ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - अंतिम भाग.

0
0





पुर्वसूत्र:
भाग १
भाग २
भाग ३

तिकडे केवळ सुकामेवा विकणारी अनेक दुकाने आहेत,(पण पिस्ते सोडुन ईतर सुकामेवा मध्यपूर्वेच्या ईतर देशात चांगला मिळतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.) त्यातले एक दस्तचिन् (दस्त -हात, चिन् - निवडलेले) हे खुप प्रसिद्ध आहे (अस त्यांनीच सांगितले, मला काय माहीती हास्य ) त्या दुकानात पिस्ते खरेदी करायला गेलो, (कारण तेवढेच परवडणारे होते, तेल आणि गालिचे, "मला" विकले तरी परवडणार नाही) Sad , माझ्या सहकार्‍याने हिन्दुस्थान, आमीताब वगैरे नेहेमीचा पाढा वाचल्यावर गडी खुशीत आला. मला चीक्कार प्रकार दाखवल्यावर मला सगळ्यात आवडलेला (चव नव्हे किंमत) निवडला. एक अत्यंत सुंदर लाकडात कोरलेले ईराणी सौदर्यवतीचे चित्र पण खरेदी केल (दुधाची तहान ताकावर..) छायाचित्रक सापडला तर छायाचित्र टाकेन इथेच.

शेवटचे २ दिवस सगळ्यांच्याकडुन जेवणाची आमंत्रणे येत होती, पण मी कुठेच जाउ नाही शकलो. काही स्थानीक पक्वान्नं मात्र खायला मिळाली Party . त्यातला एक "अ‍ॅश" (ह्यातला 'अ‍ॅ' म्हणताना हे लोक ईतक्या लडिवाळपणे जिभ आत घेउन उच्चारतात की, तो उच्चार आणि तो पदार्थ यात अधिक मोहक काय हे सांगणे कठिणच) हा पदार्थ विशेष आवडला, थोडिशी चकोल्यांसारखी (वरणफळं पण म्हणतात ह्याला, म्हणजे चकोल्यांना, अ‍ॅश ला नव्हे) चव लागते. बाकीपण पदार्थ ठिकच. लॅट्युस चा वापर जास्त करतात, फ्रेंचांचा प्रभाव जेवणावरही जास्त दिसतो.
आतापर्यंत माझ्या हॉटेलवाल्याकडुन हवा तो पदार्थ करुन घ्यायची युक्ती माहीत झाली होती, त्याला 'वीजाय' अशी हाक मारली कि तो काय वाट्टेल ते करुन द्यायचा. (अमिताभचे नाव कुठल्यातरी चित्रपटात विजय होतं म्हणे thinking ) त्यामुळे चरत होतो आणि फिरत होतो

पर्शियन संगीत ह्याविषयी बरेच काही लिहिले जाऊ शकते, पण दुर्दैवाने मी तितका जाणकार नाही, हे संगीत क्षणार्धात आपल्याला वेगळ्याच जगात घेउन जाते, ते संथ पण कमालीचे स्फुर्तीप्रद सुर ऐकुन मला क्षणभर कुमारजींची निर्गुणी भजने आठवली. एका रेस्त्राँमधे बसलो असताना, वाढदिवसाला वाजवायची पारंपारीक ईराणी धुन ऐकली, पियानोवर बसलेला पांढरर्‍या केसाचा बाबा असे काही सुर आळवत तल्लीन झाला होता की मी कितीतरी वेळ चक्कचक्क पुढ्यातले ताट विसरुन डोळे मिटुन बसलो होतो. (मला समोरचे जेवण विसरायला लावणारे संगीत स्वर्गीयच असले पाहिजे) या 'तावलोदेत मोबारक' गाण्याचे अगदी यथार्थ वर्णन पर्शियन लोक करतात "मोस्ट ब्युटीफुल बर्थडे साँग ऑन धिस अर्थ" ईकडे ऐका हवेतर आणी स्व्रतःच ठरवा.
आताशा त्या पारंपारीक संगीतामधे काही नवीन प्रवाह येउन मिसळतायत, पण मूळ लहेजा आणि डौल कायम आहे. त्यांच्या जुन्या संगीतकारापैकी एक "अनोशिर्वान रोहानी" ह्यांच्या काही रचना अप्रतीमच आहेत (त्यांचेही 'तावलोदेत मोबारक' ऐकुन बघा याडच लागेल). गेल्या निवडणुकीनंतर झालेल्या आंदोलनात काही लोकप्रिय संगीतकार, गायकांनी खास गाणी रचून, गाउन ते आंदोलन आपल्यापरीने पेटते ठेवले होते. मला सतत सकाळसंध्याकाळ गाडीमधे नवनव्या पर्शियन रचना ऐकण्याची मेजवानी मिळत होती. Party

