कविता/ गाण्यातला भावलेला विचार/कल्पना

0
0

अनेक वेळा एखादं गाणं ऐकताना एखादी ओळ, विचार, त्यातली कल्पना मनाला भिडते आणि आपल्या तोंडुन अहाहा, क्या बात! अस नकळत बाहेर पडत. इथे तुम्हाला भावलेल्या कल्पना, विचार लिहा.

Unless it is required, कॄपया अख्खी कविता लिहु नका. तो विचार का आवडला ते ही लिहा. तुम्हाला वेगळा अर्थ समजला असेल तर तो (पाल्हाळीक न लावता ) लिहा

लाट आणि किनाऱ्याच किती वेगळं

1

लाट आणि किनाऱ्याच
किती वेगळं प्रेम असत
आतुर मनाने लाटेने
किनार्याकडे धावत जाणं
विशाल अंतःकरणाने
किनार्याने लाटेला मिठीत घेणं
किनारा भेटताच लाटेच
स्व-अस्तित्व विसरणं
यातील लाट म्हणजे तू
आणि किनारा म्हणजे
मीच......... नाही का?

सागर आणि सरितेच
तेवढच वेगळं प्रेम असत
उगमापासून सरितेच मन
सागराकडे धाव घेत
उंच डोंगर दर्याचे
सारे अडथळे झुगारून
अडचणींचे बांध तोडून
सागराला नक्की भेटायचं
शांत , संयमी मनाने सागराने
सरितेला बहुत घेणं
अल्लड ,अवखळ सरितेच
खळखळून सागराशी एकरूप होण
यातील सरिता म्हणजे तू
आणि सागर म्हणजे
मीच......... नाही का?

>>>नवनाथ शेलार यान्चि हि कविता सहिच आहे...काय उपमा...भारिच अहे...

मस्त धागा गं प्रीमो मला

2

मस्त धागा गं प्रीमो हास्य

मला आत्ता पाडगावकरांची कविता आठवतेय..

जरि तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातिल इवले उमलणार तरीही नाही
जिंकील मला दवबिंदू;जिकील तृणाचे पाते
अन स्वतःस विसरून वारा जोडील रेशमी नाते...


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

आज उदास उदास दूर पांगल्या

3

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना
असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी

ना. धो. महानोर यांच गीत, लता मंगेशकर यांचा अपूर्व आवाज आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच संगीत क्या कहने ......................

मला आवडलेले गाणे.. हे सुरांनो

4

मला आवडलेले गाणे..

हे सुरांनो चंद्र व्हा आ आ आ...
चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा..

आग्ग्ग्गायायायाया... काय आठवण

5

आग्ग्ग्गायायायाया... काय आठवण काढलिये.. चला आज दिवसभर अभिषेकीबुवाच..

तो बोल मंद हळवासा आयुष्य

6

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणु अंगी राघवशेला

ग्रेसःलता:हृदयनाथ


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

हे अख्खं गाणंच अप्रतिम आहे!!

7

हे अख्खं गाणंच अप्रतिम आहे!! प्रीमो यांनी म्हटलंय खरं की अख्खी कविता/गाणं नका देऊ पण मायातै तू आता या गाण्याची आठवण करून दिल्यावर मोह आवरत नाही..

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनि गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगि राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

यमन राग, ग्रेसांचे शब्द, बाळासाहेबांचं संगीत आणि दीदीचा आवाज! अहाहा!!
एखादी रम्य संध्याकाळ, अंधार-उजेडाचा लपंडाव, हलकीशी पावसाची सर, हातात वाफाळत्या कॉफीचा मग आणि मंद स्वरात हे गाणं.. सुख सुख म्हणतात ते हेच!!

सुन्या सुन्या...

8

उंबरठा मधिल सुरेश भटांचि "सुन्या सुन्या..." हि रचना मला खुप आवडते. विशेषतः हि दोन कडवि

कळे न मि पाहते कुणाला, कळे न हा चेहरा कोणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसु आरश्यात आहे

सख्या तुला भेटतिल माझे, तुझ्या घरि सुर ओळखिचे
उभा तुझ्या अंगणि स्वरांचा, अबोल हा पारिजात आहे

त्याच चित्रपटातिल "गंजल्या ओठास माझ्या" हि सुद्धा अप्रतिम मराठि गझल आहे.


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

या नभाने या भुईला दान

9

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

या नाभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

ना.धो. महानोर हास्य


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

देखणे ते चेहरे

10

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे
तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा
वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती
देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया
लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

बा. भ. बोरकर.


