मृत्यु : विस्कळीतपण माझे विचार
लहानपणी एकदा महाबळेश्वरला शाळेची सहल गेलो होती कुठलातरी सनसेट पाँईन्ट होता नाव नाही आठवत आता पण तेथून पाच पैसे अथवा दहा पैश्याचे नाणे टाकले की ते काही काळ तरंगत असे, हे आठवलं व एक मनात एक विचार चमकून गेला. आपण उडी मारल्यावर देखील तरंगू का ?
चार पाऊले पुढे तर चार पाऊले मागे हेच जगणे, कधी कधी एकातं देखील स्वर्गाहून सुंदर वाटू लागतो. कुठेतरी डोंगरमाथ्यावर बसून शेवटची सिगरेट अर्धीच प्यावी व मग हिशोब करावा जगण्याचा, काही राहीले तर नाही ना ? पण हिशोब सगळेच अर्धवट असतात नेहमी प्रमाणेच, इच्छा देखील अर्धवटच पण त्यामुळे काही थांबावे असे नाही ना, सर्वच काही हवे असते पण तसे घडत नाहीच ना ? मग हलकेच आपणच आपल्या जगण्याला चियर्स करावे व मागे वळून पहावे तर उंच उंच डोंगरमाथा सोडला व समोर मस्त पसरलेले आकाश व खाली चित्रवत वाटणारे वास्तव, काहीच नाही दिसत मग तेव्हा व फक्त रम्य अशी खोलवर दरी, त्या दरी मध्ये, स्वतःला झोकून द्यावे मनसोक्तपणे ! कसली ही काळजी, कसलेली बंध मागे न ठेवता... मुक्त व्हावे !
मृत्युचा हा आगळा वेगळा एकट्यानेच केलेला समारंभ किती विलक्षण असेल ना ! कितीतरी वेळा आपण असे विचार करतो की मला मुक्त व्हायचे आहे, मला मोकळीक हवी अगदी सगळ्यातून. मग आपण आपल्याला गुंतवू पाहतो विविध प्रकारच्या कार्यामध्ये, विचारामध्ये, व्यसनामध्ये. आपले वेद पण सांगतात की मृत्यु हेच सत्य. पुन्हा नवजन्म होईल एक मेला असेल व दुसरा जिवंत होईल. कपडे बदलावे तसे शरीर बदलेल व पुन्हा नवीन जीवन खळखळून वाहू लागेल.. चेहरा तोच असेल शक्यतो पण आपलं मन बदललेलं असेल.. काही क्षणामध्ये नकळत, सगळी बंधनं, मोह, माया मागे राहीली असेल व पुन्हा नवीन उषःकाल झाला असेल... पुर्वेकडून तो हसत मुखाने पुन्हा आपल्या सहस्त्र किरणाच्या रथावर आरुढ होऊन येईल व त्याच्या बरोबर पुन्हा नवजीवन खळखळून हसू लागेल.. सगळी दुखद स्वप्ने हवेत विरुन गेली असतील व डोळ्यात फक्त नव भविष्याचे तेज चमकत असेल..!
वेदांपासून आजकालच्या काळापर्यंत जन्म व मृत्यु ह्यावर खुप लिहलेले गेले बोलले गेले चर्चा केली गेली. का ? ह्या प्रश्नाचे उत्तर सोडून जवळजवळ आपण सर्व कारणे विज्ञानाच्या जोरावर शोधली आहेत ( असतील ) पण मृत्यु म्हणजे हदय अथवा मेंदू कार्य करणे बंद हे नाही अथवा वेदांप्रमाणे कपडे बदलावे तसे देह बदलणे देखील नाही.
मृत्यु ! एकाचा मृत्यु म्हणजे त्याच्या प्रिय व त्यांना प्रिय असलेल्या व्यक्तीशी संपर्क तुटणे. एक हदय असलेल्या पती-पत्नी मध्ये ताटातूट, मुलांपासून पालकत्व हरवणे, मित्रांपासून एक खास मित्र हरवणे व समाजापासून एक काहीतरी करु शकणारी व्यक्ती हरवणे. बुध्दीच्या जीवावर आपण अनेक कारणे देऊ तो गेला, तो असता तर हे झाले असते अथवा हे केले असते पण त्याच्या आपल्या व्यक्तीनी जे हरवले अथवा गमावले आहे त्याचे सांत्वन कसे करावे ह्याचे कारण नक्कीच कुठलेली शास्त्र देऊ शकत नाही.
पाप-पुण्य ह्यातर एकदम वेगळ्या संकल्पना. त्याचा व ह्या मृत्युचा काहीच संबध नाही. मृत्यु हे सत्य आहे पण उत्तर नक्कीच नाही. नकळत आलेला मृत्यु हा सहनीय असतो. त्याला देखील व त्याच्या प्रियजनां देखील. कारण माहीत नसते व तसेच कार्य देखील म्हणून. व स्वः हस्ते व मुक्त कंठाने आरोळी देऊन आपल्या मृत्युला स्वतः आपल्या जवळ बोलवणे हे एखादा वेडाच करु जाणे. असे वेडे अगणित झाले ह्या सृष्टीमध्ये. कोण परत आला व कोण नाही हे कोणाला माहित.
बुध्दांचे "एक मुठीं चावल" ही कथा माहीत आहे का ? ज्या घरात एक ही मृत्यु नाही अश्या घरातून एक मुठभर तांदुळ घेऊन ये आई मी तुझा मुलगा जिवंत करतो अशी ती कथा. अशक्य कोटीची गोष्ट. जे घडणे सध्याच्या काळात ही नक्कीच अशक्य ! पुढे माहीत नाही विज्ञान मेलेल्या शरिराला जिवंत करेल देखील. पण आनादी काळापासून मान्य असलेले सत्य आज तरी आपण सर्वजण मान्य करतोच की मृत्यु अटळ आहे, असमय असो वा वृध्दकाळामुळे. आजारपणामुळे असो वा आत्मघातामुळे. मृत्यु ही संकल्पना देखील एकदम विचित्र आहे, एकाद्याची सुटका व बाकी राहीलेल्यांना क्षणीक त्रास अथवा जिवनभराचा आनंद असतो. तो कसा जगला व कसा व्यवहार केला जगताना इतरांशी ह्यावर ती अवस्था अवलंबून असते.

.jpg)
विस्कळीत पण माझे विचार हम्म.
विस्कळीत पण माझे विचार
?
हम्म. एखादा दुसरा विषय नाही का रे मिळाला..
क्रमश: आहेच का अजून..
>>म्म. एखादा दुसरा विषय नाही
>>म्म. एखादा दुसरा विषय नाही का रे मिळाला..
ह्म्म्म.. काय आहे माहीत आहे का मित्रा, हेच सत्य आहे.
>>>क्रमश: आहेच का अजून..
सगळे लिहणे एकाच वेळी शक्य होत नाही यार
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
राजांसाठी पण विषयाची यादी
राजांसाठी पण विषयाची यादी तयार केली पाहिजे...ररा कुठे आहात?
पुष्करिणी
हॅ हॅ हॅ ... ररा झोपले
हॅ हॅ हॅ ... ररा झोपले
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
का रे बाबा हल्ली त्या अंतिम
का रे बाबा हल्ली त्या अंतिम सत्याच्या मागे लागला आहेस सध्या.
लोकांना अधुन मधुन सर्दी-पडस होतं तस तुला मृत्यु-प्रेमभंगाच वारं लागत का?
जपा जरा जीवाला.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
>>>का रे बाबा हल्ली त्या
>>>का रे बाबा हल्ली त्या अंतिम सत्याच्या मागे लागला आहेस सध्या.
असे काही नाही आहे रे, जगणे सत्य बाकी सगळे असत्य !!!!
>>लोकांना अधुन मधुन सर्दी-पडस होतं तस तुला मृत्यु-प्रेमभंगाच वारं लागत का?
हा हा हा... तसे पण काही नाही, असेच काही विचार आले मनात एक जूना प्रतिसाद पाहून मग त्याला पुन्हा इडिट केला
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>> जगणे सत्य बाकी सगळे
>> जगणे सत्य बाकी सगळे असत्य
वर म्हणतोयंस मृत्यु सत्य बाकी सगळे असत्य.
वैचारीक महात्मा असेच वागतात
वैचारीक महात्मा असेच वागतात बच्चा... असो अजून लहान आहेस तु
त्याचा वेडा रंग देखणा..
वाट चाले आपल्यापरी सज्जना
त्यास काय कुणाचे
संगे कोणी ना आपला
भटकत आहे आत्मा
मुक्त झाली वेदना
उरलो शब्दात तरी
मनी अमृत हवे ही वासना
माझे काय तुझे काय
ह्या गुंत्यात अडकला सदा
तो चालतो वाट पैलतरीची
तरी हा त्याचा मार्ग एकला....
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चिंतन चांगलं
चिंतन चांगलं आहे.
शंकराचार्यांचं ' निर्वाणषट्क ' वाचलं नसेल तर अवश्य वाचा.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
>> चिंतन चांगलं
>> चिंतन चांगलं आहे.
धन्यवाद.
>>शंकराचार्यांचं ' निर्वाणषट्क ' वाचलं नसेल तर अवश्य वाचा.
संकृत व माझे जन्मजन्मांतराचे भांडण आहे, मराठी आहे का उपलब्ध हे ????
ई बुक ? अथवा पुस्तक स्वरुपात ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चालू द्या राजे..
चालू द्या राजे..
द्या ! ह्या शब्द दिसलाच नाही
द्या !
ह्या शब्द दिसलाच नाही
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वासांसि जीर्णानि यथा विहाय
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोSपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही |
-ज्याप्रमाणे माणसे आपले जुने झालेले कपडे टाकून नवीन वस्त्रे धारण करतात त्याप्रमाणेच आत्मा जुने झालेले शरीर सोडून देऊन नवीन शरीर धारण करतो. ऐकलाय मी.....पण तू सांगितलेला मृत्यूचा सोहळा कदाचित निराळा असेल, काय माहित त्या निळ्या आभाळात जडत्व नसलेल्या शरीर विरहीत अवस्थेत फिरताना कस वाटेल???
कदाचित खाली छोटी मुंग्यांसारखी माणस दिसतील, माझीच माणस, पण मन आडकणार नाही त्यात, कारण तेव्हा मी मी नसेन, या देहातून बाहेर पडलेला निर्विकार, निराकार आत्मा.त्याला मग भावना, दु:ख, सुख काहीच नाही..........खरय ना???
जीवनाने एक शिकवलय, कशातही अडकायच नाही, भिरभिरायच नाही, सरळ समोर जे सत्य येत त्याला निर्विकार मनाने सामोर जायच........ जमतय का पहा विचार करून, एकदा का ही निर्विकार मनाची स्थितप्रज्ञ अवस्था आली की
ना भिती, ना कसली खंत ना खेद कसला
तो चालतो वाट अंबराची
हा त्याचा मार्ग एकला.......................
>>>ना भिती, ना कसली खंत ना
>>>ना भिती, ना कसली खंत ना खेद कसला
तो चालतो वाट अंबराची
हा त्याचा मार्ग एकला.......................
सहमत आहे..
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अतिंम सत्य.
अतिंम सत्य.
एका ओळीमध्ये ह्या अवस्थेची
एका ओळीमध्ये ह्या अवस्थेची उकल होऊ शकते ?
जरा अवघड नाही का वाटत ?
येवढे सोपं नाही आहे हो की अतिंम सत्य असे म्हणुन मोकळे व्हावे.
पुढील भाग नक्की वाचा म्हणजे मला काय लिहायचे आहे ते कळेल.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कसली भन्नाट फिलॉसॉफी आहे
कसली भन्नाट फिलॉसॉफी आहे राव..
म्रुत्यु हे आपल्या जिवनाचे अंतिम सत्य आहे..
ते कोणत्या मार्गाने येईल हे निश्चीत सांगता येत नाही.. आणी जेंव्हा येईल तेंव्हा मुकाट्याने त्याच्या स्वाधीन व्ह्यायचे आहेच प्रत्य्रेकाला... मग त्या गोष्टी बद्द्ल (जी आपल्या हातात नाही) विचार करण्यात काही अर्थ आहे का?
मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहं
मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहं
न च श्रोत्रजिव्हे न च घ्राणनेत्रे .
न च व्योमभूमिः न तेजो न वायुः
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् .. १..
न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः
न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः .
न वाक् पाणिपादौ न चोपस्थपायू
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् .. २..
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः .
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् .. ३..
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः .
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् .. ४..
न मे मृत्युशंका न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्म .
न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् .. ५..
अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुव्यार्प्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् .
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् .. ६..
मस्त रे नाना!! उपस्थपायू
मस्त रे नाना!!
उपस्थपायू म्हणजे काय?
जननेंद्रिय आणि गुदद्वार
जननेंद्रिय आणि गुदद्वार
"सत्यं शिवं सुंदरम" हेच तर
"सत्यं शिवं सुंदरम" हेच तर आहे !
शिवोहम..शिवोहम..
पुण्यात रामकृष्ण मठात या स्तोत्राचे सुंदर अनुवाद असलेले पुस्तक मिळेल.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
वाचायला हवे एकदा.
वाचायला हवे एकदा.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लेख छान. हल्ली कशाचंच काही
लेख छान. हल्ली कशाचंच काही वाटत नाही.
-पुण्याचे पेशवे
ह्यावरुन एक गोष्ट आठवली
लेख खुप आवडला. पटला.
ती उद्याला देतो. कारण ती द्यायच्या आधी आपण लिहीलेला पुढील भाग वाचायचाय मला.
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtravrat.blogspot.com
http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
आज पहिल्यांदा तू छान लिहले
आज पहिल्यांदा तू छान लिहले आहेस असे म्हणते आहे.
क्रम काही चूकले असतील पण लेखाचा आशय व गांभीर्य कोठे ही हरवू दिले नाही आहेस.
आता मुळ विषय,
नेहमी प्रमाणे हे देखील अर्धवटच ?
लिहतो लिहतो लिहतो............
लिहतो लिहतो लिहतो............ हा अर्धवट माझ्या मागे का पडला आहे
बघतो आज लिहीन शक्यतो... मुड आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मृत्यू ही माणसाची कल्पना आहे
अशी कल्पना करा की हे सारं अस्तित्व पाण्याचं बनलेलं आहे. या अस्तित्वात प्रकट होणारी प्रत्येक गोष्ट - चंद्र, सूर्य, तारे, पशु, पक्षी, समुद्र, डोंगर, देह, भावना, विचार सगळं काही या पाण्यातूनच प्रकट होतयं आणि पाण्यातच विलीन होतयं. आता प्रत्येक आकार जरी वेगळा भासला तरी मूळात तो पाणीच आहे, तुम्ही प्रत्येक आकाराच्या सुक्ष्मातल्या सूक्ष्म अणूचं विघटन केलंत तरी पाणीच मिळेल. तुम्हाला आकार विलीन होतायत असं वाटलं तरी मूळात पाणीच पाण्यात मिसळतयं. तुम्हाला आपण जरी वेगळे आहोत असं वाटत असेल आणि तुम्हाला कुणीही सांगीतलं नाही तरी मूळात तुम्ही पाणीच आहात. तुम्ही समजा अगर समजू नका सारा खेळ पाण्यातच चालेल आणि पाण्यातच संपेल किंवा पाण्यातच अव्यहत चालू राहील.
आकार निर्माण करणं आणि काही कालावधी नंतर ते विलीन होणं ही देखील पाण्याचीच अंगभूत क्षमता असेल. पाणी आणि प्रकट होणारे आकार जरी वेगळे भासले तरी मूळात सगळं पाणीच आहे. सगळं अस्तित्व पाण्याचं असल्यामुळे मृत्यू ही कल्पना असेल कारण पाणी मरून जाणार तरी कुठे?
आता थोडा पाण्याच्या बाजूनी विचार करा, पाण्याला जर सगळच पाणी असेल तर आपण पाणी आहोत हे कसं समजेल? जेंव्हा पाण्यात काही तरी निर्माण होईल तेंव्हाच पाण्याला स्वतःची जाणिव होईल.
आता पाणी ही कल्पना सोडून द्या आणि समोर बघा तुम्हाला निराकार दिसेल. हा निराकार या सगळ्या प्रकट जगाचा आधार आणि स्त्रोत आहे. प्रत्येक आकार या निराकाराचाच बनलेला आहे. आपण पाणी ही कल्पना केली म्हणून पाणी कुठे तरी संपेल, किनारा असेल ही शक्यता संपली, कितीही वेध घेतला तरी निराकाराला अंत नाही. संपूर्ण शांतता आणि दिशाहीन अनंतता!
तुम्ही निराकाराचं अस्तित्व नाकारू शकता कारण निराकार निःशब्द आहे. तुम्ही निराकार नाकारलात तरी मूळात तुम्ही निराकारच आहात कारण नकार देण्यापूर्वी नाकारणार हजर हवा. मी नाही म्हणायला देखील मी हवाच.
हा निराकाराला निराकाराचा बोध होणे म्हणजे मुक्ती!
आता निराकार हा देखील शब्द आहे तो सोडून द्या, काय उरतं? एक निःशब्द, अथांग शांतता. या बोधाला कुणी शून्य म्हंटलं आहे तर कुणी पूर्ण पण सर्व शब्द मानव निर्मीत आहेत त्यामुळे अर्थ शब्दात नाही तर अनुभवात आहे. अनुभव मात्र सगळ्यांचा एकच आहे.
अशा प्रकारे अस्तित्वात द्वैत नाही. आकार आणि निराकारात द्वैत नाही आणि आकार जरी वेगवेगळे भासत असले तरी त्यातही द्वैत नाही कारण अस्तित्व एक आहे. द्वैत हे बोध नसण्यात आहे.
अस्तित्व एक आहे, आपण स्वतःला व्यक्ती समजतो म्हणून दुसर्यालाही व्यक्ती समजतो आणि त्यातून मृत्यू ही कल्पना निर्माण होते.
संजय
www.sanjayunlimited@yahoo.com
जे जगतो तेच लिहितो!
सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही
समोर : http://sanjaynowhere.blogspot.com/
मृत्यूवरची पोपटपंची.
जन्म आणि मृत्यु या दोनच अशा घटना आहेत की ज्यापासून माणसांना अलिप्त राहता येत नाही. आणि ज्यांच्या बाबतीत ही अंधश्रद्धा आहे असं "अंनिस" वाले पण म्हणू शकत नाहीत.
या सत्य आहेत की आभास आहेत हे सांगणं कठीण आहे. पण समोरची सृष्टी खोटी आहे म्हंटलं तर हेही खोटं म्हणावं लागेल. कितीही जरी विचार करायचा नाही म्हंटलं तरी या दोन
घटनांचा विचार करावाच लागतो. मृत्यू रम्य (अजून तरी असं वर्णन लिहून ठेवलेलं दिसत नाही. जशी सायनाईडची चव अजून कळली नाही , तसं मृत्यू नंतर काय हेही कळल नाही) की
भेडसावणारा , हे ज्या परिस्थितीत माणूस मेला त्यावर अवलंबून असावं. मृत्युवर विनोदही करून झाले आहेत. सध्यातरी माझ्या मते सामान्य माणसाच्या दृष्टीनी अंतिम सत्य म्हणजे
मृत्यू आहे त्यानी बाकीची पोपटपंची कितीही केली तरी.
अरूण कोर्डे.