मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle
श्रीगणेशा (कथा संग्रह) - शंकर पाटिल
लेखक :शंकर पाटील
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्य : १२०.०० रु.
गंगीला पदर येऊन ती मकरात बसली तेव्हापासून या खडकलाटेचे डोळे तिच्याकडं लागून आहेत.तिच्या रूपाची पडलेली भूल अजून तशीच आहे; कारण गंगीचं अंग चांगलं उफाड्याचं आहे आणि थोरवड अंगाच्या ह्या गंगीचं कातडंही हळदीगत गोरंपान आहे. तिच्या नाकाचा शेंडा जरासा खुडल्यागत दिसतो; पण तेच नाक तिला शोभून दिसतं असं तिथल्या तरुण पोरांचं मत आहे. तिच्या गोर्या गालावर डाव्या बाजूला एक हिरवा तीळ आहे, तो तिला पाहणार्याच्या मनावर ठसल्याशिवाय राहत नाही.
.jpg)