प्रामाणिक चोर

0
0

विनोबांनी लहान मुलांसाठी लिहीलेली, एक गोष्ट आठवली (लहानांसाठीच का ते कळले नाही). कदाचीत आधीपण कुठेतरी लिहली असेल, पण रमताराम यांच्या या कथेमुळे आठवण झाली. आधी तेथेच प्रतिसादात लिहीत होतो, पण मोठी होत असल्याने हा धागा... आठवणीतून देत असल्याने त्यात काही अजाणतेपणे बदल असू शकतात:

एका गावात एक चोर असतो, त्याला घरातल्यांची पोटे भरण्यासाठी इतर काही त्या गावात मिळत नसल्याने तो चोरी करत असतो. पण त्याचे त्याला वाईट वाटायचे. एकदा एका साधूशी बोलताना, त्या साधूने सांगितले, की "वाईट वाटून घेऊ नकोस, तू तुझे कर्म आणि कर्तव्य करत आहेस. फक्त करताना खोटे बोलत जाउ नकोस, कल्याण होईल."

कर्मधर्मसंयोगाने त्या रात्री साध्या वेषात राज्याची अवस्था बघायला बाहेर पडलेल्या राजाला हा भेटतो.

राजा : तू कोण आहेस?
चोरः मी चोर आहे...
राजा: कुठे चालला आहेस?
चोर: राजवाड्यावर चोरी करायला
राजा: काय चोरणार?
चोरः राणीचा रत्नहार
राजा: तेव्हढेच?
चोर: तेव्हढा पोट्यापाण्याला बरेच दिवस पुरू शकतो
राजाला उत्सुकता वाटते, ही काय भानगड आहे? (भानगड हा माझा शब्द आहे, विनोबांचा नाही wink )
राजा: मी तुझ्याबरोबर येऊ का? मदत देखील करेन.
चोरः चालेल. नंतर, तो विकला की कामाप्रमाणे वाटून घेऊ

दोघेजण राजवाड्यावर जातात. चोराला आत कुठून जायचे, कुठे हार आहे वगैरे घरच्या अभ्यासामुळे माहीत असते. राजा, कोणी येत नाहीना या कडे लक्ष ठेवतो. चोरी यशस्वी होते!

दुसर्‍या दिवशी सकाळी प्रधान धावत राजमहालात येऊन या चोरीची दु:खद बातमी देतो. राजा विचारतो, काय चोरीला गेले? प्रधान, ही मोठी लिस्ट देतो: राजा-राणीच्या अलंकाराची. राजा शांतपणे बरं म्हणतो आणि दरबार बोलावतो. मधल्या काळात सैनिकांना चोराला कुठे पकडता येईल हे सांगतो आणि पाठवतो.

दरबारात सैनिक चोराला घेऊन येतात. परत संवाद घडतात आणि चोर खरी उत्तरे देतो. प्रधानाचे भांडे उघडे पडते... प्रधान तुरूंगात जातो आणि चोराला खजिन्यासाठीचा प्रमुख पहारेकरी करण्यात येते...

मस्त बोधकथा

1

सध्या अशा चोरांना निवडुन द्यायला हरकत नाही.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नको!

2

सध्या अशा चोरांना निवडुन द्यायला हरकत नाही.

नको!

देशापासून ते संकेतस्थळापर्यंत काही चालवणार्‍यांसाठी ही कल्पना सुचवलेली नाही आहे. wink आधी म्हणल्याप्रमाणे केवळ रमताराम यांच्या बोधकथेमुळे आठवली इतकेच. हास्य


विकास देशपांडे

हम्म

3

राजाला काय वाटा मिळाला ते लिहिले नाही. त्यामुळे चोराचा प्रामाणिकपणा कसा सिद्ध झाला ते समजले नाही. बाकी राजाचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याने राजालाही शिक्षा व्हावी का? Evil
आणि राजाच गुन्ह्याठिकाणी उपस्थित असल्याने कोण खरे बोलतो आहे हे ठरवणे न्यायासनाला शक्य झाले. इथे लोकशाही असती तर दोघांपैकी कोण खरे बोलते आहे हे ठरवणे अवघड आहे.

चालायचेच. कथा मुलांसाठी असल्याने नेहमीच तर्कसंगत असावी असे नाही. पण इथे वाचणार्‍यांच्या डोक्यात शंकेचे पिल्लू सोडून द्यावे म्हटलं. Big smile

तर्कसंगत

4

प्रतिसाद आवडला. हास्य

कथा मुलांसाठी असल्याने नेहमीच तर्कसंगत असावी असे नाही.

ह्या संदर्भात मी एकदा एका (वयाने लहान पण अनुभवाने मोठ्या असलेल्या) व्यक्तीकडून ऐकले होते, जे सर्वांनी, म्हणजे ज्यांना मुले आहेत, अथवा जवळच्या नात्यात आहेत अशांनी लक्षात ठेवावे:

त्याचे म्हणणे होते की मुलांना त्यांच्या वयात हृदयाने विचार करायला शिकवा. मोठे झाल्यावर डोक्याने विचार करणारच आहेत.


विकास देशपांडे

>>मुलांना त्यांच्या वयात

5

>>मुलांना त्यांच्या वयात हृदयाने विचार करायला शिकवा. मोठे झाल्यावर डोक्याने विचार करणारच आहेत.

+ १

खुपच छान वाक्य आहे हे... अगदी नोंद ठेवण्यासारखं !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

बिरबल....

6

"....चालायचेच. कथा मुलांसाठी असल्याने नेहमीच तर्कसंगत असावी असे नाही...."

श्री. रमताराम यांच्या या विचाराशी सहमत. तर्कसंगतीची केमिस्ट्री लावायची झाली तर बिरबल बाद्शाहच्या सर्व कथा निव्वळ कल्पनाविलासच वाटतो. एकसंध हिंदुस्थानावर आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने निरंकुश राज्य करणारा अकबर या कथातुन इतका उल्लु, बालिश दाखविला जातो की, त्याच्या बुध्दिमत्तेविषयी शंका वाटावी..... पण ठीक आहे, बिरबल नावाच्या व्यक्तीसारखे शहाणपण मुलांनी मिळवावे हाच उद्देश या पात्र निर्मितीकडे असल्याने या अतर्क्य बाबी खपून जातात.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

सहमत

7

>>अकबर या कथातुन इतका उल्लु, बालिश दाखविला जातो की, त्याच्या बुध्दिमत्तेविषयी शंका वाटावी

सहमत. आणि लोकमानसात एवढे खोलवर रुजलेले बिरबलाचे पात्र कुठल्याही ऐतिहासिक कथेत मात्र आढळत नाही. म्हणजे बिरबलाच्या चातुर्याने बादशहाला कुठची लढाई जिंकण्यात, मुत्सद्देगिरीमध्ये कुठे फायदा झाल्याची कोनतीही ऐतिहासिक कथा ऐकलेली नाही. अशा कथा नाना फडणीसाबद्दल ऐकल्या आहेत.

अशा कथा लिहिण्यात करमणुकीबरोबरच, दुखर्‍या अहंकारावर फुंकर घालण्याचाही प्रयत्न असेल.

अकबर....!!

8

".....दुखर्‍या अहंकारावर फुंकर घालण्याचाही प्रयत्न असेल. ..."

हेच ! उगाच आपल्या मनाला वारा घालत बसायचे की, अकबराने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला तो, मानसिंग अँड को. च्या तलवारीच्या जोरावर, तोडमलच्या मुत्सद्दीगिरीवर.... संस्कृतीचा विकास केला बिरबलच्या बुद्धीवर.... कला विकसीत झाली तानसेनमुळे.... त्यामुळे अकबराने काहीच केले नाही हो...!!


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

ही गोष्ट मुलांसाठीच असु

9

हास्य
ही गोष्ट मुलांसाठीच असु द्यावी हास्य त्यांना मोठे झाल्यावर कळेल की राजाच चोरी करतो व आळ प्रामाणिक चोरावर आणतो आणतो आणि राजाला पुढील निवडणूकी आधी ब्लॅकमेल करून प्रधान हार कमावतो


-ऋ

हा हा हा

10

हा हलकट्ट (ट पूर्ण) टोमणा. लोकशाही जिंदाबाद.

+ १ १००% सहमत. लोकशाहीचा

11

+ १

१००% सहमत.

लोकशाहीचा विजय असो wink

*

विकास राव कथा मस्तच आवडली.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

चांगली कथा. काही काही

12

चांगली कथा.

काही काही प्रतिसाद त्यांच्या ख्यातीनुसार

असो.

प्रतिसाद वाचून.....

13

शाळेत एक धडा होता तो आठवला.....

त्या मधे लोक 'भोपळा आणि म्हातारी' ची गोष्ट आहे, तिची वाट लावतात हास्य

-माणूस (१०वी पास)

मस्त कथा

14

मस्त.