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

फलक , ए काश! हमको ख़ाक ही रखता

11

फलक , ए काश! हमको ख़ाक ही रखता , की उस में हम
गुबार -ए -राह होते या किसी की ख़ाक -ए -पा होते

>>> गुलजार साहेबांची अप्रतिम रचना............
>>>कवी म्हणतोय तो धूळ असता तर किती चांगल झालं असत......किमान तिची पायधूळ जालो असतो

नज़्म उलझी हुई है सीने

12

नज़्म उलझी हुई है सीने में
मिसरे अटके हुए हैं होठों पर
उड़ते-फिरते हैं तितलियों की तरह
लफ़्ज़ काग़ज़ पे बैठते ही नहीं
कब से बैठा हूँ मैं जानम
सादे काग़ज़ पे लिखके नाम तेरा
बस तेरा नाम ही मुकम्मल है
इससे बहतर भी नज़्म क्या होगी

>>>>>>सादे काग़ज़ पे लिखके नाम तेरा
बस तेरा नाम ही मुकम्मल है
इससे बहतर भी नज़्म क्या होगी>>>>>

हि कल्पना मस्तच आहे ...किंबहुना सत्यच असाव......गुलजार साहेबांची अप्रतिम रचना

तरल भावनांचे साधे, सोप्पे शब्द पण अप्रतिम कल्पना,

13

हे तुला कसे कळेल
कोण एकटे जळेल
सांग कां कधी खरेच
एकटा जळे पतंग
राजसा किती दिसांत
लाभला निवांत वास

.. सुरेश भट

लै भारी........काळे

14

लै भारी........काळे साहेब...अशाच भारि कविता येउदेत...... Party

कैसे सुकून पाऊँ , तुझे

15

कैसे सुकून पाऊँ , तुझे देखने के बाद ,
अब क्या ग़ज़ल सुनाऊँ , तुझे देखने के बाद .

तेरी निगाह -ऐ-मस्त ने मखमूर कर दिया ,
क्या मैकदे को जाओ ,तुझे देखने के बाद .

नज़रों में तबेदीद ही बाकि नहीं रही,
किससे नज़र मिलाऊँ, तुझे देखने के बाद .

काबे का एहतेराम भी मेरी नज़र में है ,
सर किस तरफ झुकाऊँ , तुझे देखने के बाद .
>>>

माझ्याकडे शब्दच नाहीयेत...एखाद्या पेमिकाच्या भावना इतक्या छान अनि सहज मांड्लेल्या मी नाही पहिल्या..........

+१

16

+१


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१००

17

+१००

अजून काही

18

१. आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का?
उमलण्याचे सुख फिरूनि या फुला सोसेल का?
नित नवी मरणे मराया जन्म तू मागू नको

२. यूं हसरतों के दाग

घरसे चले थे हम तो, खुशी की तलाश में
गम राहमें खडे थे, वोही साथ हो लिए

३. बगळ्यांची माळ फुले

हातांसह सोन्याची सांज गुंफताना,
बगळ्यांचे शुभ्र तळे मिळुनि मोजताना,
कमळापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात

४. अशी पाखरे येती

हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समईमधुनी,अजून जळती वाती

५. जाहल्या काही चुका अन्

संपता पूजा स्वरांची हात तू देशील का?
दाटुनी काळोख येता तू घरी नेशील का?
पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले

६. तोच चंद्रमा नभात

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे
मीही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे
ती न आर्तता उरांत, स्वप्न ते न लोचनी

७. चलो इक बार फिरसे अजनबी बन जाएं

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुंकिन
उसे इक खुबसूरत मोड देकर छोडना अच्छा

८. हमने देखी हैं उन आखों की

सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो

एक से बढकर एक! व्वा!

19

एक से बढकर एक! व्वा!

वा !

20

वा !

भातुकलीच्या खेळामधली .. हे असच एक अप्रतिम गाणं

21

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी

राजा वदला मला समजली, शब्दावाचून भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा
का राणीच्या डोळा तेव्हा दाटूनी आले पाणी

राणी वदली बघत एकटक, दूरदूरचा तारा
उद्या पहाटे, दुसरा वाहता, दुज्या गावचा वारा
पण राजाला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी

तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे
का दैवाने फुलण्याआधी, फुल असे तोडावे
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी

का राणीने मिटले डोळे, दूरदूर जाताना
का राजाचा श्वास कोंडला, गीत तिचे गाताना
वार्‍यावरती विरुन गेली, एक उदास विराणी

हा खेळ सावल्यांचा चित्रपटातलं

22

हा खेळ सावल्यांचा चित्रपटातलं "आला आला वारा"
या गाण्याचं पहिलच कडवं.
सुधीर मोघ्यांच्या प्रतिभेला वंदन!!!

नव्या नवतीचं बाई लकाकतं रुप
माखलं ग उन जनु हलदीचा लेप
ओठी हासु पापणीत आसवांचा झरा

माझी आवडती कविता - कोमेजून

23

माझी आवडती कविता -

कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला....

त्यातलं हे कडवं तर फार टचिंग -

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
एका घरा राहुनिया मनामध्ये घोर,
तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं?
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये

कवी : संदिप खरे
अल्बम : दमलेल्या बाबाची कहाणी

मला आवडलेली हि एक कविता ( त्यातील तीन कडवी )

24

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा...
या नितळ उतरणीवरती

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा...

कवी - ग्रेस

आणखी काही घ्या!

