ओळख बायबलची - १ (अधिभौतिकशास्त्र)
ओळख बायबलची - प्रस्तावना: http://mimarathi.net/node/1612
मी कोण? मी कुठे आहे? मी येथे कसा आलो? हे सगळे कसे झाले?
हे मानवापुढचे सनातन प्रश्न. यांची उत्तरे शोधल्याखेरीज तत्त्वज्ञानात पुढे जाणे अश्यक्य होते. त्यामुळे सर्वच धर्मात याबाबतचा प्राथमिक विचार येतो. हे करत असताना या ज्या विश्वात मी आहे त्याची निर्मिती कशी झाली याचे उत्तर क्रमप्राप्त ठरते. त्यामुळेच प्रत्येक धर्म विश्वोत्पत्तीबाबत काहीतरी ठाम विश्वास घेऊन येतो. बहुधा हे विचार परमेश्वराने विश्व ऊत्पन्न केले असे असले तरी त्याची तार्किक मांडणी अत्यंत महत्त्वाची ठरते.
विश्वउत्त्पत्तीबाबत बायबलवी विचारधारा बेरेशिथ या जुन्या करारातील मोशेलिखित हिब्रु सर्गात आहे. बेरेशिथ (जेनेसिस) या शब्दाचा अर्थ प्रारंभ, उत्पत्ती, जन्म, उगम असा होतो. या सर्गात सृष्टीची उत्पत्ती, पापाची सुरुवात, मानवाचा इतिहास, हिब्रू लोकांचा अब्राहाम पासुन झालेला आरंभ या गोष्टी आहेत. विश्वाची उत्पत्ती यहोवा (जव्ह, जहोवा) देवाने सहा दिवसात केली असा बायबलचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत असा:
प्रारंभी देवाने पृथ्वी निर्माण केली तेव्हा वायुरुप पृथ्वी अंधाराने वेढलेली होती आणि देवाचा आत्मा जलाशयांवर पाखर घालत होता. देवाने शब्द उच्चारले, `प्रकाश होवो' आणि प्रकाश अस्तित्वात आला. देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे आणि त्याने अंधारापासुन प्रकाश वेगळा केला. देवाने प्रकाशाला दिनसमय आणि अंधाराला रात्रसमय म्हणले. हे सर्व पहिल्या दिवशी घडले.
नंतर देवाने शब्द उच्चारले, 'जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि अंतराळामुळे वरचे वायुरुप जलाशय आणि खालचे जलाशय अशी विभागणी होवो.' त्यानुसार घडवुन आणल्यावर देवाने अंतराळास आकाश असे नाव दिले आणि हे सर्व दुसर्या दिवशी घडले.
पुन्हा देवाने शब्द उच्चारले, `अंतराळाखालील जले एकत्र येऊन त्यांचे महासागर निर्माण होवोत आणि कोरडी जमीन दृष्टीस पडो' तसेच घडल्यावर देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि जलाशयांस सागर अशी नावे दिली. मग देवाने शब्द उच्चारले, 'गवत, बीज देणार्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमी उपजावो' आणि तसेच घडुन आले. हे सर्व तिसर्या दिवशी घडले.
त्यानंतर देवाने शब्द उच्चारले, 'दिवस आणि रात्र भिन्न करण्यास आकाशात ज्योती होवोत व त्या चिन्हे, ऋतु, दिवस आणि वर्षे दाखवणार्या होवोत' आणी तसे घडुन आहे. देवाने सुर्य व चंद्र या मोठ्या ज्योती आणि तारेही प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी निर्माण केले. हे चौथ्या दिवशी घडले.
पुढे देवाने शब्द उच्चारले `जलांमधे जीवजंतुंचे थवेच्या थवे उत्त्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीच्या वर आकाशात विहार करोत.' त्यानुसार सागरातील प्राणी, जलचर, पक्षी निर्माण झाले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा. वृद्धी पावा.' हे पाचव्या दिवशी घडले.
