तर्पणाची छाया
तर्पणाची छाया
दि. ४ मार्च २०१०
"प्रथम पत्नीला स्मरून रामेश्वरच्याकिनाऱ्यावर तर्पण कर" अशी आज्ञा नाडी महर्षींनी केली त्याप्रमाणे मी ३४ वर्षानंतर सौ.छायाला तर्पण करायला मी रामेश्वरमच्या तटावरील समुद्रात सुर्याकडे हात जोडून उभा होतो. तेंव्हा एक वाक्य. क्षणात तरळून गेले.
"छाया मी तुझ्या मृत्यूला नकळत का होईना जबाबदार आहे. त्यासाठी तू मला माफ कर. मला माझ्या जबाबदारीच्या त्या बोचणीतून सोडव." डोळ्यातून अश्रु टपकले. छायाचा चेहरा डोळ्यासमोरून हटत नव्हता.
पाण्याच्या लाटा अंगावर येत होत्या. तर्पणाची कामगिरी झाली. सर्व अन्य मृतात्म्यांनाही त्या निमित्ताने तर्पण केले गेले. नंतर पुन्हा समुद्रातून मिळालेल्या मातीच्या पिंडाला, फुलांना, तिळांना परत समुद्रात विसर्जन करायला पुन्हा पाण्यात गेलो. तोवर मन शांत झाले. होते. छायाचा चेहरा आठवुनही मनात येईना.
पुढे "रामेश्वराच्या मंदिराच्या आवारातील २२ विहिरींच्या पाण्याने स्नान करावे" असा आदेश होता त्याप्रमाणे स्नान झाले. मुख्य मंदिरातील शिवाला दर्शन घ्यायला सुकलेले कपडे चढवून मंदिराच्या गाभाऱ्यात निघालो. मी, माझ्या सोबतचा प्रवासात भेटलेला मित्र व स्नानासाठी केलेला गाईड एका मागे एक चाललो असता, विलक्षण प्रकार घडला .
गरुडध्वजाच्या पितळेच्या खांबापाशी जायच्या वाटेत एक कावळा अचानक मला दिसला. जणु तो माझी वाटच पहात होता तिथे. मी चमकून मित्राला व गाईडला थांबवत म्हटले, "ये कौवा यहां क्या कर कहा है? मित्राने व गाईडने पाहून म्हटले, "कौआ मंदिर में इतने अंदर यहा आ नही सकता। इतने सालों में मैं पहली बार देख रहा हूँ। पता नही कहां से आ टपका है।"
वर्दळीच्या वाटेवर, मंदिराच्या गाभाऱ्यातील आतील भागात कोणताच पक्षी सहजासहजी येणे शक्य नव्हते..त्यात फक्त एक कावळा उडून आला कुठून? माझ्या मनात त्या दृष्याने घर केले. "नाडी महर्षी यथावकाश याचे रहस्योद्घघाटन करतील". असे मी मनात म्हणत त्या कागाला पहात पहात सलाम केला व पुढे सरकलो. त्याप्रमाणे त्याचा खुलासा नाडी महर्षींनी नंतर एका वाचनात केला तेंव्हा मला थक्क व्हायला झाले.
जसे पुर्वी एकदा एका कुत्र्याच्या पिल्लाला मी बिस्किटाचे तुकडे खाऊ घातले होते. "ते श्वान रुपात शुक महर्षी होते". असे नंतर मला नाडी ग्रंथातून सांगण्यात आले.होते!
शब्दांकन २१ एप्रिल २०१०
.jpg)
ह्म्म ! उत्तम अनुभव कथन. काही
ह्म्म !
उत्तम अनुभव कथन.
काही गोष्टी नवीन कळाल्या.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
उत्तम अनुभव कथन
उत्तम अनुभव कथन
पुन्हा पुन्हा वाचला.. काही
पुन्हा पुन्हा वाचला.. काही राहीले आहे असे वाटत आहे सर... जरा पुन्हा बघा जरा.
कावळ्याचा काही संदर्भ मला नीट लागत नाही आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बरोबर
अपेक्षा तीच आहे.
काही तरी कमी आहे याची हुरहुर मनाला सुखावते..
तो संदर्भ नंतर केंव्हा तरी सवडीने.
नाडी ग्रंथ प्रेमी
शशिकांत ओक
तुमचे नाडीवरील काही लेख मी
तुमचे नाडीवरील काही लेख मी वाचले आहेत, पटतात मला व मी अनुभव घेतला आहे.
उत्तम अनुभव कथन. अनुभूती
उत्तम अनुभव कथन. अनुभूती श्रेष्ठ कधीही.
-पुण्याचे पेशवे
माझे देखील असेच मत आहे.
माझे देखील असेच मत आहे.