मित्रमंडळींच्या घोळक्यात एक दिवस असे लक्षात आले की खूप जण पुस्तकावर प्रेम करणारे आहेत. वाचतात. जमेल तशी पुस्तक खरेदी करतात. खूप जणांना स्वतःची पुस्तकं असावी असे वाटते. पण पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर एकदम खूप सारी पुस्तकं खरेदी करायला मध्यमवर्गीय खिसा नको म्हणायचा. वाचनाची ओढ तर स्वस्थ बसू देत नाही. घरात हवे ते पुस्तक हवे तेव्हा हाताशी असणे हे सूख पण वेगळेच ! मग एका सुपिक डोक्यातून एक कल्पना उगवली पुस्तक भिशी.
मराठवाड्यात , पुण्यातही असे गट चालतात असे ऐकून माहीत होते. सुवर्ण भिशी, साड्यांची , भांड्यांची सुद्धा भिशी असते हे पण माहीत होते. आम्ही पुस्तक भिशी सुरू केली.
सुरुवातीला केवळ ६ लोक एकत्र आलो. प्रत्येकी १०० रु. जमा करायचे. मग नावांच्या चिठ्ठ्या करायच्या. एक चिठ्ठी उचलायची. त्यात ज्याचे नाव निघेल त्याने सगळ्या पैशांची फक्त पुस्तकं घ्यायची. स्वतःला हवी ती ! पुस्तकांची मालकी त्याची असली तरी प्रत्येक सदस्याला ती वाचायला मिळावी.
अट एकच, ही पुस्तकं कुठल्याही अभ्यासक्रमाची नकोत. ( कारण ती आपोआप गरज म्हणून घेतली जातात. )
हळूहळू इतर मित्रांनाही यात रस वाटू लागला. भिशीची संख्या वाढली. जमा होणारे पैसे वाढले. एकदम दीड दोन हजारांची पुस्तकं घेणं शक्य होऊ लागलं. प्रत्येकाच्या संग्रहातली पुस्तकं वाढली. आनंद वाढला. कित्येक दिवस मनाच्या कोपर्यात ढकललेल्या पुस्तकांच्या याद्या बाहेर आल्या.
वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा, वेगवेगळ्या आवडीनिवडी असणारा असा हा गट. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीची पुस्तकं जमा होऊ लागली. मग ठरवलं की प्रत्येक वेळी ज्याने पुस्तकं घेतली त्याने किमान एक तरी पुस्तकाचा परिचय करून द्यायचा. त्याचा सर्वांना अजून फायदा झाला. साहित्यातले आपल्याला आवडतात त्यापेक्षा वेगळे प्रकार वाचून बघण्याची मनाची तयारी झाली. वाचनानुभव समृद्ध व्हायला लागला. पुस्तकं अधिक डोळसपणे वाचली जावू लागली. जवळचा पुस्तकसंग्रह अधिक रंगीबेरंगी व्हायला लागला. काही दिवसांनी 'संग्रहात पाहिजेच' अशा स्वतःच्या पुस्तकांची यादी संपली. अगदी नवी, माहीत नसलेली पुस्तके घेण्याचा, प्रयोग म्हणून अगदीच नव्या लेखकाचे पुस्तक घेण्याचा धीर होऊ लागला. अर्थात सगळीकडची पुस्तक परीक्षणं नजरेखाली घालून खरेदी होऊ लागली.
या कार्यक्रमाने अजून एक अमूल्य आनंद दिला. यानिमित्ताने महिन्यातून एकदा सगळे एकत्र भेटू लागलो. रोजच्या कामापेक्षा वेगळ्या विषयांवर बोलू लागलो. चेष्टा मस्करीत विचारांची, बातम्यांची देवाण घेवाण होऊ लागली. सणावाराला एक संदेश किंवा मेल पाठवतानाच आठवण व्हायची.. ते लोक आता प्रत्यक्ष संवादू लागले. अडचणींवर उपाय - मदत हे ओघाने आले. आणि अजून एक म्हणजे एकत्र खादाडी !!!!
खरंच खूप भरभरून दिलं आम्हाला या पुस्तक भिशी ने ! या महिन्यात आम्ही हा उपक्रम सुरू करून चक्क ५ वर्षे झालीत. पण अजूनही त्यातला ताजेपणा तसाच आहे. भरभरून मिळणारा आनंद वाढतोच आहे...
तुम्ही पण सुरु करा ना असा मासिक आनंदोत्सव...
छान उपक्रम
फारच छान उपक्रम! वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचायची संधी यामुळे मिळाली हे सगळ्यात महत्वाचे. नाहीतर नेहमी असा अनुभव येतो की आपले वाचन फक्त ठराविक विषय किंवा साहित्याभोवतीच घुटमळत राहते.
पुस्तकभिशी हा माझ्या दृष्टीने अभिनव उपक्रम (माझ्या ओळखीत कुणीच अशी भिशी चालवत नाही
). पुण्यात परत गेल्यावर काही मित्रांबरोबर चालू करावी म्हणतो. तुमच्या मित्रमंडळींसारखाच प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे....
वा वा..त्या सुपिक डोक्याला
वा वा..त्या सुपिक डोक्याला सलाम..छान उपक्रम..५ वर्षे झाली..ग्रेट
आनंददाया कल्पना.....!!
"....भरभरून मिळणारा आनंद वाढतोच आहे... ....."
सकाळी सकाळीच इतक्या आनंदी आणि उत्साहवर्धक धाग्याच्या वाचनाने मन प्रसन्न होऊन गेले. मी स्वतःला पुस्तकातील किडा समजतो, पुस्तके विकत घेतो, तीन सार्वजनिक ग्रंथालयाचा सदस्य आहे, नेटवरूनही पुस्तके मागवितो.... पण लेखिकेने ओळख करून दिलेली ही "नॉव्हेल" कल्पना कधीही मला वा माझ्या अन्य मित्रांना सुचली नाही. मायाताईंना याबद्दल जितके धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत, इतके महत्वाचे आहे हे पुस्तकप्रेम वाढील लावण्याचे त्यांचे प्रेम ! त्यांच्या सुदैवाने त्यांच्या या आदर्शवत कल्पनेला साथ देणारा ग्रुपही त्यांना मिळाला हे विशेषच, त्यामुळे त्यातील प्रत्येक भिशीसदस्याचे हार्दिक अभिनंदन.
मी जरूर असा क्लब स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आणि लेखिका म्हणतात त्याप्रमाणे महिन्यातून एकदा या निमित्ताने समानधर्मीयांचे एकत्र जमणेही होऊन जाईल.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
पूण्यात ताबडतोब सूरु करुया..
कृपया नवीन धागा सुरू करुन भीडू जमवा ना जरा.. मी पहिला येणार,
माझ्या ओळखिची एक पुस्तक भिशी आहे.. पण ती महिला स्पेशल आहे..
तसे आम्हा 'म्हैलांचे' डोके
तसे आम्हा 'म्हैलांचे' डोके सुपिक अस्तेच म्हणा...
पण आमच्या भिशीत पुरूष जास्त आहेत
करुया की सुरु.. सध्या तुम्ही पुढाकार घ्या.. मी भारतात आले की मी पण येईन...
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
पुस्तक भिशीची कल्पना भारीये.
पुस्तक भिशीची कल्पना भारीये. आवडली.
एकदम मस्त कल्पना आहे ! व ही
एकदम मस्त कल्पना आहे !
व ही योजना ५ वर्ष राबवलेली पाहून हेवा वाटला
अभिनंदन तुम्हा सर्वांचे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
फारच छान..
फारच छान योजना आहे.
माझी पत्नीही अशाच एका योजनेची सभासद झाल्यापासुन तिचे वाचन वाढले आहे.(एकता कपूर ला मात्र वाईट वाटत असावे :greenface ),
माझीही अर्थातच चंगळ झाली आहे.
बिचारी एकता कपूर... मला तर ती
बिचारी एकता कपूर...
मला तर ती शापच देत असेल..
माझ्याकडे टी.व्ही. च नाही.. !!
तुम्ही त्या सगळ्या बायकांचे नवरे एकत्र येऊन सुरू करा नविन भिशी..
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
जबरा !!!!
जबरा !!!!
फारच छान योजना आहे.
मी पुण्यातच असतो. जर आपणापैकी कुणी पुण्यात पुस्तकाची भिशी काढणार असेल, तर भिशीमध्ये मी सामिल होऊ इच्छितो.
मी पण तयार आहे व मी देखील
मी पण तयार आहे व मी देखील पुण्यात आहे.
अजून कोणी आहे का तयार ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मी पण तयार आहे..
मी पण तयार आहे..!
भीशी सुरु करणार असाल तर सांगा...
श्रीवर्धन
वा!! छानच कल्पना राबवलीये
वा!! छानच कल्पना राबवलीये मायातै.. मस्तच!!
झकास कल्पना. आजच बोलतो आमच्या
झकास कल्पना. आजच बोलतो आमच्या गृपमध्ये. सगळे तयार होतील.
मुंबईत कोणी तयार असेल तर सांगा. निदान त्या निमित्ताने आपले दर महिन्यात भेटणेही होइल. पहिला मेंबर मी
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
या धाग्यातच दोन नव्या
या धाग्यातच दोन नव्या पुस्तकभिशी निर्माण होत आहेत...
वाचू आनंदे... वाचू आनंदे...
मी पुण्यात आल्यावर अजून एका पु. भि. त यायला उत्सुक आहे.
अवांतर.. मला ' भिशी' या शब्दाची व्युत्पत्ती कुणी सांगेल का प्लीज ??? खरंच !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
ये लवकर.. ! >>भिशी शक्यतो
ये लवकर.. !
>>भिशी
शक्यतो भिक्षा ह्या शब्दाशी संबधीत असावा, हा माझा असाच अंदाज आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
भिशी.....!
>>भिशी
शक्यतो भिक्षा ह्या शब्दाशी संबधीत असावा, हा माझा असाच अंदाज आहे.
नाही....."भिशी" चा भिक्षेशी काही संबंध नाही. "भिशी"चा अर्थ आहे : "साठा" (स्टोअर). याला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रांतात "साटपा" असेही म्हणतात. ही पध्द्त दिवसभराच्या बोलीने घेतलेल्या मजुरांमधील आहे. म्हणजे जो शेतमालक मजूर टोळीला कामासाठी आणेल त्यांच्या मुखीयाला ठराविक रक्कम तर देत असे पण सांजवेळेला सर्व मजुरांना मिळून कच्चा शीधा (तांदुळ, ज्वारी, बाजरी, तेल, चटणी आदी...) देत असे. गावातील वेगवेगळ्या ठिकाणी कामे करून संध्याकाळी एकत्र आलेले हे मजूर जमा झालेल्या शिध्याचा "साठा" करत.... तीच "भिशी"... मग मुखिया दहा दहा जणाच्या एका गटाला किती शीधा लागेल या हिशोबाने त्याचे वाटप करी.
आता या नामाच्या व्युत्पतीबाबत मात्र विविध भागात वेगवेगळ्या समजुती असतील.
पाहतो... (चांगली शंका आहे, मायाताईंची...)
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
ह्म्म्म असे असु शकेल मी पण
ह्म्म्म असे असु शकेल मी पण शोध घेतो...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मायातै , एकदम अभिनव कल्पना,
मायातै , एकदम अभिनव कल्पना, आवडली!
पुष्करिणी
बायकांचा चिटफंड असावे.
भिशी हा शब्द बायकांचा चिटफंड चे लघुरूप (म्हणजे मराठीत शॉर्टफॉर्म हो ! सगळे मराठीत सांगावे लागते पहा तुम्हाला.) असावे. "बी. सी."
पुढे त्याचा अपभ्रंश होऊन भिशी शब्द तयार झाला असावा.
यानिमित्ताने बायका एकमेकांत मिसळतात उखाळ्यापाखाळ्या / खादाडी चा मजा घेतात. पण पुस्तक भिशी हा खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे.
यानिमित्ताने बायका एकमेकांत
यानिमित्ताने बायका एकमेकांत मिसळतात उखाळ्यापाखाळ्या / खादाडी चा मजा घेतात. <<
पुस्तकभिशीत हे होत नाही असे वाटले की काय तुम्हाला
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
उत्तम उपक्रम!!
उत्तम उपक्रम!!
मस्त
मस्त उपक्रम........पुण्यातल्या भिशीत मी येईनच
भिशीचा उगम....!!!
सापडला.... सापडला.... "भिशी" चा उगम सापडला....!!
वर जो मजूरांचा "साठ्या" चा संदर्भ दिला आहे, त्याच्या अनुषंगानेच ही पुढील ज्यादाची माहिती....
...... तिथे व्यवहार झाला तो भुसारी मालाचा.... तांदुळ, ज्वारी, बाजरी अशा भक्कम साठा वाटपाचा. पण मजुर काय वा अन्य पांढरपेशे काय, अन्न शिजविण्यासाठी "किराणा" देखील कमीअधिक प्रमाणात लागतोच. त्यासाठी गावातील दुकानदाराला रोखीने पैसे देणे भाग असते. आता असा रोखीचा पैसा त्या मजूर टोळीच्या मुखीयाकडे. मग हा प्रमुख एकेक कुटुंबाला साधारण्तः किती "रोकड" द्यावी लागेल याचा अंदाज घेई व त्याच्याकडे असलेल्या कामाच्या हिशोबानुसार त्यातील काही हिस्सा (इथे वाटा...) त्या मजूर कुटुंबाला देई. समजा एका सहा लोकांच्या कुटुंबाची त्या आठवड्याची मजुरीची रक्कम १००/- रुपये होत असेल तर मुखीया त्याना २५ रुपये देईल व उरलेले ७५/- आपल्याकडे "सुरक्षा ठेव" रितीनुसार ठेवेल. यात तक्रार करायला जागा नसायचीच कारण या मजूरांना बँका, पतसंस्था अशी काही ठिकाणे असतात याची जाणीव अर्थातच नसते. मग राहता राहिला विश्वास, जो त्यांना कामे मिळवून देणार्या मुखीयावर ठेवावाच लागतो.
......आणि हा विश्वास म्हणजेच "भिस्त".....किंवा "भरवसा' ! या कुटुंबाचा एखादा घटक पैशासाठी त्या प्रमुखाकडे तगादा लावू लागला की तो प्रमुख त्याला सांगे, "आता नाहीत माझ्याकडे, पुढ्च्या आठवड्यात बघू.... माझ्यावर भिस्त हाय नव्हं?" ~~ ही "भिस्त" म्हणजेच पुढी जिचा "भिशी" त अपभ्रंश होत गेला ते प्रकरण ! दहाजणांनी एकत्र येऊन त्यातील एकावर "भिस्त" ठेवायची आणि या एकाने क्रमाक्रमाने ते पैसे, तो व्यवहार "भिस्तीने" (भिशीने...) दरमहा पूर्ण करायचा.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
वा ! धन्यवाद साहेब उगम
वा !
धन्यवाद साहेब उगम शोधल्या बदल
आवडले.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
खुप छान माहिती आहे
खुप छान माहिती आहे.
धन्यवाद..!
श्रीवर्धन
धन्यवाद इस्किलार
धन्यवाद इस्किलार
तुम्ही प्रयत्नपूर्वक शब्दाचे मूळ शोधलेत.. आभारी आहे.
पण तुमच्या खुलाशाने समाधान झाले नाही. काहीतरी कमी राहिली आहे असं वाटतंय..
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
वा..
पुस्तक भिशीची कल्पना आवडली,
स्वाती
मला वाटते भिशि म्हणजे बेसिक
मला वाटते भिशि म्हणजे बेसिक कलेक्शन किंवा बेसिक कांपोनंट असेल. कारण तुम्हाला भाग घ्याचा असेल तर
महिना काही रक्कम भरावी लागते. हा बी.सी. चा अपभ्रंश असावा.
हे अगदी पटण्यासारखे आहे..
हे अगदी पटण्यासारखे आहे..
काही जण भिशी ला बी सी पण म्हणतातच की..
खूप खूप आभार.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
ह्म्म्म !! चला भिशी कधी सुरू
ह्म्म्म !!
चला भिशी कधी सुरू होतेय??
असच चालु ठेवु.
मी ५ वर्षांपासून माया ताइ सोबत या उपक्रमाचा एक सदस्य आहे. आणि मला त्याचा अभिमान आहे.
माझी पुस्तक वाचण्याची आवड वृद्धिंगत झाली .
वैभव, तुम्हाला इथे बघुन आम्ही
वैभव,
तुम्हाला इथे बघुन आम्ही धन्य झालो
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