बॉम्बस्फोट आणि मी - भाग ४ (अंतिम)
रात्री घरी येवुन मावशीला सर्व कल्पना देवुन उद्या कदाचित माझ्यावर कारवाई होईल असे तिला सांगुन ठेवले. दुस-या दिवशी सकाळी कंपनीत निघालो. जे होईल त्याला तोंड देण्याची तयारी करुनच चाललो होतो. स्टेशनवर उतरुन
नेहमीच्याच रस्त्याने चालता चालता विचार करत करत चाललो होतो. अचानक पाठीवर हात पडला अन 'अरे नानाऽ. मागुन तुला आवाज देतोय? लक्ष कुठाय तुझे आज?' तो नवीन होता.
नवीन त्याच बाजुने जात असतांना रस्त्यात आमची चर्चा सुरु झाली. त्याच्या बरोबर मी त्याच्या औफिसात गेलो. तिथे त्याला सर्व कहाणी सांगितली. मला आलेल्या अडचणींमुळे तो पण खुप विचारात पडला. त्याने मला पैशाची मदत
करायचे कबुल केले. तिथुन त्याने स्वतः माझ्या कंपनीत फोन करुन पैसे मिळतील, नानाच्या विरुद्ध कारवाई करु नका असे मालकांना सांगितले. जाधवने तिकडे मालकांना पोलिसात फिर्याद द्याच असा लकडा लावला होता. नवीनमुळे
मालक शांत बसले. नवीनचे आभार मानुन त्याच्याकडुन पैसे घेवुन मी कंपनीत गेलो. सरळ मालकांकडे जावुन पैसे दिले व आता मी आपल्याकडे काम करणार नाही माझा हिशोब करुन मोकळे करा असे सांगितले.
उरलेले पैसे घेवुन व माझा हिशेब करुन निघालो असतांना सुनील आला. त्याने एक पुडके व चिठ्ठी दिली. चिठ्ठी गीताने लिहिली होती.
'नाना, तु पैशाची अफरातफर केलीस हे मला समजले. तु कधी कधी खोटे बोलायचास, टोपी लावायचास पण असे काही करशील असे वाटले नव्हते. माझा निर्णय बरोबर आहे असे आता मला वाटत आहे. तु इतका फ्रॉड माणुस असशील असे मला कधीच वाटले नव्हते. सुनील बरोबर तु मला लिहिलेले पत्र देत आहे. मी तुला लिहिलेली पत्रे त्याच्याकडे दे. माझा तुझ्यावर आता अजिबात विश्वास नाही. आणि तुझ्यासारख्या माणसाबरोबर मला आता मैत्री पण ठेवायची नाही.'
चिठ्ठीच्या खाली नाव पण नव्हते. अक्षरावरुन ते गीतेने लिहिले आहे हे लक्षात आले. मी शांतपणे माझ्या ड्रावर मधुन तिची पत्रे काढुन सुनील कडे दिले. माझे बाकिचे काही सामान होते ते काढुन किल्लि एच आर असिस्टंटला देवुन टाकली. जाधव माझ्याकडे पहात होता.
कंपनीकडे शांतपणे एकदा पाहीले अन मुकाट निघालो. परत नवीनकडे गेलो. मिळालेल्या पैशातुन त्याचे काही पैसे परत दिले व बाकि मी गावी जावुन देतो असे सांगितले. नवीनने काही काळजी करु नको. जमतील तसे दे असे सांगितले.
त्याच रात्री मी मुंबई सोडुन गावी परत गेलो.
दोनचार दिवसानंतर जरा मुड नीट करावा म्हणुन परत जुन्या मित्रमैत्रिणींना भेटायला गेलो. अनेकांना माझी हकीगत कळली होती. काहींनी कोरडी सहानुभुती दाखविली तर काहींनी पाठ फिरवली. मला समजले. हळूहळू मित्रपरिवार कमी झाला. दोन चारच मित्र नेहमी भेटत राहीले.
एक दिवस अचानक फिरतांना शिल्पा भेटली. शिल्पा दोन बैच मागे होती. हाय हेलो झाल्यावर तीने तिच्या वडिलांचे कार्ड दिले. गावाबाहेर एमआयडीसीत फैक्टरी होती. त्यांचा संगणकीकरण करण्याचा विचार होता. मी जावुन भेटलो.
परत नोकरी सुरु झाली.
बघता बघता सहा महीने उलटुन गेले. मध्यंतरीच्या काळात थोडे थोडे करुन मी नवीनचे सगळे पैसे चुकते केले होते. माझे वेगळे स्वतःचे आयुष्य सुरु झाले होते. मागील आठवणींचा विसर पडत चालला होता. कधी कधी कढ येत असत पण हळुहळू तीव्रता कमी होवु लागली होती. घरी कोणीही त्याविषयाची चर्चा निदान माझ्यादेखत करत नसत.
असेच एक दिवस अचानक कंपनीत असतांना नविनचा फोन आला. 'नाना. अरे फार महत्वाचे काम आहे. एकदोन दिवसांत मुंबईला येशील का?'
'काम? काय काम?'
'नाही. ते इथे आल्यावर समक्षच बोलता येईल. तु ये. '
'ठीक आहे. सुट्टी मिळाली तर उद्या येईन नाहितर परवा'
'चालेल'
फोन कट झाला. मी दिवसभर विचारात होतो काय काम असु शकेल. शेवटी विचार करणे बंद केले व काम करत बसलो.
