'We know the name son, take a bow son'
जगातील सगळ्यात जुन्या देशस्तरीय फुटबॉल नॉकआउट स्पर्धेत २००५ साली, या स्पर्धेतली सर्वात चुरशीची फायनल खेळताना नव्वदाव्या मिनटाला टीपीकल यॉर्कशायरी अॅसेंट मधे कॉमेंट्रेटर...स्पर्धा कोणती - FA cup...वेस्ट हॅम युनायटेड आणी लिव्हरपूल ह्यांच्यातली फायनल. आधी २-० नंतर ३-१ असे पाठीमागे असून दुसर्या हाफ मधे २ गोल, त्यातला एक ९०व्या मिनिटाचा २५ यार्डावरून पाईलड्रायवर गोल करून मॅच पेनल्टीमधे नेणारा कप्तान - स्टीवन जेर्राड. सध्याच्या इंग्लंड टीमचाही कप्तान आणी आधारस्तंभ.
फिफा वर्ल्डकप - फुटबॉल, फुटबॉल म्हटलं की नजरेसमोर उभा राहतो इंग्लंड. MCC ह्या क्रिकेटच्या नियम बनवणार्या संस्थेप्रमाणेच जागतीक फुटबॉलचे ही नियम सर्वप्रथम इंग्लंडमधेच १८६३ मधे बनवले गेले. सांघीक फुटबॉल का इंग्लंडचा de facto राष्ट्रीय खेळ आहे. हा फुटबॉल फीवर इंग्लंड मधे प्लेगसारखा पसरलाय. इंग्लंड आणी इंग्लीश प्रिमीयर लीग समर्थक हुलीगन्स (कु)प्रसिद्ध आहेतच. चाळीस हजाराहून जास्त छोटे मोठे क्लब असलेल्या या आकाराने एव्ढ्याश्या देशाला फुटबॉल प्रेमात तोड नाही.
अशा या इंग्लंडचा फुटबॉल इतिहास बराच तगडा आहे. इग्लंडमधे जगातला सगळ्यात जुना फुटबॉल क्लब शेफिल्ड एफ सी आहे, सगळ्यात जुनी कार्यकारी समिती द फुटबॉल असोसिएशन , सगळ्यात जुनी राष्ट्रीय टीम, वर सांगितलेला द एफ ए कप यासोबतच द नॅशनल लीग (EPL) सुध्दा आहे. आज जगातल्या मोठ्या, अतिश्रिमंत आणी छाती ठोकून गर्व करण्यासारखा इतिहास असलेले क्लब आहेत. त्यांबद्दल नंतर कधीतरी.
वर्ल्डकपच्या इतिहासात हा देश एकदाच फायनल जिंकलाय. १९६६ साली. वेस्ट हॅम या लंडनस्थीत क्लबच्या बॉबी मूर या खेळाडूच्या नेतृत्वाखाली. या संघाचे कोच होते सर आल्फ रॅमसे. सर बॉबी चार्लटन आणी सर जिऑफ हर्स्ट सुद्धा या संघातलेच... फिफाच्या वेबसाईट वरील या दोन ओळी या संघाबद्दल. १९६६ नंतर हा संघ एकदाच उपांत्यफेरी पर्यंत पोहचू शकला १९९० मधे.
'The country that invented football, England, finally found a formula for success on the world stage. Alf Ramsey's 'Wingless wonders' overcame Final opponents West Germany thanks to Geoff Hurst's historic hat-trick, though the debate over whether his middle strike crossed the line continues to this day.'
सध्याच्या इंग्लंड संघाची रचाना बघून असे म्हटले जात आहे की सध्याची टीम ही गेल्या दोन दशकातील इंग्लंडची सर्वोत्कॄष्ट टीम आहे. तर मंडळी घेऊया या संघाचा आढावा.
या विश्वचषकात इंग्लंड आहे ग्रुप सी मधे. या ग्रुप मधे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत अमेरीका, अल्जेरीया आणी स्लोवेनीया.या ग्रुप मधून पुढे जाउन चषकासाठी चॅलेंज करण्याचे सर्वात प्रबळ दावेदार आहे इंग्लंड. अल्जेरीया आणी स्लोवेनीया च्या मानाने अमेरिका हा इंग्लंडाचा तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. गेल्या कन्फेडरेशन कप मधे त्यांनी स्पेनला हारवून फायनलमधे मारलेली मुसंडी जोरदार होती. इग्लंड सध्या फिफा रँकिंग्समधे आठव्या स्थानावर आहे तर अमेरीका चौदाव्या , अल्जेरीया तिसाव्या आणी स्लोवेनीया पंचविसाव्या. अमेरीकेने उत्तर, मध्य आणी कॅरिबियन अमेरिकेत झालेल्या पात्रता स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून विश्वचषकात प्रवेश केलाय. दुसर्या बाजूला अल्जेरीया चोवीस वर्षानंतर विश्वचषकाला पात्र ठरलाय. रशियन पात्रता गटातून रशिया, झेक, पोलंड अशा बलाढ्य ग्रुप मधे असतानाही पात्र होण्याची किमया केलीय स्लोवेनीयाने.
या विश्वचषकाच्या इंग्लंड संघात तेवीस खेळाडू आहेत. या तेवीस जणांमधले वेन रूनी, स्टीवन जेर्राड, जॉन टेरी, फ्रँक लँपार्ड, जो कोल, अॅश्ले कोल तसेच गॅरेथ बेरी हे खेळाडू संघासाठी फार महत्वाचे आहेत.
 |
 |
 |
 |
 |
 |
 |
| वेन रूनी |
स्टीवन जेर्राड |
जॉन टेरी |
फ्रँक लँपार्ड |
जो कोल |
अॅश्ले कोल |
गॅरेथ बेरी |
वेन रूनी : बस नाम ही काफी है.....कशासाठी?? तर, प्रतीस्पर्धी संघाच्या उरात धडकी भरवायला. लोन स्ट्रायकर म्हणून खेळताना या पठ्ठ्याने मॅन यु तर्फे गेल्या मोसमात सर्व स्पर्धांमधे ३४ गोल केले आहेत. इंग्लंडच्या सर्व स्ट्रायकर्स मधे एका एकच प्राणी भरवश्याचा आहे. ही इस अ वर्कहॉर्स. गोलवरचा अॅटॅक वाया गेला असेल तर काउंटर अॅटॅक रोखण्यासाठी हा स्वतःच्या गोलच्या दिशेने संरक्षणासाठी धावतो..ते ही सर्वात जास्त वेगात. रोनाल्डो मॅन यु सोडून गेल्यावर ह्याने एकट्याच्या दिमतीवर मॅन यु ला प्रीमियर लीग जिंकण्याच्या स्पर्धेत ठेवले. पण आतापर्यंत ह्याला विश्वचषकात एकही गोल करता आला नाहीये..ही कसर त्याने भरून काढावी ही ह्याच्याकडून पूर्ण ब्रिटनला आशा आहे. ह्याच्या स्वभावाचा दुसरा पैलू म्हणजे तापटपणा. गेल्या विश्वचषकात पोर्तुगाल विरूध्दच्या सामन्यात ह्याच अतातायीपणामुळे साठाव्या मिनटाला रेड कार्ड घेऊन बाहेर पडावे लागले. हीच मॅच पेनल्टीवर जाउन इंग्लंडही स्पर्धेच्या बाहेर गेला.
स्टीवन जेर्राड :काय लिहू या प्लेयर बद्दल. जेपी ला सचीन आणी मेव्याला लक्ष्मण तर डॉन्रावांना टेरी बद्दल लिहिताना जे वाटेल ते मला ह्याच्याबद्दल लिहिताना वाटतं. एकट्याच्या जिवावर मॅच खेचायची ताकत आहे ह्याच्यात. दुसर्यांसाठी गोल सेट करणे हा अजून एक गूण. प्रचंड वेग आणी स्कील्स चा धनी. जेर्राड म्हटलं की नजरेसमोर येतो २००४-२००५ च्या चँपियन्स लीग मधे त्याने ९४ व्या मिनटाला केलेला ग्रीक क्लब ऑलिंपियाकोस च्या विरूध्दचा गोल करणारा जेर्राड, त्याच स्पर्धेच्या फायनल मधे हाफटाईमनंतर ३-० असे मागे असताना, ५ मिनिटानीच हेडर ने गोल करून ए सी मिलान च्या विरूध्द वातावरण चेतवणारा जेर्राड. वर लिहिल्याप्रमाणे एकट्याच्या जिवावर एफ ए कप जिंकवणारा जेर्राड. लिव्हरपूल साठी सध्या 'जस्ट बिहाइंड द स्ट्राईकर' खेळणारा जेर्राड कोणत्याही पोझीशन मधे खेळू शकतो, मग ते मिडफील्ड असो, विंग असो की सेकंड स्ट्रायकर.ह्याला स्वतःचा लीग फॉम राट्रीय स्तरावर १००% घेउन जाता आला नाहीये. ही एकच दुखरी बाजू आहे. रिओ फर्डीनांड जखमी झाल्यावर ह्याच्यावर कप्तानपदाची जबाबदारीही आहे.. तो ती समर्थपणे पेलेलच..
जॉन टेरी : सहा महिन्यांपुर्वीचा Mr.England. टॉप नॉच डिफेंडर. भल्या भल्या स्ट्रायकर्सना घाम फोडणारा. रिओ जायबंदी असल्याने लेड्ली किंग सोबत डिफेंसची भिंत असणार आहे. नजाकतीने टॅकल कराणारा डिफेंडर आहे हा. डिफेंडर्समधे सर्वात कमी बुकींग्स असणारा डिफेंडर.
फ्रँक लँपार्ड : इंग्लंडचा जादूगार. जेर्राड- रूनी जिथे कमी पडतील तिथे हा नग ती जबाबदारी स्वतःवर घेतो. पेनल्टी स्पेशलिस्ट. जगातल्या ड्रिबलींग करणार्या मिडफिल्डर्स एवढे स्किल्स नसतील पण वर्करेट त्यांच्यापेक्षा जास्त आहे ह्याचा. जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूत मोडूनही लंडन मधे एका फ्लॅट मधे राहणारा खेळाडू. मॉडेस्ट म्हणतो तसा एकदम मिडलक्लास विचारांचा. प्रत्येकाला आपल्या टीममधे हवासा वाटणारा.
जो कोल : वेन रूनी वन्स सेड, ' ही इज द निअरेस्ट ब्रझिलीयन थिंग हॅपन्ड टू इंल्गीश फुटबॉल'. ह्यापेक्षा काय सांगायच जास्त. दुसर्याने(क्रीटीक्स) केलेल्या स्तुतीपेक्षा दुसर्या खेळाडूने केलेली स्तुती जास्त महत्वाची असते कोणत्याही खेळाडूला. इंग्लीश टीमचा ड्रीबलींगचा बादशहा. लेफ्ट्/राइट विंगवरून हल्ले करण्यात पटाईत.
अॅश्ले कोल : जगातला सगळ्यात बेस्ट लेफ्ट बॅक. थोडीशी जागा मिळाली की डाव्या बाजूने जोरदार मुसंडी मारून गोलवर हल्ला करणारा अॅटॅकिंग लेफ्ट बॅक. डिफेंसमधे तेवढाच तत्पर. विरोधी राइट बॅकच्या नाकात दम करून सोडणारा प्लेयर.
गॅरेथ बेरी : इंग्लीश फुटबॉलमधे सध्या सगळ्यात उत्तम होल्डींग मिडफिल्डर. जेर्राड-लँपार्ड हे अॅटॅकिंग मिडफिल्डर्स आहेत. त्यांना त्यांचा नैसर्गिक खेळ करता यावा ह्यासाठी गॅरेथ बेरीची टीमला खूप गरज आहे.
वरील खेळाडूंशिवाय इंग्लंडची गोलऱक्षणाची भिस्त आहे रॉबर्ट ग्रीन या गोलकीपरवर. इंग्लंडचा हा दोन नंबरचा गोलकीपर आहे. त्या जागेचा मुख्य दावेदार आहे ३९ वर्षाचा डेव्हीड जेम्स. पण सराव सामन्यात त्यालाही छोटीशी दुखापत झाल्याने रॉबर्टवर बराच भार येणार आहे. EPL मधे रेलेगेशन झोन मधे असलेल्या टीम्स ना वर आणण्यात रॉबर्टचा हाथखंडा आहे. या एका आतिशय चपळ अशा गोलकीपर कडून बर्याच acrobatic बचावाची इंग्लंडला अपेक्षा आहे.
 |
अशा या हरहुन्नरी संघाचे कोच आहेत फॅबियो कॅपेल्लो. कॅपेल्लो यांनी इटलीमधे क्लब स्तरावर ए सी मिलान्,युवेंटस, आणी ए एस रोमा या संघांसोबत तब्बल ७ वेळा इटालीयन लीग Serie A जिंकलेली आहे. मिलानसोबत चँपियन्स लीग तसेच रीयल माद्रीद सोबत दोन वेळा स्पॅनिश La Liga जिंकलेली आहे. EURO २००८ मधे पात्र होऊ न शकलेल्या इंग्लंड संघाला सध्याच्या नव्या उंचीवर घेउन जाण्यात कॅपेल्लोंच्या विनिंग मेंटॅलीटीचा मोठा सहभाग आहे आणी ही गोष्ट खेळाडूंनीही मान्य केली आहे. कॅपेल्लो इटालियन असले तरी त्यांचा फुटबॉल डिफेंसीव्ह नाही.(इटालियन फुटबॉल हा खूपच डिफेंसीव्ह असतो.) तो क्रिएटीव्ह आहे. |
या इंग्लंड संघात वादग्रस्तपणे निवडले गेलेले खेळाडू आहेत तसेच गाळले गेलेले ही आहेत. २००७ मधे निवॄत्ती घेतलेल्या जेमी कॅरॅघर या उत्तम खेळाडूला कॅपेल्लोनी त्याच्याशी बोलणी करून संघात निवडले, तेंव्हा ब्रिटन मधे थोडा गदारोळ झाला. तसाच गदारोळ झाला थीओ वॉलकॉट ला वगळल्यावर. चार वर्षापूर्वी गेल्या चषकाला वयाच्या १६व्या वर्षी वादग्रस्तपणे निवड झाली होती त्याच रितीने खांद्याच्या दुखापतीतून पुर्ण फॉर्ममधे न परतल्याने यावेळेस त्याला डच्चू मिळाला. रिओ फर्डीनांड स्पर्धेच्या १० दिवस आधी गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघारी गेला.
इंग्लीश फुटबॉल हा धसमुसळा खेळ आहे. हा कधीच नजाकतीने खेळला जात नाही. रॉ पॉवर आणी वेग हे या संघाच्या खेळाचे वैशिठ्य आहे. पहिल्या सामन्यासाठी गॅरेथ बेरी नसल्याने जेर्राड आणी लँपार्ड यांच्य हालचालीवर थोडी बंधने आली आहेत. तसेच राइट बॅक ग्लेन जॉन्सन ह्याच्या अॅटॅक करून गोल करण्याच्या क्षमतेवर कोणाला शंका नसली तरी त्याच्या संरक्षण करण्याच्या कामगिरीवर सगळ्यांचे लक्ष आहे. रीओ च्या अनुपस्थीतीत डीफेंसची सर्व मदार जॉन टेरी वर आहे. रूनी- जेर्राड ही स्ट्राईक पार्टनर्शीप जेवढ्या लवकर क्लीक करेल तो क्षण इंग्लंडला त्यांच्या स्वप्नाच्या एक पाउल जवळ घेउन जाईल.
थोडक्यात सांगायचं तर, प्लेयर्स टू वॉच : स्टीवन जेर्रार्ड, फ्रॅ़क लँपार्ड, वेन रूनी
सध्याची ही टीम सेमीफायनल पर्यंत मजल मारेल असा माझा अंदाज आहे. फायनल ला पोहोचेल न पोहोचेल हे त्यांच्या नशीब आणी खेळावर अवलंबून..
फुटबॉल असेल आणी वॅग्स नसतील असं होणार नाही. वॅग्स म्हणजे वाईव्ह्स अँड गर्लफ्रेंडस. या इंग्लंड संघातील काही प्रसिद्ध वॅग्स जोड्या.
जॉन टेरी - टोनी टेरी , जो कोल - कार्ली झुकर , स्टीवन जेर्राड - अॅलेक्स करन , अॅरॉन लेनन - माँटॅना मॅनींग ,
फ्रँक लँपार्ड - ख्रीस्टीन ब्लेकली , पिटर क्राउच - अॅबी क्लँसी , वेन रूनी - कोलीन रूनी
सरतेशेवटी या संघास लिव्हरपूलच्या गाण्याप्रमाणे एकच गोष्ट म्हणेन 'you will never walk alone'
जबरदस्त ! >>सध्याच्या इंग्लंड
जबरदस्त !
>>सध्याच्या इंग्लंड संघाची रचाना बघून असे म्हटले जात आहे की सध्याची टीम ही गेल्या दोन दशकातील इंग्लंडची सर्वोत्कॄष्ट टीम आहे
+ १
+ १
+ १
त्रिवार + १
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धन्यवाद मालक.
धन्यवाद मालक.
मस्त माहिती. अशीच माहिती
मस्त माहिती. अशीच माहिती यावेळच्या सर्व टिम्सबद्दल मिळाली तर बहार येइल.
धन्स रे मित्रा.
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
इंग्लीश टीम
इंग्लीश टीमची मस्त ओळख प्रभो..
(जादुगार लॅंपार्ड चा फ्यान) दिपक
इंग्लड टीमची मस्त ओळख प्रभो.
इंग्लड टीमची मस्त ओळख प्रभो. लवकर दुसर्या टिमबद्दल ही लिहा.