माझी २ वर्षांची चिमुरडी आज मला म्हणाली,'चल तुला मस्तपैकी छान् छान गोष्ट सांगते..' आता तासाभराची निश्चिंती असे म्ह्णून मी म्हणाले'सांग की'.
आणि मग गोष्ट सुरु झाली. ती तिच्याच शब्दात-
"एक ए मोठ्ठं जंगल होतं..तिथे झाडावर एक ससुल्या रहय्चा.त्याला भूक लागली. तो खारुताईला म्हणाला,खारुताई खारुताई माला खूप भूक लागली गं! माला काइत्ला(काहीतरी)खायला दे नं पलीज! मग ते सायकल वर बसतात आणि आजीबाई कडे जातात्.पाहतात तर काय एक ए मोठ्ठा वाघोबा आला. तो म्हणाला,ए म्हातारे मि तुला खाणार..! म्हातारी म्हणते लेकीकडे जाते तुप रोटी खाते मग तु मला खा. वाघ ओक्के म्हणतो.एक दिवस काय झालं माहितै तुला? कावळ्याचं घर वाहून गेलं. मग तो चिउताइच्या घरी गेला.टिंग टांग्..कोणय़् कोणय?? चिउताइ चिउताइ दार उघड्,थांब माझ्या बाळाला क्रीम लाउ दे..मग मी तुझं डोकं पुसून दे हं..मग तू मला खा. मग खूप आनंद होतो.लेक काय देते महितय तुला?? पावभाजी..पास्ता..गुलाबजामुन्..मॅगी आणि कोशिंबीर!!! मग ति म्हणते चल रे भोपळ्या टुलुक टुलुक्..मग सस्सेभाउसारखे टुण टुण उड्या मारतात्..बघ्तो तर काय?? एक छोटासा कासुल्या(कासव)आणि अस्सोल(अस्वल)झाडावर चढतात.तिथे खूप आंबे लागले असतात्.माकड ते आंबे मगराला देतं.मगराची बायको खुशुन(खूश होऊन)गेली.ती म्हणते,ते काइ नै..मला माकडाचं काळीज हाव म्हण्जे हाव म्हणजे हाव! माकडाच्या दुकानात काय असतं माहितै तुला???..............."
पुढचं मला आठवत नाही.झोप लागली.लेक पण कधितरी झोपुन गेली असावी. जाग आल्यावर पाहिलं; झोपेत मधुनच खुदुखुदू हसत होती.तिने सांगितलेली गोष्ट आठवली.त्या निरागसपणावर मन लुब्धून गेलं.तिच्या गोष्टीत खारुताइ सशाला सायकलवर फिरवते.म्हातारीच्या शब्दावर विश्वासून वाघ'ओक्के'म्हणतो,जंगलातली म्हातारी पास्ता खाते..चिमणी कावळ्याचं डोकं पुसून देते..कासव झाडावर चढते...
किती निर्मळ जग आहे हिचं! त्या जगात कुठेही घाण नाही..जळमटं नाहीत्..अंधाराचा लेश नाही..भेद नाही,भय नाही,अविश्वास नाही,अनिश्चितता नाही.सगळं नितळ..प्रकाशमान्..आशादायी..
हे परमेश्वरा!या निरागसपणाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य मला दे!
ही कळी इतक्याच सुंदरतेने फुलताना बघण्याचं भाग्य मला दे!
आणि त्याच क्षणी;सहज विश्वासाने,झोपेत माझं बोट धरून हसणार्या मनुलीला बघताना क्षणभर वाटलं;परमेश्वर आहे!!!
मस्त
मस्त
किती गोड >हे परमेश्वरा!या
किती गोड
>हे परमेश्वरा!या निरागसपणाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य मला दे!
ही कळी इतक्याच सुंदरतेने फुलताना बघण्याचं भाग्य मला दे! >>
तथास्तु! आमेन!!
+१
असेच म्हणतो!
माझे पिलू १० महिन्यांचे आहे, तो आता माझ्या छातीवर हात मारत "भू--भू", "बॉ" (बॉल), दाराकडे बोट दाखवत - "बाहे..." (बाहेर चल) असे शब्द बोलतो....त्याला गोष्ट सांगायला अजून १ वर्ष तरी आहे...मला बघुन त्याच्या डोळ्यात होणारा आनंद बघितला, की सगळा त्रास विसरायला होतो. हे पिल्लू लोक म्हणजे खरच.....'कलेजे का तुकडा' असतात!
धन्यवाद निर्मयी
धन्यवाद निर्मयी
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
मस्त
हे परमेश्वरा!या निरागसपणाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य मला दे!
ही कळी इतक्याच सुंदरतेने फुलताना बघण्याचं भाग्य मला दे!
ही अगदी हीच प्रार्थना आहे!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
हे परमेश्वरा!या निरागसपणाचं
हे परमेश्वरा!या निरागसपणाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य मला दे!
ही कळी इतक्याच सुंदरतेने फुलताना बघण्याचं भाग्य मला दे!
सुंदर
प्रेरणा ...
".....हसणार्या मनुलीला बघताना क्षणभर वाटलं;परमेश्वर आहे!!!....
इतरत्र असेल, नसेल.... पण आपल्या बार्बी डॉलीसम मनुलीच्या हसर्या चेहर्याभोवती मात्र नक्कीच असणार कारण त्यामुळेच तर तुम्हाला इतकं काव्यमय लिहायला प्रेरणा मिळाली.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
हा हा! मनुलीची गोष्ट लय
हा हा!
मनुलीची गोष्ट लय म्हंजे लयच भारी!!!
वाचूनच तब्येत खूश!!
-ऋ
खरच सुंदर... ! त्यांचे
खरच सुंदर... !
त्यांचे भावविश्वच वेगळे.. त्यात हेवेदावे, द्वेष, आरोप नाही, कोण कश्या अवस्थेत असेल ह्याची चिंता नाही, उद्या काय ह्याचे काहीच भविष्य नाही... एकदम स्वप्नमय जग.. !
शक्यतो ह्याच मुळे प्रत्येक मोठ्या व्यक्तीला पुन्हा लहान व्हावे असे वाटते... क्षणीक का होई ना पण ते निरागस जिवन पुन्हा जगावेसे वाटते !
हेच सत्य.. बाकी खरोखर सगळे मिथ्या.. बालपणी सारखा काळ नाही...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ज्ञानेश्वराचीच माया
म्हणायच दुसर काय?
मनुची गोष्ट खु$$$$प आवडली.
"किती निर्मळ जग आहे हिचं! त्या जगात कुठेही घाण नाही..जळमटं नाहीत्..अंधाराचा लेश नाही..भेद नाही,भय नाही,अविश्वास नाही,अनिश्चितता नाही.सगळं नितळ..प्रकाशमान्..आशादायी.." ते तसच राहण्यासाठी माझ्या शुभेच्छा
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
चित्रासाठी धन्यवाद जयपाल..
चित्रासाठी धन्यवाद जयपाल..
>>> ज्ञानेश्वराचीच माया
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
माझ्याही अनेक
माझ्याही अनेक शुभेच्छा!!!
भाचीची आठवण झाली.
(विषय दिलेला नाही)
खुपच छान
खुपच छान
:)
मस्त आहे मनुली तुझी.. अश्याच माझ्या पियुलीच्या ( वय वर्ष ५ ) छान छान गोष्टी दर शनीवारी रात्री मी ऐकते आणी आठवडाभराचा सगळा शीण मिनीटात पळून जातो..
मस्त लिहिलय. माझा पोरगा अडीच
मस्त लिहिलय.
माझा पोरगा अडीच वर्षाचा आहे. तोच आम्हाला रोज गोष्ट सांगुन झोपवतो.
तो ससा आणि कासवाची गोष्ट सांगतो.
एक ना ससा असतो ना,
एक ना कासव टोर्टोइज असतो ना,
..................
...................
काळ बदलला.. तर
काळ बदलला.. तर
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आमच्या पण भुभुली च्या गोष्टी
आमच्या पण भुभुली च्या गोष्टी आहेत पण आम्ही नाई सांगणार?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
अहो सान्गा की
त्याचा
अगदी स्वतंत्र, सविस्तर लेख झाला पाहिजे (हे सांगून, सांगून थकलो)
मस्त
मस्तच.
आमच्या
भाचीने (वय वर्षे ३ १/२) सांगितलेली गोष्ट.
एक काका-काकू असतात. ते डोंगरावर राहत असतात. त्यांच्या घरात एकदा कूगाडी घुसते. मग ते पळत सुटतात. मग त्यांच्या अंगावर सगळं बर्फ पडून जाते. तिकडून एक वाघोबा चालला होता तो म्हणाला म्हातारे म्हातारे खाऊ का तुला. मग म्हातारी म्हणाली वाघोबा वाघोबा बोरे पिकली. वाघोबा म्हणाला नाही ग म्हातारे टेरी पोळली. मग तो धूम पळून गेला. संपली गोष्ट. (हो हा गोष्ट संपल्याचा जाहीरनामाही तिनेच काढला होता, कारण समोर आजोबा क्रीम बिस्कीट घेऊन आलेले दिसले होते एवढ्यात)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मस्तच माझ्या भाचीला आई पाढे
मस्तच
माझ्या भाचीला आई पाढे शिकवायची. १.२.३.....८.९.१०. तर ती कधीकधी आठानंतर डायरेक्ट १० म्हणायची
. आईने 'असे नाही' म्हटल्यावर ति मोठे डोळे करुन म्हणायची असेच असते.
मला हे वाचून अनिल अवचटांनी
मला हे वाचून अनिल अवचटांनी 'स्वतःविषयी'मध्ये लिहिलेला एक प्रसंग आठवला.
यशो एकदा कुणासमोर तरी डाव्या हाताने जेवत होती.पाहुण्याला राहावले नाही. ते म्हणाले;'बेटा उजव्या हाताने जेवावं,डाव्याने नाही'.
ही म्हणाली'मी उजव्याच हाताने जेवतेय की..'.पाहुणे तिला डावा उजवा सांगू लागले. यशो म्हणाली;'हातावर कुठे त्याचं नाव लिहिलंय? माझा उजवा हात हाच' !!
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
येस्स
'तुम्हीच चुकीच्या हातानी जेवताय.'
मी वाचल्या वाचल्या सलाम केला तिच्या हजरजबाबीपणाला.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मी ही गोष्ट मनुलीला वाचुन
@ ररा

मी ही गोष्ट मनुलीला वाचुन दाखवते आता..
मस्त !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
भाचीला एकदा भेटायला हवे
भाचीला एकदा भेटायला हवे
हुषार दिसते
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ये ना
भेट घालून देतो. एक काम कर येतानाच एखादी अॅस्प्रो किंवा अॅनासिनची गोळी घेऊन ये बरोबर.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
बोबडे तर अस्ले मस्त बोलतात ना
बोबडे तर अस्ले मस्त बोलतात ना ही मुले कि अगदी
असे वाटते.
खरे आहे. मिपावर पण बरीच बोबडे
खरे आहे. मिपावर पण बरीच बोबडे बोल बोलणारी मुले मुली आहेत
अच्र्त
अच्र्त
*
चुकून, चुकून.
छकुलीची गोष्ट मस्तच. निरागस
छकुलीची गोष्ट मस्तच. निरागस लहानग्यांचं तितकंच निरागस जग. लेकीच्या बालपणात हे जग आम्हीही अनुभवतो आहोत.
हा आमचा स्वभाव
सगळी मंडळी आपापले आनंदाचे
सगळी मंडळी आपापले आनंदाचे मोती घेउन येत आहेत.
मनापासुन धन्यवाद.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
सुंदर
आवडले.
छान आहे गोष्ट... आवडली. खरंच
छान आहे गोष्ट... आवडली.
खरंच ही लहान मुलं कित्ती निरागस असतात.....
निरागस असतात पण वात्रट
निरागस असतात पण वात्रट पण....
एकदा माझी भाची खुप त्रास देत होती. बहिणिकडे कोणीतरी आले होते म्हणुन ति बाहेर हॉलमधे बिसी होती. मी बयोला म्हणाले..चल बाहेर काका आलेत त्याना हॅलो कर. ति माझा बरोबर बाहेर आली.. काका तिला आवडले नसावेत
... मला खट्याळपणे हसुन म्हणाली... काका..च्छिचि आहेत
. नशीब काकांनी आइकले नाही हे सगळे .
मनुलीची गोष्ट आवडली. छान आहे
मनुलीची गोष्ट आवडली. छान आहे हां.
-पुण्याचे पेशवे
च्यायला हे निसाटलं होतं...
च्यायला हे निसाटलं होतं... आत्ता चुकून कशावर तरी टिचकल्यावर उघडलं..
माया.. पोरगी गोड आहे.. बापावर गेलिये वाट्टं..