सर्वप्रथम ५० रू डील सुविधेबद्दल राजेंचे आभार.
बरेचवेळा मला पुस्तके काढून टाकण्याची वेळ येते. एक महत्त्वाचा प्रश्न असे की त्यांचे करायचे काय. एकदोनदा वाचली गेलेली पुस्तके रद्दीत जाण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर झालेला चांगला असा माझा समज आहे. पूर्वी मी अशा पुस्तकांची सूची करून मित्रमंडळींना पाठवित असे नि कोणाला हवी असल्यास घेउन जाण्यास सुचवित असे (क्वचित मी स्वतः पोचवून देण्याची तयारी दाखवित असे). अर्थात एखादा अपवाद वगळला तर याला प्रतिसाद थंड असे. फुकट मिळूनदेखील वाचून पाहण्याची तयारी नसे. अशा वेळी जवळजवळ नव्यासारखी असणारी पुस्तके रद्दीत टाकणे जिवावर येई. कारण रद्दीत गेले की पुस्तकाच्या पुनर्वापराची शक्यता खूपच कमी होते.
इथे ई-खरेदीचा विभाग पाहून या व्यासपीठाचा वापर पुस्तकांचे आदानप्रदान करण्यासाठी करता येईल असे वाटले. राजेंशी बोलताच त्यांनी ही कल्पना राबविण्याची तयारी दाखविली. अर्थात मीम इथे फसिलिटेटर अथवा माध्यम म्हणून काम करणार असल्याने मीमला काही नाममात्र पण निश्चित रक्कम मिळावी असे मला वाटले. म्हणून मी '५० रू डील'ची कल्पना मांडली जी राजेंनी आज कार्यान्वित केली आहे. आपले सभासद पुणेरी आणि सोना यांनी ताबडतोब प्रतिसाद देऊन सक्रीय पाठींबा दिला आहे.
पुस्तक न विकता, शेअर करण्यासाठी देउन मीमला माफक ५० रू देऊन सभासद पुस्तके घेऊ शकतात नि स्वतःची ही तशीच देऊ शकतात. याने पुस्तकाचा पुनर्वापर तर वाढेलच पण न वाचणारेही '५० रू तर आहे, वाचून बघू' असे म्हणत वाचूही लागतील. पुन्हा जेव्हा विकत घेणारा ते काढून टाकण्याचा विचार करेल तेव्हा त्याने/तिने ते पुस्तक केवळ रू. ५०/- ला घेतलेले असल्याने विकण्यापेक्षा याच सुविधेखाली पुन्हा देण्यास तयार होण्याची शक्यता आहे. पुस्तक विकण्यापेक्षा हे अधिक उपयुक्त असे मला वाटले. याने वाचन संस्कृती विस्तारावी हा हेतू आहे.
माझी पुस्तके वेळोवेळी इथे देत राहीनच. आपणही सर्वांनी आपली शक्य ती पुस्तके इथे द्यावीत ज्यामुळे अशा पुस्तकांचा पुनर्वापर नि उपलब्धता दोन्हीही वाढतील.
उत्तम, माझ्याकडून जमेल तशी
उत्तम, माझ्याकडून जमेल तशी पुस्तकांची आदानप्रदान करेन .
पुष्करिणी
माझीही काही पुस्तके मी
माझीही काही पुस्तके मी राजेकडे दिली आहेत.मला ही कल्पना अतिशय आवडली
मी ही लवकरच घरी गेलो की
मी ही लवकरच घरी गेलो की माझ्या पुस्तकांची यादी येथे टाकेन.
तुमची कल्पना एकदम उत्तम आहे म्हणून उचलून धरली आहे एवढंच, जेणे करुन वाचनाची सवय वाढावी.
तुमच्या ह्या कल्पनेमुळे माझ्यासारख्या अनेक वाचकांना ह्या योजनेचा लाभ होईल अशी आशा.
कधी कधी असे होते की पुस्तकाची किंमत जास्त आहे म्हणून विकत घेतले जात नाही व वाचायचे राहून जाते
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मी ही लवकरच घरी गेलो की
पूनमवरून लवकर घरी गेलो की असं वाचू का ?
अहो घरीच आहे मालक *
अहो घरीच आहे मालक
* चिक्कोडीला गेलो तर... दिल्ली मधील सर्व सामानामध्ये पुस्तके पण तिकडेच गेली आहेत.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छान
उत्तम कल्पना!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आणि हो, आजच्या दिवसामध्ये मी
आणि हो,
आजच्या दिवसामध्ये मी १५ पुस्तके ५०+ डिल मध्ये टाकली होती त्यातील ५ पुस्तके वेगवेगळ्या सदस्यांनी घेतली. हे सांगणे राहीले होते..
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ती स्मायली
मला उदयोन्मुख दिसायला लागली आहे.
हाल ए गम क्या बता ए.. हम हसे
*
आभारी आहे.
**
एक माझी जुनी शायरी आठवली
हाल ए गम क्या बता ए..
हम हसे तो भी लगते रोते है
हम रोए तो हसते हूए लगते है
राजे द शायर
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मला पण ही योजना आवडली.. पण
मला पण ही योजना आवडली..
पण पुस्तकांच्या बाबतीत मी फारच हावरट आहे..माझ्याकडे असलेल्या पुस्तकांची चाळणी झाली तरी ती मला काढून टाकता येत नाहीत...
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
हम्म
मी तसे केले तर मलाच घराबाहेर रहावे लागेल. आताच पुस्तकसंख्या ७०० च्या आसपास आहे. महिन्याला सुमारे १०-१५ पुस्तकांची भर पडत असते. आजवर मी नियमितपणे पुस्तकांना चाळणी लावली नसती तर ही संख्या अदमासे दीड ते दोन हजार इतकी झाली असती. शिवाय उपयुक्तता संपल्यावरही जपून ठेवणे हे निव्वळ स्टँप कलेक्षन आहे असे मला वाटते. हावरट मी ही आहे. अनेकदा निव्वळ शीर्षक वाचून पुस्तक खरेदी केले जाते. पण आवडले नाही तर स्वतःशी तसे प्रामाणिकपणे मान्य करून काढूनही टाकतो.
मायातै, पुस्तके आपण खरेदी करीत असलो तरी सर्वच पुस्तके आवडतात असे नाही, आवडली तरी संग्राह्य वाटतात असे नाही, संग्राह्य वाटली तरी जागेचा विचार करता नि नव्या पुस्तकांना आत येण्यासाठी वाव ठेवताना काढून टाकावी लागतात. अर्थातच आवडलेली पुस्तके कोणी काढून टाकत नाही त्यामुळे भावनिक गुंतवणूक वगैरे अर्थातच फक्त तिथे असते, सर्व पुस्तकांबाबत नाही. पण ना आवडलेली पुस्तके वा एकदा वाचले चांगले होते पण पुन्हा पुन्हा वाचावे असे काही नसेल तर केवळ आपण पैसे खर्च केले म्हणून जमा करून ठेवणे हे मला तरी जमणार नाही. हां आता मला माझ्याकडे इतकी पुस्तके आहेत अशी फुशारकी मारायची असेल तर गोष्ट वेगळी. कित्येक पुस्तकांना तर निव्वळ प्रासंगिक्/नैमित्तिक मूल्य असते अशी पुस्तकेही सांभाळून ठेवण्यात काही अर्थ आहे असे मला वाटत नाही.
अवांतरः तसे काही लोक त्यांच्या शाळेच्या वह्याही जपून ठेवतात. आता त्यात उपयुक्ततामूल्य शून्य असते.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मी अजुन लहान आहे हो ररा...
मी अजुन लहान आहे हो ररा...
माझ्याकडे पाचेकशे पुस्तकं आहेत..( शाळा-कॉलेजच्या वह्या जपून ठेवायला आधी अभ्यास आवडायला पाहिजे..त्या बाबतीत आनंदच होता आम्चा !! ) भर पडतेच आहे..आणि मुख्य म्हणजे अजुन पुस्तकांसाठी जागा पण आहे.जागा संपेल तेव्हा असा त्याग करायला शिकावेच लागेल मलापण !!!
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
कल्पना फारच छान आहे.
कल्पना फारच छान आहे. माझ्याकडची पुस्तकं चाळुन बघायला पाहिजेत.
सुरेख कल्पना. भाग घेता येत
सुरेख कल्पना. भाग घेता येत नसल्याने वाईट वाटते.
छान कल्पना. मस्तं वाटली. राजे
छान कल्पना. मस्तं वाटली. राजे प्रत्येक पुस्तकासोबत जमलेच तर पृष्ठसंख्याही द्यावी. म्हणजे ५० रु उगाच मोठें पुस्तक विकत घेतले व वाचायचे राहीले असे व्हायला नको.
बाकी माझी मागणी लवकर नोंदवेन.
त्याआधी मानसोपचार दज्ज्ञाकडे जाऊन येतो..
-पुण्याचे पेशवे
चांगली सुचना व अंमळ
चांगली सुचना
व अंमळ पांढर्या रंगातील विचारावर तातडीने तुम्ही लक्ष पुरवाल ही अपेक्षा
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तुला पांढर्या रंगाचं
*संपादित*
सदस्यांनी अवांतर गप्पा खरडवहीत कराव्यात
-पुण्याचे पेशवे
(विषय दिलेला नाही)
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
भाग घ्यायला मलाही आवडेल. पण
भाग घ्यायला मलाही आवडेल. पण हि योजना मुंबईसाठी उपलब्ध आहे काय? इथे कोणाशी संपर्क करावा लागेल?
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
हो सर्वांसाठी आहे ही योजना
हो सर्वांसाठी आहे ही योजना
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
माझी पण यादी काढली पाहिजे...
वेळ लागेल (बायकोचे डोळे भरुन येतील मी चक्क पुस्तके आवरतोय हे पाहुन..)
छान कल्पना आता घरातील
छान कल्पना
आता घरातील पुस्तकांची वर्गवारी करून इथे देता येतील अशी पुस्तके सांगतो.. मागणी नोंदवतो.. अर्थात काहि काळानंतर.. सध्या लगेच शक्य नाही
-ऋ
ररा अतिशय उत्तम सुचना आहे.
ररा अतिशय उत्तम सुचना आहे.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
उत्तम कल्पना..
मी हा धागा उशीरा वाचला. मी ह्या योजनेत सहभागी होईन.
+ १
उत्तम कल्पना!
पुस्तकं मी घेतो ती अनेकदा लेखकांना प्रोत्साहन, टाईमपास अश्या कारणांनी. माझ्या दृष्टीने ती संग्राह्य नसतातच. अशी पुस्तके मी बहुधा फिरवतो मित्रांत, आप्तांत. इथे ती कदाचित अनेक लोकांच्या उपयोगी पडू शकतील.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)