पन्नासाची नोट


इंजिनियरींगचे तिसरे वर्ष असेल. साधारणतः फेब्रुवारीचा पहिला आठवडा असेल. असेच एकदा कॅन्टीनमधे बसलो होतो. चारपाच नेहमीचे मित्र अन नेहमीच्याच गप्पा. त्याकाळी व्हैलेंटाईनडेचे आजकाल असलेले फॅड नव्हते. पण गुपचुप किंवा थोड्याशा प्रमाणात साजरा होतच असे. मुळात तेव्हा घाउकमधे १०० गुलाबाची सर्व रंगाची फुले आणुन हाताला जे येईल ते समोर येणा-या पोरीला द्यायचे इतका भुक्कड अर्थ नव्हता चिकटलेला त्या दिवसाला. आजकाल काय पोरीच गोळा करतात गुलाबाची फुले. स्पर्धाच असते कोण जास्त गोळा करुन दाखवेल ते. अन दुपारनंतर रस्त्यावर स्वस्त उपचार केंद्राची जाहिरात करणा-या जाहिरात केंद्राच्या कागदाप्रमाणे गुलाबफुले मलुल झालेली विखरुन पडलेली असतात. पण देणारा अन घेणारा यांना काहीही त्याचे सोयर सुतक नसते. पण तेव्हा तसे नसायचे. खरोखर जर मनात असेल तरच फुल दिले जायचे अन तेही इतके घाबरत की ज्याचे नाव ते. अन दिलेले फुल त्यामुलीने घेतले तर ती मुलगी त्या फुलाची कदर करुन जपुन ठेवायची अन नसेल स्विकारायचे तर नम्रपणे सांगायची की तो मुलगा पण समजुन घ्यायचा अन वाटेतुन दुर व्हायचा. असो. तर मी सांगत होतो ते असे...

आमच्या वर्गात एक मुलगी होती. रुपाली. दिसायला निमगोरी पण चुणचुणीत अन हुशार. कायम पहिल्याच प्रयत्नात पास. अवघड असते हो इंजिनियरींगला सगळ्याच सेमीस्टरला सगळेच विषय पहिल्याच प्रयत्नात सुटणे. असा विद्यार्थी स्वतःचे नाव पण नीट सांगु शकत नसतो तर बाकीच्या गोष्टी सोडुन द्या. तरी ही अपवाद. नाटक, संगीत वगैरे मधे पण ब-यापैकी चुळबुळ आणि हो.. जर्मन भाषा शिकायची आवड होती. तर ही मुलगी मला मनातुन आवडायची. पण कधी धीर झाला नाही कारण असे की ती आमच्या लांबच्या नात्यातील होती. नाते तसे दुरचे होते पण उगाच
कशाला म्हणुन मी जास्ती विचार केलाच नाही. कधी आठ पंधरा दिवसांनी मी तिच्या घरी चक्कर मारायचो पण हे फारसे मित्रांमधे कुणाला माहीत नसायचे अन मी पण कधी गाजावाजा केला नाही. ती कधी आली नाही माझ्या रुमवर कारण आमचा सगळा पोरांचा कारभार. काय हिंमत होईल कुणा पोरीची रुमवर यायची?

तर त्या दिवशी आमचा विषय चालला होता येणा-या व्हैलेंटाईनडेचाच. अर्थातच दहा बारा पैकी सात जण शांतीला धरुन बसले होते. त्यामुळे ते कुणाला काही न देता केवळ कसे केले की नक्की फुल स्विकारले जाईल याचा सल्ला देत होते.
उर्वरीत मधे मी होतो. कारण मी अजुन देणार की नाही व देणार तर कुणाला देणार याचा निर्णय घेतला नव्हता. अर्थात फार काही विचार करण्यासारखी परिस्थिति नव्हती कारण कालचाच रिझल्ट एका विषयात गचका देवुन गेल्याने मन
जरा खट्टू होते. तेवढ्यात एकाला हुक्की आली अन त्याने 'का रे तु रुपालीला का नाही देत? तुला आवडते ना ती ?' असा प्रश्न केला. मी एकदम गांगरुन गेलो. असा काही विषय कधी चर्चेला येईल असे वाटले नव्हते. चर्चा होता होता
मी फुल देवुच शकणार नाही कारण माझ्यात हिंमत नाही असा निष्कर्षावर यायला लागली. ते पाहुन अचानक एका दुस-या मित्राला फुरफुरी आली. त्याने प्रस्ताव मांडला की मी जर फुल दिले ते ती स्विकारो वा ना स्विकारो तरी सर्व जण प्रत्येक दहा दहा असे एकुण शंभर रुपये मला देतील. अन जर मी फुल दिलेच नाही तर मी सगळ‍्याना भेळ खावु घालायची. मला खर्च आला असता चाळीस रुपये. तेव्हा भेळ चार रुपयाला मिळत असे.

सौदा तसा वाईट नव्हता कारण रुपालीने फुल जरी नाकारले असते तरी मला फारसे वाईट वाटले नसते कारण ती फुल स्विकारेलच याची खात्री नव्हती तसेच मानसिक तयारी असल्याने मी तयार होतो. स्विकारले असतेच तर सोन्याहुन पिवळे. त्यामुळे केवळ फुल द्यायचे शंभर रुपये मिळत असतील तर का सोडा ? असा विचार मी केला. आता हौस्टेलवर रहाणा-या (त्या काळातील) मुलांच्या वेदना फक्त ज्याने हा अनुभव घेतला आहे तोच जाणु शकतो... बाकीचे सौदागर म्हणुन नाके मुरडतील. असो.

तर होता होता उद्यावर व्हैलेंटाईन डे येवुन पोहोचला, अन माझ्या छातीत धडधड वाढायला सुरवात झाली. बसल्या बसल्या भयाण स्वप्ने दिसायला लागली. काऽडकन कानाखाली आवाज निघालाय.. बेशरम हलकट अशी शेलकी विशेषणे अन काय काय.. बापरे. रुमवरुन उठुन बाहेर टपरीवर येवुन बसलो. गोल्डफ्लेक घेतली. चहा घेतला. आता जरा बरे वाटले अन मनात काही विचार आला. मनातला विचार पक्का केला अन रुपालीच्या घरी गेलो. नेमकी ती एकटीच घरी होती त्यामुळे जरा बोलायला धीर आला. तिला वाटले सहज आला नेहमीप्रमाणे, त्यामुळे वाचनालयातली आणलेली पुस्तके मला देवुन ती तिची कामे करण्यात गुंग होती.

शेवटी मी तिला हाक मारली अन बोलावले. तिला हळुच सगळे सांगितले अन तिला म्हणालो 'प्लिज तु फक्त फुल घे व याचे उत्तर नंतर देईन असे सगळ्यांसमोर बोल अन निघुन जा. एवढे कर माझ्या करता. '

गालातल्या गालात हसत रुपाली म्हणाली 'किती पैसे मिळणार रे तुला..१०० रुपये ना?'

'हो.' मी चाचरत म्हणालो.

'मग मला किती देशील त्यातले?'

'तुला?'

'हो. मला निम्मे ५० रुपये लागतील'

'ठिक आहे. चालेल.'

'हां आणि तेवढेच नाही तर पार्टी पण लागेल'

बापरे आता हा मोठा बाका प्रसंग आला. शंभर रुपयातले पन्नास तर आधीच गेले. वरती पार्टी म्हणजे हा घर घालुन धंदा होणार होता. पोरीपायी पैसे कसे जातात हे समजावुन सांगितले तरी पटत नाही जेव्हा जातात तेव्हाच कळते. ठीक
आहे असे म्हणुन मी परत आलो. निदान मार पडणार नाही अन फुल स्विकारले जाईल याची खात्री झाली होती. आता उत्तर काय असणार ते माहीत होते पण ते सगळ्यांच्या समोर मिळणार नसल्याने चर्चेला विषय मिळणार नव्हता. त्यामुळे औपचारिकता फक्त बाकी राहीली होती.

दिवस उजाडला. मधल्यावेळेत हळुच धीर करुन एक छानसे गुलाबाचे फुल रुपालीला दिले. मित्र लांबुन बघत होते. मी फुल देत आहे हे पाहुन पैसे गेल्याचे दुःख त्यांच्या चेह-यावर दिसु लागलेच होते पण रुपालीने फुल घेतले हे
पाहुन वैतागही स्पष्ट दिसत होता. मी रुपालीला फुल दिले. हलक्याच आवाजात ती म्हणाली 'दुपारी चारला अलकाला
येते. पिक्चर पाहुन पुनमला जेवायला जावु. घरी मी मैत्रिणिंबरोबर जाते असे सांगेन. नक्की ये.' अन हळुच ती फुल घेवुन निघुन गेली.

ती गेल्याबरोबर सगळी पोरे माझ्याभोवती गोळा झाली. कायरे काय म्हणाली ... असे करुन आरडा ओरडा केला. अरे हो हो करुन एकेकाला शांत करुन मी म्हणालो 'तिने प्रोव्हीजनली फुल घेतले आहे. विचार करुन सांगणार आहे नक्की काय ते.'

'अरे पण कधी सांगणार...'

'ते काही ती बोलली नाही. माहित नाही कधी सांगणार ते'

'गेला तु बाराच्या भावात. तुझा चक्का करुन टांगुन ठेवला. फुल घेवुन फूल बनवुन गेली'

'जावु दे रे. माझे पैसे द्या. आपली बोली ठरली होती'

पोरांनी मुकाट्याने पैसे दिले. शंभराची नोट अलगद खिशात ठेवली अन पुन्हा वर्गात आलो.

अचानक लक्षात आले अरे दुपारी जायचे आहे. पटकन रुमवर आलो. रुमपार्टनरकडुन उसने पैसे घेतले बरोबर असु द्यावे म्हणुन. अन अलकाला आलो. दोनपाच मिनिटांत रुपाली आली. तिकिटे काढली अन पिक्चरला गेलो. पिक्चर होता गोस्ट. अजुन त्याच्या स्मृती मनात कोरलेल्या आहेत. नंतर मस्तपैकी हॉटेलात गेलो. फार नाजुक आठवणी आहेत या. सगळ्याच मनातल्या कोप-यातुन काढुन दाखवता येत नाहीत. फार त्रास होतो नंतर. महत्वाचे तेवढे सांगतो.

चिअर्स करुन मी वाईनचे व ती ज्युसचे घुटके घेत हळुवार चर्चा चालु होती. अजुन तिने सकाळच्या फुलांचा विषय काढला नव्हता. चर्चेचे विषय सामान्य व रोजचेच होते पण माहौल असा होता की काय सांगु... शब्दांत सांगता येणे फार
अवघड आहे. मधुनच मी शंभर रुपयाची सकाळी मिळालेली नोट तिला दिली. ती पाहुन हसली. तिने ती नोट घेवुन तिच्या पर्समधे ठेवली अन पर्समधून एक पन्नास रुपयांची नोट काढली अन पेन मागुन घेवुन त्यावर काहीतरी लिहिले. ती नोट तिने दिली. मी वाचायचा प्रयत्न केला पण काही उमजले नाही. मी विचारले

'जर्मन?'

'हं'

'काय लिहिले आहेस?'

'का?'

'सहज. कळले नाही म्हणुन विचारले!'

'तुझे नाव'

'अरे वा ! असे आहे काय माझे जर्मन नाव ' असे म्हणुन परत नोट ठेवुन दिली अन गप्पा मारत बसलो.

यथावकाश जेवण झाले. बील आले. बील दिले. एकुण हिशोब मी तेव्हाही केला नाही व आजही करत नाही. त्यामुळे या दिवशी मी कितीला कापला गेलो ह्या प्रश्नाचे काही उत्तर नाही कारण या दिवसाने माझ्या मनात ज्या स्मृती कोरल्या आहेत त्या अमुल्य आहेत.

मित्राची गाडी आणली होती त्यामुळे रुपालीला घरी सोडण्यास अडचण आली नाही. कोप-यावरच इथुन मी जाईल असे सांगुन तिने थांबवले. अन एकटीच पुढे निघाली. दोनएक पावले पुढे गेली अन वळुन म्हणाली 'तुला उत्तर हवे होते ना? तु हुशार असशील तर तुझे तुलाच कळेल. नाही कळले तर ती नोट बघ' असे बोलुन निघुन गेली.

कॉलेज चालु होते. रुपाली भेटत होती. हा विषय परत कधीच चर्चेत आला नाही. तिने निम्मे पैसे घेतले यावरुन मी काय समजायचे ते समजलो होतो. मधुन मधून रुपालीच्या घरी जाणे होतच असे. का कोण जाणे आता दिवसांमधले अंतर वाढायला लागले. दिवस निधुन गेले. इंजिनीयरींग पुर्ण झाले. आपापल्या मार्गाने निघून गेलो.

****

दिवाळीसाठी घर आवरतांना जुन्या पेटीत एक पत्रिका अन पन्नास रुपयांची नोट पाहिली अन स्मृती जाग्या झाल्या. सुखद असो वा दुखःद आठवणी डोळ्यात पाणी आणतात. रुपालीच्या लग्नाची पत्रिका पाहिली अन मन परत तसेच उदास झाले जसे पहिल्यांदा पाहिल्यावर झाले होते. आता ती कुठे आहे, काय करते काही माहित नाही, मी पण माहीत करुन घेण्याचा प्रयत्न केला नाही. उगाच जीवाला त्रास कशाला करायचा, आहे ते ठिक आहे. नाही का?

पन्नासाची नोट हातात घरली अन हलकेच हसलो. अचानक आठवले तिने काहीतरी लिहिले होते त्या नोटेवर. इतक्या वर्षांनंतर अक्षरे फिकट झाली होती पण वाचता येत होती.....

एकेक करुन वाचु लागलो अन अश्रुंचा महापुर वाहु लागला.

त्या पन्नासाच्या नोटेवर लिहिले होते..... Ich liebe dich

No votes yet

राजे's picture
काळजाला चीरत जाणारा शेवट

काळजाला चीरत जाणारा शेवट Sad


सहज's picture
वाह!

नेहमीसारखीच नाना पेश्शल कथा.


तात्या अभ्यंकर's picture
नान्या, लेख्नन सुंदर

नान्या,

लेख्नन सुंदर रे..

तात्या.


स्नेहाराणी's picture
सूंदर!

नेहमीप्रमाणे खास लेखन...!


बिपिन कार्यकर्ते's picture
...

...


प्रकाश घाटपांडे's picture
Ich liebe dich जरा गुगलून

Ich liebe dich जरा गुगलून पाह्यल असत तर? समजा तव्हा गुगल नसन पण डिक्सनरी त व्हती का नाई?


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

परिजा's picture
Very Heart touching.....

खुप हळवं करुन टाकणारं लिहीलं आहे तुम्ही.

म्हणूनच काही गोष्टी वेळच्या-वेळीच एकमेकांशी बोलुन क्लिअर केलेल्या चांगल्या असतात; नाहीतर मग आयुष्यभर फक्त हळहळण्याशिवाय आपल्याकडे फारसं करण्यासारखं काही उरत नाही. (पण हे नेहेमीप्रमाणे उशीरा सुचलेलं शहाणपण असतं.... Santa )


परिजा
******

आयुष्याच्या गणिताची समिकरणे सोडवताना ... तू कधी वजा झालास हे कळलेच नाही
तुझ्या आठवणिंचा हातचा धरुन ... मी कधी पुढे गेले कळलेच नाही.....

प्रभो's picture
नान्या.....लै भारी कसं म्हणू

नान्या.....लै भारी कसं म्हणू याला??


मेघवेडा's picture
+ १

असेच म्हणतो. सकाळीच बघितली होती कथा पण कामं आटोपल्यावर निवांतपणे वाचू म्हणून ठेवली होती बाजूला. 'नाना पेश्शल' कथा वाचण्यास वाट पाहिली पण वर्थ इट.. नक्कीच! सुरेख रे नाना! फारच छान!!

काळजाला चीरत जाणारा शेवट
खरंच. Sad


दत्ता काळे's picture
. . . . . .

. . . . . .


राजे's picture
आता पुन्हा वाचला तेव्हा

आता पुन्हा वाचला तेव्हा कुठेतरी असे वाटले की त्या रुपालीची देखील चुक होती..... Sad
तीने स्पष्ट सांगायला हवे होते.. विदेशी भाषा कळेलच असे नाही नाना ला Big smile


रमताराम's picture
नाय हो

आमाला बी पैले अशेच वाटले व्हते. पन तिचंबी बराबर हाय. आरं म्हराटीत लिवलं अस्त न् दुसर्‍या कुनी वाचलं आस्तं तर झाला का इस्कोट. आता तिला काय ठाव्की की नानुस आळशी हाय म्हून. म्या अस्तू तर लगालगा जर्मन डिक्शनरी काढून पायलं आस्तं. छ्या, नानुस चांगला नाय केला तू. जाव् दे आसं व्हतंय जगन्यात. दोगं बी आपापले सुकात आस्ले म्हंजी जालं.


नवीन पुणेकर's picture
>>विदेशी भाषा कळेलच असे नाही

>>विदेशी भाषा कळेलच असे नाही नाना ला
नाना, त्यावेळीपण देशीवाला होता का?


आदि's picture
काही लोक कसले गोल गोल

काही लोक कसले गोल गोल घुमवतात........श्या बाबा हास्य
तिने सांगायच ना मनात काय होत ते. Big smile

नाना मस्त लेखन


पुणेरी's picture
अरेरे!

Sad
पण अश्या अनुभवातुन उभा राहीलेला नानाच तर कायम जिंदगीशी झगडायला धीर देतो ना!
Grade


---
पुणेरी
puneri

पाषाणभेद's picture
मस्त कथा. (कथाच आहे की

मस्त कथा. (कथाच आहे की खरोखरचा अनुभव?)


------------------
मी मराठी! जय मराठी!!
माझी जालवही

इस्किलार's picture
लिलीची फुले...!!

"पन्नासाची नोट" ही खरे तर एक कविताच आहे, जी लेखकाने मुक्तछंदात लिहिली आहे. हळवी तर आहेच पण त्या अनुभवाचे ओझे (की शाप?) घेऊनच आयुष्य "तू आता भोगले पाहिजे..." असा इशारादेखील ती नोट देते.

या निमित्ताने पु.शि.रेगे यांची अशाच अनुभवाची एक छोटी कविता आठविली...

"लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले...!

लिलीची फुले
आता कधीहि
पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!"


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

रमताराम's picture
...

इस्किलारा... तू बी हळव्या आट्वनी काडायलास. नको रं बाबा.


इस्किलार's picture
क्रेडिट....!!

"....हळव्या आट्वनी...."

इफ दॅट्स द केस, देन क्रेडिट गोज टु मि.अवलिया !!


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

राजे's picture
रे

रे अरे........................ ह्या अवलियाचे काय करु मी wink


भाग्यश्रीकुलकर्णी's picture
मस्त लिहीली आहे कथा.

मस्त लिहीली आहे कथा.


विश्वनाथ मेहेंदळे's picture
शेवटी चटका लावलात भाऊ !!!

शेवटी चटका लावलात भाऊ !!!


मितान's picture
सुंदर कथा ! मला शन्नांच्या

सुंदर कथा !

मला शन्नांच्या शैलीची आठवण झाली.. हास्य


जोवरी सुचते पावसाचे गाणे, हिरमुसवाणे व्हावयाचे नाही !

पुण्याचे पेशवे's picture
अजून एक प्रेमभंगाची कथा. राजा

अजून एक प्रेमभंगाची कथा.
राजा बंद झाला तर नान्या चालू..

नान्या मस्तं कथा रे... बाकी हे अलका, पूनम पुण्यातलं काय रे? wink

(पूनमप्रेमी)


-पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस's picture
सुरेख कथा! आवडली!

सुरेख कथा!
आवडली!


टारझन's picture
!!!! णाणा क्लासिक्स !!!!

!!!! णाणा क्लासिक्स !!!!


डॉ.श्रीराम दिवटे's picture
भिजलेली नोट...

भिजलेली नोट...


***********************************************************************************
माझे 'पुस्तक' माझा 'ब्लॉग'

डेविल's picture
मनाला भिड्नारी कथा !

मनाला भिड्नारी कथा !


शानबा५१२'s picture
लेखकाने 'तिने' सांगितल्यावर

लेखकाने 'तिने' सांगितल्यावर तेव्हाच 'त्या' ओळीचा अर्थ का नाही बघितला??

लेख पुर्ण काल्पनिक आहे,म्हणुन हसायला आल!


*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

मराठमोळा's picture
नॅन्स, डोळे पाणावणारे

नॅन्स,
डोळे पाणावणारे प्रकटन....

असो,
नानाकडे पन्नासाची नोट आहे, माझ्याकडे तसच एक कॅडबरी डेरी मिल्क च एक कवर आहे.


राजे's picture
साठवतच बसा !

साठवतच बसा !

Sad


आदि's picture
माझ्याकडे पण एक डेअरीमिल्कच

माझ्याकडे पण एक डेअरीमिल्कच कव्हर आहे आणि एक पेपरनॅपकीन

>>साठवतच बसा !
गा. गु. च. का. ( हे ज्याला कळेल तो हुशार)


विशाल कुलकर्णी's picture
माझ्याकडे एक पत्र आहे, मीच

माझ्याकडे एक पत्र आहे, मीच लिहीलेले आणि तसेच परत आलेले.
फक्त खालच्या बाजुला एका कोपर्‍यात लिहीले होते...
"कृपया पत्र घरच्या पत्त्यावर पाठवणे." Crazy


"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
(कवि श्री. प्रवीण दवणे)

आम्ही इथेही पडिक असतो : ऐसी अक्षरे मेळविन

गणपा's picture
अरे लेका मग का नाही पाठवल ते?

अरे लेका मग का नाही पाठवल ते? नुसतेच केस उपटत बसला हैस.

मे बी तिने आडवळणाने सांगायचा प्रयत्न केला असेल की आधी घरच्यांची परवानगी घे मग मी तुझीच wink
Laughing out loud

अडाणि


काटकर's picture
छान !

छान !


करतो. करेन. व करेगें

अस्मी's picture
सुंदर...खूप छान

सुंदर...खूप छान हास्य


गणपा's picture
अरे हे वाचायचच राहुन गेल

अरे हे वाचायचच राहुन गेल होतं.
आत्ता कळल की नान्याच्या लेखांत/कवितेत इतका दर्द कुठुन येतो.


विशाल कुलकर्णी's picture
नान्या... अडाणी रे अडाणी तू !

नान्या... अडाणी रे अडाणी तू ! अरे काहीतरी लिहीलय म्हणल्यावर मी आकाशपाताळ एक केलं असतं त्याचा अर्थ जाणुन घ्यायला. भलेही त्या शिव्या का असेनात. जावुदे.. त्याचवेळी तुला त्याचा अर्थ कळला असता तर आज आम्हाला हे वाचायला कसं मिळालं असतं.
बाकी लेखन तुझ्या किर्तीला साजेसेच आहे. ते छानच असणार याची खात्री असते म्हणुनतर आम्ही उड्या टाकतो ना हास्य


"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
(कवि श्री. प्रवीण दवणे)

आम्ही इथेही पडिक असतो : ऐसी अक्षरे मेळविन