जिना - जसवंत सिंग

लेखक :जसवंत सिंग
अनुवादक :अशोक पाध्ये
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्य : ५००.०० रु.

1906 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील फारच थोडा भाग आपल्या समोर ठेवला गेला होता. टिळक, गांधी, सत्याग्रह, चलेजाव चळवळ, क्रांतिकारकांचे प्रयत्न... बस्स. एवढेच आपल्याला ठाऊक आहे.परंतु याखेरीज असलेला 90टक्के इतिहास हा श्री. जसवंतसिंग यांनी संशोधन करून बाहेर काढला. जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले. पाच वर्षे 30 माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे 5000 संदर्भ गोळा केले गेले.