माझी पुणेरी ऑरकुट प्रोफाइल

0
0

माझी पुणेरी ऑरकुट प्रोफाइल

ही प्रोफाइल वाचण्या आधी हे नियम वाचा.

  1. ही जोश्यांची प्रोफाइल नाही. वारंवार चौकश्या करू नयेत. अपमान होईल !
  2. स्क्रॅपबुक वर विनाकारण स्क्रॅप टाकु नयेत. उत्तरे मिळणार नाहीत.
  3. स्क्रॅपबुक वर थिललर वा आचरट प्रश्न विचारल्यास तशीच उत्तरे दिली जातील.स्क्रॅपबुक वर जाहिराती अथवा आचरट मजकूर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
  4. ह्या प्रोफाइल ला वारंवार भेट देऊ नये. बॅंड विड्थ मर्यादित आहे. आम्ही बॅंड विड्थ चे पैसे भरतो.
  5. या प्रोफाइल वरचा मजकूर इतरत्र कोपी पेस्ट केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
  6. प्रोफाइल वरचे फोटो मनोरंजना साठी लावले आहेत. त्याचा खासगी मालमत्ते सारखा वापर करू नये.
  7. फोटो जास्त वेळ बघू नयेत. फोटोची झीज झाल्यास दंड पडेल.
  8. ही देशपांड्यांची खासगी जागा आहे. आत पाहण्यासारखे काही नाही.
  9. अनोळखी व्यक्तिंनी भेट देऊ नये. अपमान झाल्यास आम्ही जबाबदार नाही.
  10. फिरत्या ओनलाईन विक्रेत्यानि आत येऊ नये. त्यांच्या कंप्यूटर मध्ये व्हायरस गेल्यास आम्ही जबाबदार नाही.
  11. वाट्टेल तिथे उगाच क्लिक करत बसू नये. काही मोड्तोड झाल्यास खर्च भरून द्यावा लागेल.
  12. ही कामाची जागा आहे. गप्पा मारायचा आड्डा नाही.

passions:
पुण्यातल्या प्रत्येक गोष्टी बाबत जाज्वल्य अभिमान बाळ्गणे.

sports:

  1. पुण्यातल्या रस्त्यां मधून वाहन चालवणे.
  2. वाहने चालवताना गप्पा मारणे.
  3. चालत्या बस मधून उतरणे वा चढणे.
  4. गाडीच्या होर्न चा वाद्या सारखा उपयोग करणे.

activities:

  • आपल्या मालकीच्या प्रत्येक वस्तू वर पाट्या लावून दुसरयांना सतत उपदेशाचा डोस पाजणे.
  • अड्ड्यावर कोंडाळे जमवून आपल्या जिभेची धार वाढवण्याचा सराव करणे.
  • प्रत्येक व्यक्तीचे दर आठवड्याला बारसे करणे. ( दर आठवड्याला नवीन टोपण नाव ठेवणे)
  • सिंहगडा वर जाणे. ( फक्त गाडीने!!)
  • टोमणे मारणे.
  • "आपले ठेवायच झाकून आणि दुसर्‍याच पाहायाच वाकून" या उक्तिचे कटाक्षाने पालन करणे.
  • फोन वर कधीही हेलो चा वापर न करणे.
  • दुसर्‍याच्या पार्ट्याना आधी दिवसभर न जेवता जाणे.
  • स्वता: च्या पार्टीला पाकीट अशक्त आहे म्हणून आयत्या वेळी टांग मारणे.
  • घरच्या घरी पतंगाचा मांजा बनवणे.
  • सायकल वरुन जाताना वृद्ध इसमास "ए बाळ बाजूला हो", अश्या आपल्या वयास न शोभणार्‍या हाका मारत जाणे.
  • सायकल वरुन जाताना केळिवाल्याला केळ्यांचा भाव विचारत जाणे.
  • दुपारी एक ते चार दुकान बन्द ठेवणे.
  • मिठाईच्या दुकानात देखील "इथे हवा भरून मिळेल का?" अशी निरागस चेहर्याने चौकशी करणे.
  • घरात झुरळे मारायची उदबत्ती लावून बाहेर पसार होणे, आणि शेजार्यांची गम्मत बघण्यासाठी संध्याकाळी उशिरा उगवणे.
  • वरच्या मजल्यावर ठोका ठोक चालू असल्यास खालून काठीने ठोकून वरच्या मजल्यावरच्या लोकाना इशारा देणे.
  • मित्रांमध्ये एकमेकाला वडिलांच्या नावाने संबोधणे.
  • काही अभिनव पाट्या

    • क्रुपया खिडकीतुन पत्र टाकु नयेत. आमटीत पड्तात. चव बिघडते.
    • लाकडी जीन्यावर : चढण्यासाठी वापर करावा... वाजवण्यासाठी नव्हे.
    • होटेल मधे : कामाशीवाय बसु नये..
    • दुपारी १ ते ४ दार वाजवु नये. येथे माणसे रहातात व ती दुपारी झोपतत..
    • अपमान कसा होतो ते पहायचे असल्यास वाजवुन पहा....
    • कोर्या कागदाची झेरोक्स काधुन मिळेल.
    • येथे कचरा टाकू नये साभार परत केला जाईल

    सौजन्य: बोलघेवडा

    हाच लेख माझ्या ब्लाग वर वाचा
    http://shaniwarpethi.blogspot.com/2010_03_01_archive.html

    बरं. मग?

    1

    बरं. मग?

    यातली बरीच वाक्ये आमचे मित्र

    2

    यातली बरीच वाक्ये आमचे मित्र परा यांच्या खवत देखील आहेत तिकडे.


    -पुण्याचे पेशवे

    होय होय. ते ११ नियम आहेतच!

    3

    होय होय. ते ११ नियम आहेतच! नक्की!

    काय रे मेघवेड्या ... हा लेखक

    4

    काय रे मेघवेड्या ... हा लेखक तुझे विडंबण काय ? Laughing out loud

    -हॉलकेवढा

    आयडींच्या 'विडंबणांचे' आयडी??

    5

    आयडींच्या 'विडंबणांचे' आयडी?? कल्पना भारीये!!

    असं झालं तर गुर्जींच्या नावाच्या आयडींची होलसेल मध्ये विक्री करशील तू टार्‍या!! wink आणि वाट्टेल त्या रेटला!!

    Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

    - बोलकेवढा?

    हा हाहा

    6

    अगदी !! पण मेल्या .. आमच्या कडे खुप व्हरायटी आहे ... गुर्जी ब्राड तर वन ऑफ मेनी आहे नं ? मंग ?
    असो wink

    - रॉडएवढा

    येस्स! पण गुर्जी ब्रॅण्ड

    7

    येस्स! पण गुर्जी ब्रॅण्ड सर्वाधिक लोकप्रिय आहे नं! मंग?

    आणि मेल्या मी 'बोलकेवढा' हे रेट बद्दल म्हणत होतो.

    Laughing out loud Laughing out loud

    -- खोलतेवढा

    मस्तच....

    8

    मस्तच....


    "Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

    मस्त !!! काहीही म्हण आवडले

    9

    मस्त !!!

    काहीही म्हण आवडले ब्वा !!

    कालपरवा एका टपरीवर मिसळ खाल्ली,तेथे पाटी होती ' येथे 'टोकन-पध्दत' नाही ', मला वाटले असे का ? सहज शेजारच्या टपरीवर नजर गेली तर त्यावर पाटी होती 'कृपया आधी टोकन घ्यावे' Laughing out loud

    :)

    10

    लेका तू बरा अशा ठिकाणी टपकतोस रे. Laughing out loud

    आवडले... अर्थात पुणेकरांवर

    11

    आवडले...
    अर्थात पुणेकरांवर लिहीलेले काहीही आम्हाला चघळायला आवडते ;-)


    *************************************************************************************
    आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

    ऐसी अक्षरे मेळविन

    पुणे ना !

    12

    काय बोलणार ?

    बरे झाले...

    13

    बरे झाले तुला काय बोलनार असा प्रश्न पदला आणि तु काहि नाहि बोलला...

    असा प्रश्न पदला अरे अरे

    14

    असा प्रश्न पदला Laughing out loud
    अरे अरे अरे............ कोण रे तो शुद्ध लेखनाचा आग्रह नसावा म्हणणारा.............


    --------------------------------------------------------------------------
    एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
    संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते