विजयवाडा - कालीमाता

0
0

श्री कालीमाता अम्मावरी देवस्थान हे हे त्रिशक्ती पीठ म्हणून प्रसिद्ध आहे, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे ‍असलेले हे मंदिर कृष्णवेणी या नदीच्या काठी वसले आहे. येथे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत. त्या इच्छाशक्ती, क्रियाशक्ती व ज्ञानशक्ती आहेत असे मानले जाते. हे स्थान अष्टदश पीठात मोडते.

स्थळ पुराण-

नेल्लोरजवळील जंगलात एका लष्करी अभियंत्याला स्वयंभू श्री महाकालीची मूर्ती सापडली, ती त्याने विजयवाडा येथे आणली. शक्तीची उपासना करणारा गुंजा रामास्वामी याने 14 ऑक्टोबर 1947 ला कृष्णवेणी नदीच्या काठी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. 'कालिदास' अर्थात कालीचा शिष्य या नावाने ओळखल्या जाणार्‍या या उपासकाने 11 वर्षे या लहानशा मंदिरात या देवीची पूजा केली. त्यानंतर काही कारणांमुळे हे मंदिर बंद झाले. सन 1965 साली तुर्गा वेंकटेश्वरलू याने 15 वर्षांपासून बंद असलेल्या या मंदिराचे द्वार उघडले. द्वार उघडल्यानंतर त्याला व त्याच्यासोबत असणार्‍यांना मंदिरात ज्योतीचा प्रकाश पसरलेला दिसला. मूर्तीभोवती त्यांना आभा दिसली. महाकालीच्या शक्तीचा त्यांना प्रत्यय आला. त्यानंतर शास्त्राप्रमाणे नियमित वैदिक पध्दतीने पूजा केली जाऊ लागली. त्यानंतर येथे भाविकांच्या गर्दीत नवरात्र, दिवाळी व विविध उत्सव साजरे केले जात आहेत.

दशमुखी माहाकाली
या महाकालीला दहा तोंड व दहा पाय आहेत। ती निळ्याशार रंगाची आहे. तिच्या आठही हातात नक्षीदार आभुषणे व शस्त्रे आहेत. तिने तलवार, चक्र, धनुष्य, मानवी डोके, चक्र, कमान, शंख, गोफ, खण आदी आयुधे धारण केली आहेत. तिला योगनिद्रा असे संबोधले जाते. तिच्या प्रभावाखालीच भगवान विष्णूला निद्रेच्या आधीन झाले. म्हणून ब्रह्मदेवाने तिला विनंती केली, की मधू व कैटभ या राक्षसांचा निःपात करण्यासाठी विष्णूला निद्रेतून जागे कर.

अठरा हातांची महालक्ष्मी
महालक्ष्मी ही देवीचे राजस रूप आहे, ही महालक्ष्मी लाल रंगाची आहे. तिच्या अठरा हातांमध्ये तलवार, खण, धनुष्यबाण, पाण्याचे भांडे, कमळ, सुदर्शन चक्र, जपमाळ, वज्रास्त्र, गदा, घंटा, त्रिशूळ, ब्रम्हपाश आदी शस्त्रे आहेत. ही देवी शक्तीचे आणि त्याचवेळी आसुरी शक्तींविरूद्ध लढण्याच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा रंग रक्ताचा, युद्धाचा म्हणजे लाल आहे. तिने महिषासूरालाही संपविले आहे. म्हणूनच महिषासूर मर्दिनी म्हणूनही शक्ती उपासक तिची उपासना करतात.

अष्टहातांची सरस्वती
महासरस्वती ही देवीचे सात्विक रूप आहे, ती शिशिरातल्या चंद्रासारखी दिसते. तिच्या आठ हातांमध्ये घंटा, त्रिशूळ, धनुष्यबाण आदी शस्त्रास्त्रे आहेत. ही देवी शारीरिक शक्तीचे व सौंदर्याचे प्रतीक आहे. सरस्वतीने धुम्रलोचन, चंड, मुंड, निशुंभ, शुंभ या असुरांचा वध केला. माहेश्वरी किंवा राज राजेश्वरी ही या तिनही देवींच्या उर्जेचा स्त्रोत आहे. तिलाच 'ललिता त्रिपूरसुंदरी' असे तिला म्हणतात. ललिता म्हणजे सौंदर्य.

मंदिरापर्यंत कसे जाल

विजयवाडा शहराच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर वसले आहे. रेल्वे स्टेशनपासून किमान 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. विजयवाडा हे शहर हैदराबादपासून 275 किलोमीटरवर आहे. हे शहर रस्ता, रेल्वे, हवाई सेवेने पूर्ण देशाशी जोडले आहे.

VW

छान.. आणखीही फोटो येऊ द्या

1

छान.. आणखीही फोटो येऊ द्या की... भटकंतीच्या धाग्याला किमान पाच फोटो असावेत. अन्यथा तो फाऊल धरला जातो. wink

सुंदर लिखांण.......अजून फोटो

2

सुंदर लिखांण.......अजून फोटो येऊदेत

मंदिराच्या माथ्यावरुन

3

मंदिराच्या माथ्यावरुन नदीपात्र पाहणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे विजयवाड्याचा.

बाकी सुंदर लेख.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुरेख लेख

4

सुरेख लेख हास्य

+१

5

+१

मस्त

6

मस्त हास्य


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

फोटो फोटॉ फोटो

7

फोटो फोटॉ फोटो


-पुण्याचे पेशवे

'गुंटुर्'ला जाताना

8

'गुंटुर्'ला जाताना विजयवाडावरन्च गेलो होतो ..तेव्हा माहीत असते तर्......असो ...

१) कृष्णवेणी या नदीच्या काठी वसले आहे. ...फोटो ??
२)तिने तलवार, चक्र, धनुष्य, मानवी डोके, चक्र, कमान, शंख, गोफ, खण आदी आयुधे धारण केली आहेत. ....फोटो ??

फोटो ??
फोटो ??
फोटो ??

मंदिरामध्ये व मंदिर

9

मंदिरामध्ये व मंदिर परिसरामध्ये फोटो काढण्यास बंदी आहे असे आठवले ( २००३ मध्ये गेलो होतो) पण नदी तटापासून अनेक सुंदर फोटो येऊ शकतात व बाजूच्या डोंगरावरुन सुध्दा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आपण आजानूबाहूंना जाऊन फोटो

10

आपण आजानूबाहूंना जाऊन फोटो काढून या असे सांगू

फोटो काढू शकलो नाही मी कारण

11

फोटो काढू शकलो नाही मी कारण कॅमेरा घेऊन गेलो नाही ना.
Sad

असू दे हो बेटर लक नेक्स्ट

12

असू दे हो बेटर लक नेक्स्ट टाईम........

पुढल्या वेळी फोटो काढा मस्त.

13

पुढल्या वेळी फोटो काढा मस्त.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आभारी आहे.

14

हास्य

आभारी आहे.

हा लेख तुम्ही लिहला आहे का हो

15

हा लेख तुम्ही लिहला आहे का हो ?

Crying


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हो माझ्या ब्लॉगवर आहे हा लेख

16

हो माझ्या ब्लॉगवर आहे हा लेख दुवा तुम्हाला व्यनी केला आहे.

प्रतिसाद

17

देवीचा फोटो मिळाल्यास बरे होईल. फार उत्सुकता आहे.


अरूण कोर्डे.

दादा फोटू कुठे ठेवलेत हो???

18

दादा फोटू कुठे ठेवलेत हो??? लॉकर मध्ये आहेत काय??

मस्त.

19

मस्त. हास्य