ओंगळ समस्त, आम्ही नंगे...

0
0

कालच्या बातम्यांमधे सर्व वाहिन्यांवर भोपाळ दुर्घटनेची माहिती ऐकली.. राजदीपला प्रत्यक्ष फील्डवर खुप कमी वेळा बघितला होता.. एकएक कहाणी बघुन मन सुन्न झालं.. खुप वेळ तळमळ चालली होती.... मानवी मनाचा काहीतरी गुण असावा खास.... सगळ्या जगातल्या पापापुण्यांचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर एकदा फोडले कि मग आपण आपापले गटारजिणे जगायला मो़कळे.. बर ते खापर फोडायला प्रत्येकवेळेला कुणिनाकुणी सापडतोच आपल्याला....अ‍ॅन्डरसन वा राजीव गांधी वा ईतर कुणिही.... सकाळी जाग आल्यावर (अस नुसते म्हणायचे, खरी जाग येतच नाही.. एका झोपेतुन दुसर्‍या झोपेत....सारखा भ्रमप्रवास चालू) पण भोपाळ मनातुन जाईना..... तेवढ्यात प्रणव मुखर्जी चे स्टेटमेंट ऐकलं.."त्यवेळेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता म्हणुन, लोकक्षोभाचा विचार करुन आम्ही अ‍ॅन्डरसनला जाउ दिले"......म्हणजे पुन्हा खापर माझ्याच डोक्यावर.. पण त्यावेळेला कारखाना उभारताना काही तपासण्या झाल्या नसतील का?.... का त्यावर कुणी पर्यावरण खात्याच्या कारकुनाने पाचपन्नास रुपये घेउनच सही केली असेल.... मी काल ७/१२ घेताना दिली तीच असेल का ती नोट.... ईतकी रक्ताळलेली असुनही कशी चालली कुणास ठाउक.... मर्ढेकर हातात धरले कि नेहेमीच असं का होते.... सगळे प्रश्न शेवटी बुमरँगसारखे मलाच शोधत का येतात..

सत्तेचेच तुप | सत्तेचीच पोळी |
मानव्याची होळी | भाजाया ती ||
देवा ऐशी भूक | कासया दिलीस? |
झालो कासवीस | मीही नंगा ||
नंग्याचाच आता | येथे कारभार |
कोंडी आरपार | फोडा या ही ||
टिर्‍या अर्धपोट | जोवरी आहेत |
ओंगळ समस्त | आम्ही नंगे ||

- मर्ढेकर.

अस्वस्थ...

1

भोपाळ्च्या बातम्यांनी अस्वस्थ होतोच, तुम्ही जखमेवर मीठ चोळलेत.
आणखी मीठ येउ दे.

खरं आहे, जख्मेवर मीठ चोळले

2

खरं आहे, जख्मेवर मीठ चोळले Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

नंगेसे खुदाभी डरता है!

3

म्हणुनच तर आपण पुन्हा पुन्हा त्यांनाच निवडून देतो बहुतेक!


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

अर्धवटराव तुम्ही शहाणेच आहात

4

अर्धवटराव तुम्ही शहाणेच आहात हो.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

टिर्‍या अर्धपोट | जोवरी आहेत

5

टिर्‍या अर्धपोट | जोवरी आहेत |
ओंगळ समस्त | आम्ही नंगे || >>>>

हेच काय ते सत्य !!

हम्म्म्म. असो.

6

हम्म्म्म. असो.


-पुण्याचे पेशवे

जगण्याचाही चुकला पाढा...!!

7

"....बर ते खापर फोडायला प्रत्येकवेळेला कुणिनाकुणी सापडतोच आपल्याला....."

आणि आता न्यायालयाच्या त्या "दोन" वर्षाच्या हास्यास्पद शिक्षेवर उडालेली वावटळ शांत होण्यासाठी तीनचार उल्लू मंत्र्यांची (ज्यामध्ये कमलनाथ, जयराम रमेश सारखी दिव्य मंडळी आहेत) एक विशेष समिती जी भत्त्यापोटी आणि परदेश प्रवासापोटी जनतेचे आणखी तीनचार कोटी उडवणार आणि "आम्ही अँडरसनला पकडून आणणार..." असा धर्तीच्या अधुनमधून डरकाळ्या फोडत बसणार.... आणि सर्व काही शांतशांत झाले की, सरकार समितीचा गाशा गुंडाळणार. ९० वर्षाचा झाला हा अँडरसन आणि त्याच्या राष्ट्राच्या मंत्र्यानेच परवा सांगितले की, "आता आमच्यापुरता भोपाळ गॅस दुर्घटना हा विषय संपला आहे.,.." आता यावर हे कमलनाथ काय मल्लीनाथी करणार ?

कालपरवा झालेल्या पुण्यातील बेकरी स्फोटातील आरोपीवर याना धडपणे आरोप ठेवता आला नाही आणि न्यायालयात एटीएसने हसू करून घेतले....सोडावे लागले त्या चांगला गवगवा करून पकडलेल्या "दोषी" लोकाना...., आणि आता ही कमिटी २६ वर्षापूर्वीच्या घटना तपासणार !!

मर्ढेकरांच्याच शब्दात >>>
--- अशा येथल्या संसारात
जगण्याचाही चुकला पाढा;
आणि शेवटी परिस्थितीचा
गळ्याखालती उतरे काढा......."


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

खरं आहे.

8

खरं आहे.

कसं बोललात

9

सगळ्या जगातल्या पापापुण्यांचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर एकदा फोडले कि मग आपण आपापले गटारजिणे जगायला मो़कळे.. बर ते खापर फोडायला प्रत्येकवेळेला कुणिनाकुणी सापडतोच आपल्याला....

(असलेच तर) हे अंतिम सत्य.

>>झालेल्या पुण्यातील बेकरी

10

>>झालेल्या पुण्यातील बेकरी स्फोटातील आरोपीवर याना धडपणे आरोप ठेवता आला नाही आणि न्यायालयात एटीएसने हसू करून घेतले....सोडावे लागले त्या चांगला गवगवा करून पकडलेल्या "दोषी" लोकाना...., आणि आता ही कमिटी २६ वर्षापूर्वीच्या घटना तपासणार !!

Sad

+१

11

+१