मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle
गारवेल (कथा संग्रह) - शंकर पाटिल
लेखक :शंकर पाटील
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्य : १३०.०० रु.
आपल्या बाळपणापासून शिवा त्या गारवेलाचा संसार बघत आला होता. एवढी दांडगी, डेरेदार चिंच गारवेलानं निम्मी झाकली होती. वर्षांनुवर्षं भरतकाम करावं तसे टाके घालीत बसला होता.दरसाल आपलं जाळं विणतच होता. बघावं तिकडं सगळीकडं त्या झाडावर ती हिरवी वेलबुट्टी आणि फुलं दिसत होती. किती पावसाळे आणि किती उन्हाळे त्यानं पाहिले होते! किती वादळांशी झोंबी घेतली होती! गरजणार्या वळवानं झोडलं, झंझावातानं झिंजाडून विस्कटून बघितलं; पण आजवर त्यानं कधी कुणाला दाद दिली नव्हती, नमतं घेतलं नव्हतं.
.jpg)