25

१. काटा रुते कुणाला
हा स्नेह वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनि मी रिक्तहस्त आहे

२. आनंदवनभुवनी
उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया,
जपतप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी

३. अलवार तुझी चाहूल, का धडधडते हे ऊर
घन वादळवार्‍यातून मी जपले सारे सूर,
कोंदणात आनंदाच्या लपविले असे काहूर

४. कळा या लागल्या जीवा
उरी या हात ठेवोनि उरीचा शूल का जाई,
समुद्री चौकडे पाणी पिण्याला थेंबही नाही

५. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती
यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर,
घडिले मानवतेचे मंदिर,
परी जयांच्या दहनभूमिवर,
नाहि चिरा नाही पणती

६. सांज ये गोकुळी
माऊली सांज अंधार पान्हा,
विश्व सारे जणू होय कान्हा,
मंद वार्‍यावरि वाहते बासरी,
अमृताच्या जणू ओंजळी

७. झटकून टाक जीवा
पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे,
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे,
हसुनि करी परि ते वर्षाव सौरभाचा

सध्या इतकीच. हळूहळू देतो आणखी! हास्य

जबरा !

26

जबरा !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

घ्या आणखी काही

27

राज्या अरे थोडी वाट बघायची होतीस. असो. आणखी काही 'मला आवडलेल्या कल्पना' इथं देतो.

८. जय जय गौरीशंकर
शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी
त्रिगुणाची ही तीनच पाती चराचरातुनि निनादति

(हे गाणे कुणाकडे असल्यास कृपया मला द्यावे. धन्यवाद!)

९. एकवार पंखावरुनि
वने, माळराने, राई, ठायी ठायी केले स्नेही
तुझ्याविना नव्हते कोणी आत अंतरात

१०. गेले द्यायचे राहुनि
खरंतर अख्खं गाणंच. पण विशेषतः
आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला,
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा

११. माझ्या गोव्याच्या भूमीत - पुन्हा, अख्खी कविताच खरंतर पण विशेषतः

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे,
कड्याकपारींमधुनी घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात

१२. गायिली गाणी तुझी

केतकी कांती तुझी झळके अशी की
लाविली तुजला जणू मेंदी वीजांनी
गायिली गाणी तुझी सार्‍या फुलांनी
रात्रभर जागून जी लिहिली कळ्यांनी

मस्त.............

28

मस्त.............

मज सांग सखे तु सांग मला

29

मज सांग सखे तु सांग मला ""
पत्रात लिहु मी काय तुला ""

अजुन काही निगाहें मिलाने को

30

अजुन काही
निगाहें मिलाने को जी चाहता है

किसीके मनाने मे लज्जत वो पाई
की फिर रूठ जाने को जी चाहता है

शून्यात गर्गरे झाड तशी

31

शून्यात गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद
तुझा की वैरी

वार्‍याने हलते पान
तसे सुनसान
हृदय गहिवरले


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

जपत जपत फुटकी कळशी जपायची उरी

32

जपत जपत फुटकी कळशी
जपायची उरी युगांची असोशी
जोवरी सुचते पावसाचे गाणे
हिरमुसवाणे व्हावयाचे नाही
थकायचे नाही थांबायचे नाही
प्राक्तनावरती रुसायचे नाही...
- संदीप खरे

घन तमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी...
- पाडगांवकर


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

कोलंबसाचे गर्वगीत - आठवतंय तसं..

33

कोलंबसाचं गर्वगीत. दहावीला होतं अभ्यासक्रमात. काव्यवाचनाच्या स्पर्धेत ८०% मुलांनी हीच कविता वाचलेली!
अगदी मनात घर करून राहिलेली कविता! आता आठवेल तशी लिहितो!

हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या, समुद्रा डळमळू दे तारे,
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशून मातु दे दैत्य नभामधले दडू दे पाताळी सविता,
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती, करी हे तांडव थैमान

पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभ माथ्यावरती,
आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नि, नाविका ना कुठली भीती

यापुढची कडवी आठवत नाहीत. शेवटचं आठवतं.

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला,
अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!

मधल्या कडव्यांमध्ये धन, दारा, कारा असे उल्लेख पुसटसे आठवतात. कुणाला ही कडवी माहिती असल्यास द्यावीत इथं. एका ब्लॉगवर आहे कविता ही पण हापिसात ब्लॉगस्पॉट ब्लॉक्ड असल्याने बघता येत नाहीये. Sad

हे घे मेवे

34

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

लै भारी!

35

लै भारी! हास्य

माझ्या आवडत्या कविता / गाणी

36

१)मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो , घुमतो शिळ वाजवतो

२) भोली भाली लडकी ,खोल तेरे दिलकी प्यार वाली खडकी Shy Puzzled Laughing out loud


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

>>> भोली भाली लडकी ,खोल तेरे

37

>>> भोली भाली लडकी ,खोल तेरे दिलकी प्यार वाली खडकी Crazy Crazy

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