बॉम्बस्फोट आणि मी - भाग २
भाग १
....
जोरदार आवाज होताच काय होतय हे समजण्याच्या आतच माझ्या पाठीला जोरात फटका बसला अन त्याचवेळेस पायातुन एक जीवघेणी कळ डोक्यापर्यंत गेली. भयानक वेदनेने तोंडातुन आवाजही आला नाही आणि मी जवळजवळ जमीनीवर कोसळलो. त्याचवेळेस चहुबाजुंनी एकच आवाज येत होता, त्या आवाजातच नाऽना असा रमेश व गिताचा आवाज मिसळला जावुन मला काहीच समजेनासे झाले होते. धुराळ्यात काहिच दिसत नव्हते व पायातील पाठीतील वेदना विचार सुचु देत नव्हत्या.
एखाददिड मिनिटानंतर हळुच पाहिले तर... माझ्या मागील बाजुस सुमारे ७०-८० फुटावर एक भयानक बॉम्बस्फोट झाला असे दिसले. एका पावभाजीच्या गाडीजवळ झालेला तो स्फोट तिथे उभ्या असलेल्या अनेकांना या जगातुन कायमचे घेवुन
गेला होता तर अनेक जणांना जखमी करुन गेला होता. डोळे पाण्याने भरलेले होवुन काहिच दिसेनासे झाले अन रमेश व गिता कोठे आहेत म्हणुन मी समोर पाहिले तर काय..
गीता पोटाशी हात दाबुन खाली जमीनीवर बसलेली होती तर रमेश माझ्यासमोर असल्याने कमी जखमी झाला होता. कुठलातरी एक लोखंडी पत्र्याचा लहानसाच तुकडा पण गीतेच्या पोटात घुसल्याने असह्य वेदनेने किंचाळतच ती खाली बसली
होती. रक्तस्राव चालुच होता. रमेश तोंडावर, अंगावर धुळ व रक्ताचे शिंतोडे उडाल्याने धुळवडीत रंगल्यासारखा दिसत होता पण त्यावेळेस त्याचे ते रुप पाहुन मनात काहीच भावना येत नव्हत्या. त्याच्याही पायाला हाताला कुठे कुठे खरचटल्याच्या जखमा झाल्या होत्या पण तो बराच नीट असल्याचे पाहुन मी त्याला पटकन गीतेला दवाखान्यात नेण्याची विनंती केली.
हळु हळु आजुबाजुनी लोकांचा समुह जमायला सुरवात झालेली होती. अशावेळी सर्वसामान्य माणुसच पटकन मदतीला धावतो असा माझा आजवरचा अनुभव याहीवेळेस खरा ठरला. अचानक एक तिशीचा मनुष्य चटकन धावत आला व आमच्याकडे पाहुन म्हणाला चला ह्या टैक्सीत बसा. मी रमेश व गीतेला जाण्यास सांगुन मी ठीक आहे. माझी
काळजी करु नका. या साहेबांबरोबर काही लोकांना मदत करता आली तर बघतो असे सांगुन आलेल्या माणसाला माझी ओळख करुन दिली व म्हणालो चला आपण पटकन काय जमते ते बघु. त्यानेही त्याची ओळख करुन देत त्याचे नाव नवीन असे सांगितले.
नवीन व मी जिथे स्फोट झाला तिकडे जावु लागलो. चालतांना मला फार त्रास होत होता. 'तुमचा पाय चांगलाच जखमी झालाय. तुम्ही दवाखान्यात जायला पाहिजे' नवीन
'हं. ठिक आहे. रक्त वहात नाहीये. माझ्यापेक्षा जास्त जखमी असतील ते आधी दवाखान्यात गेलेले बरे'
असे म्हणुन मी कमीतकमी हालचाल करावी अशी सुचना करुन नवीन व आणखीन काही लोक यांच्या मदतीने अनेक मृतदेह व जखमी माणसांना एकेक करुन दवाखान्यापर्यंत नेले. ते नेत असतांना एक चेहरा अचानक ओळखीचा असावा असे
वाटले पण रक्त धुळ यांनी चेह-यावर थर जमल्याने त्या व्यक्तिची नीट ओळख पटली नाही. ती वेळ पण ओळख पहात बसायची नव्हती. लवकरात लवकर मदत पोहोचणे महत्वाचे होते. सावकाश पोलिस आले. पंचनामा वगैरे गोष्टी चालु झाल्या.
सगळ्यात शेवटी नवीन मला जबरदस्तीने दवाखान्यात घेवुन गेला. डोक्टरांनी तपासुन काळजीचे कारण नाही. गरम काहितरी पाठीला लागल्याने जरा कातडी जळाली होती व बारिकसा स्पोक किवा असेच काहितरी पायात घुसुन जखम झाली होती. ८-१० दिवसांत मी व्यवस्थित होईल असा दिलासा मिळाल्याने जरी निश्चिंत झालो होतो तरी गीतेबद्दल काहिच माहिती नव्हती.
आता काय करावे हा विचार मनात येत होता तोच होस्पिटलच्या एका कोप-यात रमेश दिसला. रमेशकडे मी जावुन गीतेची चौकशी केली तेव्हा गीता सुखरुप आहे. पण खुप रक्त गेल्याने तिला थकवा आला असुन पोटाला टाके पडले होते. गीता
सुखरुप असल्याचे ऐकुन मला जो आनंद झाला होता त्याचे वर्णन करणे अशक्य आहे.
१० दिवसांनतर गीता घरी आली. अतिशय थकवा व तिच्या डोळ्यासमोरच तो स्फोट झाल्याने तिची मानसिक अवस्था पाहुन तिला एक दिड महीना आराम करण्यास सांगितले होते. त्यामुळे तीने सुट्टिचा अर्ज पाठवुन रजा मंजुर करुन घेतली
होती. मी १० दिवसांनंतर कामावर जायला लागलो. कामावर गेल्यावर सर्व मंडळी जी आधीहि भेटुन गेलीच होती त्यांनी गराडा करुन माझी व गीतेची चौकशी केली. कुलकर्णीची चौकशी केली तेव्हा त्याची होणारी वधु त्या स्फोटात मृत
झाल्याचे कळताच मला माझ्यावरच आभाळ कोसळल्याचे वाटले. अवघ्या १५ दिवसांवर कुलकर्णीचे लग्न होणार असल्याचे मला माहित होते. कुलकर्णी सुट्टीवर गेलेला असल्याने त्याची माझी भेट झाली नाही. आता तो चेहरा कुणाचा होता हा
पडलेला प्रश्न सुटला होता पण मनात दुःखाचे कढ देवुन. कुलकर्णीने आधीच सांगितल्यामुळे मी आता फोर्ट मधील ओफिसात जायला सुरवात केली होती. नवीन काम सुरू झाले होते.
या कामाच्या निमित्ताने त्या क्लायंटच्या ओफिसात गेलेलो असतांना तिथे नवीन भेटला. नवीन त्या क्लायंट कंपनीच्या संचालकांचा मुलगा. शेअर बाजार व संबधित क्षेत्राशी निगडीत व्यवहार करणारी ती कंपनी व नवीन, ज्याला मी
नवीनशेठ या नावाने हाक मारायचो , आमचे संबध हळुहळु चांगले दृढ होवु लागले.
गीता आता घरातल्या घरात हिंडु फिरु लागली होती. मी एकदोन दिवसाआड जावुन तिच्या बरोबर गप्पा मारत असे. तिला घडले्या पाहिलेल्या त्या दृश्यांचा विसर पडावा याकरिता मी जे जे करणे शक्य होत असे ते ते करीत असे. पण
गीतेचा पुर्वीचा मोकळा स्वभाव आता जरासा अबोल झाल्या सारखा वाटत होता. भरपुर गप्पा मारणारी गीता एक दोन शब्द किंवा वाक्यातच संभाषण संपवत असे. मी तरीही तीने बोलावे हसावे याचा प्रयत्न करित होतो.
एक दिवस अचानक गप्पा मारता मारता गीता म्हणाली 'नाना'
'बोल?'मी
'नाना. तु लग्न कर'
'हो ते तर करायचच आहे. तु बरी तर हो आधी. तु अशी आजारी. हनीमुनला कसा काय तुला नेवु?'
'गप रे. मी काय बोलते ते तर ऐक. चाललाय लगेच ... दुसर काही सुचत नाही का रे तुम्हा पोरांना?'
'ऑ. म्हणजे किती पोरांनी तुला विचारले?' वातावरणातला तणाव कमी करण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न
'आता गप्प बैस. मी काय म्हणते ते ऐक'
'हं बोल. मी एकदम गप्प बसतो. ओके'
'नाना. मी तुला उत्तर पुर्ण द्यायच्या आतच ते घडल. मला हे ठीक नाही वाटत. मला वाटत की तु माझ्याशी लग्न करुन सुखी नाही होणार. तु दुस-या चांगल्या मुलीशी लग्न कर.'
कशीबशी गीताची समजुत घालुन, तु आधी बरी हो मग आपण चर्चा करु असे समजावुन सांगुन मी घरी गेलो.
