लैंगिक शिक्षण - एक गरज
http://www.mimarathi.net/node/1870
ह्यावरून संदर्भ घेऊन हे लिखांण........ लैंगिक शिक्षणाची गरज का आहे??
कदाचित मी जे लिहीणार आहे ते ही एक सहभागी कारण असू शकते.
-------------------------------------------------------------------------------------------
लहान मुलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, विनयभंग अशा अनेक गोष्टी आपण उघड्या डोळ्यांनी कधी पहतो,वाचतो,ऐकतो. अस का?अस का? असे मी स्व:तालाच विचारतेय.पण ही सुद्धा समाजाची एक बाजु आहे आणि आजही अस घडतय हेच दुर्दैव ! याला जबाबदार कोण?
मुलं निरागस असतात त्याना ह्यातल काहीच कळत नाही.म्हणुन मुलांना विश्वासात घेउन त्यांना विचारा आणि सांगा-
१) .अनोळखी वा ओळखीच्या कोणकडुनही गोळ्या-बिस्किटे घेउ नकोस. जर कोणा ओळखीच्यांकडुन घेतलीच तर आधी घरी येउन सांग. त्यांनी का दिली हे सांग
२.) कोणी काका, दादा, मामा...तुझ्या विशिष्ठ अंगाना हात लावतो का? हो-नाही.हो असेल तर कोण?
फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही हेच प्रश्न लागु होतात.
मी इथे लहान मुलांच्यातच काम करत असल्याने, असले ओंगळ चाळे आणि प्रकार हाताळणे माझ्या प्रोफ़ेशनचा भाग आहेत. खुप वाईट आणि बिभत्स अनुभव आहेत. पण माझी काही मतेही पक्की आहेत.
१) आपण जर झोपडपट्टी आणि तत्सम मंडळींबद्दल बोलत असु तर मात्र खुप् वेगळे चित्र आहे... आणि खुप काही करण्याची गरज, त्यासाठी अनेकजण मनापासुन राबतही आहेत. पण तो विषय पूर्ण वेगळा आहे, कारण त्याचा आवाका.... आणि शिक्षण हा फ़ार मोठा घटक आहे.
२) मला जास्त प्रोब्लेम आढळून येतो, तो मोठ्या घरातुन. सभ्यतेच्या बुरख्यामागे जे सुरू आहे, ते किळसवाणे आहे. त्याला आळा घालणे आवश्यक पण अवघड आहे.
पालकांनी जागरूक तर रहावेच रहावे आणि स्वत:वर नियंत्रण पण ठेवावे.... आई- बाबांनी जर काही नियम पाळले, तर पूर्ण नाही पण नक्कीच काही गोष्टी आटोक्यात आणता येतील....
सभ्यतेचा बुरखा पांघरुन अनेक विकृत आपला डाव साधतात ही खरोखर एक द:खदायक आणि खेदजनक आहे.
शाळांमधुनही ह्याचे धडे दिले गेले तर उत्तम.ह्या विषयाचा बौ न करता त्यावर सखोल चिंतन व्हायला हवे.
३) पालकांचा व मुलांचा संवाद वाढायला हवा. शाळंमधुन ही समस्या व ती हाताळण्याचे मार्ग याचे शिक्षण द्यायला हवे.
वेळप्रसंगी कायद्याचा आधार घ्यायलाही कचरता कामा नये. या समस्येविषयी जागृति समाजात निर्माण करायला हवी.
४) शाळेत शिक्षण देण्याचा मुद्दा आहे त्याबद्द्ल काही बोलावेसे वाटते. जवळपासचे लोकच नाहीतर काहीवेळा शाळेतसुध्दा ’सर’ किंवा अगदी ’मॅडम’ सुध्दा मुलांशी अशा प्रकारचे वर्तन करू शकतात. असे प्रसंग वर्तमानपत्रातून वाचनात आलेले असतीलच. त्यांचे काय करायचे?
या संकेतस्थळावरील असलेल्या सर्व पालकांना तसेच भावी पालकांना माझे आवहन आहे की आपल्या पाल्याच्या शाळेतही तुम्ही हा विषय जरुर मांडा जेणेकरुन अशा लोकांना आपल्या निरागस मुंलाचे आयुष्य उध्वस्त करण्यापासुन वाचवता येइल. सर्वेक्षाणानुसार भारतातील ५३% टक्के मुले ही अशा विकृत वासनांचा बळी ठरतात.
याचे प्रमाण प्रत्येक ३ लहान मुलांमागे २ मुले बळी ठरतात.
२००७ साली भारताच्या बाल व महिला कल्याण खात्याने एक अहवाल प्रस्तुत केला.त्यातुन ही माहीती इथे दीली आहे.सविस्तर अहवाल इथे देणे शक्य नसल्यामुळे इंटरनेटवर उपलब्द असलेल्या लिंक मी इथे देत आहे.
या पुढेही आपली अशीच मदत मिळत राहील ही अपेक्षा करत आहे.
धन्यवाद !
संपुर्ण अहवाल इथे उपलब्ध आहे
http://www.violencestudy.org/IMG/pdf/childabuseIndia2007.pdf
बी बी सी न्युज
http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/6539027.stm
टाइम्स ऒफ इंडीया न्युज
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1881344.cms
.jpg)
{सोना, सविस्तर उकल केल्याबद्दल}
सोना, सविस्तर उकल केल्याबद्दल धन्यवाद.
लैंगिक शिक्षण हा माझ्या ही व्यवसायाचा एक भाग. दुर्दैवाने शाळांमधून या विषयासंदर्भात जी अनास्था दाखविली जाते ती या प्रकाराइतकीच चीड आणते.
सरकारने हा विषय शाळांमधून अनिवार्य केल्यानंतरचे मला दिसलेले चित्र असे होते -
एक त्यातल्या त्यात प्रौढ शिक्षिका या प्रशिक्षण कार्यकमाला पाठविली जाते. ( पुरूष शिक्षक तयार होत नाहीत )
ती नाइलाजाने जाते. संपूर्ण प्रशिक्षणात तिचा सहभाग १ टक्का ही नसतो.
शाळेत आल्यावर तिने मुलांचे-मुलींचे-स्वतंत्र आणि एकत्र चर्चागट घ्यावे अशी अपेक्षा असते. ते होणे दूरच. पण अनेक शाळात असे कार्यक्रम झाले असे खोटे सांगण्यात येते. किंवा सरकारी नोंद करण्यासाठी प्रशिक्षणाचे नाटक केले जाते.
बर्याच वेळा शालेय मानसतज्ञ म्हणून ज्या केसेस हाताळाव्या लागतात त्यांच्या समस्यांचे मूळ कारण लैंगिक शिक्षणाचा अभाव, शोषण असे असते. या संदर्भात पालकांबरोबर जे सेशन असते ते त्या मुलाचे शेवटचे सेशन ठरते... समस्येमागील कारणाचा स्वीकार त्याना करता येत नाही.
लैंगिक शिक्षण म्हणजे मुलाला आपल्या लैंगिक भूमिकेत राहाताना विवेक कसा वापरायचा हे शिक्षण असते. आणि ते मूल साधारण प्रश्न विचारायला लागले की सुरु होते. दुर्दैवाने इथे ही पारंपारिक मानसिकता आड येते. एखाद्या अवयवाला ' शी: घाणेरडे ' असे मुलाना शिकवून आपणच पहिली अढी निर्माण करतो.
खूप अनुभव आठवत आहेत. पण ते पुन्हा कधीतरी.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{अवघड आहे, सर्वात आधी}
अवघड आहे, सर्वात आधी समाजाच्या भल्यासाठी शिक्षकांनाच शिक्षण देणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
>>पण अनेक शाळात असे कार्यक्रम झाले असे खोटे सांगण्यात येते. किंवा सरकारी नोंद करण्यासाठी प्रशिक्षणाचे नाटक केले जाते.
सकाळ मध्ये सध्या शाळेतील भ्रष्टाचारवर एक उत्तम लेखमाला चालू आहे त्याची आठवण झाली.
Hope is a good thing...
{भारतातील ५३% टक्के मुले ही}
भारतातील ५३% टक्के मुले ही अशा विकृत वासनांचा बळी ठरतात.
बाप रे
भयानक आहे हे.
करतो. करेन. व करेगें
{आकडा चुकला तर नाहिये ना}
{>>आकडा चुकला तर नाहिये}
>>आकडा चुकला तर नाहिये ना
अजिबात नाही, हे अभ्यास व वाचन करून लिहीले आहे, अशा बाबतीत तरी मालमसाला वापरणार नाही मी चुचु
{हम्म.... मुलांनाच काय काहि}
हम्म.... मुलांनाच काय काहि काही मोठ्या (वयाने) लोकांनाही हे शिक्षण गरजेचे आहे.
{छानच हाताळलाय हा विषय.....}
अन त्यामुळेच माझेपण दोन पैसे.
२००८ साली पुण्यात बलात्काराचे ९२ गुन्हे दाखल झाले त्यापैकी ३९ प्रकारांमधे (४५ टक्के) पीडीता १४-१८ वर्षे वयोगटातल्या मुली होत्या, १२ प्रकरणांमधे पीडीता १०-१४ वर्षे वयोगटातल्या होत्या तर ४ प्रकारांमधे त्या १० वर्षांपेक्षा लहान होत्या. संपुर्ण २००९ साल व २०१० च्या जानेवारी ते मार्च कालखंडात पुण्यातील पोलिसांकडे दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी ७० टक्के गुन्ह्यांमधे पीडीता १०-१८ वयोगटातील मुली होत्या. हे चित्र फक्त पुण्यातच दिसते असे नाही तर हे सार्वत्रिक आहे.
असा प्रश्न अनेकदा विकसीत पाश्चिमात्य देशांमधेही दिसतो. त्यावर तोडगा म्हणुन तेथील तज्ञ पुर्वीपासुनच मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यातील फरक ओळखायला शिकवा असा सल्ला पालकांना देत आहेत. गेल्या काही वर्षात असाच सल्ला येथील तज्ञ भारतीय पालकांनाही देतात.
बहुतेक सर्व पाश्चिमात्य देशात लैंगिक शिक्षण पुर्वीपासुन सुरु असुनही तेथे असे प्रश्न आहेत तर भारतासारख्या देशात जिथे लैंगिकता व तिच्याशी दुरान्वयानेही संबंध असलेल्या सर्व विषयांना टाळण्याची प्रवृत्ती आहे, तेथे तर त्यांचे स्वरुप अजुनच गंभीर होते. येथे अजुनही पालक मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळतात व त्यामुळे अनेकदा मुले आपले कुतुहल भागवण्यासाठी अश्लील साहित्याचा आधार घेतात. अश्लील साहित्याची निर्मीती व विक्री यावर कायदेशीर बंदी असली तरीही तिची परिणामकारक अंमलबजावणी करणे जवळपास अशक्यच आहे. अश्या परिस्तिथीत लैगिक शिक्षण ही काळाची गरज आहे हे म्हणणे योग्यच आहे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{एके काळी लैंगिक शिक्षणाचा}
एके काळी लैंगिक शिक्षणाचा विचार मांडणे हीच विकृती मानली जात होती. आज देखील समलैंगिता ही विकृतीच मानली जाते. मूळात विकृत अशी गोष्ट नसतेच. समाजाला एखादी प्रकृती मान्य नसेल तेव्हा ती विकृती मानली जाते. हा शब्द सोयी साठी आहे. लैंगिक प्रेरणा या नैसर्गिक असतात. परंतु समाजात त्याचे व्यवस्थापन व्हावे म्हणुन काही लिखित / अलिखित नियम्/संकेत बनवले. ते परिपुर्ण आहेत असे अजिबात नाही. लैंगिकतेला नैतिकतेची जोड दिली असल्याने समाजमान्य नसलेल्या लैंगिक वर्तन अनितीमान मानले आहे. उदा. हस्त मैथुन हे अनैतिक मानले होते / आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{अंशतः असहमत. माझा प्रतिसाद}
अंशतः असहमत. माझा प्रतिसाद पूर्णपणे धाग्याशी अवांतर आहे हे जाणून हा प्रतिसाद देत आहे.
