आईचे स्वगत (भाग २ आणि ३ एकत्रीत ).

0
0

सुकुमारचा फोन अगदी वेळेवर आला.
पावणे सहाचा गजर आणि त्याचा फोन एकाचवेळी.
ह्यांची सुदर्शन क्रियेची वेळ (हे एक नविनच खूळ सध्या पाळलंय)
फोन उचलून हॅलो म्हणाले आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा.शरु... शरुता ई ..आणि परत मुसमुसणे.
मलाही राहवेना .पण मला हातानेच बेडरूम मध्ये जायची खूण केली.
मी बापडी थांबतेय कशाला.
आज्जी मात्र सरकत सरकत फोनजवळ.दोन मिटांनी बोलण्याचा आवाज आला.सुकुमारशी बोलत होते.आधी बराच वेळ सरकारी आवाजातलं इंग्रजी . आय ऍम गिवन टु अंडरसस्टँड असं तीन वेळा ऐकलं आणि मी हळूच म्हणले अहो.. हिन्दी.. हिन्दी..
आणि झालं ... पुढची दहा मिनीटं हिंदीच्या चिंध्या.
मला कळलं ते एवढंच.
तुम रायलसीमा ब्राम्हन है क्या?
हमारी बेबी को तिखट नही चलता है.
उसको रोज गोड खाता है.मग ...
दोन मिनीटांनी म्हणाले लो, बडी आज्जी से बात करो. फोन आज्जीकडे.
तीस वर्षानंतर ही घरची बाई दुय्यम नागरीक.
आज्जी चं बबडू .. सोनी .संपलं आणि फोन माझ्याकडे.(फोन मला देण्याआधी सोन्याच्या करगोट्याचं काही तरी बोलली ना गं आज्जी.माझा संशय खोटा नाही.मोठ्या आत्याकडे अजून साठा शिल्लक ठेवलाय)
मी पण पहिल्यांदा बोलण्याचा आव आणला.....
हम आयेंगा अमेरिका अशी सांगता झाली तेंव्हा जरा हुश्शं झाल.
तोपर्यंत आजी च्या प्रेमाला पूर आला होता. माय लेकरं आपापसातंच बोलत बसली.
मी चहाच्या बंदोबस्ताला लागले.
===============================================================
चहा पिताना मला म्हणतात कसे
चला...
आज्जीला पणतू झाला. सोन्याची फुलं उधळू या. मी म्हणलं अहो.. आपल्या शशिधर ला मुलगा कुठे झालायं?
झालं . दोन मिनीटं .
मुलगा कसा नालायक .
मुली कशा गुणी.
वगैरे.वगैरे.
आज्जी सोबत री ओढायला तयारंच. मी अंदाज घेतला.
बरं उधळू या फुलं.
माय लेकरांचे चेहेरे खुलले. पण सोनं आहे कुठे घरात ?.
हे म्हणतात कसे नातू मला झालाय मी आणीन .
मी म्हणल आणा आणा..फुलं उधळा.....
मोठ्या वन्संना पण बोलवा.
फुलं वेचायला कुणितरी हवं ना.
पुढची दहा मिनीटं घरात शांतता. यांना अधूनमधून असे धक्के द्यावे लागतात गं
त्या शिवाय वन्संकडला साठा बाहेर येणार नाही गं.
---एव्हाना नातू झाल्याची बातमी चंदावरकर लेन पासून बाभई नाक्यापर्यंत पोहचलीच असावी.
आत्याबाईंचा फोन . दुपारी येउन जाईन .
शशिधरचा फोन दादा इकडे आलेत.
मला तर बाई एकेक धक्केच बसत होते सकाळपासून.
हे आणि शशिधरकडे ! वेलणकर घराण्याचे दोन्ही पुरुषोत्तम गणपती आणि दिवाळीलाच समोरासमोर येतात.आज तर एक मे. दोघंही एका टेबलावर . समोरसमोर. न गुरगुरता. मद्राशी सुनेच्या हातचे दोसे खातायेत.
दोन मिनीटं सुजाथा सुद्धा अय्यो .. म्हणायची विसरली असावी. मी आपली याद्यांच्या कामाला लागली.
=== == ================================= === =====
साडेअकरा वाजता आले घरी एकदाचे.
आल्याआल्या म्हणाले
त्या सुकुमारला फोन लाव बरं उद्या,जरा महत्वाचं बोलायचंय !
मला काही कळेना. मी म्हटलं कशाला हो.
ते नाळेच्या तुकड्याबद्दल बोलायचंय.
मला माहीती होतं सगळं . पण मी आपलं विचारलं.
आता हे काय नविन ?.
मला म्हणतात कसे,
तुला नाही माहिती ते. नविन संशोधन आहे ते . नाळेचा तुकडा गोठवून ठेवतात.पुढे मागे बाळ आजारी पडलं तर जन्मभर कामाला येतं. स्टेम सेल असं नाव आहे .
मी म्हटलं हे बरं आहे की हो.
आधी नाळ तोडायची आणि नाती गोठवायची आणि मग परत तिच नाळ वापरायची आणि हवी ती नाती जोडायची.
क्षणभर तापून लाल झाले पण पटकन म्हणाले
एव्हढ्या सहज तुटेल ती नाळ कसली गं
===============================================================
मला रात्री मधेच उठवलं.
काय गं? नातू काळा असेल की गोरा?
(दुपारी बहिणीशी गप्पा मारत बसले होते त्याचा इफेक्ट !)
असेल काळा मद्रासी. मी म्हटलं
(सुकुमार गोरा पिट्ट आहे हे यांना कुठे माहिती असायला)
मग चेहेरा एकदम आध्यात्मिक चेहेरा करून म्हणाले.
म्हणजे तुझ्याइतका पण गोरा नसेल का?
आता मी काही यांच्याइतकी कोकणस्थ गोरी नाहीय्ये पण माझा रंग यांना अजूनही काळाच दिसतो.
जाउ दे .कृष्ण देखील काळाच होता.
अचानक मला चिडवायला लागले.
रात्र काळी घागर काळी.
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी
कृष्ण मूर्ती बहु काळी हो माय.
माझ्या एक लक्षात आलं की हे आता चेकाळलेत.
मी पाठ फिरवून झोपले गं बाई. मला नाही सोसत जागरणं आजकाल.
---------------------------------------

हाहा...मस्तच.....

1

हाहा...मस्तच.....

दंडवत

2

>>मी पाठ फिरवून झोपले गं बाई. मला नाही सोसत जागरणं आजकाल.
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवाSSSSSS....

रामदास काका
<=०O=


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

हा हा हा मजेशीर

3

हा हा हा मजेशीर

हिहिहि ! जबरा...

4

हिहिहि !

जबरा...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

एव्हढ्या सहज तुटेल ती नाळ

5

एव्हढ्या सहज तुटेल ती नाळ कसली गं

ह्म्म हास्य

प्रसंग अगदी डोळ्यासमोर...

6

फार मस्तं लिहीलय.
आधी नाळ तोडायची आणि नाती गोठवायची आणि मग परत तिच नाळ वापरायची आणि हवी ती नाती जोडायची... ह्या टोमण्याला सलाम.

ग्रेट..........सलाम तुम्हाला

7

ग्रेट..........सलाम तुम्हाला

सही लिहिल आहे..लय मज्जा

8

सही लिहिल आहे..लय मज्जा आली..मिश्किलपणा छान !!!

छान..!

9

मस्त लिहलय.
हास्य

छान , मजा आली वाचताना !

10

छान , मजा आली वाचताना !


पुष्करिणी