मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle
संभाजी - विश्वास पाटील
लेखक :विश्वास पाटील
प्रकाशक :मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्य : ३९०.०० रु.
पृष्ठसंख्या: ८४७
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकर्त्यांची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!
आजचे अग्रगण्य रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबिड दर्याखोर्यांनी, सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथराक, वादळी, पण वास्तव गाथा!!ई-सकाळ रविवार १२ मार्च २००६
.jpg)