"निर्मल" कविता संग्रह
नमस्कार मीमकर वाचकहो...!
तसा मी पण येथे येउन नियमित वाचन करतो. पण राजे यांच्या आग्रहामुळे माझ्या वडिलांच्या काही निवडक कविता येथे प्रकाशित करत आहे. या कविता नुकत्याच प्रकाशित झालेल्या "निर्मल" कविता संग्रहातील आहेत. वाचकांना त्या नक्कीच आवडतील अशी आशा आहे.
ओळख
ओळखा पाहू मी कोण?
ओळखतात मला सारेजण
माझ्याशिवाय चालत नाही कोण?
पैशाच्या आधारे, ओळखीच्या आधारे
होऊन पहचान होती सोयरे
संग एखाद्याचा वाईट रे
एकदाच मी तिच्याशी बोललो
जीवनाचा भागच बनलो
अनेकांशी कित्येकदा बोलले
क्षणातच विसरुन गेले
अशी मी सार्यांनाच ओळखते
कित्येकांना उगीचच खेळविते
जीवनात रंग भरते
'ओळख' च मी सार्यांना भुलविते..!
-- दत्तकुमार --
२२-१२-१९७१ (पंढरी)
.jpg)
{राजे धन्यवाद}
राजे धन्यवाद...!
आभारी आहे.
श्रीवर्धन
{पुस्तक रुपामध्ये प्रकाशीत}
पुस्तक रुपामध्ये प्रकाशीत साहीत्य मीमवर येण्याची ही पहीलीच वेळ.
श्रीवर्धन आभारी आहे आपला मी.
बाकी सर्व कविता देखील आपण येथे प्रकाशीत करत जाऊ.
धन्यवाद.
Hope is a good thing...
{पूर्ण संग्रह अतिशय सुंदर आहे.}
पूर्ण संग्रह अतिशय सुंदर आहे. कविता खूप आवडल्या.
पुस्तकरूपात प्रसिध्द करण्याच्या मीमच्या उपक्रमाचे अभिनंदन
{धन्यवाद}
धन्यवाद सोनाली...!
श्रीवर्धन
{२० कविता ह्या पुस्तकात जमा}
२० कविता ह्या पुस्तकात जमा झाल्या आहेत, अजून होतील.
एकापेक्षा एक अश्या सुंदर कवितांचा हा गुच्छच आहे जो श्रीवर्धन येथे घेऊन आलेले आहेत..
Hope is a good thing...
{छान सुगंधित आहे की कवितांचा}
छान सुगंधित आहे की कवितांचा गुच्छ, राजे!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{+१}
+१
{वा ! छान आहेत कविता.}
वा !
छान आहेत कविता.
{अप्रतिम शब्दांची गुंफण}
श्रीवर्धन,
सुंदर आहेत कविता तुमच्या. शब्दांची गुंफण सुरेख केली आहेत तुम्ही.
पुढच्या कवितासंग्रहांच्या प्रकाशनांसाठी हार्दिक शुभेच्छा
सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{+ १}
+ १
Hope is a good thing...
{धन्यवाद सागर}
धन्यवाद सागर..!
या कविता माझ्या वडिलांच्या आहेत. संग्रहाच्या दुसर्या आवृत्तीचे काम चालु आहे.
श्रीवर्धन
{नवीन आलेल्या कविता देखील छान}
नवीन आलेल्या कविता देखील छान आहेत.
{सर्व कविता वाचल्या सुंदर आहेत}
सर्व कविता वाचल्या सुंदर आहेत एकापेक्षा एक.
{कविता वाचल्या सुंदर आहेत}
कविता वाचल्या सुंदर आहेत
{एकापेक्षा एक अश्या सुंदर}
एकापेक्षा एक अश्या सुंदर कवितांचा हा गुच्छच आहे