स्वरालयीची दुनिया..३

0
0

स्वरालयीची दुनिया..१
स्वरालयीची दुनिया..२

कुछ तो लोग कहेंगे.. (येथे ऐका)

एक संध्याकाळ.. दोन घोट घशात उतरवायचा टाइम!

एक देखणी शर्मिला टागोर आणि 'कुछ तो लोग कहेंगे..' हे तिला समजावणारा राजेश खन्ना..! पंचमदांचं संगीत, अप्रतिम गायकीची परिसीमा गाठणारे किशोरदा.. सगळंच भन्नाट, सगळंच शब्दातीत..!

घरवाली, धंदेवाली शर्मिला टागोर.. तिच्याच मोहल्यात राहणारा तिच्याच गावचा कुणी एक तिला म्हणतो..'बाई गं, मी सभ्य-सुसंस्कृत समजातला.. आपण एकमेकांना ओळखतो हे कुणाला न कळलेलंच बरं!'-- त्यामुळे दुखावली गेलेली शर्मिला..!

आणि..'तू कौन है, तेरा नाम है क्या? सीता भी यहा बदनाम हुई..' इतकं साधं-सोपं तत्त्वज्ञान सांगणारा काका राजेश खन्ना..!

गिटारच्या साहाय्याने दिली गेलेली सुंदर लय.. जीव ओवाळून टाकावा असे बासरीचे तुकडे.. 'छोडो बेकार की बातोंमे..' म्हणताना मस्तीत फेकून दिलेला किशोरदांचा स्वर, 'कही बीत न जाए रैना..' म्हणताना 'जाए' शब्दावरचा मोजका, सुंदर आलाप, 'रैना' शब्दावरचा जिवाला भिडणारा आलाप..! कमालीचा सुरेलपणा, गळ्यातला दर्द, शब्दोच्चार, अर्थानुरुप गाण्यातले भाव..! किशोरकुमार गांगुली..! हिंदी सिनेसृष्टीचं, भारतीय संगीताचं भाग्य!

कुछ तो लोग कहेंगे - अमरप्रेम! काय आणि किती लिहावं या गाण्याबद्दल?

-- (नतमस्तक) तात्या अभ्यंकर.

ऑसम !!!

1

ऑसम !!!

आमच्या " फरमाईश " च काय झाल, तात्या !!!

मस्त!!

2

मस्त!!

सुरेख ! काही गाणी अशी असतात

3

सुरेख !

काही गाणी अशी असतात जी कधी विसरली जाऊच शकत नाही अगदी एखाद्याचा गजनी झाला तरी wink

त्याच प्रकारातील हे गाणे..
व उत्तम रसग्रहण !

आवडले साहेब...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अरे वा.. आता रोज मेजवानी का

4

अरे वा.. आता रोज मेजवानी का तात्या?!?!

मस्त मस्त मस्त!!

वाह! तात्या वाह!

5

अशीच सुरु राहु दे महफिल!


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)