माझे(फोटोग्राफिक)किडे = मॅक्रो फोटोग्राफी भाग २
जायंट वुड स्पायडर नावाप्रमाणे ब-यापैकी मोठा असतो. धड साधारणतः २ते३ ईंच लाब असत. येउरल भरपुर आहेत. प्रचंड मोठ्या आकाराच जाळ बनवुन भक्षाची वाट बघत बसतात. जमीनी पासुन खुप वरती (१५/२० फुटावर) आणि दोन झाडांच्या मधे हवेत तरंगता बसलेला असतो. जमीनी पासुन बराच वरती असल्याने जवळुन फोटो काढण अवघड आहे. हा मला नशिबाने ८/१० फुटावर हा आढळला. ही त्याची पोटाकडची बाजु आहे

नाव माहीत नाही. हा सधारण रुपयाच्या नाण्याच्या आकाराचा होता. हे दबा धरुन बसण्याकरता स्वतःला एवढ अप्रतिमरीत्या कॅमेफ्लोज करुन घेतात की कितीही जवळुन बघीतल तरी लवकर लक्षात येत नाहीत

फोटो काढताना खुप आक्रमक झाला होता

अंड्याची पिशवी राखण करताना...हा/ही पण फोटो काढताना भावी पिढीच्या काळजिने आक्रमक झाली होती.

हे काही क्रॅबस्पायडरचे नमुने पुढील पाय खेकड्याच्या नांग्याप्रमाणे करतो म्हणुन नाव क्रॅबस्पायडर. आकाराने अत्यंत लहान अंदाजे चन्याच्या डाळी एवढा किंवा त्याही पेक्षा लहान.

या क्रॅबस्पायडरने स्वतःला फुलाप्रमाणे रंगवले आहे


हा सिग्नेचर स्पायडर आपल्या जाळ्याच्या चारी दिशांना जिगजॅग करत नेहमी सही केल्या सारख विणकाम करतो म्हणुन सिग्नेचर स्पायडर. हा आकाराने मोठा म्हणजे धड अंदाजे १/१.५ ईंचाच आसत. ब-यापैकी नजरेच्या टप्प्यात येईल ईतपत उंचीवर असतो.


कॅमेफ्लोज नाकतोड्यांचे काही अप्रतिम नमुने. आपण काही ईंच जवळ गेल्यावर देखिल यांच अस्तित्व जाणवत नाही. निसर्गाची जबरदस्त कलाकारी.




गवळण अथवा मॅटीस पाला पाचोळ्यात ही पटकन काडेच वाटते.

लिफबिटल अक्षरशः वाळलेल्या छोट्या पाना प्रमाणे दिसतो

नाव माहित नाही पण गोगलगाइ प्रमाणे चाल होती.

हे आहेत ज्वेलबिटल यांना पुर्वी दो-यात ओवुन दागिन्याप्रमाणे अंगावर परिधान करत असत.
जबरदस्त रंगकाम. बहुधा नर-मादी एकमेकांना आकर्षीत करण्यासाठी अश्या आकर्षक रंगांचा वापर करत असावेत.



ह्याने देखिल आप्ल्या पोटाखाली अंड्यांची पिशवी धरुन ठेवली आहे. बाजुला चिंचेची पाने दिसत आहेत या वरुन तुम्हाला कोळ्याच्या आकाराचा अंदाज येउ शकतो.

किडे झाले आता काही फुले




चतुरसिंग

समाप्त 
कॅमेरा निकॉन डि ९० + लेन्स नोकॉन १८-५५ व निकॉन १०५
.jpg)
यार तु ठार वेडा केलयस..
यार तु ठार वेडा केलयस..
कसले जब्राट फोटो आहेत रे.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
मस्त... मागे एकदा नेटवर
मस्त... मागे एकदा नेटवर हिंडताना 'रिवर्स-लेन्स फोटोग्राफी' बद्धल वाचलेलं.. ते पण एकदा ट्राय करुन बघा ना..
हा दुवा बघा: http://macro-photography-blog.com/
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
उपयुक्त दुवा आहे, धन्यु.
उपयुक्त दुवा आहे, धन्यु.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
फोटोग्राफीबद्दल सुरेख दुवा.
फोटोग्राफीबद्दल सुरेख दुवा. बुकमार्क केला आहे. धन्यवाद कोहम.
नादभरी फोटो आहेत.
नादभरी फोटो आहेत.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
जयपालदादा !! साष्टांग दंडवत
जयपालदादा !!
साष्टांग दंडवत आणि थँक्स.........
सलाम !!
मॅक्रो फोटोग्राफीचे अनेकोत्तम नमुने. एकदम प्रोफेशनल फोटोग्राफी !!
कॅमाफ्लॉज म्हणजे खरोखरच निसर्गाची अचाट कलाकारी. ती अशी सुंदरतेने पकडणार्या तुम्हाला सलाम !!
अ प्र ति म
खरंच आता प्रदर्शन भरवा तुम्ही !!
क्लास फोटो !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
सारखे पहात राहेवेसे वाटतात.
सारखे पहात राहेवेसे वाटतात. खुपच सुंदर. कोणता केमेरा वापरता.
अतिशय सुंदर रे जयपाल ! ग्रेट
अतिशय सुंदर रे जयपाल !
ग्रेट फोटो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त. न बघितलेले किडे बघितले
मस्त. न बघितलेले किडे बघितले आज
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
छान फोटो! मस्त!
छान फोटो! मस्त!
सर्व
वाचकांचे आणि प्रतिसाद कर्त्यांचे आभार.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
ओ दादा
लै येडं केल हो तुमी. तो फुलाच्या गाभ्यावर बसलेला कीटक लय भारी पकडलाय. फुलाचा रंग हलका नि किडा जवळजवळ पारदर्शक पांढरा. हे पकडणे येरागबाळाचे काम नोहे. टोपी उंचावली आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मस्तं फोटोग्राफी. जयपा
मस्तं फोटोग्राफी. जयपा आम्हाला पण काहीतरी शिकव रे... बाकी कॅमोफ्लॅज ला मराठी शब्द काय बरे?
-पुण्याचे पेशवे
का छ्ळतोयस त्याला
बाकी कॅमोफ्लॅज ला मराठी शब्द काय बरे?
चुकीच्या संस्थळावर हा प्रश्न विचारल्याने चुकीचे असे टाचण दिले आहे.
बादवे 'फोटोग्राफी' हा फोटॉग्रफी असा उच्चारतात बरं का. (पळा आता हाणतोय पुप्या)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
छद्मावरण असं म्हणतात त्याला.
छद्मावरण असं म्हणतात त्याला.
मस्त!
मस्त!
भारी..
भारी..
---BinaryBandya™
सलाम....
फोटो बघण्यास जरी मौज वाटत असली तरी या फोटोकरिता तुम्ही केलेल श्रम दिसत आहे त्यास सलाम....
मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ
जयपाल मित्रा, फारच अप्रतिम
जयपाल मित्रा,
फारच अप्रतिम फोटो, मलाही किड्यांचे फोटो काढायला आवडतात, पण तुझ्याएवढी माहिती नाहीये त्यातील.
हे फोटो पण फारच सुपर्ब आहेत - या फोटोग्राफीबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल.
.................. घेतलेली
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
काय जबरदस्त फोटो काढलेत राव
काय जबरदस्त फोटो काढलेत राव !!
मस्तच.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
अप्रतीम.. सुंदर.. शब्दच
अप्रतीम.. सुंदर.. शब्दच नाहीत..
सुंदर !..... आणि हा धागा वरती
सुंदर !..... आणि हा धागा वरती आणण्या करिता आभार !
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !