प्रेम - १
माहीत नाही ज्याने बनवलं ह्या मानवाला त्याने कुठली चुक केली असेल ती. एक कुठले तरी रसायन जास्त झाले व एका उद्रेकाचा जन्म झाला. मनाच्य गुंतागुंतीचा जन्म झाला. सायन्स म्हणतं म्हणे प्रेम व प्रेम भावना ही एका रसायनामुळे निर्माण होते हा शोध लावणारा देखील थोडा सटकलेला असावा नाहीतर त्यांने कधी कोणावर प्रेम केलेच नसेल नाही तर ह्दयात होणार्या हलचालीला व कुठेतरी मनात उठणार्या तरंगासाठी तो कुठल्यातरी अनामिक रसायनाला जबाबदार ठरवून मोकळा झालाच नसता. असो, कोणी काही म्हणो माझे मत नक्की आहे की प्रेमाचे पहिले तरंग हे ह्दयात उठतात व त्याचा अंत देखील तेथेच होतो. मेंदू, रसायन, शास्त्र, विज्ञान ह्या पलिकडची ही गोष्ट आहे नाही का ?
प्रेमभाव हा सहज सुंदर असतो त्याला कुठला मुलामा चढलेला आवडत नाही अथवा तो मग टिकत नाही, खोटं प्रेम हे काही क्षणात संपत अगदी पाण्यामध्ये मीठ विरघळावे असे. प्रेम हे व्यक्ती सापेक्ष देखील नसतं, प्रेम हे स्वभाव सापेक्ष असतं कोणाचा तरी स्वभाव आवडला म्हणुन प्रेम होतं, प्रेम भावना ही मनात निर्माण, ह्दयात निर्माण होते, एखाद्याचा स्वभाव जर आपल्याला आवडत नसेल तर १००% त्याच्या बद्दल आपल्या मनात १% देखील प्रेम निर्माण होणार नाही, उलट त्याच्या योग्य गोष्टीमध्ये देखील चुका आपण शोधू लागतो हा मनुष्य स्वभाव आहे ह्याला कुठलेच औषध लागू होत नाही. ह्याच्या उलट एखाद्याचा स्वभाव जर आपल्याला आवडत असेल तर त्याच्या शंभर चुका आपण हसत हसत माफ करतो / करु शकतो. प्रेमाने टाकलेल्या एका कटाक्षामुळे जीव घायाळ होऊन जातो व येथे मग चुकांचा प्रश्नच येत नाही कारण सर्व काही समोरच्य व्यक्तीचे बरोबर वाट्त असतं, ती व्यक्ती देखील कधी चुकू शकते ह्यावर आपला विश्वासच नसतो व मग तेव्हा थोडी अडचण निर्माण होते प्रेमाबरोबरच एक प्रकारचा अहंकार देखील तुमच्या मनात प्रवेश करतो.
प्रेमाची गोष्ट तुला काय सांगावी मी
तुझ्या-माझ्या शब्दातून व्यक्त होते ती
तीचे / त्याचे माझ्यावर एवढं प्रेम आहे... ती / तो माझ्यासाठी जीव ओवाळून टाकेल, ती / तो माझ्यावर एवढं प्रेम करतो... एका निर्वाज्य प्रेमाची आपण किंमत लावू लागतो व येथे मग गणित गडबडू लागतं, शेवटी किती ही झाले तरी दोन वेगवेगळे जीव, दोन वेगवेगळ्या अवस्था, दोन वेगवेगळ्या इच्छा, दोन वेगवेगळ्या जीवन पध्दती ! हे सगळे कळूपर्यंत आपण काही पाऊले पुढे गेलेलो असतोच समोरच्याला आपली व त्याची आपल्याला सवय झालेली असते, कपडे खरेदीपासून किराना स्टोअरमध्ये खाण्याचे सामान घेण्यामध्ये देखील त्याला / तीला काय आवडते ह्याचा विचार करु लागलेलो असतो.
जगणे मरणे तुझ्यासाठी
हा शेवटा श्वास देखील तुझ्यासाठी
कणकण शरिराचा हा
गहाण ठेवला मी तुझ्यासाठी
अशी ही अवस्था, समोरच्या व्यक्तीचा भुतकाळ / भविष्यकाळ ह्याचा काडीमात्र देखील विचार करावा असे वाटत नाही, समोरचा सांगण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी माझा तुझावर पुर्ण विश्वास आहे ह्या वाक्याने बोळवणी केली जाते. समोरचा मनातून हरकून उठतो म्हणतो किती प्रेम आहे तीचे / त्याचे माझ्यावर अगदी पाण्यासारखं निर्भेळ ! ह्या सगळ्या भावना सागर लाटांना देखील लाजवतील ह्या वेगाने घडत असतात. सुखासुखीचे चार दिवस हसत खेळत निघून जातात. मग खरी अडचण चालू होते, खरा स्वभाव दिसू लागतो , ज्या कधीच दिसल्या नाहीत त्या चुका देखील जाणवू लागतात. मग प्रेम भावना हळू हळू संपुष्टात येऊ लागते छोट्या छोट्या गोष्टीवरुन खटके उडू लागतात व वातावरण तंग होऊ लागते अश्यावेळी एक कोण तरी नक्कीच समजुतदार हवा. जर असे झाले नाही तर मग समुद्राकडेच्या वाळूमध्ये उभे राहीलेल्या घरासारखं एखाद्या मोठ्या लाटेच्या भेट चढतं त्या पध्दतीने एकदम अचानक प्रेम भावनेचा अंत होतो, ह्यात चुक कोणाची हा मुद्दाच राहत नाही पण एकाला नक्कीच आश्रुला जवळ करावे लागते कारण त्यांने कोठेतरी नक्कीच जीवपाड प्रेम केलेलं असतं म्हणून त्याचं / तीचे दुखः आश्रु वाटे बाहेर पडतं.
ओय राजू प्यार ना करियो डरियो दिल टूट जाता है
चाहत की बात ना करियो डरियो दिल टूट जाता है
दिल दीवाना तू न आना दिल की बातों में सोच ले
ओय राजू प्यार ...मैने अपने दिल को मेरे दिल ने मुझको रोका
प्यार है क्या इक मस्त हवा का आता जाता झोंका
जान गंवा बैठा जिसने खेला ये खेल दिलों का
ओय राजू प्यार ...पहले पहले प्यार की अच्छी लगती हैं बरसातें
उसके बाद न पूछो कैसे कटती हैं रातें
रस्ते में रह जाती हैं अरमानों की बारातें
ओय राजू प्यार ...प्यार में अपनी जान भी हो जाती है चीज़ पराई
दिल में बसने वाले अक्सर होते हैं हरजाई
हमने भी ये तब जाना जब चोट जिगर पे खाई
ओय राजू प्यार ...
क्रमशः

.jpg)
वा!!!
राधा
||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||
प्रेमाची गोष्ट तुला काय
प्रेमाची गोष्ट तुला काय सांगावी मी
तुझ्या-माझ्या शब्दातून व्यक्त होते ती
वाह!!!!!! सुंदर
राजे छान लेख....
लेख सुंदर............ जगणे
लेख सुंदर............
जगणे मरणे तुझ्यासाठी
हा शेवटा श्वास देखील तुझ्यासाठी
कणकण शरिराचा हा
गहाण ठेवला मी तुझ्यासाठी
क्या बात है राजा टच एकदम..............
थोडीशी भर माझ्याकडूनही
प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत
अडीच अक्षरा॑चा खेळ सारा तेच गणित फार अवघड असत..
प्रेम करण जितक सोप तितकच अवघड पण, तरीही मला आजपर्यंत एक गोष्ट समजली नाहीये प्रेम करता कस येत??? तो काय अभ्यास आहे करायला, शिकायला ??? जाणिव, भावना आहे ती. जगाच्या दुस-या तोकाला कुठेतरी असणा-या माणसापासून अगदी शेजारी बसलेल्या व्यक्तीपर्यंत कोणाबद्दलही प्रेम वाटु शकत.
प्रेम हे प्रेम असत, त्याला खर, खोट ही लेबल लावायची कशाला?? आपण माणसांना ना लेबल लावायची सवयच फार, आणि मेजरींज टेप लावायची, याच / हीच किती प्रेम अरे करायचय काय?? अस सेंटीमिटर मिलीमिटर मध्ये मोजायच का प्रेम???
तुमच्या एका मताशी मी अजिबात सहमत नाहीये राजे !
प्रेम बदलू शकत??? अशक्य गोष्ट आहे , प्रूव्ह करून दाखव आणि जर ते बदलत असेल तर ते प्रेम नव्हेच, ते होत आकर्षण जे क्षणिक असत. वास्तवाच भान येण, चुका दिसू लागंण या गोष्टी होतात ना ते या आकर्षणाचा भर ओसरल्यावर.
पाडगावकर काका म्हणतात तस "प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत",
नाही हो कोणाच काहीच सेम नसत प्रत्येकाने आपापल्या अनुभवावर चढायची पायरी आहे ती. जमल तर बघा नाहीतर द्या सोडून.........पण "प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे" हे मात्र सत्य
प्रेम कशाशी खातात
चुचु, प्रेम खायची वस्तू
चुचु,
प्रेम खायची वस्तू नाहीये.......अग तुला शिकवून शिकवून दमले मी आता
(विषय दिलेला नाही)
काही नाही मिळाले की मिपा आणि
काही नाही मिळाले की मिपा आणि मिमकरांच्या डोक्याबरोबर ;-)
छान टेस्ट येते.
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
किताबो मे छपते है चाहत के
किताबो मे छपते है चाहत के किस्से
हकीगत की दुनियामे चाहत नही है....