खुश खरेदी (कथा संग्रह) - शंकर पाटिल

लेखक :शंकर पाटील
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्य : १००.०० रु.

बाबू चांगलाच कर्जबाजारी झाला. तवनापपाचे घेतलेले दहा हजार रुपये कशानं फेडायचे हे कळेना झालं. अखेर यावर पंचाईत बसली आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलं, बाबूनं हे हॉटेल कर्जापोटी तवनापपाला लिहून द्यावं आणि तवनापपानं त्यात आपलं कर्ज वळतं करावं, इतरांचीही देणी भागवावीत आणि एक-दोन हजार रुपये बाबूला रोख द्यावेत.पंचाईतीत ठरल्याप्रमाणं सगळ्या गोष्टी नमूद करून पक्का कागद केला.