भेटीगाठी (कथा संग्रह) - शंकर पाटील

लेखक :शंकर पाटील
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्य : ११०.०० रु.

तो असा बसताच चाबूक कडाडे... वादी पिंजून जाई, तुटून जाई. निबार कातडीवर वळ उठत. दवबिंदूगत रक्ताचे थेंब अंगावर थरथरत उभे राहत. कोयंड्याची काठी चिंबून, एकेक कुंडं मनगटाएवढा उठे; पण सर्जा जागचा हलत नसे.हे बघून लोक त्याला ‘बशा’ म्हणायचे.