गंधर्वगाथा - भा. द. खेर

लेखक :भा. द. खेर
प्रकाशक : विहंग प्रकाशन
मुल्य : २००.०० रु.
पृष्ठसंख्या: २४८

बालगंधर्वांच्या जीवनावरील प्रसंगनिष्ठ कादंबरी. बालगंधर्वांचे बालपण, गंधर्वकालीन भारलेला कालखंड, बालगंधर्वांच्या आठवणी, त्यांच्या सहवासातील भीमसेनजी, पु. ल. देशपांडे, रामूभैय्या दाते आदी व्यक्तींनी सांगितलेले बालगंधर्व, त्यांच्या वाट्याला आलेला मानसन्मान, जीवनात आलेले दुदैर्वाचे दशावतार अशा अनेक घटनांवर आधारलेली प्रसंगनिष्ठ कादंबरी. बालगंधर्वांचे कुटुंबीय, त्यांचे सहकारी यांच्या सहभागाने या कादंबरीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. अडीचशे पानांच्या या रससिद्ध कादंबरीत प्रत्येक प्रसंग कादंबरीच्या रुपाने अधिकाधिक जिवंत झाला आहे.