माझे(फोटोग्राफिक)किडे = मॅक्रो फोटोग्राफी भाग१
ज्या गोष्टी मुळे मी फोटोग्राफी कडे आकृष्ट झालो ती म्हणजे मॅक्रो फोटोग्राफी. या पद्धती मधे लहान-लहान गोष्टींचे उदा. किडे, फुले , फुलांचे परागकण ई. जवळुन (क्लोजप) फोटो काढुन त्या मधील जास्तीत जास्त डिटेल टिपण्याचा प्रयत्न असतो. माहीत अस्लेल्या किड्यांची नावे दिली आहेत. (उरलेल्या नावांसाठी जाणकारांनी मदत करावी)
दर रविवारच्या येउर व ईतर भटकंती दरम्यान ह्या मॅक्रो फोटोग्राफीत मी लावलेले दिवे..............

ईथे मुद्दामच एकाच कोळ्याचे (हळुहळु क्लोजाप घेत) ४ फोटो दिले आहेत.




आंब्याच्या वाळलेल्या पानाच्या सुरळीत हा लपुन बसला होता. स्वतःची रगसंगती अप्रतीम रित्या त्या पानाशी मिळ्ती जुळती करुन घेतली आहे.



नुकतच कोषातुन बाहेर आलेले पाम बटरफ्लाय

घरातल्या या कोळ्याने आपले भक्ष(डास) पकडले आहे

प्रेईंगमॅटीस (गवळण)




क्रमशः
कॅमेरा निकॉन डि ९० + लेन्स नोकॉन १८-५५ व निकॉन १०५
.jpg)
वाह ! एकापेक्षा एक सुंदर असे
वाह !
एकापेक्षा एक सुंदर असे फोटो क्या बात है.
शेवटून तिसरा तर गजब !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त रे , बरेच वेग-वेगळे किडे
मस्त रे ,
बरेच वेग-वेगळे किडे आहेत की तुझ्याकडे.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
क्लास...
क्लास...
फार सुंदर
पानातल्या बेडकाचा अप्रतिम. त्याचे डोळे. पानांच्या शिरा एकदम स्पष्ट दिसताहेत. लै भारी फोटोज्.
एक वेगळीच अनुभूती दिलीत या
एक वेगळीच अनुभूती दिलीत या फोटोंनी.
मस्त.
एखादे प्रदर्शन का करत नाही तुम्ही?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
ज ब रा !!!!!!!
ज ब रा !!!!!!!
आपले...
आपले जयपाल भौ नॅशनल जिऑग्राफिक मासिकात दिसले तर आश्चर्य वाटणार नाही मला.
ज ह ब ह रा !!! रे चित्रमित्र
ज ह ब ह रा !!! रे चित्रमित्र !!
च्यायला सुलेमानी रेहमानी आहेत
च्यायला सुलेमानी रेहमानी आहेत हे तर!
त्या कोळ्याचं डोकं लैच भारी! एखाद्या माणसाचा मुखवटाच वाटतो!
अगदी!! हेच विचार आले होते
अगदी!! हेच विचार आले होते डोक्यात.
हे फोटो मला फारच जास्त आवडलेत !!
माझे कि...
फोटो कायबी खासच...
किती किडे करतोस रे भाऊ!
पण हे किडे खासच!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आणखी एक आठवले. जय दादा,
आणखी एक आठवले. जय दादा, तुम्ही फोटो तर चांगले काढतातच पण त्या फोटोंवर काही प्रोसेसिंग करत नाही की सॉफ्टवेअर मधले पुचाट फटकारेही मारत नाही. आणखी एक, मुख्य म्हणजे तुमच्या फोटोंमध्ये बटबटीत 'वॉटरमार्क' ही नसतो.
तुमची नजर अन कॅमेरा बस्स.
पुलंचे एक वाक्य आठवले. 'खानदानी गवई तंबोर्याच्या चार तारा अन तबल्यात स्वरांचा स्वर्ग उभा करतो' अशा अर्थाचे.
जे काही आहे ती तुमची कलाकाराची नजर बघणार्यांना लगेच समजते. कला दाखवण्याचीही एक नजाकत असते ती तुमच्या फोटोंमध्ये दिसते. वर ताण करून "आहे ते तसेच घ्या" असेही तुम्ही म्हणत नाही. यात तुमचा विनय दिसतो. एका कलंदर कलाकाराचे मन दिसते. जी कला आपण केली ती आहे तशी रसिकांपर्यंत सादर करणे हे ही एक कलेचे अंग आहे. ते तुम्ही सांभाळतात. असो.
उत्तरोत्तर आम्हांस तुमची कला बघावयास मिळो ही इच्छा.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
>>कला दाखवण्याचीही एक नजाकत
>>कला दाखवण्याचीही एक नजाकत असते ती तुमच्या फोटोंमध्ये दिसते
जी कला आपण केली ती आहे तशी रसिकांपर्यंत सादर करणे हे ही एक कलेचे अंग आहे.
+१
जयपाल.. मुजरा... !!
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
पानातल्या बेडकाचा अप्रतिम.
पानातल्या बेडकाचा अप्रतिम.
अप्रतिम!
दुसर्या फोटोत कोळ्याबरोबरचा किट्क कोण आहे?ते त्याचे भक्ष्य का?
बाकि फोटो अप्रतिम्!खासकरुन फुलपाखराचा,फुलपाखरु नसुन फुलच वाटते ते!
मुम्बइत एकवेळ मौल्स सापडतिल, पण मराठि पुस्तकाचि लायब्ररि शोधुनहि सापड्णार नाहि!
वा जयपासाहेब. मस्तं फोटो आहेत
वा जयपासाहेब. मस्तं फोटो आहेत ..
बाकी तू फोटोच इतके छान काढले आहेस की वेगळे प्रोसेसिंग करायची काही गरजच नाहीये. नाहीतर माझ्यासारख्याने काढलेले फोटो प्रोसेसिंग केल्याशिवाय दाखवणे म्हणजे बघणार्यला केवळ शिक्षाच. बाकी तू प्रत्यक्ष भेटशील तेव्हा २-४ फोटोग्राफीचे धडे नक्की दे.
बाकी, फोटोवर वॉटरमार्क जरूर टाक नाहीतर हे फुकटे ब्लॉगवाले तुझे फोटो ढापून फुक्काटचा टीआरपी खातील.
-पुण्याचे पेशवे
+ १ वॉटरमार्कचे तेवढे मनावर
+ १ वॉटरमार्कचे तेवढे मनावर घे रे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जयपाल, तुम्ही टिपलेले सर्व फोटो अप्रतिम,
मॅक्रो फोटोग्राफी व्रर जयपालजीची हुकमत आहे.
दिलीप