बॉम्बस्फोट आणि मी - भाग ३
तिच्या अचानक घेतलेल्या निर्णयाने आम्ही सगळेच गोंधळुन गेलो होतो. मला तर काय बोलावे हेच कळत नव्हते. असा काही स्पष्ट निर्णय ती घेईल असे वाटलेच नव्हते. ज्या संकटाची कधी कल्पनाच केलेली नसते त्याला तोंड कसे द्यायचे हे कळत नसले की जी अवस्था होते तिचा मी पुरेपुर अनुभव घेत होतो.
कितीतरी वेळ नुसताच शांततेत गेला.
शेवटी गीताची आई म्हणाली 'अग पण असा विचारच का आला तुझ्या मनात? असे कधी होत असते का?'
'का? का नाही? तुच सांगते ना एखादी चर्चा करतांना चांगली बातमी घटना घडली तर चांगले असते तर मग तसेच जर मी म्हटले की नानाच्या प्रश्नाला जर मी उत्तर देवु शकले नाही. यात नियतीची काही योजना आहे. म्हणुन मी त्याच्याशी लग्न करणार नाही असा जर निर्णय घेतला तर काय चुकले?' गीता
'अग पण आपले आधीच ठरले होते यात त्याने विचारणे वगैरे हा केवळ तुमचा गंमतीचा भाग होता' बाबा
'तुमच्यासाठी गंमत असेल माझ्यासाठी नाही' गीता
'असे कसे?' गीताची आई
'मग? बरोबर आहे! संपुर्ण ५ वर्षात त्याने पहिल्यांदा मला असा प्रश्न विचारला आणी ते घडले.... ?'गीता
बराच वेळ अशीच चर्चा झाली पण गीतेचा निर्णय ठाम होता. गीतेच्या बाबांनी पण आपण काहीच करु शकत नाही असा माझ्याकडे पाहुन अभिप्राय दिला. शेवटी जास्त ताणण्यात अर्थ नाही असे बघुन मी गीतेला म्हणालो 'गीता. मी तुझ्या मनातल्या शंकाचे निरसन करीन पण तुर्त मी तुझी इच्छा मान्य करतो. आपण मित्र आहोत. मित्र राहु. ओके.'
मी घरी येवुन न जेवताच पडलो. मावशीने खुप आग्रह केला पण जेवण घशाखालीच उतरेना. मावशीला सगळे सांगितले. तिनेही गीतेचा निर्णय चुकीचा आहे असे सांगितले पण काहीच उपयोग होणार नव्हता. गीता कुणाचे ऐकणारी नव्हती.
दुस-या दिवशी सकाळी अंग भरुन आल्याने आज दांडी मारावी असा विचार करुन कंपनीत फोन केला. तर फोन नेमका मालकांनीच उचलला. त्यांनी काहीतरी तातडीचे काम आहे निदान दोन तास तरी येवुन जा असे सांगितले. मी काय काम असेल याचा विचार करत करत कंपनीत पोहोचलो.
रिसेप्शनवर मी आल्या आल्या केबिन मधे पाठवावे अशी सुचना दिलेली होती त्यामुळे मी लगेचच मालकांच्या केबिन मधे गेलो. मालकांच्यासमोरच कॅशियर जाधव बसलेला होता. दोघांची काहीतरी चर्चा चालु होती. मी परवानगी घेवुन आत गेलो.
'अरे नानाऽ, हा जाधव म्हणतोय तु एडव्हान्स चे व्हाउचर क्लियर केलेले नाहीस? दोन महिने झाले?' मालक
'नाही सर. मी तेव्हाच सगळा हिशेब दिलेला आहे. मला काही मटेरीयल हवे होते म्हणुन मी घेतले होते काही पैसे.. पण दोनच दिवसांत बीले वगैरे आणी उरलेली रक्कम परत केली होती' मी
'ते पाहीले मी. पण तु संपुर्ण रक्कम नाही परत केलीस.... हे बघ तुझ्याच सहिचे व्हावुचर अन तु परत केलेली रक्कम... बघ किती बाकी आहे अजुनऽ' मालक
मी ते पाहु लागलो तर मी जी रक्कम घेतली होती तिच्यावर एक शुन्य जास्त होते. माझ्या डोळयासमोर संपुर्ण केबीन फिरली. इतकी रक्कम म्हणजे कमीत कमी सहा महीने मला बिना पगाराचे काढणे आले. मला काहीच सुचेना. मला नीट आठवत होते आधी लिहिलेली रक्कम बरोबर होती मग एक शुन्य वाढले कसे... खात्री करण्याकरता अक्षरी रक्कम पाहीली... आकडे व अक्षर जुळत होते.. असे कसे झाले हा विचार करत असतांनाच मला आठवले ..पैसे घेतांना मी आकडा पाहिला पण अक्षरी लिहिलेली रक्कम वाचली नव्हती. एक अतिशय साधी चुक... पण मला आयुष्याचा धडा शिकवत होती.
माझ्या तोंडुन काहीच शब्द उमटत नव्हते. अखेरीस मालकांनीच सांगितले की दोन दिवसांत मी त्यांची रक्कम पुर्ण करुन द्यावी अन्यथा ते कारवाई करतील. माझ्या पायातील बळच संपले होते.
कसाबसा परत घरी येवुन मावशीला सगळा प्रकार सांगितला. मावशीला तिच्याकडे काही पैसे आहेत का विचारले पण तिचे यजमान टुरवर गेल्याने घरखर्चासाठी व तातडीसाठी लागणारे पैसे यापेक्षा जास्त काहिच नव्हते. त्यामुळे तिची
काहीच मदत झाली नाही. घरी जावुन पैसे आणणे म्हणजे दोन दिवसांत शक्य नव्हते आणि घरी काय व कसे
सांगायचे हा मोठा प्रश्न होता....
दुपारपर्यत नुसताच विचार करत करत डोके भणभणले म्हणुन मी जरा बाहेर जावुन येतो असे सांगुन बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर सहज विचार आला आणि कुलकर्णीच्या घरी गेलो. कुलकर्णी घरीच होता. त्याला सगळे सांगितले व
त्याला म्हणालो 'सर. तुम्ही मला ओळखताच. तुम्ही जर मला मदत केली तर मी तुमच्याकडे काम करुन तुमचे पैसे परत करीन. प्लीज मला मदत करा.'
कुलकर्णी काहीच भाव न दर्शविता म्हणाला ' नाना. मी तुला मदत का करावी? काय संबंध तुझा माझा?'
'सर. मी संबंध आहे म्हणुन म्हणत नाही. इथे माझे कुणी ओळखीचे नाही. तुम्ही आहात म्हणुन मदत मागतो' मी
'का? गीता नाही का?'
'नाही. मी तिच्याकडे नाही मदत मागु शकत.'
'नाना तुझ्यामुळे माझी होणारी बायको गेली. तु जबाबदार आहेस तिच्या मृत्युला. त्यामुळे मी तुला मदत करणार नाही तसेच तु परत माझ्याकडे येवु पण नकोस.'
'मी ? तो कसा काय?'मी
झाले होते असे. मी अन गीता रमेशची वाट पहात असतांना कुलकर्णी अन त्याची होणारी बायको तिकडुन काहि कामासाठी चालले होते. कुलकर्णीला काही काम होते तर ते काम पुर्ण होइपर्यत मी नाना व गिताशी बोलते असे सांगुन त्याची बायको आमच्याकडे येत होती. कुलकर्णी पुढे निघुन गेला होता. ती येत असतांनाच स्फोटात सापडली. कुलकर्णी थोडा दुर असल्याने त्याला हे लगेच कळले नाही. नंतर अजुन का आली नाही म्हणुन तपास करतांना त्याला ही बातमी
कळाली. त्याने तिच्या मृत्युचा माझ्याशी संबंध लावुन टाकला. त्याला समजावुन कसे सांगावे हा मोठा बिकट प्रश्न होता.
कुलकर्णी हिस्र होवु लागलेला पाहुन मी हताश होवुन तिथुन निघालो. त्याच्या सोसायटीतील एक एक पायरी उतरत असतांना जणु दुःखाच्या खाइतच एक एक पाउल चालत होतो.
गीता नाही....
पैसे कसे आणायचे......
कुलकर्णी मदत करेल तर तो असा डोक्यात राख घालुन बसलेला......
मावशी पण असमर्थ....
बाकी कुणी ओळखीचे नाही ....
वेळ संपत चालला होता.....
काल पासुन एक एक क्षण नविनच दुःख घेवुन येत होता ज्याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. एखादी सुंदर रांगोळी काढुन छान छान रंग भरुन त्याच्याकडे एकटक पहात असतांनाच मंदमंद वहाणा-या वा-याने अचानक जोर धारण करुन ती रांगोळी अन रंगाची कलाकुसर सर्व आसमंतात भिरकावुन द्यावी अन रांगोळी कुठे होती, कशी होती याचे पुसटसे पण चिन्ह न ठेवावे अन परत शांत होवुन मंदमंद वाहु लागावे .. जसे काही घडलेच नाही. त्याप्रमाणे माझ्या आयुष्याच्या रांगोळीला नियतीने विस्कटुन टाकले होते......
आता माझ्यापाशी गमावण्यासारखे काहीही उरले नव्हते....

.jpg)
नान्या पुढचा भाग टाक ना लवकर
नान्या पुढचा भाग टाक ना लवकर
आईशप्पत!! लै हुच्च.... पुढे
आईशप्पत!! लै हुच्च....
पुढे काय??
नाना
.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
बाब्ब्बो पुढे ????
बाब्ब्बो पुढे ????
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
उच्च उच्च उच्च!! पुढे??
उच्च उच्च उच्च!! पुढे?? लवकर!!
मस्त..!
पुढचा भाग लवकरात लवकर येऊ दे
आता इन्ट्रेस्ट वाढलाय्...लवकर
आता इन्ट्रेस्ट वाढलाय्...लवकर लिहि
आईशप्पत, कसला जबरी टर्न आहे.
आईशप्पत, कसला जबरी टर्न आहे.
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन