ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग १

0
0

पर्शिया ह्या शब्दाशी माझा संबंध याआधी फक्त दोन वेळा आला होता, पर्शियन मांजर आणि प्रिन्स ऑफ पर्शिया हा संगणक खेळ. त्यावेळी अजिबात वाटले नव्हते कि या नावाचा देश अस्तित्वात असू शकेल.
काही दिवसांपूर्वी ईराणला प्रवचन देण्याची सुपारी आल्यावर गडबडलो.. ईराण विशयी माझ्या ईष्ट (आणि अनिष्टही) मित्रांकडुन बरेच ऐकुन होतो, त्यावरून ह देश म्हणजे अगदिच हा.. आहे आसे वाटले होते.

आता हा देश जगाच्या पाठिवर कुठे आहे ते शोधण्यापासून सुरूवात, आता सुपारी घेतलिये म्हणल्यावर वि़ज़ा वगैरे लफडि आली,तो घेउन.(ईराणी विज़ा विषयी नंतर कधितरी सांगेन) राजधानी तेहरान मधे उतरलो (तिकिट मिळे पर्यन्त मी ईराणची राजधानी पर्शिया समजत होतो.) फक्त रात्री २ वाजता.(चाल - गावडेवाडीचा पत्ता, वार्‍यावरची वरात)
ईमाम खोमेनी (हा ईसम जिवन्त आहे का हो? thinking ) विमानतळावर असंख्य प्रश्नांनी वेढलेल्या अवस्थेत उतरलो (त्यातील पोटापाण्याचा प्रश्न जास्त जहाल) आणि माझ्या स्वागतला येणार असलेल्या चालकाला शोधु लागलो (हा आणखी एक प्रश्न, कारण आमचे अ‍ॅडमिनमामा, प्रत्येक शहरात तुम्हाला अगदि वाजतगाजत न्यायचि सोय केली आहे असे तोंड भरुन आश्वासन देतात (त्याच्या बापाचे काय जातय,प्रत्यक्षात लीफ्ट मागुन हॉटेल शोधायला जावे लागते))
त्या बिचारया चालकाने हातात नामफलक धरलेला असुनही मी येडबंबुसारखा त्याच्याकडे न बघता सगळा एअरपोर्ट शोधुन काढला. शेवटी तोच कीव येउन सामोरा आला( जीव भांड्यात पडल्याचा आवाज येतो का हो. thinking ) आणी त्यानंतर आमचा संवाद असा.. फक्त रात्री २ वाजता

मी: फ्रॉम अबकड कंपनि?
चालक: सालाम (सलाम चा ईतका गोड उच्चार नवीन होता)(च्यायची.. हा अवसर्ग कसा देतात.)
मी: आय अ‍ॅम फ्रॉम पफबभ कंपनी
चालक: सालाम
मी: बोंबला
चालक: हॉटेल?
मी: आर वी गोइन्ग स्ट्रैट टू द हॉटेल?
चालक:... क ख ग ची अगम्य भाषा (ऐकायला चांगल वाटत होते पण त्याने पोट भरत असते तर नोकरी कशाला केली असती)
मी: हॉटेल? हॉटेल? Angry
चालक: हॉठेल
मी: विल आय बि एबल टू ऑर्डर माय डीनर अ‍ॅट धिस अवर?
चालक: क ख ग.. (स्वगत : आयला हे अवघडच होत चाल्लाय)
मी: फूड, डीनर, ईट.. (हातवारे पण करून सम्पले thinking )
चालक: क ख ग.. (आणी तो माझी बॅग उचलून चालायला लागला, मी संपलोच )
मी: ईग्लिश?
चालक: नो ईन्ग्लिश.. पर्शियन?
मी: झक मारली अन विचारले ह्याला. (पोटाचा प्रश्न बिकट होत चाल्लाय)
चालक: हॉटेल (गपगुमान गाडीत जाउन बसलो,आणी गार वारं अंगावर घेत, थंड डोक्याने जेवण मिळवण्याचा कट रचायला लागलो )
मी: यू? तेहेरान?
चालक:... ( होकारार्थी काहितरी अगम्य )
मी: आय अ‍ॅम फ्रॉम ईंडीया.. ईंडीया..
चालक: ईंडीया.. ईंडीया.. हीदुस्थान? हीदुस्थान? ( हे त्याच्याच शब्दात) (त्याला अत्यानंद, माझा गोंधळ)
मी: येस हीदुस्थान (हुश्श्श्श्श्श्श्श्श)
चालक: सेंटर ईंडीया डेल्लि न्यु..? (त्याने हे ३ वेळा विचारले, बहुतेक माझी परीक्षा घेत असावा. नन्तर उजेड पडला - भारताची राजधानी नवी दिल्ली )
मी: येस येस.. सेंटर ईंडीया डेल्लि न्युच (संवाद तर होतोय ना..)
चालक: हीदुस्थान.. मूव्हि.. आमीताब बाछ्छान.. (युरेका युरेका .. मी सिटवरून केवळ सिटबेल्टमुळे पडतापडता वाचलो)
मी: येस येस आमीताब बाछ्छान.. मुव्हिज..

आणी त्यानंतर त्या चालकाने माझे हॉटेल शोधून देउन, त्या हॉटेलच्या मॅनेजरला माझ्या जेवणाविषयी सांगुन, मला जेवताना आग्रह करुन, मला रूममधे सोडुन, सकाळी लवकर न्यायला येतो हे सांगून बिचारा रात्री ३:४५ ला मार्गाला लागला (मला सारखी शंका येत होती की हा मलाच अमिताभ समजला का काय?)

क्रमशः

पुढचा भाग - ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग २

खूपच रंजक आणि रोचक सुरुवात

1

खूपच रंजक आणि रोचक सुरुवात !
मस्त !


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

फारच छान! पण काहीही म्हणा

2

फारच छान!

पण काहीही म्हणा अमिताभ बच्चन च्या फारच प्रेमात असतात बाहेरचे लोक्...माझा एक इराकी मित्र अमिताभाबा असं काहीस म्हणतो आणि त्याच्या देशातल्या वर्तमान्पत्रात अमिताभ ची रोज एकतरी बातमी असतेच म्हणे!

* ...पायरेटेड डीव्हीडी असली तरी अमिताभच्या लुक्स मधे इतका फरक पडत नसावा ..हं घ्या हास्य


पुष्करिणी

मी एकदा एअर-पोर्‍त वरुन घरी

3

मी एकदा एअर-पोर्‍त वरुन घरी जात असताना मला गुलाबी रन्गाची टॅ़क्सि सुदानी बाइ ड्राइव्हर अस्लेली दिली गेली. मला गाडित पुढे बसायची आवड असल्याने ति डिकित सामान टाकेस्तोवर मी तिच्या बाजुच्या सिटवर जाउन बसले. माझ्या एकंदर पर्सनॅलिटिवरुन तिला मी साधी व बोलकी व्यक्ती वाटले. तिला मी कुठुन आले काय करते कोण कोण बरोबर राहाते ह्यात इन्त्रेस्ट दिसला. मी तिला सगळी माहिती पुरवल्यावर मि मुबै होउन आले हे आइकुन तिला आनंद झाला. तिला आमिताब बेच्चन खुप आवडत होता. तिला अ‍ॅश पण माहिती होती. पण तिला अ‍ॅश अमिताभ ची सुन आहे ही अ‍ॅडीशनल माहिती मी पुरवली. तिला शोले सुध्हा माहित होता.

>>अ‍ॅश सारखा सारखा सिगरेटच्या

4

>>अ‍ॅश

सारखा सारखा सिगरेटच्या अ‍ॅशचा विचार येत होता डोक्यात Laughing out loud

ती पण तशीच म्हणा..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कृपया मार्गदर्शन करावे

5

ज्येष्ठ सदस्यांनी कृपया मार्गदर्शन करावे.
याच्यापुढील भाग टाकण्यासाठी हाच लेख पुनर्संपादित करता येइल का? की नवा भाग २ लिहावा लागेल?
एकदा प्रकाशीत केल्यावर दुरुस्ती करता येते का?

कृपाभीलाशि अर्धवट.

मस्त लिहिताय. येऊद्या अजून.

6

मस्त लिहिताय.
येऊद्या अजून.


- प्राजु

कंसाची वाक्ये मस्तच

7

कंसाची वाक्ये मस्तच wink

कंसातील वाक्ये म्हणा..

8

कंसातील वाक्ये म्हणा.. अर्धवटराव काय कंसमामा वाटले तुम्हाला? wink

येउ द्या..

9

झकास अनुभव आहेत येउ द्या अजुन पण फार वाट नका पहायला लावू बॉ.

+१

10

+१


__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:

छान

11

वाचतोय!

वाचतो आहे, पुढील भाग टाका..

12

वाचतो आहे, पुढील भाग टाका..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

=)) और भी आने दो !! हे

13

Laughing out loud =)) Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
और भी आने दो !!

हे प्रवचन बगैरै म्हणजे ट्रेनींग का ?

मस्त

14

मस्त

म्हटलं मोहिनी हे

15

हास्य हास्य म्हटलं मोहिनी हे काय..........? आमचं नाव कसं आलं? btw..... पांढऱ्या रंगातला वाचता आलं नाही. Big smile बाकी ते सिन्त्राल इंडिया दिल्ली न्यू .......मस्त!


मोहिनी