पर्शियातला मुक्काम संपत आला होता, मी ह्या सुंदर देशातली प्रत्येक गोष्ट मनात साठऊन घेत होतो, पाय खरच निघत नव्हता, आपला मुक्कम अजुन काही दिवस असायला हवा होता असं सारखे वाटत होते, जाउद्या.. कुणाच उष्ट, कुठे, आणि किती दिवस सांडावे ह्याची काहीतरी नियतीयोजनाच असावी. (अशावेळी गदिमांच्या कडे उधारउसनवार नाही करणार तर कुणाकडे.. दोन ओंडक्यांची होते अकस्मात भेट.. एक लाट तोडी दोघा.. पुन्हा नाही गाठ) शेवटी सामान व मन आवरुन विमानतळावर येउन थांबलो.

परतीच्या प्रवासात ईराण एअरचे विमान होते. बसल्यानंतर काही वेळातच त्या विमानाने मला जमिनीवर आणले. Crying (त्या कालच्या चित्रविक्रेत्त्याने कुठली फ्लाईट आहे? असे विचारले.. मला वाटले सहज विचारले असेल. पण मी ईराण एअर सांगितल्यावर आधिचे पॅकिंग फोडुन दुप्पट जाड पॅकिंग केले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती). ईराणी विमानकंपनी ही ईतर कुठेही नोकरी न मिळाल्यावर शेवटचा पर्याय म्हणुन त्या कर्मचार्‍यांनी निवडली असावी. ईराणी आकाशातल्या बाया बाहेरच्या ईराणी स्त्रियांच्या मानाने अगदीच सुमार होत्या. प्रत्येक गोष्ट अन्नछत्रात वाढल्यासारख्या वाढत होत्या. Crazy नविन विमानखरेदी बहुदा खोमेनीच्या काळातच थांबवली असावी. त्या विमानकंपनीत आपल्याकड्च्या काही चित्रपट समीक्षकानीही शिरकाव करुन घेतला असावा बहुतेक. ईतके सुरेख पर्शियन चित्रपट सोडून, तद्दन रटाळ चित्रपट संपला की अतीरद्दड गाणी कि परत अती फड्तूस चित्रपट अशे शोधुन लावत होते.
त्या प्रवासात काही भैय्ये (राजसाहेबांच्या ठसक्यात म्हणुन पहा बरं)पण होते, त्यांच्या बायका नखशिखांत ईराणी पोशाखात होत्या (अर्थात विमान मुंबईत उतरेपर्यंतच, हे लेकाचे बाकी सगळ्या देशात जाउन तिकडचे निर्बंध गपचुप पाळतात, ईकडे आले की दात येतात साल्याना.)

असो.. तर असा हा माझा पर्शियन अनुभव, तोडक्यामोडक्या शब्दात जसा जमेल तसा लिहीला आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. (उम्मीद पे दुनिया कायम है )
आवडला तर नक्की कळवा. (म्हणजे त्या बालवॉशींग्टनच्या कुर्‍हाडीसारखी दिसेल त्या विषयावर लेखणी चालवायला हुरुप येइल.)

Tehran skyline

समाप्त.

मस्तच !!! मज्जा आली

1

मस्तच !!!
Party

मज्जा आली वाचताना..

ग्रेट.. तुमच्या लेखणीतून

2

हास्य

ग्रेट.. तुमच्या लेखणीतून आलेल्या ह्या लेखामुळे घरी बसल्या बसल्या पर्शिया दर्शन झाले wink

आवडले...

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अजून एक मस्त लेख. दात येतात

3

अजून एक मस्त लेख. दात येतात हा वाक्प्रचार अगदी योग्य. हास्य


-पुण्याचे पेशवे

धन्यवाद

4

>> दात येतात हा वाक्प्रचार अगदी योग्य.
होय.
अगदी अस्साच प्रकार मी ओमानला जातायेता पण बघितला आहे. तिकडे एकदम सरळ असतात...

उत्तम लेखमाला! मजा आली

5

उत्तम लेखमाला! मजा आली वाचताना! हास्य

सुरेख !!!

6

सुरेख !!!

हे घ्या....

7

>>>>(म्हणजे त्या बालवॉशींग्टनच्या कुर्‍हाडीसारखी दिसेल त्या विषयावर लेखणी चालवायला हुरुप येइल.)>>>>
इतके सुंदर लिहीताय,
हे घ्या तुम्हाला मी म च्या वाचकांकडून.
1
ह्याची किंमत मात्र विचारू नका.

>>>>...जाउद्या.. कुणाच उष्ट, कुठे, आणि किती दिवस सांडावे ह्याची काहीतरी नियतीयोजनाच असावी. (अशावेळी गदिमांच्या कडे उधारउसनवार नाही करणार तर कुणाकडे.. दोन ओंडक्यांची होते अकस्मात भेट.. एक लाट तोडी दोघा.. पुन्हा नाही गाठ)>>>>> हा परिच्छेद फार आवडला.

श्रीकांत
अन्नासाठी दाहीदिशा आम्हा फिरविसी जगदीशा....

धन्यवाद

8

धन्यवाद श्रीकांतराव..
तुम्ही पेन भेट दिलय खरं पण इतकं महाग पेन घेउन काही लिहायचीच छाती होणार नाही आपली.. (का हाच सुप्त हेतू असावा बरं thinking )

.. (का हाच सुप्त हेतू असावा

9

.. (का हाच सुप्त हेतू असावा बरं )>>>>

हा हा हा , नाही बरं असा काही हेतू नाही, लेखन आवडले, तुम्हाला लेखणी चालवायला आणखी हुरुप यावा म्हणून जे सहज आठवले ते डकवले,
तसे म्हणाल तर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने... तीच जास्त आवडतात. हिरा अन कोळसा शेवटी काय कार्बनचीच रूपे इ.इ. ( अर्रर्र मी विज्ञानवादी विचारवंत होतोय का काय हळू हळू? Stare )

जबरा

10

जबरा

बख्लवा

11

बख्लावा खाल्ला नाही का तिकडे?

ढण्यवाद...!!! छान सफर घडवली

12

ढण्यवाद...!!! छान सफर घडवली आमची.. हास्य लिहा तुम्ही लिहा

फोटो अपलोड केले आहेत.

13

फोटो अपलोड केले आहेत.

हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हे लेकाचे बाकी सगळ्या देशात

14

हे लेकाचे बाकी सगळ्या देशात जाउन तिकडचे निर्बंध गपचुप पाळतात, ईकडे आले की दात येतात साल्याना. >>>>

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud =))

संपुर्ण लेखमाला आवडली ..आणी लेखात काढलेले चिमटेही मस्त !!!

लेख आवड्ला!

15

अमिताभच्या कुट्ल्यातरि चित्रपटान त्याचे नाव विजय होते?
कुठ्ल्या तरि नव्हे, सर्वच! हास्य


मुम्बइत एकवेळ मौल्स सापडतिल, पण मराठि पुस्तकाचि लायब्ररि शोधुनहि सापड्णार नाहि!

छान. अवांतर फोटो दाखवण्याची

16

छान.

अवांतर फोटो दाखवण्याची व्यवस्था आवडली.

अर्धवट राव

17

मस्त लेखमाला आणि प्रवासवर्णन.

ईराणवरून शांता शेळके ह्यांची एक कविता आठवली.. ती खाली देत आहे.

एक मांजरी हिंदुस्तानी ईराण मध्ये गेली,
नवा देश अन नवी माणसे बघून जराशी भ्याली..

ईराणमध्ये बदाम पिस्ते झाले असती स्वस्ते,
खूशीत येउन म्हणूनी मांजरी मिषीत हलके हसते..

बदाम पिस्ते अक्रोडांनी खुलल्या पेठा रस्ते,
दूध नको मज, म्हणे मांजरी बदाम खाईन नुसते..

शुभ्र मशीदी, शुभ्र मनोरे, कुराण वाची मुल्ला,
गुडघे टेकूनी नमाज पढते मांजर म्हणते "अल्ला"..

नंतर मांजर बाजारातून फेरी मारून आली,
लालगालिचा पश्मिन्याची शाल खरेदी केली..

रेशीम पिशवी भरून नेली नाणी बाजारात,
सोने घालून अंगावरती मांजर बसली गात..

घाबरली पण एक दुकानी दिसता काळा बुरखा,
चला म्हणाली आपुल्या देशा, देश नको हा परका;चला म्हणाली आपुल्या देशा, देश नको हा परका...

----शांता शेळके.

म्यॅव म्यॅव

18

चायला.. कवीता वाचुन मी माझ्याभोवती गिरकी घेउन शेपूट वगैरे फुटलिये का बघितले पट्कन..

असो.. छान कविता

>>चला म्हणाली आपुल्या देशा, देश नको हा परका;चला म्हणाली आपुल्या देशा, देश नको हा परका...
येक्झॅटली मला ह्येच म्हणायच होते...

वा.. मस्त लेख

19

वा.. मस्त लेख