माझं इंदूर आख्यान - पुस्तक

0
0

नोकरीच्या निमित्ताने २००७ च्या मे महिन्यात नाशिकचं बस्तान आवरून इंदूरला आलो तेव्हा या शहराविषयी फारशी माहिती नव्हती. होळकरांचे, खाण्या-पिण्याची चंगळ असलेलं शहर इतकीच काय ती ओळख मनात होती. पण या पलीकडे जाऊनही इंदूर आणि परिसर आहे, हे पुढच्या तीन-साडेतीन वर्षाच्या काळात कळाले. हिंदीवगुंठीत शहराच्या आत सुखनैव नांदणारी मराठी संस्कृतीही जवळून पहायला मिळाली.

मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची सोनेरी पाने या शहरापासून पुढे उत्तरेपर्यंत लिहिली गेली. ती पानेही या काळात फडफडवत पाहिली. इथली भाषा अनुभवली, अभ्यासली. इथली संस्कृतीही अभ्यासली. भाषा आणि संस्कृती टिकवण्याचा मराठी जनांचा सार्थ अट्टाहासही खूप जवळून पाहिला.

हे सगळे खूप भावले. आपल्या इथल्या सगळ्या जगण्याला शब्द द्यावा, असे मनापासून वाटले. म्हणूनच अनेक विषयांवर मुक्तपणे शाई सांडली. एका महाराष्ट्रवासियाच्या नजरेतून टिपलेले इंदूर आख्यान तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा.

{प्रस्तावना मस्त ! पुस्तक कुठे}

1

प्रस्तावना मस्त ! पुस्तक कुठे आहे?? उत्सुकता आहे.


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{वर दिलेल्या लिंक्स ही पुस्तकातील प्रकरणे आहेत. (नावेखालीलप्रमाणे}

2

इये इंदुर नगरी
खवय्यांचं इंदूर
खास इंदुरी पाणीपुरी
भाषा इंदूरी
माझ्या हिंदीचा बोलु कवतिके
माय, मावशी नि माझी लेक!
इंदूरकरांचे संस्कृती जतन
सावध ऐका (मागल्या) हाका!
भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास
एक वर्तुळ पूर्ण झालं
सारे प्रवासी गाडीचे
वाहतुकीची 'यातायात'


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

{ह्म्म आत्ता दिसतंय.. हे काम}

3

ह्म्म आत्ता दिसतंय.. हे काम मघाशी चालू असावं.. प्रस्तावनाच दिसत होती फक्त.. वाचते आता..


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{छान}

4

छान हास्य

{छान. पुस्तक वाचतो आहे. पूर्ण}

5

छान. पुस्तक वाचतो आहे. पूर्ण वाचून परत प्रतिसाद देईन.


-पुण्याचे पेशवे

{उत्तम पुस्तक... एकदम चटपटा...}

6

उत्तम पुस्तक... एकदम चटपटा... सलग वाचायला मजा आली.

धन्यवाद भोचकभैय्या ! मजा आला. Big smile


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{सगळे भाग पुन्हा वाचले}

7

सगळे भाग पुन्हा वाचले !
नेहमीसारखचं आनंद देऊन गेले लेखन.


Hope is a good thing...

{छान लेखन }

8

सगळे भाग वाचले
नेहमीसारखचं छान लेखन
पवन शिन्दे

{झकास!}

9

ह्या धाग्याची वाचनखूण साठवली आहे. इंदूरला यायचं आहेच, पण तोवर हे भाग पुन्हा वाचून काढतो.

{नंद्या,तू ये रे इंदौरला..}

10

नंद्या,
तू ये रे इंदौरला.. तुझं छप्पन दुकानचं खाणं आपल्याकडं लागलं. wink

-पेशवे
पेशव्यांची कोठी, टिळकनगर, इंदौर


-पुण्याचे पेशवे

{इंदुरविषयी सांगोपांग माहिती}

11

इंदुरविषयी सांगोपांग माहिती मिळाल्याने कुतूहल चाळवते.
त्याबद्दल अभिनय कुलकर्णीँचे अभिनंदन!


*****

{इंदुरविषयी सांगोपांग माहिती}

12

इंदुरविषयी सांगोपांग माहिती मिळाल्याने सगळे लेख वाचले.
छान लिहले आहे.


करतो. करेन. व करेगें

{उत्तम पुस्तक...}

13

उत्तम पुस्तक...

{:(}

14

1


Hope is a good thing...

{आजची वाईट बातमी वाचल्यावर हे लिखाण जास्तच हृदयाला भिडेल! }

15

या लेखमालेचे अस्तित्व आजच कळले! आणि आजच त्यांच्याबद्दलची वाईट बातमी वाचली!! आता तर हे लिखाण हृदयाला जास्तच भिडेल! लवकरात लवकर वाचायचा निर्धार केला आहे.


सुधीर काळे
------------------------