काल बिनवासाच्या मातीवर पडणार्या परक्याच पावसात भिजले आणि तुझी कडकडून आठवण आली....तुझ्यामाझ्या पावसाळ्यांची...
आठवतं सये, भर पावसात नदीकाठी ओच्यामध्ये रंगीत गारगोट्या गोळा करायचो आपण.. दातपडल्या तोंडात शर्यत लावून चिंचा कोंबणं..फुटक्या बांगड्यांच्या रंगीबेरंगी काचांचे तुकडे जमवून केलेले 'गुप्त खजिने'...माळवदावर भाकरीच्या कुस्कर्याबरोबर प्यायलेलं डेर्यातलं ताक..आणि देवळाच्या चिरेबंदी सावलीत मांडलेली भातुकली....कोणी टारगट भुताखेतांच्या गोष्टी सांगू लागला की आम्ही पळुन जायचो.. तू मात्र जणु खिळुन जायचीस तिथे..सोसाट्याचा वारा सुरू झाला की घरात दडून बसण्याऐवजी तुला घाई वार्याने पडलेल्या कैर्या वेचायची..! पाऊस सुरू झाला की आपलं फुगड्या घालत सुरू- " ये गं ये गं सरी.. माझे मडके भरी..." हे सगळे आठवणींचे थेंब झेलताना आज मन वाळलेली पानं भिजताना जशी चिरमटून जातात तसं कापरं झालंय...
आज कळतंय की ती सर खरंच आपलं ऐकत असते... उगाच नाही तुझं मडकं वाहून गेलं.. !
एकदा असाच सोसाट्याचा वारा आला आणि आपले ढग विखुरले..तुला तुझं..मला माझं आभाळ सापडत गेलं... किती फरक होता त्यात !आपल्याही नकळत वार्याने दूर दूर नेले...दोघीहे गेलो त्याचे बोट धरून..अधुनमधुन मागे बघत..मध्येच जुन्या खुणा दाखवत.. तुझ्या आभाळात नेहमीच इंद्रधनुषी रंग विखुरलेले असायचे...प्रत्येक रंग असोशीने मिरवायचीस तू...प्रत्येक रंगात हरवून जायचीस तू..... आणि मी फक्त माझ्या निळाईत बुडाले म्हणून चिडवत रहायचीस वाकुल्या दाखवत..तेव्हाही पाऊस मात्र दोघींचा असायचा..
अचानक एका वीज फितूर झाली आणि त्या फटक्यात कळले तुला... रंग खरा एकच.. बाकी सारे भास!!!! पावसासोबत वेड्यासारखी कोसळत गेलीस तू..
मोडून फुटून गेलीस तू..आणि दुरून तुला बघणारी मी पण !! माझे हात तुला देण्याचा खुळा प्रयत्नही करून पाहिला..तू नाकारलास तो आणि माझ्या हाताला लागल्या त्या गारगोट्या..रंगीत काचांनी रक्तबंबाळ केलं मला...चिरेबंदीत मिटून गेलेली तू जणू रंगांध झाली होतीस....उधळलेल्या भातुकलीला पाऊस निरागसपणे भिजवत होता..
त्या पावसाळ्यानंतरचा एकही पावसाळा 'आपला' राहिलाच नाही...
तरीपण प्रत्येक पावसाला तुझी एकतरी सर मागतेच मी..प्रत्येक रंगीत ढगाशी भांडते मी....कधीतरी त्याला माझा हट्ट पुरवावा लागेलच ! .आजही तुझ्या माझ्या हरवलेल्या पावसाची वाट बघतेय..एक उन्हाळा सरता सरता.. !
>>आजही तुझ्या माझ्या
>>आजही तुझ्या माझ्या हरवलेल्या पावसाची वाट बघतेय..एक उन्हाळा सरता सरता.. !
छान लिहले आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>>आजही तुझ्या माझ्या
>>आजही तुझ्या माझ्या हरवलेल्या पावसाची वाट बघतेय..एक उन्हाळा सरता सरता.. ! >> छान लिहले आहे.
राजेंशी सहमत....
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
छान...डायरीतल(रोजिनिशी) एखाद
छान...डायरीतल(रोजिनिशी) एखाद पान वाचल्या सारख वाटल.
ह्म्म.. डायरीतलंच आहे हे
ह्म्म.. डायरीतलंच आहे हे
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
छान...डायरीतल(रोजिनिशी) एखाद
येस्स..
तात्या.
छान..
छान लिहीले आहे.
मस्त लेखन
मस्त लेखन
आजही तुझ्या माझ्या हरवलेल्या
आजही तुझ्या माझ्या हरवलेल्या पावसाची वाट बघतेय..एक उन्हाळा सरता सरता.. !
सुरेख !!!!!!!!!!
मस्तच लिहिलं आहे.
मस्त!!!
मस्त!!!
माया तै मस्त..........
माया तै मस्त..........
वाह...........मस्तच लिहिलयस.
वाह...........मस्तच लिहिलयस.
सुरेख लेखन गं मायातै!
सुरेख लेखन गं मायातै!
छान आहे लिखाण..
छान आहे लिखाण..
सुरेख
फार छान! आवडले.
यावरुन जुन्या उमरावजान सिनेमाची आठवण झाली.
मला उमरावजान चा संदर्भ समजला
मला उमरावजान चा संदर्भ समजला नाही..
बघावा लागेल आता तो सिनेमा..
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
ती रेखा कुठेतरी पावसात भिजत
ती रेखा कुठेतरी पावसात भिजत गाणे म्हणत असेल हो त्याची दर्दभरी आठवण झाली असेल सहजकाकांना
त्यामुळे... तो प्रतिसाद...
बाकी उमरावजानच्या त्या ठोकळ्या हिरोच्या जागी आमचे सहजकाका आरामात फिट झाले असते.. हो की नाही काका
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ह्या पाऊसाचा नादच वाईट खुप
ह्या पाऊसाचा नादच वाईट खुप जीव लावतो
मस्त
मस्त लिहले आहेस!
मस्तचं
मस्तचं
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा