द सेपॉय रिव्होल्ट - ले. ज. मॅक्लिऑड आइन्स

लेखक :धनंजय गोळे
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन
मुल्य : १२०.००
पृष्ठसंख्या: १४४

स्वातंत्र्यसमराची दुसरी बाजू

1857 चे स्वातंत्र्यसमर हा आपल्यासाठी प्रोत्साहक लढा असला , तरी ब्रिटिशांनी त्याला ' शिपायांचे बंड ' च ठरवले आहे. या लढ्यात विजयश्रीची माळ ब्रिटिशांच्या गळ्यात का व कशी पडली याचे इंग्रजांच्या दृष्टीने , त्यांचा या लढ्यातील एक योद्धा लेफ्ट. जन. मॅक्लिऑड आइन्स याने केलेले मूल्यमापन धनंजय गोळे यांच्यामुळे मराठीत उपलब्ध झालेले आहे. आइन्स यांच्या लिखाणात कोठेही श्ाेष्ठत्त्वाचा अभिनिवेश नाही. त्यामुळेच इतिहासाच्या साक्षेपी वाचकांना ते आवडेल.