खूप खूप दिवसांपूर्वी गौरी देशपांडे वाचताना ग्रीस मनात रुतुन बसला होता. परवा मीना प्रभूंचं ग्रीकांजली वाचताना मनाने अजुन एकदा ग्रीसचा हट्ट धरला. बर्याच दिवसात भटकायला मिळालं नव्हतं. मन ग्रीस ग्रीस करत होतं त्याचवेळी डोकं दिवाळखोरीच्या बातम्या ऐकत होतं. शेवटी मनाचं पारडं जड झालं आणि ग्रीसची तिकिटं निघाली. वेळ मिळणार होता ५ दिवस. त्यामुळे केवळ अथेन्स ला जायचं; पार्थेनन बघायचं; जमलं तर एजियन समुद्रातल्या एखाद्या बेटाला भेट द्यायची आणि परत निघायचं असे नियोजन केले.
जायच्या तारखा २ महिने आधी ठरवल्या होत्या. त्या सुमाराला ग्रीसमधले वातावरण बिघडतच चालले होते. अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी सरकारने भरमसाट करवाढ केली. त्यामुळे जनक्षोभ वाढला. रोज सरकार विरोधी निदर्शने, दगडफेक, पोलीसांचा लाठीमार असे चित्र बातम्यांमध्ये दिसू लागले. आणि आमच्या प्रवासाबद्दल शंका वाटू लागली. मित्रमंडळीत ग्रीस बघून आलेले कोणीच नाही. सगळा अनुभवच नवा असणार होता. २ वर्षाच्या लेकीसोबत असा पहिलाच नवख्या ठिकाणचा प्रवास असणार होता. त्यामुळे थोडी काळजी वाटत होती. एकीकडे सगळे ठीक होइल असा विश्वासही होता. प्रवास ठरल्याप्रमाणेच करायचा असे ठरवले. आम्ही निघायच्या आधी आठवडाभर अथेन्सही थोडे शांत झाले. आणि आम्ही निर्धास्त मनाने विमानात पाऊल टाकले.
कोणत्याही शहराचे आकाशातून होणारे दर्शन मला आवडते. पण हे छोटे विमान खाली उतरताना कानात दडे बसल्याने लेकीने रडून गोंधळ घातला. त्यामुळे अथेन्सचे आकाशातून दिसणारे चित्र पहाता आले नाही. विमानतळ बेताचे वाटले. बाहेर येऊन मेट्रोने मुख्य शहरात आलो. आमच्या हॉटेलच्या जवळच्या स्टॉपवर उतरलो. रात्रीची वेळ असल्याने मुळीच गर्दी नव्हती. बाहेर आलो आणि मस्त धक्का बसला. बाहेरच्या चौकात चक्क बाजार भरला होता! भारतीय, पाकिस्तानी चेहरे दिसत होते. छोटे गाडे लागले होते. काही विक्रेते समोर एक कपडा अंथरून त्यावर माल विकत होते. खेळण्यांपासून चपलांपर्यंत आणि फळांपासून मासळीपर्यंत तर्हेतर्हेच्या गोष्टींची गर्दी दिसत होती. ओरडून भाव सांगणे, घासाघीस, मनधरणी...सगळे यथासांग...कितीतरी ओळखीचे! बेल्जियममध्ये रात्री आठानंतर रस्त्यावर कुत्रे सुद्धा बघण्याची सवय नाही; आणि इथे रात्री १० वाजता एवढी गजबज बघून मन आनंदले, थेट घरी भारतात गेले.
हॉटेलचा पत्ता नकाशानुसार जवळचा होता पण किरकिरणार्या लेकीकडे बघून टॅक्सी करायची ठरवली. एका टॅक्सीवाल्याला पत्ता दाखवला तर त्याने निर्विकारपणे तोंड फिरवले! गेला ढगात म्हणत दुसर्या टॅक्सीकडे निघणार एवढ्यात स्टेशनच्या मागे उंच डोंगरावर अप्रतिम अशा पार्थेननचे दर्शन झाले. २ दिवसांवर पौर्णिमा आली असल्याने भरपूर चंद्रप्रकाश होता. तेवढ्याच शांत कृत्रीम प्रकाशात अॅक्रोपोलीस टेकडी तेजस्वी दिसत होती. ते दृश्य पाहून दिवसभराचा शीण पळाला. उद्या पहिले दर्शन पार्थेननचे असे मनाशी म्हणून टॅक्सीकडे मोर्चा वळवला.
३ मिनिटात हॉटेल आले. मीटर २ युरो बिल दाखवत होते. मालक ५ मागत होता. दिले!
हॉटेलमध्ये शिरताच दुसरा धक्का. इंटरनेटवर फोटो आणि माहिती वाचून हॉटेल ठरवले होते. त्यातली एकही गोष्ट समोर दिसेना. रंग उडालेल्या भिंती, जुनाट फर्निचर, दोन माणसांची लिफ्ट, सुमार सजावट असे दृष्य होते. कुरकुरत्या लिफ्टमधून आम्ही तिघे आणि सामान चकरा मारत वर आलो. वर १०बाय१० ची भलीमोठ्ठी खोली. त्याला ३बाय्१.५ची बाल्कनी. बाथरूममध्ये केविलवणा शॉवर आणि लटकणारा बेसिन. दार फुगले असल्याने, कडीची गरजच नाही. नळाला फक्त गरम पाणी. प्यायलाही तेच. सामान ठेवण्यासाठी कपाट उघडले. आत ५-६ तुटके हँगर, रंग उडालेला, लाकूड पोखरलेले, कडी नाहीच... बाल्कनीचे दार उघडले. खाली मुख्य रस्ता. वाहनांचे आवाज, दिवे. उजवीकडे प्रसिद्ध ओमनिया चौक. डावीकडे छोटे मोठे हॉटेल्स. रस्त्यावर रिकामटेकड्या मवाली दिसणार्या तरुणांचे घोळके. आणि भरमसाठ कचरा...
मन अजून खट्टू झाले. वाचलेली ग्रीसची रम्य चित्र आठवू लागली. युरोपातल्या इतर शहरांशी, पाहिलेल्या राजधान्यांची चित्रं डोळ्यासमोर तरळू लागली. आणि ही पण एक राजधानी आहे या विचाराने हसूच आले.
भूक लागली होती. लेकीला दूध हवं होतं. अपेक्षेप्रमाणे अन्न गरम करण्याची कोणतीच सोय हॉटेलमध्ये नव्हती. नळातून येणार्या गरम पाण्यात दूध बनवलं. सोबत आणलेली भाजी पोळी खाल्ली.
झोप येईपर्यंत आत्तापर्यंत दिसलेल्या अथेंस विषयी डोक्यात विचार येत होते. स्वप्नात मात्र गौरीने सांगितलेली रम्य बेटं आणि ग्रीकांजलीत बघितलेले ग्रीक देवतांचे देखणे पुतळे दिसत होते.
:-)
छान सुरवात.
स्व:ता हॉटेल बुकिंग इ केले होते की टुर पॅकेज घेतले होते?
जमल्यास हॉटेल, साईट सिइंग पॅकेज इ. रेकमेंड करा.
कानात दडा ऐकून वाईट वाटले
कुठले विमान होते, बोइंग का?
मला सुध्डा दड्याचा त्रास आहे
मला सुध्डा दड्याचा त्रास आहे
>>> मीटर २ युरो बिल दाखवत
>>> मीटर २ युरो बिल दाखवत होते. मालक ५ मागत होता.
आपल्याकडे रिक्षावाला होता हो तो. जावूद्या प्रगती झाली बिचार्याची.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
अरे.. ! सुरवात खुपच वाईट
अरे.. !
सुरवात खुपच वाईट (मनाविरुध्द गोष्टी, हॉटेल, लुबडणूक.. इत्यादी.) झाली की....
पुढे काय झाले ??
लवकर लिहा.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ओ फोटो टाका ना लवकर! तुम्हाला
ओ फोटो टाका ना लवकर!
तुम्हाला विमानातून काढता आला नाही ना फोटो.. हा घ्या...
अजूनही आहेत पण आधी तुम्ही टाका. बाकी तुम्ही सांगितला तितका वाईट अनुभव मला आला नाही हॉटेलाच्या बाबतीत.. पण रस्त्यावर कापड मांडून काय काय विकणारे साऊथ इंडियन, श्रीलंकन, पाकिस्तानी पाहिले. आणखीन एक गोष्ट चटकन दिसून येते ती म्हणजे या शहरातील बसेस.. मुंबईतल्या लोकल सारखे पेंटाग्राम्स आहेत बसेसना आणि इलेक्ट्रिसिटीवर चालतात त्या.. बसचा फोटो नाही घेतला पण त्यांच्या मार्गाचा आहे. हा बघा.. फोटोत नीट पाहिल्यावर कळेल स्ट्रीट लॅम्प्स सुद्धा वायर्सना लटकत आहेत. स्ट्रीट लॅम्प्ससाठी पोल्स तसे नाहीतच कुठे.. सगळे असेच तारांखाली लटकलेले!!
मायाजी.. येऊद्या अजून!! अॅक्रॉपोलिस च्या फोटोशिवाय मजा नाही हं पण..
मस्त आहेत रे फोटो.
मस्त आहेत रे फोटो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
खरोखर विचित्र अनुभव आहेत
खरोखर विचित्र अनुभव आहेत हे.
फोटो देखील टाका प्लिज.
मेवे थान्कू..फोटोत केलीस तशी
मेवे थान्कू..फोटोत केलीस तशी थोडी तपशीलात पण मदत कर न प्लीज्..काही महत्त्वाचे सुटले तर जोडून दे..
मी पुढच्या लेखात जोडते फोटो.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
हॅहॅहॅ.. तपशीलात मदत? मी काही
हॅहॅहॅ.. तपशीलात मदत? मी काही जास्त फिरलो नाही तिथं.. तीनच दिवस होतो फक्त.. त्यातले दोन दिवस क्रिकेट खेळण्यात गेले!!
तरी जमल्यास नक्की करीन.. पुढील काही भागांत अॅक्रोपोलिसबद्दल आणि खास ग्रीक 'सुव्लाकी' (Greek: Σουβλάκι) बद्दल वाचायला आवडेल!
येऊ द्या!
अथेन्समध्ये जाऊन फक्त चेंडू
अथेन्समध्ये जाऊन फक्त चेंडू कुटला????
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
त्याचसाठी गेलो होतो! मुख्य
त्याचसाठी गेलो होतो! मुख्य उद्देश क्रिकेट हाच होता!! आमच्या क्रिकेट क्लबची वार्षिक 'ओव्हरसीज टूर' होती!!
(प्रकाटाआ)
(प्रकाटाआ)
वा..
सहलीची सुरुवात चांगली झाली नसली तरी लेखाची मात्र छान झाली आहे, पुढचे भाग लवकर येऊ देत..
स्वाती