सुट्टी मंजुर झाल्याने दुस-या दिवशी दुपारी मी नवीनकडे गेलो. आत त्याच्या केबिनमधे बसुन गप्पा मारता मारता नवीनने जी माहीती दिली त्यामुळे मी पार चक्रावुन गेलो.
'नाना. तुला माहीत्येय का? तु कसा अडकलास?'
'नाही.' मी
'तो कुलकर्णी नडला तुला. त्याने जाधवला फितवला. तुला अडकवुन जाधव आता कुलकर्णीकडे काम करत आहे. आणि गीता व कुलकर्णी पुढच्या आठवड्यात लग्न करत आहेत'
'काय? कुलकर्णीने? आणि गीता त्या कुलकर्ण्याशी?' मी ओरडलो.
'हो. अरे गीतेच्या मनातला भ्रम त्या भडव्याने बरोबर ओळखला व त्याने भरवुन दिले तुझ्याविरुद्ध. साल्याने बायको गेल्याच्या सहानुभुतीचा गैरफायदा मिळवला अन तुला थर्ड बसला'
'आईशप्पथ. अन त्या जाधवला काय फायदा?'
'का नाही? अरे सगळे पैसे खावुन बसला वर अधीक पगारावर मैनेजर म्हणुन कुलकर्णीकडे'
बराच वेळ मी नुसताच विचार करत बसलो. काय करावे अन काय नाही...
'मग काय विचार करतोयस...' नवीन
'कसला..' मी
'हेच. आता काय करायचे?'
'काय करणार? साला जावुन त्याची मुंडी पिरगाळून टाकतो..'
'त्याने काय होणार? तु आत जाशील. गीता काय येणार आहे तुरुंगात डब्बा घेवुन रोज तुझ्यासाठी ? दे सोडुन. ८ दिवसांत लग्न आहे त्यांचे. तु आता गीतेचा विचार सोडुन दे. कुलकर्णीचे काय करायचे ते विचार कर.'
'काय करु?'
'त्याचाच खेळ त्याच्याशी खेळ. त्याच्याच हत्यारांने.'
मनात विचार सुरु झाला. कुलकर्णीचा सर्वनाश करायचा. सुड घ्यायचा.... सुड.
*****************
'अरे बम्मन फिरसे खो गये सपनोमे. चलो खाना खाने. बाद मे काम के लिये बैठेंगे' नविन पाठीवर थाप मारुन म्हणाला. कुलकर्णी टीव्हीवर बोलतच होता. एक मिनीट त्याला पाहुन मी उठलो.
चालता चालता परत मनात तरंग येवु लागले.
त्या दिवसापासुन प्रेम कधीच कुणावर जडले नाही.....
खेळ सुरू झाला....
लख्या पारधी...... जीवन्या तांत्रिक ......अखलाख...... नाजनीन.....
अन कोण कोण भेटले......
टेंडर्स.....लेनदेन....अपघात...
'बेटा तेरी जिंदगीका ये मकसद नही, तुम संन्यासी बनोगे' म्हणणारा बाबाजी....
गीतेची स्वतःला समर्पणाची तयारी....
कधी मी जिंकलो ...
कधी हरलो....
सलग आठ वर्षे..
एकच ध्यास...सुड...
हत्यार एकच...पैसा.
कधी मानवनिर्मित संकटे...
नियतीच्या हातातील जणु खेळणे बनुन नशा चढली होती....
आजही मी जरी शेवटची खेळी केली असली तर मी जिंकलोय की हरलोय हे सांगता येत नाही...
नियती जिंकली हेच नक्की !!!

.jpg)
मस्त....
पण सूड कसा घेतला तो भाग पण थरारक झाला असता. अगदी नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस पद्धतीचं आपल्या मातीतलं काही वाचायला आवडलं असतं.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
+१
>>> पण सूड कसा घेतला तो भाग पण थरारक झाला असता
--- सहमत आहे. पुपे म्हणतात तसे हा भाग अधिक विस्ताराने वाचायला आवडला असता.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
च्यामायला..... ह्या नानाला
च्यामायला.....
ह्या नानाला लिही म्हणून सांगणे म्हणजे देखील अपराध आहे... राव !
झिंणझीण्या आणतो डोक्याला....
लिहीत रहा रे व वाट मिर्या माझ्या डोक्यावर
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
नाना..........मस्तच.......एक्
नाना..........मस्तच.......एक्दम जबरा
लै भारी!!
लै भारी!!
नानुस, कथा छान आहे रे..
नानुस,
कथा छान आहे रे.. आवडली. मस्तंच. बाकी मला एक सांग की चौथा भाग जरा विस्तृत कधी लिहीणार आहेस?
-पुण्याचे पेशवे
+१
+१
+२
+२
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
+ ३
+ ३
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
नाना खरच
हा भाग घाई घाईत संपवल्यासार्खा वाटला
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
त्या दिवसापासुन प्रेम कधीच
त्या दिवसापासुन प्रेम कधीच कुणावर जडले नाही.....
हे वाक्य मनाला भिडले
नाना, खरेच अवलिया आहात. कुठे
नाना, खरेच अवलिया आहात. कुठे थांबायचे हे पक्के कळाले आहे तुम्हाला. हा मोह आवरणं ज्यादिवशी जमेल मला त्यादिवशी तुम्हाला गुरूदक्षीणा आणुन देइन.
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
सगळे भाग वाचले छान लिहले आहे.
सगळे भाग वाचले छान लिहले आहे.
खूप सुन्दर
पण शेवटचा भाग विस्त्रुतपणे लिहिला असता तर आणखी मजा आली असती. एकदम संपल्यासारखं वाटलं.