म्युच्युअल फंड

0
0

मी अनेक वर्षे व्यक्तीगत रूपाने म्युच्युअल फंडमधे पैसे गुंतवत आलो आहे. मी असे म्हणणार नाही की त्यामुळे मी खूप श्रीमंत झालो आहे. पण पैसे बँकेत अथवा कुठल्याही ठराविक व्याजाच्या दराने जसे पी पी एफ, पोस्ट किंवा इतर काही अश्याच प्रकारच्या गुंतवणूकीपेक्षा पैसे म्युच्युअल फंडमधे गुंतवल्यास नक्कीच जास्त फायदा होतो हा माझा अनुभव आहे.

साधारणतः शेअर बाजार म्हटले की पैसे गेले अशी बर्‍याच जणांची समजूत असते. पण एस आय पी च्या पध्दतीने शिस्तबध्द पध्दतीने म्युच्युअल फंड(इक्वीटी अथवा बॅलन्स)मधे पैसे गुंतवल्यास आपली संपत्ती वाढीस लागते, याचा अनुभव येइल.

अर्थात एकदा पैसे गुंतवले की त्याकडे डुंकून पहायचे नाही असे करून चालणार नाही. वेळोवेळी झालेला नफा पदरात घेतला पाहिजे. तसेच नफ्याची अपेक्षासुध्दा वाजवी असावी. नाहीतर बाजारात भरमसाठ नफा करून देण्यार्‍या खोट्या स्कीम्स काही कमी नाहीत.

तसेच म्युच्युअल फंडमधे पैसे गुंतवायच्या अगोदर स्वतःला अगदी येणार्‍या नजिकच्या काळात पैश्याची किती निकड आहे याचा विचार करून तेवढी रक्कम बाजूला ठेवणे अधिक चांगले.

असो! तर म्युच्युअल फंडमधे एकदा पैसे गुंतवले व जर यदा कदाचित काही काळासाठी थोडेसे नुकसान झालेच तर नाउमेद होण्याची काहीच गरज नाही कारण साधारणपणे ते नुकसान भरून निघतेच. तेव्हा कोणी कितीही भिती दाखवली तरी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.

सर्व गुंतवणूकदाराना माझ्या हार्दिक शुभेच्छा!

{म्युच्युअल फंडचे सर्वभाग आता}

1

म्युच्युअल फंडचे सर्वभाग आता पुस्तकरुपामध्ये उपलब्ध आहे.

धन्यवाद जोग साहेब.


Hope is a good thing...

{म्युच्युअल फंड एस आय पी}

2

पुस्तक रूपाने सर्व भाग प्रसिध्द केल्याबद्दल धन्यवाद!

एक भाग 'म्युच्युअल फंड - एस आय पी' हा पुस्तकात समाविष्ट करायचा राहिला आहे.


शेक्-हर

{तो भाग ही ह्यात जमा केला आहे }

3

तो भाग ही ह्यात जमा केला आहे हास्य

धन्यवाद.


Hope is a good thing...

{खुप छान माहिती आहे}

4

जोग साहेब,
खुप छान माहिती आहे. याचा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करताना नक्कीच उपयोग होईल.
धन्यवाद..!


श्रीवर्धन

{+१}

5

खुप छान माहिती आहे. नक्कीच उपयोग होईल.


करतो. करेन. व करेगें