेलो आणि प्रत्येक वेळेला नविन, वेगळं उलगडत गेल.
हे खरंतर एक रुपांतरीत नाटक आहे, इथे रुपांतरीत हाच शब्द योग्य आहे कारण पुलं कधीही भाषांतर करीत नाहीत, केवळ भाषा वा लिपी न बदलता नाटकाची घटना, संघर्ष, पात्रे ईतकी बेमालुम उतरवतात की अगदी मुळ नाटक माहीत असेल तरी कुणाला शंकाही येउ नये कि ह्या कलाकृतीचा आत्मा अस्सल देशी नाहिये अशी, (अगदी हेच 'पिग्मॅलियन' संदर्भातही खरे आहे). 'झुंज'चा मुळ आधार म्हणजे "डोझोर्त्सेव' यांची 'द लास्ट अपॉइंट्मेंट' ही रशियन कलाकृती.
ह्या नाटकाला वरवर पाहता तसा काही खास विषयच नाहीये, पण ह्यातल्या संघर्षाची जातकुळीच वेगळी आहे. इथे पात्रे चारच, रंगमंचावर त्यांचे येणेजाणेही फारसे नाहीच, त्यामुळे पारंपारीक नाट्यगुणांचा तसा अभावच, पण दिलिप प्रभावळकर, सयाजी, सारखे कलाकार आणि वामन केंद्रेंसारखे दिग्दर्शकामुळेच हे नाटक पेलले गेले
एक सामान्य माणुस एका आरोग्यमंत्र्याच्या खोलीत शिरुन राजिनामा मागतो, स्वत:वर झालेल्या अन्यायासाठी नाही तर दुसर्या कुणावर तरी झालेल्या अन्यायासाठी आणि तोही सगळ्या पुराव्यांनीशी, या घटनेतच इतके नाट्य आहे की इतर कुणाच्या लेखणीतुन उतरताना ते मुळचे नाट्य कदाचीत झाकोळुन गेल असते पण, भाईंच्या लेखणीतुन तर ते पानोपानी फुलतच जाताना दिसते
हा अफाट लाव्हासंघर्ष ईतक्या संयतपणे पानापानातुन वाहताना पाहुन मी कित्येकवेळेला शहारुन गेलो आहे, अजुनही जातो.
'झुंज' चा घटनाकाळही २ तास आणि ह्या नाटकाचा कालावधीही २ तास पण दोन तास आपण इतक्या वेगवेगळ्या भुमीकांतुन फिरुन येतो, की मला वैयक्तिकरीत्या तरी हे नाटक वाचल्यानंतर खुप वैचारीक थकवा येतो.
एका प्रवेशात एक पात्र बोलत असताना आपल्याला त्याचे म्हणणे अगदी पुर्ण पटते, आपण अगदी नकळत मान डोलावतो, पण पुढच्याच क्षणी, दुसरे पात्र विचातशृंखला ऐकवतं आणि आपल्या काळजात चर्रर्र होते कि क्षणभरापुर्वी आपण किती राक्षसी विचार करत होतो हे जाणवुन, आणि हा विचारलंबक चालुच राहातो सतत, पडदा पडेपर्यंत.
वाचकालाच त्या नाटकातली चार पात्रे नकळतपणे करुन सोडणे, त्या व्यक्तीरेखेचा विचार जगायला लावणे, हेच मला वाटते ह्या नाटकाचं सर्वात मोठे बलस्थान,
हे नाटक मला झेपेल तेवढे उलगडुन दाखवायचा एक क्षीण प्रयत्न करणार आहे, वर्ण्यविषय एवढा अफाट आहे की क्रमश: ची मदत घावी लागणारच.
क्रमशः
एक झुंज वार्याशी - पुलंचे नाटक - रसग्रहण - भाग २
वाचावयास हवे यार एकदा तरी हे
वाचावयास हवे यार एकदा तरी हे पुस्तक ( नाटक )
पहावयास कुठे मिळेल काय माहीत...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आवर्जुन वाट पाह्तो आहे
आवर्जुन वाट पाह्तो आहे
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
+१
असेच म्हणतो.
कोणी हे नाटक रंगमंचावर करते
कोणी हे नाटक रंगमंचावर करते का सध्या? बघण्यास उत्सुक आहे.
-पुण्याचे पेशवे
नाही हो.
हल्ली नाही करत. माझ्या ओळखीचे एक काका करायचे काही वर्षापुर्वी. आपण करुया का
क्या बात है
अर्धवटराव, झकास प्रस्ताव. लै लै आवडली आयडीया. काही दिवसांपूर्वी पुलंच्या नाटकांवर पी एच. डी करण्याचा इचार व्हता. पन पोटापाण्याचा धंदा करताना जल्ला निसटून गेला. 'सुंदर मी होणार' सारखे सुरेख नाटक फारसे न चाललेले ऐकून धक्का बसला होता. पण तो दोष सादरीकरणाचा असावा असा समज निदान मी पाहिलेल्या संचातील नाटकाने दिला. रवि पटवर्धन ने वाटोळे केलेला संस्थानिक नि वंदना गुप्तेने अतिशय संवेदनाशून्य बनविलेली मूळ्ची संवेदनशील कविमनाची दीदीराजे पाहून कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली होती. तसे 'तुझे आहे तुजपाशी'बद्दल तर काही सांगायची गरज नाही.
बाकी आम्ही विद्यापीठात असताना 'अंमलदार' बसविले होते. आम्ही हरभट झालो होतो. मज्जा आली.
पुलंच एक तुलनेन कमी लोकप्रिय नाटक
अशा प्रकारच्या सर्वच नाटकांच्या बाबतीत हेच खरे असते. अहो आपल्या प्रेक्षकाला मेलोड्रामा लागतो. म्हणून तर आपल्या चित्रपटांमधून विलन हिरो, हिरविण किंवा त्यांच्या घरच्या लोकांना बांधून ठेऊन आपण आजवर कुठले नि कसे गुन्हे केले ते फुशारकीने सांगतो, न सांगता तुम्हा-आम्हाला कळणार कसे नाही का? भडक नि बटबटीतपणाचा बाजार असतो तिथे असला माल कसा खपायचा.
पण एक महत्त्वाचे हां. जवळजवळ वीसेक वर्षे हे नाटक पुरूषोत्तम, फिरोदिया करंडक नि यासारख्या स्पर्धांमध्ये सातत्याने सादर होत आहे. तिथे त्या हुच्चभ्रू वर्तुळात त्याची नक्कीच कदर होते आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
एक झुंज वार्याशी :
एक झुंज वार्याशी : दिलीपप्रभावळकरं आणि सायाजी शिंदे करायचे. ते पाहिले होते. दोघेही अप्रतीम करायचे.
तुझे आहे तुजपाशी मधील रवी पटवर्धनचा काकाजी बघताना लाज वाटली. इंदौरी मराठीची त्याने अक्षरशः वाट लावली होती
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते