आजच्या स्त्रीची अशीही एक प्रतिमा " वंदना मॅडम " - भाग - १
मग इतक्या रात्री तिच्या रुममध्ये दोन व्यक्ती? त्या पुरुष आहेत की स्त्रिया? की दोघेही? विचारात मी ट्रॉली सजवायला सुरुवात केली...
साधारण १२.१५ च्या सुमारास, ती जेवण आणि खंब्याने सजलेली ट्रॉली घेऊन मी लिफ्टपाशी थांबलो. दुसर्या मजल्यावर, एक स्वीट, एक सेमी स्वीट, सहा एक्झीक्युटीव्ह आणि सहा क्लासीक्स अश्या मिळुन एकूण चौदा रुम्स आहेत. त्यातलाच स्वीट वंदना-मॅडमचा. दरवाजाची बेल वाजवून 'रुम सर्व्हीस' असे बोंबलावे लागते. मी नित्याच्या सवयीनुसार केले. पण रुम उघडली गेली नाही. रुमचा दरवाजा पहिल्या बेलला न उघडल्यास साधारण दोन-एक मिनिटे थांबायचा नियम आहे. मीही तसेच केले. तीन वेळा बेल दाबली; पण दरवाजा ऊघडला गेला नाही. अशा परिस्थितीत लॉबीतल्या फोनवरून 'रुम सर्व्हीस केबीन' वा 'रिसेप्शन' ला कळवायचे असते. मी फोन करण्याकरता वळणारच, इतक्यात दरवाजा उघडला गेला.
एखादी व्यक्ती दरवाजातून नको असलेल्या पाहुण्याकडे जसे पाहते तसे वंदना मॅडम दरवाज्यातच उभी राहून माझ्याकडे बघत होती. उघडा खांदा, केस अस्ताव्यस्त, कपाळावर घामाचे थेंब, अंगाभोवती पांढरा-शुभ्र टॉवेल, अत्तराचा घमघमाट...
"गुड ईव्हीनिंग!! मॅडम."
"गुड ईव्हीनिंग, यु मे किप द ट्रॉली आऊट-साईड, आय विल टेक ईट ईन."
"ओके मॅम, वुड यु लाईक टु साईन द बिल नाऊ, ऑर साईन ईन द मॉर्नींग?"
(स्वार्थ! दुसरं काय? ट्युशनची फी बाकी होती, टीप तर हवीच ना.)
"ओके, आय विल साईन नाऊ."
मी कोटावरच्या खिशातलं पेन काढलं. ट्रॉलीवरचं बिलाचं फोल्डर तिच्या हातात दिलं. तिनं साईन करण्यासाठी पेन बिलावर घासलं, पण नेमकी रिफील संपली.
"वेट हियर." ती पेन शोधण्यासाठी आत गेली. जाताना हाय हिल्सचा "टॉक-टॉक- टॉक-टॉक" असा आवाज आला. टॉवेलवर हाय हिल्स? आणि तेही रुम मध्ये? मला आश्चर्य वाटले. कारण स्वीट-रुममध्ये घरात घालायची कापडी आणि बाथरुमसाठी प्लास्टीक अश्या दोन स्लिपर्स पुरविण्यात येतात.
पण त्यामुळे दरवाजा थोडासा सरकला गेला. उत्सुकतेपोटी मी ही आत पाहिले. समोरच्या उजव्या भिंतीवरील आरश्यात मला त्या दोन व्यक्ती स्पष्ट दिसल्या. दोन पुरुष! दोघांनीही कमरेभोवती टॉवेल गुंडाळलेला होता. एक शांतपणे कोचावर बसून सिगरेट पित होता. आडदांड असावा, कारण त्या कोचावर तो एकटाच बसल्यासारखा दिसत होता. दुसरा उभा होता, घामघूम झालेला, पोटावर 'सिक्स-पॅक्स'. त्याच्या कमरेभोवती गुंडाळलेल्या टॉवेलला दोन्ही मांड्याच्या मध्ये आलेला उभार लपून रहात नव्हता. मी चक्रावलो. तेवढ्यात वंदना मॅडमच्या हाय-हिल्सचा आवाज आला. मी मान खाली घातली. कस्टमरला माहित नको व्हायला की आपण रुममध्ये काय पाहिले? एक कारण म्हणजे 'प्रायव्हसी ऑफ कस्टमर' आणि दुसरं म्हणजे कस्टमरने 'तक्रार' केली तर...! वंदना मॅडमनी दिलेले फोल्डर घेऊन, मी रुम सर्व्हीस केबीनपर्यंत येईपर्यंत, विचारात गढून गेलो.
देह स्त्रीचा असो वा पुरुषाचा, त्याला भूक लागतेच. ती शमवण्यासाठी वंदना मॅडमने व्याभिचार केला असे म्हणावे का?
काय नैतिक व काय अनैतिक?
माझी बौध्दीक पातळी तेव्हा (आणि आताही) हा प्रकार नीटसा समजून घेण्याइतपत नाही.
"ए, टेक युवर टिप्स मॅन." कॅशियरच्या आवाजाने मी भानावर आलो. त्यादिवशी बिलाच्या फोल्डरमध्ये नोटाच नोटा होत्या, गुंडाळलेल्या. मी त्या मोजल्या. बाराशे-चाळीस रुपये होते. घाई-घाईत वंदनामॅडमने जे हातात आलं ते फोल्डरमध्ये टाकलं होतं. ते दोघे कोण होते? त्याचा विचार मनात आल्यावर मी केबीनमधूनच 'रिसेप्शन'ला फोन लावला. फोनवर जेम्स, आपलाच माणूस.
"अरे, व्हु आर दोज गाईज ईन वंदनामॅडम्ज रुम?"
"दोज आर दि लेडीज क्लब मेंबर्सं, डोन्ट यु नो?" मी लेडीज क्लबविषयी ऐकून होतो. मेल स्ट्रिपर्स म्हणा किंवा आताच्या भाषेत जिगेलोज म्हणा. गप फोन ठेवला. खाली आलो. ड्रेस बदलला. सायकलला टांग मारली.
मला वाटलं, "चला आज दिवस मावळला', उद्या ट्युशनची फी भरुया, मम्मीला घरखर्चाला थोडेफार पैसै देऊयात."
विचारातच सायकल चालवत होतो. सायकल पुढे जात होती. मन तसे अजून मागं त्या खोलीतच अडकलं होतं. खोलीत म्हणण्यापेक्षा त्या अनुभवाच्या विचारचक्रात.
स्त्यावर तुरळक गर्दी होती. एखाद-दुसरी कार, माझ्यासारखा एखादा हॉटेलमधून परतणारा सायकलवाला दिसत होता. संगम ब्रिज क्रॉस करुन, आरटीओपाशी आलो. आरटीओ समोरचा पेट्रोल-पंप रात्रभर उघडा असतो आणि आरटीओ शेजारी एक चहावाला रात्रपाळी करतो. मी थांबलो, सिगरेट घेतली, चहा व्हायला वेळ होता म्हणून एका सिगरेटच्या तीन झाल्या. वेळ गेला. घड्याळात पावणे-दोन झाले. पुढे निघालो.
पूर्वाश्रमीच्या 'राजाबहादुर मिल्स'चा डोलारा संभाळणारी इमारत ढळून, नव्याने होऊ घातलेल्या 'ला मेरिडियन'च्या अंडर-कंस्ट्रक्शन इमारतीच्या जरासं पुढं आल्यावर मला २०-२५ फुटांवर फुटपाथच्या किनारी काहीतरी हालताना दिसलं. सायकल जवळ जाऊ लागली तसं ते चित्र स्पष्ट होऊ लागलं. इमारत अजून पूर्ण न झाल्याने काही मजुरांच्या झोपड्या तिथेच होत्या. त्यातल्या काही अगदी रस्त्याच्या कडेला होत्या. आणि त्यातल्याच एका कडेला असलेल्या झोपडीशेजारी, रस्त्यावर दिवे आणि रहदारी नसल्याचा फायदा घेत एक मजुराचं जोडपं कामक्रीडा करत होतं. माझ्या ऊजव्या बाजूने एक ट्रक गेल्याने मला सायकल डाव्या बाजूला दाबावी लागली, सायकल त्या जोडप्याच्या अगदी जवळून गेली. दोघांचं अंग झाकावं म्हणून तिनं चादरीच्या खालचा भाग पायानं घट्ट धरला असावा, कारण वरचे दोन्ही हात त्याच चादरीच वरची टो़कं धरण्यात गुंतलेले मला दिसले आणि त्याच चादरीचा मध्यभाग खाली-वर होत होता. ट्रकच्या प्रकाशाने तिची एकरुपता तुटली. माझं तिच्या चेहर्याकडे लक्ष गेल आणि तिचं माझ्याकडं. गळ्यापाशी घाम एकवटला होता, गळ्यातलं मंगळसूत्र फाशी बसावी असं जखडलं होतं. तिच्या मानेशेजारून पाठमोरं मस्तक. पुरूषाचं. हालचालीत गर्क. अंगावर येत होते ते तिच्या चेहर्यावरचे भाव, त्यावर एखाद्या नवतरुणीची लज्जा नव्हती. तेथे होते लाचारीचे, तिच्या गरिबीचे, मजबुरीचे, नवर्याला सुख बहाल करताना होणार्या यातनांचे नृत्य.
माझ डोकं हललं, मी सायकल फिरवली. तिथून थेट 'दुर्गा'त सटकलो. काऊंटरवरून योग्याला फोन लावला. त्याला 'दुर्गा'त बोलवून घेतलं. बियरचा पहिला ग्लास रिता केल्यावर सहज त्या दिवशीच्या वर्तमानपत्राकडे लक्ष गेलं. दोन बातम्या लक्ष वेधून घेत होत्या, पहिली बातमी होती एका पंधरा वर्षाच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येची. कारण होते, तिचा तोकडा पडलेला स्कर्ट! होय, तिचा तोकडा पडलेला स्कर्ट. ताडीवाला रोडच्या मनपाच्या शाळेत कुठल्याश्या तरी योजने-अंर्तगत, गरीब विद्यार्थ्यांना 'फुकट गणवेष' वाटप झाल़ं होतं, त्याच योजनेतून तिला मिळालेला हा स्कर्ट तोकडा पडला आणि मास्तरीणबाईने भर वर्गात तिला झापले, विषय गावभर झाला. बाहेर छेडछाड आणी घरात हाड-हि़ड झाली. अवमानाने संतापलेल्या या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. दुसरी बातमी होती आपल्या गृहमंत्र्यांच्या निवेदनाची, ते निवेदन असं होतं. "घाई-घाईत कपडे बदल्यामुळे, रॅम्पवर चालताना, मॉडेल्सचे कपडे पडतात"...
सुन्न झालो वाचून. एकाच फ्रेम
सुन्न झालो वाचून. एकाच फ्रेम मध्ये तिनही दृष्य शेजारी शेजारी आल्याचे डोळ्यासमोरून तरळून गेले.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
+१
+१
+२
+२
सुन्न होऊन गेलो मी पण...
सुन्न होऊन गेलो मी पण... पाषाणभेद प्रमाणेच तिन्ही फ्रेम डोळ्यासमोर आपोआप तयार झाल्या !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
काय बोलु?
...
...
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नेहमीप्रमाणे जबरी लेख
सुहास..
नेहमीप्रमाणे जबरी लेख आहे...सुन्न झालो.
श्रीवर्धन
सुन्न..
सुन्न..
....
....
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
***
...
वंदना मॅडम, मजुर बाई, शाळकरी मुलगी, रॅम्पवरची मॉडेल......
तीच नग्नता पण भावना वेगळ्या. हे जग म्हणजे एक कॅलिडोस्कोप आहे याचा प्रत्यय दिलास रे भावा. जबरदस्त!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सुन्न केलंस रे
निशब्द...........
निशब्द...........
त्रास.
त्रास.
हा आमचा स्वभाव
सुहास ष्टाईल
सुहास च्या नेहमीच्या ष्टाईलनी झकास कॅलिडोस्कोप
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
अगतिकता... सर्वत्रच. दुसरे
अगतिकता... सर्वत्रच. दुसरे काय?
-पुण्याचे पेशवे
+१
सहमत आहे पुप्याशी.
निसर्ग नियम
आहे तो. वेगळ्या विषयावरील स्प्ष्ट(रोख-ठोक) आणि धाडसी लेखा बद्दल अभिनंदन.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
ताकदीचे लेखन...!!
श्री.सुहास यांच्या लेखणीत "इम्पार्शल ऑब्झरव्हेशन"ची विल़क्षण ताकद आहे. ती लेखणी वाचणार्याचे बोट आपल्या हाती घेऊन लेखात त्याला वर्णन केलेल्या चारी ठिकाणी फिरविते आणि सांगते, "बघ, हे मी पाहत्येय, अन् तुला दाखविते.... आता तुझे मत तूच बनव... झाले माझे काम !" ही हातोटी त्यांच्यातील लेखकाला पुढे मोठा करेल यात संदेह नाही.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
+ १
सुहास चांगला लेखक तर आहेच. यापुर्वीच्या त्याच्या लेखनातुन ते जाणवतं. (अगदी एखाद्याची टिंगल सुद्धा तो अशी खुमासदार पद्धतीने करतो की ज्याच्याबद्दल लिहिलेय त्याला राग येत नाही असा माझा स्वानुभव आहे.
) त्याचं अनुभवविश्व व्यापक असल्याने त्याच्या लिखाणात खोली पण असते. परंतु या लिखाणात मला जे भावलं ते इस्किलार यांनी अचुक शब्दबद्ध केलं - "इम्पार्शल ऑब्झरव्हेशन".
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
खरं आहे
आपला आवज बंद. माझा एक मित्र तर सुहाशाचा फॅन आहे. तो फक्त सुहासचे लेख वाचायला मीमवर येतो.
सुहाशा लेका फार थोड्या लोकांना कोणतीही बाजू न घेता असे सरळ लिखाण करणे जमते. नकळत या किंवा त्या बाजूला घसरतोच माणूस. तुला हा तोल सांभाळता येतो हे विशेष. (अवचटबुवांची आठवण होते.)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
खरंच आहे. आणि अशा संवेदनाशील
खरंच आहे.
आणि अशा संवेदनाशील विषयात तर लेखकाने कुणाचीतरी बाजू घेणं गृहीतच धरायला हवं. सुहास मित्रा, इतका सौम्य विषय अतिशय उत्तमरित्या हाताळलास! सुरेख! दर्जेदार लिखाण!!
सहमत
पुणेरी, ररा, मेवे तिघांशी सहमत.
सुहास भारी लिहतो.
+१
सुहाश्या सिरियसली लेख चांगला लिहीतो !!
+२
+२
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
. . . .
सुन्नं ...!
अ प्र ति म
फार सुंदर लेखन. मीच हे सगळ अनुभवतोय अस वाटत होत.
माझे लिखाण
अरे हो पण काय अनुभवतोय ते पण
अरे हो पण काय अनुभवतोय ते पण जरा सांग की!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
जबराट...!!!
जबराट...!!!
सँडीने लेख वर आणल्याबद्दल
सँडीने लेख वर आणल्याबद्दल आभारी आहे, वाचायचा राहुन गेला होता लेख.
सुहाश्या,
अप्रतिम लेखन रे..
तुझ्याकडे अनुभव आणी लेखणी दोन्हीचे सामर्थ्य आहे. लिहित रहा.
बापरे, नेहमीचच सगळ पण किती सुन्न करणार
बापरे नेहमीचच सगळ पण किती सुन्न करणार.
जबरदस्त
जबरदस्त, असे लेख मीम वर वाचायला मिळतात, लेख वाचुन आपणच हे सारं पहातोय की काय असा भास वारंवार होत होता, असे विषय हाताळायला आणि वाचकांना विचारात पाडायला खरच लेखन सामर्थ्य लागत ते सुहास कडे आहे, असच लिहीत रहा.........
"मराठी माणसा जागा हो, मी "मराठीचा" धागा हो"
विरोधाभास टिपण्याची आणि ती मांडण्याची कला आत्मसात आहे यात शंका न
जबरदस्त आहे राव..... लिखाण उठावदार आहे. विरोधाभास टिपण्याची आणि ती मांडण्याची कला आत्मसात आहे यात शंका नाही.
खरं आहे. वाचून काय
खरं आहे.
वाचून काय प्रतिक्रिया द्यावी हे सुचत नाही आहे
___________________________________
योगेश नाईक