स्वरालयीची दुनिया..१
![]() |
बिती ना बिताई..(येथे ऐका)
हे केवळ एक गाणं नाही..,हे गाणं म्हणजे बरंच काही..!
हे गाणं म्हणजे जगातला सारा चांगुलपणा, सारी सृजनशिलता, सर्जनशिलता..! हे गाणं म्हणजे गुलजार-पंचमदांची प्रतिभा, दीदी-भुपेन्द्रसिंगची गायकी, जया-हरिभाईचा अभिनय! हे गाणं म्हणजे मृदुता, हे गाणं म्हणजे हळवेपणा..!
हे गाणं म्हणजे बरंच काही..!
हे गाणं म्हणजे पूर्वस्मृति, हे गाणं म्हणजे जे जे काही उत्तम, उदात्त, उन्नत ते सर्व.. हे गाणं म्हणजे गायकी, हे गाणं म्हणजे लयकारी, हे गाणं म्हणजे हार्मनी, हे गाणं म्हणजे केरव्यातला वजनदार ठेका!
हे गाणं म्हणजे, 'वो गोलिया क्या खतम हो गई?' या डॉक्टरांच्या प्रश्नावर 'सासें खतम हो गई!' हे हरिभाईचं उत्तर! हे गाणं म्हणजे पतीपत्नीचं गूज, बापलेकीचं गान, पितापुत्राचं अबोल, मुकं प्रेम!
'तुम्हाला 'मेथी का साग' खूप आवडायचं, असं बाबूजी नेहेमी सांगायचे..' असं जया भादुरी प्राणला सांगते..त्यावर 'वो मुझे याद करता था?' हा प्राणचा सवाल..त्यावर 'मेरे बाबूजी जैसा उसुलोंका पक्का और कोई नही..! असं माझे बाबूजी नेहमी म्हणायचे!' हे जयाचं उत्तर.. त्यावर भितीवरील हरिभाईच्या फोटोकडे पाहताना आलेलं प्राणच्या डोळ्यातलं पाणी..! त्याच्या पोटातलं तुटणं..!
हे गाणं म्हणजे बरंच काही..!
-- तात्या अभ्यंकर.
.jpg)

क्या बात है !!
क्या बात है !! मस्त...
मीमराठीवर स्वागत आहे
असेच म्हणतो!
असेच म्हणतो!
वा तात्या
आनंददायक अनुभुती
नाडी ग्रंथ प्रेमी
शशिकांत ओक
सुंदर !
सुंदर !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वाह तात्या मस्त आठवणी जाग्या
वाह तात्या
मस्त आठवणी जाग्या केल्यात या चित्रपटाच्या.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
किती छान वाहातं करून
किती छान वाहातं करून सांगितलंत गाणं तात्या..
आता ऐकताना अजून गहिरं होईल
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
जुने ते सोने
जुने ते सोने
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
वा तात्या!
संगीत आणि तुम्ही म्हणजे मेजवानीच की.
मी मराठीवर स्वागत आहे!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सुरेखच !!!
सुरेखच !!!
क्या बात है .....सुंदर
हे गाणं म्हणजे पूर्वस्मृति, हे गाणं म्हणजे जे जे काही उत्तम, उदात्त, उन्नत ते सर्व.. हे गाणं म्हणजे गायकी, हे गाणं म्हणजे लयकारी, हे गाणं म्हणजे हार्मनी, हे गाणं म्हणजे केरव्यातला वजनदार ठेका!
.. गाण्याबद्दलचा नेमकेपणा बहरलाय ह्या वाक्यात.
आता लिहा गाण्यांवर अगदी
मीमवर स्वागत
'आता गाण्यांवर अगदी डीट्टेल्स मध्ये लिहा ... गाण्यांच्या चाली, त्यातील बारकावे, ज्या रागांमध्ये ह्या चाली बांधल्या गेल्या आहेत, त्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. शास्त्रीय संगीताबद्दलही लिहा.. वाट बघत आहे.
तात्या असं करुया का? आम्ही
तात्या असं करुया का?
आम्ही फर्माइशी करतो.. तुम्ही ते गाणं असं शिकवा... खरंच खूप गाण्यांबद्दल खूप काही शिकायचं आहे..
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
छान माहिती मिळाली.
छान माहिती मिळाली.
आभार..
मीमराठीच्या रसिकतेचं कौतुक वाटतं!
प्रतिसाद देणा-या सर्वांचा मी ऋणी आहे..
यापुढे येथेच मैफल जमवीन..
तात्या.
तात्या मीम वर स्वागत याऐवजी
तात्या मीम वर स्वागत
<<यापुढे येथेच मैफल जमवीन..>>
याऐवजी यापुढे येथेपण मैफल जमवीन.. असं वाचायला जास्त आवडेल
(सर्वच मराठी संस्थळांचा विकास व प्रसार व्हावा अशी इच्छा असलेला) सौरभ
__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:
मीमं वर स्वागत आहे.
मीमं वर स्वागत आहे.
(गाण्याबजावणतल्या)
-पुण्याचे पेशवे
स्वागत...!!
संगीतलयीतच जगणार्या तात्या अभ्यंकर यांच्यासारखी दर्दी व्यक्ती इथे आली म्हणजे कलाक्षेत्राविषयी भरभरून वाचायला आणि लिहायलादेखील मिळेल यात संदेह नाही. आपले "मी मराठी" च्या प्रांगणात सहस्य स्वागत !
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
तात्या, स्वागत रे तुझं....
तात्या, स्वागत रे तुझं....
क्या बात है तात्या. तुम्हाला
क्या बात है तात्या. तुम्हाला इथे पाहून सुखावलो.
हा आमचा स्वभाव
लै भारी...छान
लै भारी...छान
तात्या..
तात्या शास्त्रीय संगीतावर सोप्या भाषेत काहितरी लिहीत जा बुवा.. (क्काय पण अपेक्षा आमची.)
ऐकायची ईच्छा खुप आहे.. ऐकतो पण.. जास्त कळत नाही म्हणुन म्हणलो..
मीमवर स्वागत !!! संगीतात गती
मीमवर स्वागत !!!
संगीतात गती नाही !!!
फरमाईश ::: गाणे :: कतरा-कतरा मिलती है
स्वर :: आशा भोसले
गीत ::गुलजार
संगीत :: द ग्रेट " पंचम" दा
दुवा ::kattra
वा, मस्तच!
वा, मस्तच!
पुष्करिणी
प्रतिसाद देणार्या सर्व
प्रतिसाद देणार्या सर्व रसिकांचे अनेक आभार..
तात्या/
अहा.. सुंदर !!
अहा.. सुंदर !!