भिगवण भटकंती भाग १

0
0

माझा नांदुरमध्यमेश्वरचा विचका+पचका झाल्यावर ईरेला पेटुन भिगवणची मोहीम हाती घेतली. नेटवर बसुन नेटाने सगळी माहीती घेतली. तसच काही मित्रांशी सल्ला मसलत पण केली. (भिगवणला देखिल एक धराणावरच बॅक वॉटरच पाणी साठुन झालेल मोठ तळ आहे व तिथे खुप पानपक्षी येतात.) अचानक ३० जानेवारी २०१०, शनिवारी अनपेक्शीत रीत्या ४.३० वाजताच घरी यायला मिळाल आणि भिगवणचे विचार उफ़ाळुन आले. संध्या.५ /५.१५ च्या सुमारास घरुन एस.टी. स्टँडला फ़ोन लावला आणि माझ्या नेहमीच्या हुकमी चाली खेळलो.
ट्रींगट्रींग...........ट्रींगट्रींग..........ट्रींग..........ट्रींग........ट्रींगट्रींग
समोरुन = हॆलो .वंदना डेपो
मी = जयहिंद , वागळे पोलिस स्टेशन कान्स्टेबल साळुंखे बोलतोय. आजच्याला अरजंट मधी तपासाला भिगवनला जायचय किती वाजता गाड्या हाईत?
समोरुन = (अतिजलद आणि घाईच्या स्वरात) जयहिंद सहेब ५.३० नंतर ६ तेच्या नंतर७ आनी मग लास गाडी ११ ची हाय साहेब.
मी=(थोडासा हुकमी आवाज आणत) जरा थांबा साहे$$ब सगळ सविस्तर लिहुन घेतो आन ते टायमिंग तेवड २४च्या हिशोबान सांगाबरं. angery
मी(कागद पेन तयार ठेउन)= हं सांगा. १७.३० नंतर
समोरुन = नंतर १८ ..नंतर १९ वाजता तेच्या नंतर २२ वाजता. पन साहेब तीच टायमिंग सारख माग पुढ होतय बर का!
मी = धन्यवाद साहेब. या कधी तरी पोलिस स्टेशनला च्या पानी घेउया म्हंजी वळखबी हुईल. जयहिंद. Big smile

याल मी खोट बोलण समजत नाही. सामान्य नागरिक म्हणुन आलेल्या अनुभवनंतरच ते शहाण पण आहे. ~X( नाही तर एस.टी. डेपोतुन येवढी ४/५ मिनटे सविस्तर माहीती आभावानेच मिळत असावी! एक दोन तिरसट (कावलेल्या आवाजातली) वाक्य तुमच्यावर फ़ेकुन फ़ोन दाण दिशी आदळला जातो. रिक्शा वाले खुप वेळेस भाडे नाकारुन त्रास देतात. गेल्या काही वर्षात मला अजिबात त्रास नाही , कारण मी आधी झटकन रिक्शात बसतो येणार का बाबा? वगैरे तुच्छ विचारणा करत बसत नाही. आणि हुकुम देतो "नौपाडा पोलेस स्टेशन" घर जवळ आल की जरा राईट घे/घ्या, जरा लेफ़्ट हां हां बस ईथेच सोडा. पैसे द्यायचे घरी जायच. डोक्याला ताप नाही. अवांतर आहे पण हा माझा स्वभाव आहे >हास्य