मग देवाने शब्द उच्चारले, `गुरेढोरे, सरपटणारे प्राणी, जमिनीवरील प्राणी, वन्यपशू जे अस्तित्वात येवोत' आणि तसेव घडले. मग देवाने जमीनीवरील माती घेऊन त्याचेच प्रतिरुप असा मानव निर्माण केला आणि जलचर, पक्षी, पशू व सरपटणार्या प्राण्यांचे अधिपत्य त्याला दिले. मानवाच्या नाकपुड्यातुन त्याच्यात आत्मा फुंकला आणि आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा, बहुगुणीत व्हा आणि पृथ्वी व्यापुन टाका. जलचर, पक्षी, पशू यांच्यावर अधिकार गाजवा. प्रत्येक वनस्पती, प्रत्येक फळझाड तुमचे अन्न होईल. प्रत्येक पशु, प्रत्येक पक्षी तसेच सरपटत जाणारे प्राणी यांना अन्न म्हणुन मी हिरवी वनस्पती देत आहे.' हे सर्व सहाव्या दिवशी घडले. निर्मितीचे कार्य पुर्ण करुन सातव्या दिवशी देवाने विश्रांती घेतली. (हाच दिवस म्हणजे सब्बाथ/ शब्बाथ. या दिवशी काम करणे धर्माला अमान्य आहे.)
नंतर देवाने पुर्वेकडे एदनमधे बाग केली व त्यात मानवाला ठेवले. जीवनवृक्ष व बर्यावाईटाचे ज्ञान देणारे वृक्ष बागेच्या मध्यभागी लावले. बागेला पाणि देण्यासाठी नदी केली व मनुष्याला बागेची मशागत व राखण करण्यास ठेवले. त्यावेळी त्याने मनुष्याला आज्ञा केली की बर्यावाईटाचे ज्ञान देणार्या वृक्षाचे फळ तु खाऊ नकोस. मनुष्याची मदतनीस म्हणुन त्याने स्त्री निर्माण करण्याचे ठरवले. त्याने मानव झोपेत असताना त्याच्या छातीची फासळी काढुन स्त्री बनवली. तेव्हा मानव म्हणाला, "ही माझ्या हाडांचे हाड, मांसाचे मांस आहे. ती नरापासुन बनवलेली आहे म्हणुन तिला नारी म्हणतील. याकारणे पुरुष आपल्या आईवडीलांना सोडुन पत्नीशी जडुन राहील आणि ती दोघे एकदेह होतील." बायबलच्या मते पृथ्वीतलावरील मानवांची पैदास याच पुरुष (आदम/ आदाम/ अॅडम) व स्त्री (हव्वा/ इव्ह/ इव्हा) यांच्यापासुन झाली.
बायबलमधील हे अधिभौतिकशास्त्र जुन्या करारातील उत्त्पत्ती या मोशेलिखित पुस्तकामधे आहे. आधुनिक विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या संदर्भात हे कदाचित कालबाह्य ठरलेले असेल अथवा पुढे ठरु शकेल. परंतु हा सिद्धांत ख्रिस्तपुर्व १४२० ते १२२० या दरम्यानच्या काळातला आहे असे समजले जाते हे ध्यानात घेता त्याची तार्किक मांडणी नक्कीच विचारार्ह ठरते. याच सर्गात हे अधिभौतिकशास्त्र पुढे नेण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यासाठी आदमची वंशावळ व नोहाची कथा येते. त्याचा विचार पुढील भागात करु.
क्रमशः
.jpg)
वाचतो आहे... उत्तम
वाचतो आहे...
उत्तम सुरवात.
>>निर्मितीचे कार्य पुर्ण करुन सातव्या दिवशी देवाने विश्रांती घेतली.
आठवड्याच्या शेवटी असणार्या सुट्टीचा उगम येथे आहेत तर...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अर्थपूर्ण आणि सुंदर लेख,
अर्थपूर्ण आणि सुंदर लेख, पुणेरीदा खूप खूप धन्यवाद
छान. काही काही संकल्पना
छान.
