
प्रिय मित्रांनो,
आपल्या संस्कृती एवढीच प्राचीन आणि विकसित अशी ग्रीक संस्कृती. त्या भूमीचे दर्शन करण्याची खूप इच्छा होती. अगदी अल्प काळासाठी तिथे जाता आले. अवघ्या ४-५ दिवसांच्या वास्तव्यात ग्रीस जेवढा शक्य होता तेवढा अनुभवला. जे दिसले त्यावर विचार मात्र खूप केला. ते अनुभव आणि मनातल्या विचारांच्या लाटा तुमच्यासोबत वाटून घेत आहे.
केवळ सनावळ्या आणि गणिती आकडे यात मी रमत नाही. माणसं; मग ती प्राचीन असोत की आधुनिक, त्यांच्या जीवनशैलीची ओळख करून घ्यायला जास्त आवडते. प्रत्येक समाजाचा गुणविशेष त्यांच्या भौतिक जीवनशैलीत प्रतिबिंबित झालेला असतो. जुने संदर्भ नव्याशी जोडताना हे जेव्हा जाणवते तो क्षण मौजेचा! असेच काही क्षण मला अथेन्स बघताना सापडले. ते तुमच्या समोर ठेवत आहे.
माझा हा आनंद तुमच्या सोबत वाटता येतोय याचे श्रेय अर्थात ' मी मराठी' ला ! मनःपूर्वक आभार.
माया ज्ञानेश
निळाई...!!
तुम्ही लिहिताना तो आनंद अनुभवला तो आम्हीदेखील तुमच्या भाषाशैलीत आणि त्या मनमोहक फोटोंमधुन अनुभवला. विशेषतः त्या "निळाई" ने तर वेड लागल्यासारखे झाले. ज्यावेळी ती चित्रे मी पहात होतो, नेमका त्यावेळी इकडच्या वाढत्या उन्हाच्या आणि उकाड्याच्या बातम्या वाचत होतो...त्यामुळे तर त्या निळ्याशार पाण्याने डोळे निवून गेले.....!!
धन्यवाद....एका सुंदर अनुभव वृत्तांताबद्दल !!
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
असेच म्हणतो. एक सर्वांग सुंदर
असेच म्हणतो.
एक सर्वांग सुंदर असे ई-पुस्तक मीमवर आले हे पाहून आनंद झाला.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धन्यवाद माया
धन्यवाद माया
आवडले. सर्व भाग सुंदर झाले
आवडले. सर्व भाग सुंदर झाले आहेत, फोटो देखील अप्रतिम.