मूळात विकृत अशी गोष्ट नसतेच
विकृत अशा गोष्टी असतात आणि असतातच. अन्यथा बलात्कार ही विकृती नाही तर काय?
समाजाला एखादी प्रकृती मान्य नसेल तेव्हा ती विकृती मानली जाते.
समजा कुठल्या समाजात बलात्कार ही प्रकृती मानली गेली असेल तर त्या समाजाच्या दृष्टीने ती विकृती नसेल पण माझ्या दृष्टीने ती विकृतीच आहे. आणि झालेच तर त्या समाजातले लोक माझ्या संपर्कात आले तर त्यांचे प्रबोधन करणे हे मी माझे कर्तव्य समजतो.
-पुण्याचे पेशवे
{१०० % सहमत. लैंगिक शोषणाला}
१०० % सहमत.
लैंगिक शोषणाला बळी पडलेली एखादीच केस जवळून बघा.. हे प्रकृती-विकृती विसराल आणि मनात उरेल फक्त संताप आणि दु:ख !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{यातला भावनिक भाग सोडला तर}
यातला भावनिक भाग सोडला तर नैसर्गिक प्रेरणा हीच विकृतीला देखील जन्म देत असते. तो समाजाच्या हिताचा नाही म्हणुन आपण त्याला विकृती म्हणतो. लैंगिक वर्तनातील अनेक गोष्टीतील प्रकृती वा विकृती ही सापेक्ष आहे. अट्टल शाकाहारी माणसाला जिवंत प्राणी कापुन खाणारा हा क्रुर व विकृत वाटत असतो. मी अगोदरच म्हटले आहे विकृती ही समाजमान्य नसलेली प्रकृतीच आहे.
बलाचा वापर करुन केलेली समोरच्याला आपल्याला हवी असलेली कृती करुन घेणे हा बलात्कारच आहे.. आता त्याला केवळ लैंगिक अर्थ चिकटला आहे. मानवी समाज जसा उत्क्रांत होत गेला तसा बळी तो कानपिळी ही वृत्ती असंस्कृत मानली गेली. अन्यथा दुर्बल घटक नामशेष होईल. अधिकार, सत्ता, स्त्री, पैसा यासाठीच अनेक मानवी उत्क्रांतीत टोळी युद्धे झाली आजही होताहेत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{चांगल्या प्रश्नाला वाचा}
चांगल्या प्रश्नाला वाचा फोडलीत सोनाली. जेव्हा कोकणासारख्या भागात ७वी-८वीतल्या मुली गरोदर होऊन गर्भपातासाठी दाखल होऊ लागल्या तेव्हा परिस्थिती फारच विदारक होऊ लागली आहे याची जाणीव झाली. त्यामुळे त्या मुलींसाठी लैंगिक शिक्षणाची खरंच गरज आहे असं वाटून गेलं. विदारक सत्य त्याही पुढे होतं. यातल्या कोणीही त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्यांच्या अन्यायाला बळी पडलेल्या नव्हत्या तर आपल्याच शाळेतल्या समवयीन मुलांबरोबर औत्सुक्यापोटी केलेल्या सत्याच्या प्रयोगामुळे
पोटात गोळा आलेल्या होत्या.
परंतु जेव्हा लैंगिक शिक्षण दिले जाईल तेव्हा याची काळजी घेतली पाहीजे की आपण मुलांना शिक्षण देऊन या गोष्टी करायला प्रेरीत करत तर नाही ना? अन्यथा पाश्चिमात्य देशांमधली परिस्थिती आपण पाहतोच. शिक्षणाचा उद्देश या वयात मुलांना त्या गोष्टींपासून परावृत्त करण्याचाच असावा. कदाचित मुलं परावृत्त होणार नाहित म्हणून त्यांच्यावर योग्य संस्कार न करणे हे देखील योग्य नाही. मुख्यत्वे या वयात मुलींच्या जननेंद्रियांची वाढ नीट झालेली नसते म्हणूनच त्यांना शिक्षण देऊन त्या गोष्टींपासून सकारण परावृत्त करणे योग्य.
-पुण्याचे पेशवे
{>>> परंतु जेव्हा लैंगिक}
>>> परंतु जेव्हा लैंगिक शिक्षण दिले जाईल तेव्हा याची काळजी घेतली पाहीजे की आपण मुलांना शिक्षण देऊन या गोष्टी करायला प्रेरीत करत तर नाही ना?
या कारणामुळेच बर्याच शाळा हा उपक्रम राबवित नाहीत.
प्रशिक्षण देणारे किती कौशल्यपूर्वक विषय हाताळतात यावर बरेच काही अवलंबून असते. काही लोक एवढे विकृत असतात की या प्रशिक्षणात चालणार्या अनेक विषयांनी ते स्वतःचे मनोरंजन करून घेतात. अशाच एका प्रशिक्षण शिबिरात माझ्यासोबत असलेल्या एका 'प्रशिक्षकाला' शिबिरातून जाण्याची 'नम्र विनंती' करण्यात आली होती.
लैंगिक शिक्षण देण्याकरिता जेव्हा शिक्षकाना प्रशिक्षित केले जाते तेव्हा त्यांच्या मनात या विषयासंदर्भात असणारी अढी घालवून आदर निर्माण करणे हे सगळ्यात मोठे आव्हान असते. तीच गोष्ट पालकांचे समूपदेशन करतानाही करावी लागते.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{खुप महत्वाचा व विचार करावा}
खुप महत्वाचा व विचार करावा असा विषय आहे.
अवस्था बिकट होण्याआधीच योग्यतो मार्ग शोधणे आवश्यक आहे.
समाज हा बदलत असतो काळानूसार नियम व पध्दती बदलतात पण ह्या प्रकारच्या शिक्षणामध्ये अजून आपण मागासलेलेच आहोत हे नक्की.
हे आकडेच बोलत आहेत.. लैंगिक शिक्षण गरजेचेच आहे. नाहीतर ही विकृती वाढतच जाईल.
Hope is a good thing...
{सहमत}
सहमत.
माहीती व ज्ञान देणे व घेणे हा एक भाग झाला व त्याबद्दल चर्चा व धोरणे बनत आहेतच.
पण माहीती व ज्ञान असणे हा एक भाग झाला व दुसरा ...
Plato made the fatal error of equating knowledge with virtue and assuming that if one knows what is right one will do what is right.
---
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{दुटप्पिपणा}
एड्स बद्द्ल जनजाग्रुति करणार्या जहिराति दाखवल्या जातात
इर्मजन्सि गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम च्या जाहिराति वर्तमानपत्रात ,टिव्हिवर सहजपणे दाखवतात
चित्रपटात/ टिव्हिवर अंगप्रदर्शन चालते
पण शाळेत लैगिक शिषणाला विरोध होतो/ दुर्लष केले जाते
लैंगिक शिक्षण गरजेचेच आहे.
सुजाण पालक लैगिक शिषण मिळत नसल्यास घरि ते देतात. पण हे शालेय/ महाविद्यालयात दिले गेले पाहिजे.
शिषक तयार नसतिल तर डौक्टर/ स्वयंसेवि संस्थांचि मदत घेतलि पाहिजे
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
{एक चांगला धागा , प्रतिसाद}
एक चांगला धागा , प्रतिसाद सुद्धा वाचनिय !!
