"भाडे मीटर प्रमाणे देणे" असं रिक्ष्याच्या मीटर वर लिहिलेले असतं. किती लोक ते पाळतात हा चर्चेचा विषय होऊ शकतो. आत्तापर्यंत पुण्यात राहत असल्यामुळे पुणेरी रिक्षा चालक हे सर्वात जहाल असतात असा मला वाटत होत. पण पुणेरी रिक्षाचालकांच्या मग्रुरिला आणि अव्वाच्या-सव्वा भाडे आकारण्याच्या प्रवृत्तीला इथले म्हणजे बंगलोर मधले रिक्षाचालक सह्ज आव्हान देऊ शकतील. त्यांच्यासमोर मला आता पुण्यातले रिक्षाचालक अगदीच मवाळ वाटायला लागले आहेत.
बंगलोर मध्ये नवीन आलेला माणूस म्हणजे यांच्यासाठी पर्वणीच असते. काय वाट्टेल ते दर तोंडावर फेकतात. दिवसा सुद्धा मीटर प्रमाणे रिक्षा चालवत नाहीत. रात्री आठ नंतर लगेच दुप्पट भावाने दर आकारतात.
इकडे एक नवीनच गोष्ट कळली! इथले रिक्षावाले दिवसाढवळ्या सुद्धा सर्रास "रिटर्न भाडे" मागतात. म्हणजे आपण त्याना म्हणालो की "बाबा (अप्पा) इथे इथे जायचे आहे. किती होतील? तर तिथे जायचे २० रु. होत असतील, तरी हा पठ्ठ्या ४० रु. म्हणणार. का तर तिथून हा "विदाऊट पाशिंजर" कसा येणार म्हणे ? (अरे पण मग इथे येऊ नकोस ना! तिथेच एखाद गिराहिक शोध! पण नाही !!!) आता हा तिथून विदाऊट पाशिंजर येऊ शकत नाही म्हणून तो भुर्दंड गिराहिकाने का सोसायाचा? आणि ते सुद्धा दिवसाढवळ्या! बर दुसरा कोणी आजूबाजूचा रिक्षावाला बघावा तर सगळे एकाच माळेचे मणी! आपण भाव ठरवायला लागलो तर म्हणतात "चौदा रुपयेमे हमको क्या मिलेगा साब?" पण मग नुसतं रिक्षा थांब्यांवर बसून तरी रांडेच्याना काय मिळणार आहे?
संध्याकाळी तर अगदी कमीत कमी अंतरासाठी सुद्धा जिथे १४ रु हा दर आहे तिथे यांच्या डोंबल्यावर ३० रु. द्यावे लागले आहेत मला. राउंड ऑफ करण्याची पद्धत तर केवळ चीड आणणारी आहे. ट्रॅफिक जाम होत, लगेज आहे, पत्ता अचूक सांगितला नाहीत, सुट्टे नाहीत ई. कारणांमुळे इथे १४ रु. झाले असतील तरी २० रु. टिकवावे लागतात. (आणि इथे प्रश्ना पैशाचा नाही तर तत्वाचा आहे. असो ते ह्यांना काय कळणार. कप्पाळ!)
जरा शहराबाहेर गेलात तर मग विचारायची सोय नाही. रिक्षा करण म्हणजे शान्तं पापं! इकडे बससेवा मात्र उल्लेखनीय आहे. पण तरी सगळिकडेच बसने जाता येत नसल्यामुळे, आपण अगदी हरि नसलो तरी या "गाढवांचे पाय" धरणे क्रमप्राप्त आहे.
हेच लिखाण माझ्या ब्लॉग वर वाचा
http://bolghevada.blogspot.com/2010/05/blog-post_31.html
तिकडे वाहतुक पोलिस
मदत मागितल्यावर मदत करत नाहीत का ? (मुंबईत करातात असा माझा अनुभ आहे)
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
हाहाहा, फारच जुना आणी नोन
हाहाहा,
फारच जुना आणी नोन विषय आहे. एक माहिती सांगतो.
बेंगलोरात बरेचशे रिक्षावाले/कॅब ड्रायवर हे आधी क्रिमिनल होते. रिहॅबिलिटेशन म्हणुन त्यांना हा उद्योग लावुन दिला सरकारने.
तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे, भयानक राग येतो, पण काहीही करु शकत नाही आपण.
बेंगलोर आता राहण्यासाठी योग्य राहिलेले नाही. (माझ्या मते)
एक वर्ष बेंगलोरात राहिलेला/फिरलेला.
मराठमोळा
खरं आहे.
खरं आहे.
कोणी या विषयावर पिएचडी केलेली
कोणी या विषयावर पिएचडी केलेली नाही का अजून?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
अवघड आहे, मला राहून राहून नवल
अवघड आहे, मला राहून राहून नवल वाटते ते कोल्हापुरच्या रिक्षेवाल्यांचे.. जवळ जवळ सगळे नियमाप्रमाणे भाडे घेतात अगदी चिल्लर पैसे देखील परत देतात व रात्री दिड पट भाड्याचा नियम आहे तो देखील पाळतात रिटर्न भाडे तर कधी मागितलेले मी तर ना पाहीले ना मला कोणी सांगितले...
* अमंळ गोल गोल फिरवतात काही रिक्षेवाले पण अपवाद हा असतोच ना
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कोल्हापुरी रिक्शावाला...!!
"....जवळ जवळ सगळे नियमाप्रमाणे भाडे घेतात अगदी चिल्लर पैसे देखील परत देतात...."
याला मी देखील दुजोरा देतो. कोल्हापूर रिक्शा संघटनेचे याबद्दल जितके अभिनंदन करावे तितके थोडे आहे.... शिवाय एखादा रिक्शावाला मीटरपेक्षा जास्त भाडे घेत आहे असे तुम्हास वाटले तर लागलीच त्याला "टॅरिफ कार्ड" दाखविण्यास सांगावे, अन्यथा नजिकचे पोलिस स्टेशन ! (आता या गोष्टी रात्रीच्या प्रवासाचेवेळी शक्य नाही असे कुणी म्हणेल तर त्यालाही मार्ग आहे. मध्यवर्ती एस.टी. स्टॅण्ड येथे अशावेळी वाहतुक पोलिस यांच्याकडे रिक्शावाल्याच्या रिक्शाचा नंबर, तसेच पॅसेंजरला तो शहरात कुठल्या ठिकाणी घेऊन चालला आहे याची पोलिस रजिस्टरमध्ये नोंद असते. तुम्ही त्या पोलिसाचा मोबाईल नंबर देखील घेऊ शकता. इतपत जामानिमा होत असल्याने मीटरपेक्षा जादा भाडे होतच नाही.... शिवाय रिक्शात्त बसण्यापूर्वी सर्वासमक्ष तुम्ही त्याला "अंदाजे किती भाडे होईल?" हा प्रश्न विचारल्यास ते सांगणे त्याच्यावर बंधनकारक आहे.
"....* अमंळ गोल गोल फिरवतात काही रिक्षेवाले पण अपवाद हा असतोच ना...!"
हे खरे आहे... पण कोल्हापुरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहिल्यास हल्ली हे गोलगोल प्रकार "अॅक्स्पेटेबल फीचर" झाले आहे... तरीही अव्वाच्या सव्वा भाडे हा प्रकार बिलकुल होत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
खरं आहे. पण एवढे फिरलो आहे
खरं आहे.
पण एवढे फिरलो आहे भारतभर पण कोल्हापुर सारखे रिक्षेवाले कुठेच नाही भेटले !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
काही रिक्षावाले चांगले देखील
काही रिक्षावाले चांगले देखील असतात ना ?
सगळे रिक्षावाले सगळीकडे
सगळे रिक्षावाले सगळीकडे सारखेच
पुण्याचा उल्लेख खटकला, तुम्ही
पुण्याचा उल्लेख खटकला, तुम्ही तो न लिहता देखील तुमचा अनुभव लिहू शकत होता.
पुणे व पुणेकर नेटवर विनोदाचा विषय झाला आहे, पुणेकर एवढे देखील वाईट नाहीत.
अरे वाह पुणेरी वाद चालू झाला
अरे वाह पुणेरी वाद चालू झाला वाटतं
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."