काही काही संकल्पना आपल्या इकडच्या सारख्याच वाटत आहे.
-पुण्याचे पेशवे
वाचतोय.
वाचतोय.
आता कसं
स्वधर्मे निधनं श्रेयः... वगैरे वाचलेले दिसते. उगाच कायबाय कविता करून राहिला होता ते.
बायबलमधील विश्वनिर्मिती सिद्धांताबद्दल एक नेहमीच गंमतीशीर वाटत असलेला मुद्दा. सूर्यच मुळी चौथ्या दिवशी जन्मला तर आधीचे तीन दिवस कसे मोजेल ब्वॉ? आणि हे जे दिवस मोजले आहेत ते तुमच्या-आमच्या स्केलवर की त्या जगन्नियंत्याच्या प्रायवेट टाईम स्केलवर? (अहो दीडशे वर्षे तुमची, तिथे त्या ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान् सुद्धा हलत नाही हजार वर्षे उलटल्याशिवाय - अंतूबर्वा)
हापिसातून पटकन लिवतोय. सविस्तर वाचन नि प्रतिसाद घरातून सांच्याला देईन.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अँथ्रोपोसेंट्रिझ्म
आधुनिक मानवाच्या विचारधारेतील अँथ्रोपोसेंट्रिझ्मचे मूळ या उताऱ्यात आहे, असा एक विचारप्रवाह आहे. विशेषतः लिन व्हाईट यांच्या 'द हिस्टॉरिकल रूट्स ऑफ अवर इकॉलॉजिकल क्रायसीस' या निबंधात त्यांनी अत्यंत जोरकसपणे ही मांडणी केली आहे. जालावर हा निबंध सापडेल. आवर्जून वाचा आणि या लेखमालेच्या संदर्भात व्हाईट यांचे ते मत आणि बायबलचा तुम्ही लावत असलेला अर्थ असे स्वतंत्र लिहिता येईल. विचार करा.
व्हाईट यांचा तो निबंध स्वीकारला तर आधुनिक विज्ञान - तंत्रज्ञानाचा उदयही याच विचाराच्या मुळात आहे असे म्हणता येऊ शकते.
आधी पुरुषाची निर्मिती आणि मग स्त्रीची. तीही पुरूषासाठी मदतनीस म्हणून. ही मांडणी इंटरेस्टिंग आहे. आजच्या समतेच्या संकल्पनेच्या संदर्भात ही मांडणी हरकतपात्रच ठरणार हे नक्की.
देव या संकल्पनेचा अर्थ, मांडणी कशी झाली आहे? वरच्या लेखातून ती स्पष्ट होत नाही. काय स्वरूप आहे या संकल्पनेचे? (इथे देवाच्या संदर्भात जे सांगितले गेले आहे ते महात्मा फुले यांनी मांडलेल्या निर्मिकाच्या संकल्पनेशी साधर्म्य राखते का हेही समजून घ्यायचे आहे.)
देव संकल्पना
श्रामो महत्त्वाचा मुद्दा! इथे माझा नेहमीचा प्रश्न पुणेरींसाठी टाकतो. जेव्हा ते बायबलमधील देवकल्पनेबद्दल लिहितील तेव्हा हा प्रश्न विचारात घ्यावा ही विनंती.
देव हा विश्वाचा निर्माता, नियंत्रक, शासक की यापैकी दोन की तीनही? या तीनही प्रकारात देव ही धर्मविरहित संकल्पना होते. अगदी प्राथमिक/आदिम स्वरूपात देव संकल्पना धर्मसंकल्पनेच्या आधी अस्तित्वात होती त्यामुळे हा प्रश्न वाजवी आहे असा माझा समज आहे. पुढचा प्रश्न असा की देव हा धर्माचा संस्थापक (प्रेषित नव्हेत, त्यांनी सांगितलेला धर्मविचार देवाकडून आल्याने देवच धर्मनिर्माता/संस्थापक म्हणावा लागेल) नियंत्रक की शासक. आता या संकल्पनेत वेगवेगळ्या धर्मांत/परंपरांध्ये देवाला वेगवेगळे - परस्पविरोधी - गुणविशेष असणे विसगत ठरत नाही जे धर्मातीत देव मानला तर शक्य असते, पण इथे देव संकल्पना संकुचित होते नि ती विशिष्ट समाजाशीच निगडित होते.
आता निर्माता, शासक नि नियंत्रक याबद्दलचे मुद्दे पुढील भागासाठी राखून ठेवतो. जेव्हा पुणेरी या मुद्याला स्पर्श करतील तेव्हा लिहिन.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सूर्य....!!
".....सूर्यच मुळी चौथ्या दिवशी जन्मला तर आधीचे तीन दिवस कसे मोजेल...."
रमताराम जी..... ~~ "जेनेसिस" नुसार चार दिवसांचा हिशोब (थोडक्यात....) खालीलप्रमाणे आहे : (मी जाणीवपूर्वक थोडक्यात म्हणत आहे, कारण निव्वळ एकेक दिवसावर बायबलमध्ये डझनावरी पाने आहेत.
"बिग बँग थिअरी" विचारात घेऊन तारकामंडळात प्रचंड उत्पात झाला आणि तार्यांच्या टकरावामुळे एकापासून अनेक निर्माण झाले, त्यातील एक तारा सूर्य, पण हा देखील महाप्रचंड अशा स्फोटांनी धडधडत होता व त्यातुन काही शकले बाहेर पडली तीमध्ये एक पृथ्वी....आणि ती आता सुर्यापासून दूर गेल्याने थंड होऊ लागली होती...
१. पहिला दिवस ~~ या ग्रहाला = पृथ्वीला निश्चित आकार येऊ लागला आणि प्रचड अशा मेघाचे आवरण हळुहळू तीपासून हटू लागले.
२. दुसरा दिवस ~~ पाण्याचे अस्तित्व.... महासागर स्वरूपात.
३. तिसरा दिवस ~~ पृथ्वीपासून चन्द्र अलग.... वनस्पती उगवू लागल्या.
आणि
४. चौथा दिवस ~~ इथे पृथ्वीला "सूर्याचे दर्शन" झाले.... चन्द्र दिसला आणि तारकामंडळ शांतपणे पृथ्वीवरून पाहता येऊ लागले.
असा हा "चौथ्या दिवशी सूर्य जन्मला..."चा भावार्थ.... सूर्य तारकामंडळात होताच.... "पृथ्वीला तो चौथ्या दिवशी दिसला"....इतपतच त्याचा अर्थ.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
नाय पटले
(बादवे मी बायबल वाचले आहे.
)
असा हा "चौथ्या दिवशी सूर्य जन्मला..."चा भावार्थ.... सूर्य तारकामंडळात होताच.... "पृथ्वीला तो चौथ्या दिवशी दिसला"....इतपतच त्याचा अर्थ.
नाय पटेश.
पहिला मुद्दा. सूर्य तारकामंडळात होताच हे बरोबर नाही. चौथ्या दिवशी सूर्य 'मिर्माणं केला' असा उल्लेख आहे. त्यापूर्वी तो अस्तित्वात नव्हताच.
दुसरा मुद्दा: 'दिवस' ही संकल्पना ग्रहसापेक्ष आहे ना. मग पृथ्वीवर जेव्हा सूर्य दिसू लागतो तेव्हा आपला दिवस उजाडतो. (त्यामुळे तुमचा मुद्दा ग्राह्य धरला तरीही पहिले तीन Not Counted here!) गुरूचा दिवस अन्य वेळी सुरू होतो नि त्याची - पृथ्वीवरील कालमापनासापेक्ष - लांबी पृथ्वीवरील दिवसापेक्षा जास्त्/कमी असू शकते. म्हणून आमचा प्रश्न होता की जे तीन 'दिवस' म्हणता ते कुठल्या ग्रहावरचे, की त्या आकाशातल्या बापाचे स्वतःचे वेगळे टाईम-स्केल आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
"...आकाशातल्या बापाचे स्वतःचे
"...आकाशातल्या बापाचे स्वतःचे वेगळे टाईम-स्केल आहे...."
जेनेसिसला मानले तर त्याचे स्वतःचे असे काही निश्चित आराखडे आहेत, ज्याचा आपल्या हिंदु कल्पना आणि व्याख्या यांच्याशी ताडता विचित्र वाटणारच. पण असे प्रत्येक धार्मिक सतरंजीवर त्या त्या जातीचे पेले मांडलेले असतातच. त्या प्याल्यातील द्रवाची चव ही आपल्या जिभेला भावेलच असे नाही.
मुळात "हिब्रु" भाषेतील कित्येक संज्ञा ह्या कालानुरुप बदलत गेल्या आहेत. एकेकाळी 'पृथ्वीवर tehom पसरले होते' या हिब्रु कल्पनेचा अर्थ "पृथ्वीवर पाणी पसरले होते" हा होता, तो गेल्या शतकात 'पृथ्वीवर मेघ पसरले होते' असा झाला. अशाच बाबी आपण जे बायबल प्रमाण म्हणून हाती घेतो त्याचे आकलन भाषांतरकाराच्या मगदुरी प्रमाणे होत असते.
मी न्यूमन तपासला अन् त्यात चार दिवसाच्या घडामोडी अशा दिल्या आहेत.... त्याही थोडक्यात देतो :
१ला दिवस ::
After further contraction and heating, however, the whole cloud lights up and the observer immersed in light, can see no darkness anywhere.... the planet earth becomes a solid body at this point in the Genesis account and not before.
२रा दिवस ::
"the atmospheric layer immediately above the ocean the troposphere. This is the time that God established the water cycle.
३रा दिवस ::
basin formed for the ocean when the moon pulled away from the earth, "leaving a super-continent on the opposing side of the earth.
४था दिवस ::
the first appearance of the sun, moon, and stars to our hypothetical earth bound observer on the occasion of the break up of the earth's cloud cover.
आता इथे "the first appearance of the sun" याची संगती अशी लावायची का की "चौथ्या दिवशी सूर्य निर्माण केला"? ~~ "अपिअरन्स" ही संज्ञा स्वयंस्पष्ट आहे असे माझे मत आहे. ~~ ओव्हर टु यू, सर !
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
हम्म
मी न्यूमन वाचला नाही. मी जी बायबलची इंग्रजी प्रत वाचली त्यात '...God created sun...' अशीच वाक्यरचना होती. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या 'ओअॅसिसच्या शोधात' या पुस्तकात त्यांनीही 'सूर्यच मुळी चौथ्या दिवशी जन्मला' असे वाक्य लिहिले आहे.
Appearance याचा अर्थ 'अवतरला' वा प्रगट झाला असाही घेता येतो.
क्षणभर वादासाठी असे मानू या की तुम्ही म्हणता तसा अर्थ अपेक्षित आहे. आता आपल्याला आणखी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल तो असा की तुम्ही म्हणता तसा सूर्य जर आधीच अस्तित्वात होता तर तो स्वयंसिद्ध अस्तित्वात होता की देवाने त्याला आधी निर्माण केला होता? आता स्वयसिद्ध अस्तित्व मानावे तर अनावस्था प्रसंग ओढवतो, कारण मग जगातील एक मह्त्वाचा घटक ईश्वरनिर्मित नाही असे ठरते. तर देवाने आधीच निर्माण केला असे मानले तर मग केव्हा हा प्रश्न राहतो. पहिल्या तीन दिवसात निर्मिलेल्या गोष्टीत याचा उल्लेख नाही.
आता जरा सूर्यदर्शन नि दिवस संकल्पना यांना वेगळे करूया. माझा मूळ प्रश्न जरा नेमका करतो तो असा की 'पहिल्या तीन दिवसात एक दिवस संपला नि दुसरा सुरू झाला किंवा दुसरा संपला नि तिसरा सुरू झाला हे कसे ठरले, दोन पाठोपाठच्या दिवसांना वेगळे करणारी रेघ कुठल्या निकषावर/घटनेवर मारली गेली?'
आता सूर्य जन्मला का दिसला या मुद्यापलिकडे जाऊन आपण फक्त दिवस या संकल्पनेबद्दल बोलतोय. आता ठीक आहे ना?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
संकल्पना....
".......आपण फक्त दिवस या संकल्पनेबद्दल बोलतोय..."
ठीक आहे. त्यानुसार मीदेखील पुनश्च याकरीता न्यूमन प्रत पाहतो.... (हे अशासाठी म्हणतोय की, "बायबल"चे प्रत्येक 'व्हर्शन' हे जो लिहितो तो आपल्या तर्कसंगतीप्रमाने करत असतो आणि त्यानुसारच त्याची शब्दयोजना असते, तसेच वाचक त्याला जो अर्थ अभिप्रेत होतो तोच घेतो. आता Appearance याचा अर्थ 'अवतरला' असा घेतला तर मग "Descend" चा अर्थ देखील तोच आहे....आणि जो ईश्वरी संकल्पनांना फार जवळचा आहे. तेव्हा त्या लेखकाने Appearance चा आसरा का घेतला याचे भूत नजरेसमोर नाचू लागते. अर्थात हा आपल्याच बुद्धीचा खेळ आहे जो आपणास वाळवंटात सोडतो आणि सांगतो, "शोधा आता तो पाण्याचा झरा...!"
या संदर्भात धागाकर्त्याचीही मत काय आहे, असेल, हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे.... कारण "ऑनर गोज टु हिज अकौंट..."
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
का ही ही. बायबलमधील कल्पनांना
का ही ही. बायबलमधील कल्पनांना तत्वज्ञानाच्या स्वरुपातच राहु द्या, विज्ञानाधारीत स्पष्टीकरण करण्याची वा शोधण्याची गरजच काय ? असो.
असेच म्हणतो
का ही ही. बायबलमधील कल्पनांना तत्वज्ञानाच्या स्वरुपातच राहु द्या, विज्ञानाधारीत स्पष्टीकरण करण्याची वा शोधण्याची गरजच काय ?
असेच म्हणतो. गॅलीलिओचे काय झाले माहीत आहे ना?
बाकी हा लेखही चांगला जमला आहे. एक प्रश्नः
जीवनवृक्ष व बर्यावाईटाचे ज्ञान देणारे वृक्ष बागेच्या मध्यभागी लावले.
आठवणीप्रमाणे त्याचे फळ खाल्ले हे पहीले पाप (sin) होते. पण जर देवाला मनुष्याचा बर्यावाईटाचे ज्ञान देयचे नव्हते तर (१) माणसाची निर्मिती का केली? अथवा (२) असे वृक्ष असलेली सृष्टी का निर्माण केली? (तुने, काहे को दुनीया बनाई?)
विकास देशपांडे
ओ दादा
मी ही बायबलची व्याख्याच विचारतो आहे. प्रश्न नीट समजण्यासाठी उदाहरण म्हणून पृथ्वी/ग्रुरूचे दिवसांचा उल्लेख केला आहे.
चला ते सोडून द्या. फक्त प्रश्न पुन्हा विचारतो
पहिले तीन दिवस एकापासून दुसरा वेगळा कसा ओळखणार. एक संपला नि दुसरा सुरू झाला हे कसे ठरविले (बायबलमधेच)?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
महत्वपुर्ण प्रश्न. काही
महत्वपुर्ण प्रश्न.
काही प्रश्न महत्वपुर्ण असतात तर काही उत्तरे महत्वपुर्ण. त्याच नियमाप्रमाणे तुमचा प्रश्न महत्वपुर्ण आहे व त्याच नियमाप्रमाणे त्याचे उत्तर देखील महत्वपुर्ण असेल अशी अपेक्षा...... मला उत्तर हवे आहे ह्या प्रश्नाचे की दिवस पहिला कुठला हे कसे ठरले ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वाचत आहे. उत्तम चालु आहे
वाचत आहे. उत्तम चालु आहे
बायबल म्हणजे लहान मुलांच्या
बायबल म्हणजे लहान मुलांच्या गोष्टिन्पेक्शाही बालिश वाटतय.
आपल्याकडच पंचतंत्र सुद्धा यापेक्षा जास्त प्रगल्भ आहे.
(आमच्याकडे सर्व प्रकारच्या लेखांना झोडपून मिळेल)
हम्म
मग तुम्हाला पंचतंत्र वाचायची गरज आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
जेनेसिसची चांगली ओळख
जेनेसिसमध्ये हा भाग खूप पूर्वी वाचल्याचं आठवतंय. प्रत्येक धर्माचा पाया म्हणून त्याचं एक स्वतंत्र उत्पत्ती-तत्वज्ञान (कॉस्मॉलॉजी) असतं. कोण्यातरी अद्भूत शक्तीने हे विश्व निर्माण केलं हा सर्वसाधारण सारांश.
मात्र धर्म निर्माण होताना हे तत्वज्ञान आधी व त्यानंतरच सर्व काही, हे कितपत बरोबर असा प्रश्न पडतो. धर्माला जर शरीराची उपमा दिली तर अशा तत्वज्ञानाला त्याचा मेंदू म्हणता येईल. पण प्राण्यांच्या उत्क्रांतीत जसे मेंदूविरहित प्राणी प्रथम निर्माण झाले (अजूनही टिकून आहेत) तसेच सुरूवातीचे काही 'धर्म' तत्वज्ञानविरहितही असू शकतील. तेही काळानुरुप उत्क्रांत होत शेवटी या 'प्रगत' अवस्थेपर्यंत पोचले असतील.
असं काहीतरी तत्वज्ञान असलेल्या व ते सर्वसाधारणपणे मान्य करून, त्या अनुषंगाने सांगितलेल्या रुढी पाळणारे समाज म्हणजे त्या धर्माचे अनुयायी, व ते जे काही पाळतात तो विशिष्ट धर्म अशी धर्माची व्याख्याच केली तर गोष्ट निराळी.
राजेश
तत्त्वज्ञान...!!
"....धर्माला जर शरीराची उपमा दिली तर अशा तत्वज्ञानाला त्याचा मेंदू म्हणता येईल...."
प्रत्येक धर्माची सूत्रे अलग अलग असल्याने प्रत्य्क्ष "धर्म" आणि त्याचे "तत्वज्ञान" यांची वास्तवता काय आहे हे ठरविणे धर्मपंडितांच्या दृष्टीनेदेखील आव्हानात्मक कार्य होते/आहे... पण प्रत्यक्षात मात्र शब्दांचा "भुलभुलैय्या" करून केवळ चमत्काराकडे लक्ष केन्द्रीत केले जाते व मूळ प्रश्न कित्येक योजने मागे पडतो. मानवी प्रगतीचा इतिहास असे सांगतो की, मानव प्रत्येक युगात (अगदी अश्मयुगापासून...) आकाश किंवा दुसर्या शब्दांत "वरच्या" जगासंबंधी आपल्या निरीक्षणानुसार अथवा (सोयिस्कर...) अनुमानानुसार विभिन्न कल्पना मांडित आला आहे, त्यात तत्त्वज्ञानाला बरेच स्वातंत्र्य दिले गेले आहे... परंतु पिढी दरपिढी या कल्पना नेहमी बदलत राहिल्या आहे.... त्यामुळे अर्थातच "धर्मा" चा अभ्यासही...दरवेळी वेगळ्या चष्म्यातून...!!
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
धर्म आणि तत्वज्ञान
चांगलि लेखमाला. धर्म आणि तत्वज्ञानाचा आभ्यास ह खुप रोचक (ईंटरेस्टिग) भाग आहे
धर्म आणि धर्मग्रंन्थ आस्तिस्त्वात आले तेंव्हा काहि राजकिय व सामजिक परिस्तिथि होति. ( उदा मानवसमुह, समुहांचे आपसातिल संमंध,त्यांचि संपत्ति, राजकिय परिस्थिति, समुहांचे स्थलांतर इ) त्याच्या अनुशंगाने (वैयक्तिक जिवन, सामाजिक नियम, संपत्तिचे वाटप इ) नियमावलि बनत गेलि. त्यात स्रुष्टिचा जनक/ महासत्ता राबवणारा- देव्/अल्ला/गौड संकल्पना आलि असावि. मग उपासनापद्धति आल्या असाव्यात.
प्रत्येक धर्मात काहि भाग आहेत
चमक्तार
तत्वज्ञान- देव, पाप , पुण्य, स्वर्ग, नरक, उपासना , त्याचे फायदे, आध्यात्म, सण, रुढि
नियमावली- वैयक्तिक जिवन, लग्नसंस्था, संपत्तिचे वाटप, सामाजिक संकेत, कालगणना
विद्यान- भौगोलिक (नकाशे, विशिष्ट पवित्र/ अपवित्र जागा, ग्रह/ तारे, पोर्णिमा/ आमवस्या, विश्वनिर्मिति), खाद्यसंकेत (खाण्याचे पदार्थ, सवयि, फायदे, तोटे) आरोग्य
अर्थकारण इ.
तत्कालिन परिस्थितिचा धर्मग्रंन्थावर प्रभाव आसणे सहाजिक आहे. पण आता परिस्थिति खुप बदललि आहे
जसेजसे मानवानि स्थलांतर केले, तसे त्यात बदल झाले/ नविन ग्रंथ निर्माण झाले. पण तरिहि बरेच धर्मग्रंन्थ कित्येक शतके जुने आहेत, त्यात मागच्या २-३ शतकात काहि बदल झाले आहेत हा प्रश्न आहे
आधुनिक काळात धर्माचे स्थान मुख्यत्वे तत्वज्ञान व काहि प्रमाणात नियमावली एवढेच असले पाहिजे. स्थलांतर व विद्यानातिल प्रगतिमुळे इतर भाग चुकिचे/ अनावश्यक असु शकतात.
तसेच धर्म आणी देश/ राज्यसंस्था वेगळ्या झाल्याने, सामाजिक, आर्थिक व काहि प्रमाणात वैयक्तिक आचरणाचि नियमावलि धर्माधारित न राहता , राज्यसंस्थेवर आधारित होत आहे. हा बदल होत रहाणार
चांगले ते घ्यावे (उदा- योग, प्राणायाम.) पण आंधळेपणा नसावा.
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
वाचतोय
पण न रहावून एक चित्रफीत बघाच
जबर्या!! हा रिकी भारीच माणूस
जबर्या!! हा रिकी भारीच माणूस आहे!! एकेक शोज मस्तच असतात!!

पहिल्या मिनिटातच जिंकतो साला...
>> आय फाऊंड अ डस्टी ओल्ड बुक इन द लायब्ररी. इट्स कोटेड द बायबल!!
या वाक्यानंतरचे त्याचे एक्स्प्रेशन्स सुद्धा भारी आहेत!!
आणि 'स्वर्गाची आणि पृथ्वीची निर्मिती अंधारात झाली' हे भारीच!!

पुरूष आणि स्त्री ची निर्मिती =====>> फक्त आणि फक्त ==>>
स्नेक वॉज अ मिस्टेक.. अॅन्ड ही वॉज अ टॉकिंग स्नेक.. अॅन्ड ही स्पीक्स इंग्लिश!! चॅप्टर थ्री आणि सापावरची टिप्पणी फक्त आणि फक्त जबर्या!!
साला वाक्यावाक्याला नुसता हशा आणि टाळ्या!! धन्यु सहजराव!!