नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन )

0
0

मराठी मध्ये सध्या विडम्बनाला चांगले दिवस आहेत. याच लाटेचा फायदा घेऊन मी हि 'पोळी' गरम तव्यावर भाजून घेतली आहे. या कवितेचे मूळ कवी श्री. संदीप खरे आणि संगीतकार श्री. सलील कुलकर्णी, तमाम मराठी वाचक यांची माफी मागून आणि कै. आचार्य अत्रे यांना स्मरून मी हि माझी "फणसाची फुले" आपल्याला सदर करत आहे. कृपया गोड मानून घ्यावीत.

नसतेस घरी तू तेव्हा...

नसतेस घरी तू तेव्हा, कप फुटका फुटका होतो,
गिळण्याचे होती वांदे, अन खिसा फाटका होतो.

दुध नासून साय विरावी, कल्लोळ तसा ओढवतो,
हा चहा चवहीन होतो, तरी मलाच प्यावा लागतो. || नसतेस घरी तू तेव्हा...

येतात उन्हें दाराशी, पारोसा तरी मी असतो
खिडकीवर टॉवेल ओला, तव गंध हा कुजका येतो. || नसतेस घरी तू तेव्हा...

तू सांग सखे मज काय, मी सांगू या गॅसवाल्या,
ज्योतीची आच हि मंद, अन नसे स्टोव्ह हा घरात. || नसतेस घरी तू तेव्हा...

- बोलघेवडा

हेच लेखन माझ्या ब्लाग वर वाचा
http://shaniwarpethi.blogspot.com/2010/05/blog-post.html

{हा हा हा !! मस्तच...}

1

हा हा हा !!

मस्तच...


Hope is a good thing...

{मस्त.}

2

मस्तच. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{फणसाची फुले}

3

ह्या फणसाच्या फुलांचा वास चहूकडे पसरो!
-अशोक


आपला स्नेहांकित...
-अशोक

{मस्त}

4

मस्त

{असो..........माझ्या प्रिय }

5

असो..........माझ्या प्रिय गाण्याचे विडंबन करणा-याला संदीप माफ करो.

{+१ असेच म्हणते. पण विडंबन छान}

6

+१
असेच म्हणते.

पण विडंबन छान जमलं आहे.

{येतात उन्हें दाराशी, पारोसा}

7

येतात उन्हें दाराशी, पारोसा तरी मी असतो
खिडकीवर टॉवेल ओला, तव गंध हा कुजका येतो. || नसतेस घरी तू तेव्हा...

१००% खरय angery

{लै भारी!}

8

फर्मास जमलया इडंबन! हास्य


*क्रान्ति*
नाही दु:खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल

{:)}

9

हास्य