असो. घरा जवळुन डेपो चालत १०/१५ मिनीटावर, आत्ता वाजले ५.४०, म्हणजे ६ ची बस शक्य नाही अजुन सॅक भरायची होती. खायची व्यवस्था ई.विचार करुन ७ म्हनजे १९ वाजता ची बस मनाशी नक्की केली. सॅक भरताना विचार चालु होता. पुण्या पासुन भिगवण ९१ कि.मी. ईथुन पुणा ३.३० तास तिथुन अजुन २ तास म्हणजे एकुण प्रवास साडेपाच तासांचा. भिगवण अंदाजे १२.३० ला येईल .ओक्क्के!! thinking
हिरव्या एशियाड डब्याने प्रवास चालु झाला. पनवेलला बाहेरुन न जाता आतमधे स्टेंड वरुन गाडी जाणार म्हटल्यावर चपापलो. सगळ प्लॅनिंग बोंबलणार. २/४ मिनटच चरफ़डलो Crying आणि परत झोपी गेलो (|: . हायवेवर जेवायला थांबल्यावर वाहक आणि चालकाशी गप्पा मारत भिगवणविषयी माहीती काढली.गवात लॉजची सोय नसावी हे लक्शात आल. पुढे ३५ कि.मी. वर बारामतीला जाव की नाही ? झुरका + चहा घेत विचार केला :W आणि भिगवणलाच उतरायच ठरवल. आदळत, आपटत रात्री २.१५ला भिगवण स्टँडला उतरलो. कंट्रोलर कडे परत एकदा गावत राहण्या विषयी चौकशी केली.गावत एकच लॉज आहे आणि ते ईथुन(स्टेंडपासुन) ३ कि.मी. आहे समजल्यावर स्टँड्वरच झोपायच ठरवल.(राती बेरातील अनोळख्या गावात कशाला रीस्क घ्या? :/ ३/४ तासांचाच तर प्रश्न होता. स्टेंडवर कसं अधुनमधुन गाड्या येत असतात. चहावाला, वडेवाला, स्टाफ़ ई. वर्दळ असते ना ! मग काही टेंशन येत नाही. सोबत माहागडा कॅमेरा आणि उधारीच्या लेन्सची पण भिती होती.) रद्दी पेपर बाकड्यावर अंथरला तोंडाला, हाताला ओडोमास लावल आणि सॅक उश्याला घेउन झोपलो. I)
थंडीचे दिवस असल्याने पहाटे हवेत गारवा खुप होता. स्टँडवरच ब्रश केला अंघोळीची गोळी खाउन चहा+बिस्कीट ब्रेक फ़ास्ट घेतला आणि भटकंतीला सुरवात केली तो पर्यंत ७ वाजात आले होते.
सुर्योद्य आणि सुर्यास्ताचे फोटो काढायची मजा थंडीतच येते. आकाशात लाल+शेंदरी रंगछटा खुप छान येतात.(सोनसकाळ)
sun

sun

fa

हे खाली आहे ते चक्रवाक बदक. सायेबेरीयातुन हिमालय मार्गे स्थलांतर करतात हे पक्षी. #:S
sda

मला तर ह्या बदकिणबाईच वाटतात. बघाना डोळ्यात काजळ घालुन कश्या चालल्या आहेत?
wrwrw

अजुन जवळुन फोटो घेण्यासाठी होडी वाल्याला जरा तिच्या जवळ बोट न्यायाला सांगितली. बहुतेक माझी सलगी आवडली नसावी
चक्क उडण छु
dsd

पाण पक्ष्यांबरोबरच किट्कांवर जगणारे ईतरही बरेच पक्षी होते. त्या पैकी हा वेडाराघु
das

नाव माहित नाही पण स्थानिक लोकं "पिवळी चिमणी" म्हणुन ओळ्खतात
dsad

wrw

बगळे बुवा / बगला भगत
asa
adas

टेकऑफ च्या तयारित बगळे बुवा
jgghjgh

हाय फ्लाय
trt

ह्या पक्ष्याच्या पायाशी निट बघीतल तर छोटस चुंबळ केल्यागत घरट दिसेल त्या मधे ४ अंडी होती. हे घरट तरंगत्या पाण्यात उगवणा-या वेळी आणि गवतात बांधल होत. आमची बोट घरट्या जवळ येताच जोरजोरत ओरडत आक्रमक पवित्रा घेतला होता. X(
f

ह्यची चोच बघा. ( नाव माहीत नाही :S )
sfs

sf

सँड्बर्ड
hd

hjkh

हा बगळा पाण वनस्पती / झाडी झुडपां मधे स्वतःला येवढ्या बेमालुमपणे झाकुन घेतो की अवघ्या काही फुटावर आपण गेल्यावर लक्षात येत अणि तो पर्यंत हा उडुन देखिल जातो.
ffsaew

कॅमेरा निकॉन डि९० + लेन्स निकॉन ७०-३००
कमश:

आईला........... गजब

आईला...........

Grade

Grade

Grade

गजब फोटो साहेबा... लै भारी..... !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ज ब रा !!! आम्हाला अभिमान आहे

ज ब रा !!!
आम्हाला अभिमान आहे की आम्ही आपल्या मित्रवर्यांच्या यादीत आहोत ....

मला तर ह्या बदकिणबाईच वाटतात. बघाना डोळ्यात काजळ घालुन कश्या चालल्या आहेत? >>>

क्या बात है !! फोटोज आणी वर्णन अतिशय आवडले !! सलाम बॉस !!

अवांतर :: तुळ्जापुरला जाताना भिगवणवरन गेलतो राव , कळल काय मिस केल ते !!

क्या बात है !! फोटोज आणी

क्या बात है !! फोटोज आणी वर्णन अतिशय आवडले !! सलाम बॉस !!
असंच म्हणतो!! कसले फोटोज आहेत एकेक!! विशेषतः सहावा आणि दहावा (बगळा भगत) फोटो आवडला!! मस्त.. दिलखुश होगया!! हास्य

लिपस्टिक...

मला तर ह्या बदकिणबाईच वाटतात. बघाना डोळ्यात काजळ घालुन कश्या चालल्या आहेत? >>>
आणि नीट पहा लिपस्टिक सुद्धा लावले आहे, चक्क पिवळ्या रंगाचे..हास्य

बाकी सारेच फोटो लय भारी हो जयपाल भौ,

फोटो एक नंबर आले आहेत...

फोटो एक नंबर आले आहेत...



श्रीवर्धन

केवळ अप्रतिम फोटो काय

केवळ अप्रतिम Grade Grade
फोटो काय जबरदस्त आलेत !!! Grade



असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

लेख आणि


लेख आणि फोटोज..............ग्रेट............

लै भारी रे दाद्या..

लै भारी रे दाद्या..

जयपाल भौ, फोटो तर फारच छान

जयपाल भौ, फोटो तर फारच छान आलेत. तिसरा फोटो तर हाताने काढलेले पेंटीग वाटते आहे. बाकी नांदूरमध्यमेश्वराने केलेली नाराजी येथे भरून पावली असेल.
स्टँडवरचे दादा आता फोनवर ठिक बोलतात असा माझा अनूभव आहे. आहे त्या परिस्थीतीशी जुळवून घेण्याच्या गुणातून बरेच काही शिकता येईल. स्टँडवर रात्र काढणे एक अनुभव असतो बाकी.

बाकी काही म्हणा, एस. टी. स्टँड कसाही अन कोणत्याही गावाचा असला तरी मला तो फार जवळचा वाटतो. अजुनही काही काही वेळेस मी केवळ भटकायचे म्हणून एस. टी. स्टँडवर जातो. एक आवडते ठिकाण आहे असे का म्हणेना.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

+ १ असेच म्हणतो.

+ १

असेच म्हणतो.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१ कळसुबाईला जाताना

+१
कळसुबाईला जाताना इगतपुरीच्या स्टँडवर रात्र काढण्याचा आणि समोरच्या रेल्वेलाईनवर जाऊन प्रातर्विधी करण्याचा लुफ्त आम्ही एकदा लुटला होता त्याची आठवण झाली. हास्य

जयपा, लेख मस्तंच रे. आवडला.



-पुण्याचे पेशवे

>> समोरच्या रेल्वेलाईनवर जाऊन

>> समोरच्या रेल्वेलाईनवर जाऊन प्रातर्विधी
खरंच याची मजाच वेगळी रे पुपे.. आणि बारीक पावसाच्या सरी, आजूबाजूला हिरवंगार रान, एक निर्जन पायवाट, बिसलेरीची बाटली, हातात एक छोटी गोल्ड फ्लेक (इतर वेळी मार्लबोरो पीत असाला तरी अशा वेळी मात्र छोटी गोल्ड फ्लेकच हवी wink ) वावावा!! स्वर्गीय सुख आहे रे!!

आणि कार्यक्रम आटोपल्यावर टपरीवरचा चहा म्हणजे पर्वणीच!! हास्य

अप्रतिम फोटो.

अप्रतिम फोटो.

आइच्चा...येक नंबर फोटो

आइच्चा...येक नंबर फोटो आहेत..लइ भारी

मस्त फोटो..

मस्त फोटो..

छान आले आहेत फोटो.

हास्य

छान आले आहेत फोटो.

लै खास.....

सगळे फोटु मस्तच रे जयपाल. अन ती पोलिसाचं नांव सांगुन माहिती काढायची ट्रिक - असलं प्रोफेशनल सीक्रेट जाहीर करायचं नसतं रे! wink

भिगवणला गेलास तर तिथले मासे खाल्ले का नाही? नसशील तर स्वतःला दोन शिव्या हासड - स्थानिक लोकांना विश्वासात न घेता गेलास अन एका बहुमोल अनुभवाला मुकलास म्हणुन.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

+ १

उगाच का इतके बगळे तिथे बकध्यान लावून उभे असतात? wink



-पुण्याचे पेशवे

अतिशय सुंदर फोटोग्राफीला आमचा

अतिशय सुंदर फोटोग्राफीला आमचा सलाम. हास्य
मनमोहक छायाचित्रे.

के व ळ अ प्र ति म !!!!!!

के व ळ अ प्र ति म !!!!!!



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

सुंदर भारतीय पक्षीमधून काहि

सुंदर
भारतीय पक्षीमधून काहि नावे काढली आहेत
१. बदकीण बाई: भारतीय राखी बदकः वैशिष्ट्य: वर्षभर अंडी घालतात
२. वेडाराघूखालचा: बहुदा सुभग असावा
३. बगळ्यांमधे पिवळ्या चोचिंचे गाय बगळे आहेत.. तर तो उघड्या चोचीच्याला "उघड्या चोचीचा करकोचा" (हिंदी: गंगुला) असे नाव दिले आहे. स्थलांतर करणारा पक्षी आहे अश्या चोचीचे कारण यांचे प्रमुख अन्न गोगलगाई आहे ज्यांचे कवच फोडणयासाठी ते चोच वापरतात

बाकी शोधून बघतो

अजून येऊ द्यात चित्रे



-ऋ

सर्व

प्रतिसाद कर्त्यांचे आणि वाचकांचे मनःपुर्वक आभार.
माहीती मधे भर टाकल्याबद्दल ऋषिकेशजी आपले विशेष धन्यवाद.
> "भारतीय पक्षीमधून काहि नावे काढली आहेत."
अशी कोणती साईट असेल तर कृपया लिंक द्यावी ही विनंती. हास्य



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

जयपाल, ते कॅमेरा डिटेल्स पण

जयपाल,

ते कॅमेरा डिटेल्स पण द्या राव.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजे

ले़खाच्या तळाशी कॅमेरा व लेन्स डिटेल दिले आहेत. Big smile



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

अरे.... तळ पाहीलाच नव्हता

अरे.... तळ पाहीलाच नव्हता wink

असो,

तेथे एक छोटूसे क्रमशः पण दिसले.. पुढील भाग कधी? ??????



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छान फोटो. आनि त्याला साजेसं

छान फोटो. हास्य

आनि त्याला साजेसं अप्रतिम वर्णन... हास्य

सहीच ...

सहीच ...