लग्न झाल्यानंतर लगोलग बायकोने लॅबरोटरी टेक्निशियनचा (डिएमएलटी) पदवी अभ्यासक्रम केला. दुसरा क्रमांक पटकवून बायकोने आणलेले पदविकेचे प्रमाणपत्र बघितले. 'नागालॅंड' सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेने 'दिल्ली विद्यापीठातर्फे' घेतलेल्या लॅब टेक्निशियनचा तो कोर्स होता. आता सरकारी नोकर्यांच्या बाजारात या सर्टफिकिटला काय किंमत असेल याचा अंदाज सर्टफिकीटचा हा मुखडा पाहूनच आला. फाईलीत जाऊन पडलेलं, हे सर्टफिकिट त्यानंतर उघडलं गेलंच नाही....
---------------------------------------
मध्यंतरी बायकोला एका लेखनाचा चेक आला. साडेतीनशे रूपयांचा. म्हटलं बॅंकेत भरून टाकू. पण तिचं अकाऊंट महाराष्ट्रातल्या एका सहकारी बॅंकेत. इकडे इंदूरला ती बॅंक नाही. मग तिला सुचवलं, आपण एखाद्या राष्ट्रीयकृत बॅंकेत तुझं अकाऊंट उघडून टाकू. या निमित्ताने तरी हे काम होऊन जाईल. हाय काय नि नाय काय.
दुसर्या दिवशी कोपर्यावरच्या महाराष्ट्र बॅंकेत तिला सोडून आलो. संध्याकाळी परतलो तर बायकोचा चेहरा हिरमुसलेला. विचारणा केल्यावर कळलं, बाईसाहेबांकडे फोटो आयडेंटीटी म्हणून सरकारी नियमांत बसेल असे काहीही नाही. वोटर आयडी कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, राष्ट्रीयकृत बॅंकेत खातं असल्यास पासबुक, नोकरीत असल्यास तिथले ओळखपत्र. यापैकी तिच्याकडे खरोखरच काहीही नव्हतं. गेल्या वर्षीच आम्ही लग्नानंतर 'सहा वर्षांनी' का होईना विवाह नोंदणी करून घेतली होती, त्यावर दोघांचे फोटो आहेत. पण ते चालणार नाही, असं बॅंकेचा अधिकारी म्हणाल्याचं, सौभाग्यवतींनी सांगून टाकलं.
आता प्रश्नच उभा राहिला. फोटो आयडेंटीटी कार्ड आणायचं कुठून? कायम स्थलांतरामुळे दोघांची मतदार म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी नोंद झालेली. पण वोटर आयडी कार्ड काही मिळालेलं नव्हतं. किंवा स्वतःहूनही कधी त्यासाठी प्रयत्न केले नव्हते. बायको नोकरीही करत नाही. पॅन कार्ड काढण्याची वेळही कधी आलेली नाही. गाडी चालवता येत नाही, त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सही नाही. आता काय करायचं?
पॅन कार्ड यात सगळ्यात महत्त्वाचं. किमान हे असेल तरी बर्याच गोष्टी होऊन जातील. म्हणून मग आधी पॅन कार्ड काढायसाठी प्रयत्न करायचे ठरवले. पॅन कार्ड काढण्यासाठी चाचपणी करण्यासाठी गेलो.
जवळच पुण्याच्या एका बॅंकेची शाखा होती. तिथे विचारणा केली. पॅन कार्डच्या नियमावलीतही 'मॅरेज सर्टफिकिट'चा पुरावा म्हणून उल्लेख नाही, काऊंटरवरच्या बाईंनी माहिती दिली. मी हताश. नेटवर शोधाशोध केल्यानंतर त्यात पॅन कार्डसाठी ओळख पुरावा म्हणून 'शाळा सोडल्याच्या दाखल्यापासून ते अगदी दहावी, बारावीचं मार्कशीटही चालणार असं लिहिलं होतं. मग त्याचा दाखला देत 'त्यात तरी फोटो कुठे असतो, हा प्रश्न विचारल्यानंतर त्या बाईकडे उत्तर नव्हतं. आमची चर्चा ऐकून बॅंकेचा अधिकारीही तिथे आलेला. बाकीची सगळी कागदपत्र बायकोकडे होतीच. शाळा सोडल्याचा दाखला, दहावी, बारावीचं मार्कशीट, रेशनकार्ड. पण यापैकी कशावरच फोटो नव्हता. त्यांनी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पासपोर्ट यातले काही आहे काय विचारले? आमचा नन्नाचा पाढा होताच. अखेर त्यांना कसेबसे समजावून या सगळ्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी आणि मॅरेज सर्टफिकिट घ्या. त्या जोरावर ही माझी बायको आहे हे सिद्ध होईल, शिवाय तिच्या अस्तित्वाचा पुरावाही बाकीच्या कागदपत्रातून दिसेल, असं त्यांना पटवून सांगितलं.
पण तरीही कागदपत्रे परत आल्यास जबाबदारी तुमचीच असे सांगत त्यांनी ही कागदपत्रे स्वीकारायला अखेर तयारी दर्शवलीय.
हे एक काम उरकून महाराष्ट्र बॅंकेत आलो. तिथे खाते उघडायचे काम बाकीच होते. तिथल्या साहेबांना आम्हा दोघा नवरा-बायकोंचे फोटो असलेले मॅरेज सर्टफिकिट दाखवले, म्हटलं, अहो, माझ्यानंतर माझी सगळी मालमत्ता माझ्या बायकोच्या नावावर होण्यासाठी हे सर्टफिकिट तिला उपयोगी पडणार आहे, मग तिच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून हे ग्राह्य धरायला काय हरकत आहे. साहेबांना नियमांकडे बोट दाखवत 'नाही चालणार हो' असं म्हणत हतबलता दर्शवली. बायकोकडे बाकीची ढिगाने असलेली कागदपत्रेही कुचकामीच होती. कारण त्यावर तिचा फोटोच नव्हता. मग साहेबाने विचारलं तुमच्याकडे कॉलेजची काही कागदपत्रे आहेत काय ज्यावर तुमचा फोटो असेल? ......
....... आणि अशा तर्हेने ते सात वर्षे फायलीत बंद पडलेले बायकोचे डिएमएलटीचे सर्टफिकिट बाहेर पडले. सायबाला दाखवल्यानंतर त्याची कळी खुलली. 'हे चालेल', त्याने निकाल देऊन टाकला. मी आणि बायको एकमेकांकडे पहात गालातल्या गालात हसलो. सात वर्षे कुठल्याही कामास न आलेले कुठल्याशा नागालॅंड सरकारने मान्यता दिलेल्या आणि त्या संस्थेने चालवलेल्या अभ्यासक्रमासाठी दिल्ली विद्यापीठाने दिलेले हे सर्टफिकिट अखेर सरकारी पातळीवर बायकोचे अस्तित्व सिद्ध करायसाठी धावून आले.
सरकारी कारभार म्हणतात तो हाच असावा. नाही काय?
आता बँकपासबुकाच्या आधारे
आता बँकपासबुकाच्या आधारे पॅनकार्ड तयार करुन घ्या
ह्म्म... अहो भोचक पण आता
पॅनकार्ड साठी शाळेचा दाखला
पॅनकार्ड साठी शाळेचा दाखला चालतो... त्यांनी नाही म्हणून का सांगितले बरे...
**
बाकी लेखन नेहमीप्रमाणेच खुसखुशीत.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हो ना. पण दाखल्यावर फोटो
हो ना. पण दाखल्यावर फोटो नसतो. किमान तिच्या दाखल्यावर तरी नव्हता. फोटो असलेला सरकारी कागद हवा होता. पण मॅरेज सर्टफिकिटवर फोटो असूनही ते मात्र चालत नव्हतं.
हा आमचा स्वभाव
काहीही करा पण लगेच एक तरी
काहीही करा पण लगेच एक तरी फोटो आयडी काढून घ्या हो. फार उपयोग असतो त्याचा.
-पुण्याचे पेशवे
सगली डाऑकुम्नेट्स मी स्क्यान
सगली डाऑकुम्नेट्स मी स्क्यान करुन स्वतला मेल करुन ठ्वएते ..कधीही लागु शकतात.
आणि
आणि मग मेलचं खातं बोंबललं की रडत बसते, असं लिही ना पुढं!!!
होहो असे झालेय माझ्या बाबतित
आयला
पत्रकारांना लोकांच्या खाजगी गोष्टीसुद्धा ठाऊक असतात हे पटले. सावध रहा रे पोरांनो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
एकदम खुशखुशीत किस्सा !!
एकदम खुशखुशीत किस्सा !!
सगळ्यानी नॉमिनेशन पण करा.
सगळ्यानी नॉमिनेशन पण करा.
मी अग्दी ५०० रु पासुनच्या सर्टिफिकेटवर सुढा नॉमिनी करुन ठेवते.
मग उगाच आप्ल्या नंतर धावपळ नको उरलेल्या लोकांना.
+१ अतिशय योग्य सल्ला. शक्य
+१
अतिशय योग्य सल्ला.
शक्य असेल तिथे जॉइंट खाते उघडलेले फायदेशीर असते
+१ व नसेल तर नंतर करुन घेता
+१
व नसेल तर नंतर करुन घेता येतं, त्यापध्दतीने आपले खाते जॉइंट करुन घ्यावे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१ मी पण तेच कऋन घेतलं
+१ मी पण तेच कऋन घेतलं आहे.... लग्नानंतर पहिल्यांदा पॅन कार्ड काढुन लगेच बँकेतलं खातं जॉइंट करुन घेतलं....
बायकोचं
बँकेतसुद्धा खातं नाही म्हणजे कमाल आहे. मग तुमचे वेतन/उत्पन्न ठेवता तरी कुठे तुम्ही?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
बहुदा
रामभाऊ, बहुदा तीही पत्रकारच आहे. त्यामुळं बँकेत खातं वगैरे चिंता करावी लागलीच नसावी!
मागं एकदा पुणेरींनी म्हटलं तसं, पत्रकार, मग इस्टेट काय असणार तर पुस्तकं आणि कर्ज! आता कर्जासाठी बोंबलायला कशाला खातं सांभाळत बसायचं? कर्ज मिळालं की खातं गेलं उडत!
ह घ्या रे....
हॅ हॅ हॅ
श्रामो तुम्हाला प्रश्न कळलाच नाही. तुमचे पैसे कुठे ठेवता असे आम्ही भोचक यांना विचारले आहे, त्यांच्या सौंना नाही.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हाहाहाहा
रामभाऊ, मी तीही असं म्हटलंय. कारण भोचकही पत्रकारितेतच आहे... दोघांसाठी उत्तरं सारखीच आहेत!!! हो ना रे?
सहमत. बाकी बायको पक्की
सहमत. बाकी बायको पक्की 'गांधीवादी' आहे. त्यामुळे 'लग्नबाधित' नवर्यांप्रमाणे केवळ हाफिसाच्या पगाराचे पैसे उतरवून घेण्यासाठी ब्यांक अकाऊंटची सोय केलीय. पगार झाल्याच्या दुसर्या दिवशी खात्यातले सर्व गांधीजी बायकोच्या पर्समध्ये जाऊन बसतात.
हा आमचा स्वभाव
हाहाहा
खंत, अभिमान, कौतुक, आनंद, दुःख.. काय आहे हे नेमकं? कारण पुढची वाक्यं भयंकर न्यूट्रल आहेत. त्यात स्मायली डोळे मारणारी.
बादवे, तीही इथं आहे का रे? म्हणजे जरा गियर बदलता येतील?
का का... असे अडचणीत आणता
का का... असे अडचणीत आणता एखाद्याला तुम्ही असे नियमित काका
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
नाही राव...
अजून एकदाही इंदूरला गेलो नाहीये. जायचं आहे. त्यामुळं अडचणीत आणणार नाही. म्हणून तर तिची चौकशी केली. ती इथं असेल तर गियर बदलेन म्हटलंय ना!
म्हणजे साईड बदलणार का तुम्ही
म्हणजे साईड बदलणार का तुम्ही
चांगले आहे राव हे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छ्या...
छ्या... अशा मामल्यात साईड घ्यायची नसते. ते का वगैरे इथं विचारू नका.
" मोठे व्हा " व्यनी सुविधा
" मोठे व्हा "
व्यनी सुविधा आहे ना
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
असं म्हणतोस?
असं म्हणतोस? मग ठीके. ज्ञानदानच करायचं आहे तर इथंच करतो.
काये, नेहमी अशा वेळी दोन्ही बाजू सांभाळाव्यात माणसानं. घरात धरधनिणीच स्वयंपाक करतात. आपले दोस्त त्याबाबत मोस्टली बिनकामाचे (इथं सारे दोस्त, आणि त्यांच्या 'अगं' तर नक्कीच, सहमती दाखवतील. दोस्त बोटं मोडतील, पण माझ्या नावानं, 'अगं'ही मोडतील पण दृष्ट काढल्यासारखी स्वतःच्याच कानापाशी). त्यामुळं घरात खाण्या-पिण्याची चैन ही फक्त तिच्या कृपेने होते. बाहेर? आपली स्थिती अशी की, तिथं दोस्त कामाला येतो. म्हणून त्यालाही सांभाळावं. चार दिवस त्याच्या गावी वास्तव्य असेल तर हमखास एका रात्री त्याच्या घरीच तिच्या हातचं खावं. मग बाकी तीन रात्री तुम्ही बाहेर जेवू (आणि पिऊ) शकता. तसं नाही केलं तर तिच्या चेहऱ्याकडं पाहण्याचं धाडस व्हायचं नाही. आता तिला तू वहिनी म्हण, बहीण म्हण किंवा सच्ची मैत्रीण म्हण. हा मंत्र शाश्वत आणि वैश्वीक आहे.
पण हे मी तुला का सांगतोय? यू आर नोन टू फॉलो धिस...
कडकडीत सलाम !!!
कडकडीत सलाम !!!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
यू सेड इट !!! अचूक मर्मभेद.
यू सेड इट !!! अचूक मर्मभेद.
राजे, पाहिलंत, हे सगळे मनोव्यापार श्रामोंना सहज आकळतात, म्हणूनच 'मोठे व्हा' चा सल्ला देण्यास ते सर्वथा पात्र आहेत.
हा आमचा स्वभाव
१००% सहमत.
१००% सहमत.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आता
शिक्षणशुल्क?
भेटा कधीतरी पुनमक्षेत्री.
भेटा कधीतरी पुनमक्षेत्री.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हां पण आम्हाला तिथे बोलावू
हां पण आम्हाला तिथे बोलावू नका.
-पुण्याचे पेशवे
तुला काय बोलवावे लागेल का?
तुला काय बोलवावे लागेल का?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आता थांबतो
आता थांबतो. धागा मुख्य!!!
अर्रर्र
रामभाऊ, मी तीही असं म्हटलंय. कारण भोचकही पत्रकारितेतच आहे... दोघांसाठी उत्तरं सारखीच आहेत!!! हो ना रे?
आता तीही मधे 'आमच्यासारखीच' अशी गाळलेली जागा भरली होती. आम्हाला भोचकभाऊ पण पत्रकार आहेत हे ठाऊकच नव्हते.
अवांतरः एका पत्रकाराने असा 'समर्पक' आय. डी निवडल्यामुळे पत्रकारांच्या बुद्धिमत्तेबद्दलचा आदर दुणावला.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हॅ हॅ हॅ.. समर्पक.. रमताराम
हॅ हॅ हॅ.. समर्पक.. रमताराम तुम्ही तर लईच डायरेक्ट लिहीता हो.
(इनडायरेक्ट)
पेशवे
-पुण्याचे पेशवे
आयला...
लेख वाचला आणि आठवलं. पासपोर्टसाठी चौकी गाठावी लागेल. लागा पुरावे गोळा करायला!!!
:)
नागालॅन्ड सरकारचा विजय असो!!!!
ऑ !
ऑ !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ऑ काय ऑ?
शेवटी त्या नागालॅन्ड सरकारने मान्यता दिलेल्या कोर्सचं सर्टिफिकेटच कामाला आलं ना?

मग?
(बाकी नागालॅन्डमध्ये त्यांचा वेगळा पासपोर्टही मिळतो म्हणे! असं ऐकलंय हो, खरं खोटं तो लालडेंगा जाणे!!!)
ओह ! मला जरा वेगळाच वास आला
ओह !
मला जरा वेगळाच वास आला
*
नागालँन्डसाठी परमिट लागायचे ते माहीत आहे पासपोर्ट वेगळा असेल असे वाटत नाही... बाकी खरं काय ते जिंगालाला माहीत...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त..
शेवटी एकदाचे काम झाले तर (नागालँडच्या कृपेने..)
लेख खुसखुशीतच, आवडला हेवेसांनल
स्वाती
माझ्याही घरी अशीच एक केस
माझ्याही घरी अशीच एक केस आहे...
आमच्या घरी चोरी झाली, पण फार किंमती माल घरात नसल्यानं बहुतेक चोरांची चिडचिड झाली असावी कारण ते सगळंच घेउन गेले..म्हणजे आइच्या नव्या-जुन्या साड्या, इतर सगळे कपडे, सगळी भांडी ( ताटं , वाट्या, चमचे, पातेली ...या सगळ्यांवर आम्च्यापैकी कोणाचं ना कोणाच नाव कोरलेलं होतं )...२ बॅगा , ज्यात फक्त आणि फक्त कागद्पत्रच होती. आईची सगळी सर्टीफिकेट्स, पेन्शन्ची कागद्पत्र इ.इ.
चोर गडबडीत चांदीची भांडी न्यायला विसरले फक्त...
भावान पोलिसांना बोलावून आणलं ,बराच टाइम्पास केल्यानंतर पोलिसांनी पहिला संशय माझ्या भावावर घेतला की 'आजकालची तरूण मुलं काहीही करतात आणि स्वतःच पोलिसांना बोलावून आणतात हा म्हणे लेटेस्ट ट्रेंड आहे'...बरेच प्रश्न विचारून भंडावून सोडलं. भीक नको पण कुत्रा आवर अशी आवस्था झाली...
बाकीच्या गोष्टींच काही नाही पण परत आइच्या सर्टीफिकेट साठी अर्ज करण चालू आहे..आईचा पासपोर्ट करायचा राह्यलाय त्यामुळं. आईला तिच्या मॅट्रीक ,इंटर ( बहुतेक ह्याच परिक्षा असाव्यात, चु.भू.दे.घे. ) आणि ग्रॅज्यएशनच्या रिसिट्वरचे तिकिट नंबर लक्षात आहेत..२ महिन्यांपूर्वी शाळेनं डुप्लीकेट स्कूल लिव्हिंग सर्टीफिकिट दिलं ..पुणे विद्यापीठ चालढकल करतय , म्हणे त्यांच्याकडं इतकीजुनी रेकॉर्ड्स नाहीत.
आता तसाही पासपोर्टाचा अर्ज करता येइल पण शिक्षण मॅट्रिक पास इतकच दाखवाव लागेल ( जे चूक आहे ) आणि अशी खोटी माहिती देण दखल्पात्र गुन्हा आहे ...पासपोर्ट ऑफिसला शिक्षणाचीच सर्टिफिकेट्स पाहिजेत.. आता काय करायच याचा विचार चालू आहे ...
पुष्करिणी
मस्त किस्सा
असाच एक प्रसंग मला आठवतोय.... कधितरी असाच फोटो आय.डी. हवा होत.. त्यावेळी मी कॉलेजमधे होतो. त्यामुळे पासपोर्ट, पॅन कार्ड वगैरे काही नव्हतं... रेशन कार्ड घेउन गेलो तर ते चाललं नाही.. मग माझ्याकडचं जुनं स्विमिंगक्लासचं कार्ड होतं ते दाखवलं.. चाललं फस्कास....
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
एक शंका..
विवाह नोंदणीसाठी काय पुरावा दिला होता तुम्ही मग?? आम्हाला फार छळलं हो त्यासाठी.. (नवर्याकडे पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसेन्स होता पण बाकी सरकारी काही नव्हतं.. वेगवेगळ्या गोष्टी लागतात म्हणे.. वय पुरावा, पत्ता पुरावा अन फोटो पुरावा..) झालं शेवटी कसंतरी..! दहावीचं प्रमाणपत्र वय पुरावा म्हणून चाललं.
बाकी हा लेख वाचून मी आठवून बघत होते की माझा पहिला असा आय डी कुठला होता?? बराच वेळ नाही आठवलं. मग आठवलं की आई वडीलांनी माझ्या लहानपणीच माझा पासपोर्ट काढला होता.. त्यामुळे कुठे काही अडलं नाही पुढे.. त्यावर पुढचे सगळे आय डी मिळाले..
तेव्हा आता मुलाचा पासपोर्ट काढून ठेवा..