{लैगिंगतेची माहिती देण्याबाबतचा दृष्टीकोन भिन्न स्तरावर वेगळा असा}
लैंगिकतेबाबत माहिती शाळेतील मुला-मुलींना शिक्षकरूपी पगारदार कर्मचारी शिकवणार तरी काय? ती माहिती देणार तरी कशी? त्या माहितीत कोण-कोणत्या गोष्टींचा सामावेश असणार?
काय शिकवायचय? व ते नेमके कशासाठी शिकवायचय? हे स्पष्ट झाल्यानंतरच 'ते कसं पोहचवायचं?' हे आकारले जाईल.
प्रत्येक माणसाभोवती एक तेजोवलय असते. त्या तेजोवलय हे त्या व्यक्तीच्या शाररीक, मानसिक आरोग्याचे कवच असते. त्या कवचाचे रक्षण करण्यासाठीच आपले शरीर स्वच्छ ठेवायचे असते. आरोग्यदायी पदार्थच खायचे व प्यायचे. तसेच वर सांगितल्या प्रमाणे - .''अनोळखी वा ओळखीच्या कोणकडुनही खाऊ वा खेळणी घेउ नये. जर कोणा ओळखीच्यांकडुन घेतलीच तर आधी घरी येउन सांगयचे. त्यांनी का दिली हे सांगावे.
कोणी काका, दादा, मामा...आपल्या विशिष्ठ अंगाना हात लावू देवू नये. तसे केले तर आपले तेजोवलय दुषित होते व तसे झाल्याने आपल्या शरीर व मनाचे आरोग्य बिघडते.''
असे वा अशाप्रकारचा निकोप दृष्टीकोन बाळगूनच काय शिकवायचे ते ठरवता येईल.
वरील दृष्टीकोन हा घटना घडण्यापूर्वी उपाय म्हणून योजता येवू शकतो.
घटना घडल्यानंतर त्या मुला-मुलीचे मांनसिक स्वास्थ निरोगी राखण्यासाठी जे शिकवायचे आहे ते नक्कीच वेगळे असावे लागणार. जेणेकरून त्या पीडीत मुला-मुलीच्या मनात प्रणयाबाबत घृणा-तिरस्कार वा अतिआसक्ती निर्माण होणार नाही.
{'परस्परावलंबन' - समस्येचं व त्यावरील तोडग्यांचं!}
पहीला टप्पा :
लैगिंकतेबाबत माहीती देणं/मिळवणं.
हा विशय 'शरीरशास्त्र + तेजोवलय शास्त्र' यांची सरमिसळ करून शिकवता येईल.
मुख्य उद्देश "लहान मुलां-मुलींच्या निरागसतेला कोणताही ओरखडा न लावता/लागू देता त्यांना माहीती देणं." हा ठेवावा लागेल.
मुलं-मुली सद्न्यान झाल्यानंतर....?
सायकलबद्द्ल माहीती देणं वेगळं, सायकल चालवायची कशी? हे वेगळं! 'सायकल चालवायची कशी?' हे मात्र प्रत्यक्षच शिकवावे लागेल.
दुसरा टप्पा : कोणत्याही 'कृती'ला काहीतरी 'कारण' असते, असावे लागते.
म्हणूनच प्रणयाचा उंबरठा कोणत्या 'कारणासाठी' ओलांडायचा?
- नैसर्गिक उर्मीतून,
- कुटुंब व्यवस्थेसाठी (कारण त्यातून मिळणार्या सुरक्षिततेसाठी)
- समाजात राहतो तेव्हा बहुतेक जण जे करतात म्हणून तेच करावे म्हणून.
----
विशयाचा एक पैलू :
अध्यात्मिक द्न्यानाचे - ब्राह्मणांचे युग येऊन गेले, तलवारीचे - क्षत्रियांचे युग ही येवून गेले, जागतिक व्यापार केंद्र W.T.C. पडले आणि वैश्यांचे युग ही संपले, आता आले शुद्रांचे युग.
शुद्रांचे मुख्य गुण: 'कोणासाठी तरी काम करीत राहणे' , 'एखाद्या विद्येत पारंगत होवून स्वत:चे मन रिझवणे' .
शुद्रांचा मुख्य अवगुण: 'क्षणिक आनंद देणार्या एखाद्या क्रियेत अडकून पडणे, त्यातून बाहेर येता न येणे.'
सुखप्राप्ती साठी व दु:ख टाळण्यासाठी त्या-त्या युगात त्या-त्या युगाचे नियम पाळून राहणे.
----
विशयाचा दुसरा पैलू:
प्रणयात समर्पण कसे करायचे? जोडिदाराला कशा प्रकारे समर्पित करायला लावायचे?
ह्या टप्प्यावर दोघंही अनाडी असून चालत नाही. एकाला अनुभव असावाच लागेल. मग 'अनुभव असावा' असे म्हटले तर, 'तो आधि कोणाला असायला हवा?'
(गृहित अटः फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन')
नक्कीच, 'तो पुरुषाला असायला हवा?' पण मग, 'पुरुषाला प्रणयाचा अनुभव देणार कोण?' तरमग नक्कीच, 'ती अनुभवी स्त्री असावी लागणार!' पण मग, 'त्या स्त्रीला, जेव्हा ती निरागस व कुमारीका असणार तेव्हा त्या वेळी तिला कोण अनुभव देणार?'
-----
पर्यायी उत्तर:
हे प्राणयिक शिक्षण एकाच जातीतील निरोगी, सदृढ व निरोगी विवाहीत स्त्रीकडून त्याच जातीतील वयात येणार्या/ आलेल्या 'सद्न्यान व निरोगी' तरूणास त्याच्या पालकांच्याच प्रयत्नाने, पुढाकाराने मिळाले तर....!
अशी परंपरा चालू झाली तर काही वर्षातच कोणती जातीचे पुरुष 'किती समजूतदार व शहाणे' आहेत, तसेच कोणत्या जातीतील स्त्री 'धीट व संभाषण कलेत चतूर' आहे ते स्पष्ट होवू शकेल.
{पर्यायी उत्तर वाचुन जे चित्र}
पर्यायी उत्तर वाचुन जे चित्र डोळ्या पुढे उभ राहील त्याने डोळे पांढरे झाले.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{+१}
माझेसुद्धा..
{माहिती पुर्ण लेखाची नंतर}
माहिती पुर्ण लेखाची नंतर प्रतिसादात वाट लावली
{>>>माहिती पुर्ण लेखाची नंतर}
>>>माहिती पुर्ण लेखाची नंतर प्रतिसादात वाट लावली
हा वरील सर्व प्रतिसाद कर्त्यांचा अपमान समजावा का?
कशी व कुठे वाट लावलेली आहे या धागाची? याची माहिती तुम्ही द्यावी ही विनंती.
Hope is a good thing...
{>>>कशी व कुठे वाट लावलेली आहे}
>>>कशी व कुठे वाट लावलेली आहे या धागाची? याची माहिती तुम्ही द्यावी ही विनंती.
सतीश रावळे यांचा प्रतिसाद वाचला......त्यात विशयाचा दुसरा पैलू: व पर्यायी उत्तर: जो प्रतिसाद आहे तो कुठेतरी समाज व्यवस्थेप्रमाणे पटला नाही. इथे मुलांवर होणारे अन्याय व अत्याचार यांची चर्चा सुरू असताना व शाळेमध्ये लैंगिक शिक्षण कसे द्यावे जेणेकरून हे अत्याचार कमी होतील यावर प्रकाश अपेक्षित होता. अनुभवी स्त्रीकडून शिक्षण मिळणे हे सोल्युशन नसावे आणि म्हणुनच त्यांच्या प्रतिसादावर माझा आक्षेप आहे.
आपणाला माझ्या उत्तरमुळे तुम्हा सर्वांचा अपमान झाला असे वाट्ल्यास क्षमस्व यापुढे इथे प्रतिसाद देणार नाही.
