देव माझ्या अंतरीचा

0
0

कस्तूरी कुन्डल बसे, म्रग ढ़ूंढ़े बन माहि।
ऐसे घट-घट राम है, दुनिया देखे नाहिं॥

ह्या दोह्याची जागा,

अंतरी कस्तुरी जरी, मॄग शोधे वनोवनी |
अंतरंगी परमानंद जरी, जग शोधी मनोमनी ||
---------------------------------------------------------------------
देव माझ्या अंतरीचा, आज बोले मज मुखानी
अंतरीच मी आहे तुझिया, का रडशी तु वेदनांनी

अंतरी कस्तुरी जरी, मॄग शोधे वनोवनी
अंतरंगी परमानंद जरी, जग शोधी मनोमनी

का दुःखी असता जगाला, याद येते भगवंताची
का सुखाने हासतांना विसरतो भक्ती तयाची

अंतरंगी तोच वसता दुःख कसले मी करावे
का डरावे वादळांना, भय मॄत्युचे का करावे ?

मन गुंतले जगामाजी, वाट कैसी सापडावी ?
गुरु दावी प्रकाशवाट, अन्यथा कैसी सापडावी ?

सुरेख काव्य !

1

सुरेख काव्य !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अंतरंगी परमानंद जरी, जग शोधी

2

अंतरंगी परमानंद जरी, जग शोधी मनोमनी
इथे मनोमनी ऐवजी रानीवनी चालेल. मनांमधे देव तर आहेच ना. तो बाहेर शोधू नका असे म्हटले तर ठीक वाटेल.


-पुण्याचे पेशवे

पुपेशी सहमत.

3

पुपेशी सहमत.

रानीवनी समर्पक वाटते आहे

4

रानीवनी समर्पक वाटते आहे तेथे, पुप्याशी सहमत.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ध्यानीमनी

5

ध्यानी मनी टाकून पघा बर


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मस्त

6

मस्त हास्य

सुरेख.

7

सुंदर कविता. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

खूप

8

खूप सुंदर! हास्य


*क्रान्ति*
नाही दु:खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल

छान कविता.

9

छान कविता.

छान कविता, आवडली..

10

छान कविता, आवडली..


पुष्करिणी

छान कविता

11

छान कविता हास्य

कविता आवडली.

12

कविता आवडली.

व्वा!

13

अंतरंगी तोच वसता दुःख कसले मी करावे
का डरावे वादळांना, भय मॄत्युचे का करावे ?

व्वा, सोनाली, क्या बात है!
-अशोक


आपला स्नेहांकित...
-अशोक

सुरेख, आवडली:-)

14

सुरेख, आवडली:-)


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

छान

15

छान

जबरदस्त

16

जबरदस्त



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही