स्वरालयीची दुनिया..२

0
0

स्वरालयीची दुनिया..१

मैने तेरे लिये ही.. (येथे ऐका)

आनंद सेहगल. Lymphosarcoma of the intestine चा एक पेशंट. त्याच्यावर नितांत प्रेम करणारे कुलकर्णी दांपत्य आणि सख्ख्या भावापेक्षाही हा आनंद ज्याला अधिक प्रिय, तो अबोल स्वभावाचा, हळव्या मनाचा डॉ भास्कर बॅनर्जी..

"बाबूमोशाय, जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए!" असं म्हणणारा आनंद. असह्य वेदनामय मृत्यू ज्याचा निश्चित आहे असा आनंद!

छोटीशी घरगुती मैफल जमली आहे. कुलकर्णी दांपत्य, डॉ बॅनर्जी बसले आहेत, मध्येच खास हृषिदांचा प्रसन्न नोकर ये-जा करतो आहे..आणि आपल्या भयानक मरणाची पूर्वकल्पना असलेला आनंद गातो आहे,

'मैने तेरे लिये ही सात रंगके सपने चुने..!'

कुटुंबातील जिव्हाळ्याची चार माणसं जमली आहेत.. 'ए, एखादं छानसं गाणं गा ना!' असं कुणी कुणाला सांगतो आहे. तुमच्याआमच्या जीवनातील ही अगदी साधी घटना..किती छान चितारली आहे हृषिदांनी!

मुकेशची गायकी, गाण्याचा मूड, त्याचं चित्रीकरण, एक जगावेग़ळीच अदा असणारा 'काका' राजेश खन्ना, अमिताभ बच्चन नामक एक दिग्गज, स्वरलयींची सुंदर रांगोळी काढणारे सलिलदा, आणि 'हृषिदा' नामक एक आभाळाइतका मोठा माणूस.! आता कुठे गेले असे चित्रपट? कुठे गेली अशी गाणी?

"आनंद मरा नही, आनंद मरते नही!' हेच खरं..!

-- तात्या अभ्यंकर.

>>>मैने तेरे लिये ही सात

1

>>>मैने तेरे लिये ही सात रंगके सपने चुने..!'
सर्वात आवडत गाण........
आनंद पिक्चरही ग्रेट होता, आणि काका क्या कहने

वाह ! अत्यंत सुरेख गाणे

2

वाह !

अत्यंत सुरेख गाणे निवडले तुम्ही अभ्यंकरसाहेब... !
हे गाणे म्हणजे एकदम क्लासिक....

अजून लिहा..
काही भाग झाले की आपण ह्याचे ई-पुस्तक तयार करु व पिडीफ पण, जेणे करुन वाचकांना सर्व एकाजागी वाचता येईल.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ओक्के..

3

ओक्के..


तात्या! एकदम मस्त! राज्या,

4

तात्या! एकदम मस्त! हास्य

राज्या, कल्पना मस्तंय रे! होऊन जाऊ दे!

क्या बात है तात्या, अतिशय

5

क्या बात है तात्या, अतिशय आवडतं गाणं......
आनंदमधलं.. जिंदगी कैसी है.... देखील खुप आवडतं ! हास्य


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

मस्त रे तात्या !! येवु दे

6

मस्त रे तात्या !! येवु दे अजुन असेच बहारीचे वर्णन हास्य

अतिशय आवडतं गाणं... छान लिहले

7

अतिशय आवडतं गाणं... छान लिहले आहे.

मस्त तात्या.. एकदा आनंद

8

मस्त तात्या..
एकदा आनंद मधल्याच 'कही दुर जब दिन ढल जाये...' वर पण लिहाना.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

तात्या.....

9

तसा संगीतात मी अनभिज्ञच पण तुमचे सुबक लिखाण वाचायला आवडते. बरेच नवनवीन कळत जाते संगीताबद्दल तुमचे लिखाण वाचुन.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

प्रतिसाद दिलेल्या सर्व

10

प्रतिसाद दिलेल्या सर्व वाचकांचा मी ऋणी आहे..

तात्या.