त्रुटी

0
0

"काय सर, खुप दिवसांनी भेटताय?" एकदम बिझी का?
हो.
"वयोमानाप्रमाणे जरा सबुरी घ्या की".
बर.
"मुलाचे ग्रॅज्युएशन पुर्ण झाले असेल ना?"
हो.
"कितीचा जॉब मिळाला?"
अजुन मिळायचा आहे.
"क्काय?"
परिक्षा संपुन आताशी महीना तर झाला.
"पण तो यु.डी.सी.टी.मधला ना?"
हो.
"कँपस मधे जॉब मिळाला नाही?"..
जास्त कुणी आले नाहीत.
"क्काय सांगताय? मला तर वाटले की कँपस मधे कमीत कमी पन्नास साठ चा जॉब मिळाला असेल."
वर्षाला का महीन्याला?
"काय चेष्टा करताय सर? युडीसीटीवाल्याला वर्षाला पन्नास?"
शक्यता नाकारता येत नाही.
"कठीण आहे. हीच तर आपल्या शिक्षण प्रणाली ची त्रुटी आहे. मर मर अभ्यास करुन प्रिमियम इन्स्टीट्युटमधे प्रवेश घ्यायचा आणि जॉब नाही?"
चालतय हो. मिळायचा तेंव्हा मिळेल. जेवढा कमी पगाराचा मिळेल तेवढे चांगले.
"काय बोलताय सर, निदान युडीसीटी बद्दल तरी असे बोलु नका".
(आयला रे त्या युडीसीटी च्या)
अहो तुम्ही म्हणताय त्या सर्व पेशवेकालीन गोष्टी. कँपस, प्रिमियम वगैरे. आणि जरा झळ पोचु दे की. पुढे उपयोग होतो.
"मग सध्या काय करतोय?"
इतर सर्व पदवी धारकांसारखे सीव्ही पोस्ट करतोय. बाकी वेळ झोपा काढतोय.
"अरेरे."
त्यात अरेरे करण्यासारखे काय?
"तुम्ही काही हालचाल करताय की नाही".
नाही बॉ.
"कमाल आहे."
त्याच तो बघेल.
"अहो पण पालक म्हणुन काही जबाबदारी?"
हो ना. गाडी दिली की मजा करायला.
"अहो मी ते बोलत नाहीये. जॉब मिळायला काही मदत.?" त्याची जागा त्याने स्वतः शोधायची. खुपच अडल तर मग बघु.
"अडायची वाट का बघताय? जेवढा लवकर मार्गी लागेल तेवढ बरे. पुढचे सग़ळे सुरळीत."
पुढचे?
"लग्न वगैरे..."
म्हणजे तुम्ही कुठली मुलगी सुचवताय की काय?
"आता जॉब नाही म्हणजे बोलणच खुंटले की".
अस म्हणताय. बर बर. आजपासुनच बघायला सुरु करतो. मिळाला की पे पॅकेज लगेच तुम्हाला कळवतो.
हो हो लगेच कळवा.

ह्म्म्म्म अवघड आहे....!

1

ह्म्म्म्म अवघड आहे....!


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कोण होता तो चुत्या.. दोन

2

कोण होता तो चुत्या..
दोन झावडात मारा माझ्यावतीने त्याच्या आणि तो नाही सापडला तर स्वतःच्या मारुन घ्या असला मित्र आहे म्हणुन

नाना, शी काय भाशा ही...

3

नाना, शी काय भाशा ही... तुझ्याकडुन हि अपेक्शा नव्हती.

काका, असेच चालले आहे, काय करणार.

मारो !!!!

4

मारो !!!!

सहमत. भाषेत नाना तु

5

सहमत.

भाषेत नाना तु चुक्या.... Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

लोकाना असे प्रश्न विचारुन काय

6

लोकाना असे प्रश्न विचारुन काय मिळते देवाला माहीत.
मी पण वैतागलो आहे अश्या प्रश्नामुळे सध्या.

+१

7

तुम्हाला माझा मार्ग आवडेल कि नाही माहित नाही... पण माझ्या मते प्रत्येक सोनेरी ढगाला एक रुपेरी किनार असते... ह्या अश्या चौकश्या करणाऱ्या लोकांना पण... Crying

एरवी आपण समोरच्याचा विचार करून खूप गप्प बसतो पण अतीच झाले आणि खूप त्रास होऊ लागला तर आपणही अश्याच लोकांच्या दुखऱ्या नसेवर बरोब्बर बोट ठेवावे...

माझा अनुभव आहे कि हे केल्यावर समोरचा माणूस बरोबर स्वत:चे थोबाड सावरून चालता होतो... पण असे अगदी शेवटी वागावे.. त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारायला शक्यतो जाऊ नये...