धन्यवाद.
{तुमचे ते वाक्य बव्हंशी योग्यच आहे}
जान्हवी मॅडम,
तुमचे ते वाक्य बव्हंशी योग्यच आहे. त्यामुळे - You do NOT really owe an apology.
ते "बव्हंशी योग्य" का/कसे आहे ते लिहू शकतो पण विषयांतर होईल.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{धन्यवाद भाऊ}
धन्यवाद भाऊ
{लैंगिक शिक्षणाचा सर्वात मोठ्ठा धडा हा आहे की}
लैंगिक शिक्षणाचा सर्वात मोठ्ठा धडा हा आहे की - कोणत्याही दोन किंवा जास्त सजीव प्राण्यांमध्ये Consensual लैंगिक संबंध प्रस्थापित होण्याच्या आड येणारी सर्व नैतिकता व नियम बुलडोझर वापरून जमीनदोस्त केले पाहिजेत.
Consensual हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे इथे.
...
...
Evolution ... anyone ????
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{Consensual म्हणजे ??}
Consensual म्हणजे ??
{Consensual म्हंजे Relating}
Consensual म्हंजे Relating to or involving consent, esp. mutual consent.
थोडक्यात म्हंजे विवेकपूर्ण रजामंदी मिळवून केलेली (व जबरदस्ती न करता केलेली) कृती.
आता तुम्ही म्हणाल प्राणी कसे करणार हे ? प्रश्न रास्त आहे.
----
दुसरे म्हंजे - लैंगिकता ही एका बाबतीत उच्च आहे - Intercourse between consenting adults is typically a win-win process. - त्यामुळे संस्कार, शिष्टाचार/सभ्यतेच्या मर्यादा, परंपरा/रूढी, स्टॅटिस्टिक्स, भीती, दडपण या सर्वांच्या जोखडातून लैंगिकता जेव्हा मुक्त होईल तो सुदिन. लैंगिक शिक्षण हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{आता तुम्ही म्हणाल प्राणी कसे करणार हे ? प्रश्न रास्त आहे.}
गब्बरजी, असहमत.
फक्त प्राण्यांतच संपूर्णतः 'कन्सेन्सुअल सेक्स' होऊ शकते. कधीही बलात्कार होत नाही. बकरीची शेपूटही मधे आली तर लाज झाकण्यास पुरे ठरते. तो बोकड थोडी झटापटी / प्रणयाराधन करून निघून जातो.
(वरील प्रतिसादाच्या दुसर्या भागाशी /विन-विन/ १००% सहमत)
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.
{आता तुम्ही म्हणाल प्राणी कसे करणार हे ? प्रश्न रास्त आहे.}
चुकीच्या जागी, म्हणून प्रकाटाआ.
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.
{लैंगिक शिक्षण द्यायला हवे}
लैंगिक शिक्षण द्यायला हवे याच्याशी सहमत मात्र ते कोणाला द्यायला हवे यावर विचार व्हावा. माझ्यामते पंगंडावस्थेत शिरणार्या मुलांचे पालक व त्या वर्गाला शिकविणारे शिक्षक यांचे लैगिक शिक्षण होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर तरूण स्त्रियांचे लैगिक कायद्याचे शिक्षणही होणे गरजेचे आहे.
एक उदा. सांगतो, बलात्कार होणे हे विकृत मानले जाते वगैरे ठीक आहे मात्र ती घटना घटल्यावर जर त्या स्त्रीने आंघोळ केली, पोलिसांकडे जायला एकदोन दिवस लावले तर गुन्हा सिद्ध होणे जवळ्जवळ अशक्य होते. तेव्हा तुमच्यावर बलात्कार झाल्यास काय करावे याचेही शिक्षण होणे गरजेचे आहे.
मुलांशी या विषयावर कसे बोलावे याच्या शिक्षणाची गरज अधिक आहे
-ऋ