गीतेची समजुत कशी घालावी असा विचार चालु असतांनाच तिला एक दिवस चल सिनेमाला जावुया का असे विचारले. घरी बसुन कंटाळली असल्याने ती पटकन तयार झाली. चित्रपट सुरु झाल्यावर मी धीर करुन हात गीतेच्या खांद्यावर टाकला. गीतेने हळुच माझ्याकडे हसुन पाहीले व माझ्याकडे थोडी सरकुन बसली. चित्रपट चालु होता ..खांद्यावर टाकलेला हात हळुहळू आपले काम करत होता. आज तो चित्रपट कुठला होता, कोण कलाकार होते, काय कथा होती काहिच आठवत नाही. पण त्याक्षणी आलेले एक मळम दुर झाले होते.
कुलकर्णी कामावर यायला लागला होता. तो वरळीत व मी फोर्टमधे असल्याने आमचा संपर्क कमी झाला होता. तरी जेव्हा भेटत असे तेव्हा मी आवर्जुन त्याची विचारपुस करत असे. त्याचे वागणे थोडे तुसड्यासारखे झाले होते पण आयुष्यात
अचानक घडणा-या सुखद वा दुःखद घटना माणसाचा स्वभाव बदलवतात. त्यामुळे मी या गोष्टीचा तेव्हा जास्त विचार केला नाही.
गीता आता कामावर येवु लागली. नवीन कामात गीता पुर्वी भाग घेणार होती पण जवळपास दोन महीने सुट्टी झाल्याने कंपनीने तिला दुस-या कामावर नेमले. तिला आता वरळीत कामावर जावे लागत असे. कुलकर्णीच्या हाताखाली गीता काम
करत होती.
एके रविवारी रमेश, गीता, मी असे गीताच्या घरी बसलेलो होतो. अचानक कुलकर्णी घरी आला. कुलकर्णी यापुर्वी कधी गीतेच्या घरी आला नव्हता त्यामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो. आल्याआल्या त्याने पेढ्यांचा पुडा
गीतेला दिला. आणि आम्ही काय ? कशाचे? हे विचारायच्या आतच खुलासा केला की तो आता नवीन कंपनी चालु करत असुन त्याचे ते पेढे होते. त्याच्या कंपनीला पहिली ओर्डर पण मिळाली होती व गीता सध्या ज्या कामात तज्ञ होती तेच काम त्याला मिळाले होते. गीता त्याच्या कंपनीत येईल काय हे विचारण्यासाठी तो स्वतः घरी आला होता.
तो गेल्यानंतर आमची चर्चा चालु असतांना गीता त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक दिसली म्हणुन मी पण जास्त आढेवेढे न घेता त्याच्या कंपनीत जा असे सांगितले. कंपनी बनविणे व बाकी पुर्तता करणे यात बराच वेळ जाणार होता
तोपर्यंत गीता राजीनामा देणार नव्हती. कुलकर्णी राजीनामा देवुन निघुन गेला होता. कुलकर्णी कधी कधी पुढील गोष्टींची चर्चा करण्यासाठी गीतेला भेटत असे. माझ्याशी तो विशेष बोलत नसे किंवा तशी गरजही पडत नसे.
एक दिवस गीतेकडे गेलो होतो. ती अजुन आली नव्हती. गीतेचे वडील, रमेश व मी गप्पा मारत बसलो होतो तोच गीता आली. शांतपणे आमच्या मधे येवुन बसली होती. चर्चेचा रागरंग पाहुन मधेच ती म्हणाली 'बाबा, नाना ... मला काही
सांगायचय..'
आणि तिने जे काही सांगितले ते ऐकुन माझ्या डोक्यावर बॉम्बस्फोट झाला.....

.jpg)
क आणि ड आणि क!! आता पुढे काय
क आणि ड आणि क!!
आता पुढे काय
मस्त वेग!
अजून क्रमशः आहेच का.
असो.
लिहा पटापट.
नेहमीप्रमाणेच छान झालाय हा भाग.
खंगरी.....
मस्त लिहितो आहेस. वाचतोय.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
वाचतोय
येउ द्यात
वाचतो आहे रे..... लवकर येऊ
वाचतो आहे रे..... लवकर येऊ दे.. पुढील भाग...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हम्म
अशुभाची चिन्हे तर नाहीत?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
वाचिंग अॅंड वाट बघिंग फॉर
वाचिंग अॅंड वाट बघिंग फॉर नेक्स्ट पार्ट.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
नाना
पुढचा भाग लवकर टाक रे.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
वाचतोय
वाचतोय
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन